Lucas 10

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (MAR) vs VC

Sair da comparação
VC Versão Católica
1 यानंतर प्रभूने आणखी सत्तर जणांस नेमून ज्या ज्या नगरांत व ज्या ज्याठिकाणी तो स्वतः जाणार होता तेथे दोघे असे त्यांना आपल्यापुढे पाठवले.
1 Depois disso, designou o Senhor ainda setenta e dois outros discípulos e mandou-os, dois a dois, adiante de si, por todas as cidades e lugares para onde ele tinha de ir.
2 तो त्यांना म्हणाला, “पीक फार आहे परंतु कामकरी थोडके आहेत, यास्तव पिकाच्या प्रभूने आपल्या पिकात कामकरी पाठवावे म्हणून तुम्ही त्याची प्रार्थना करा.”
2 Disse-lhes: Grande é a messe, mas poucos são os operários. Rogai ao Senhor da messe que mande operários para a sua messe.
3 जा; पाहा, लांडग्यांच्या मध्ये जसे कोंकरांस पाठवावे तसे मी तुम्हास पाठवतो.
3 Ide; eis que vos envio como cordeiros entre lobos.
4 पिशवी किंवा झोळी किंवा वहाणा घेऊ नका व वाटेने कोणाला सलाम करू नका.
4 Não leveis bolsa nem mochila, nem calçado e a ninguém saudeis pelo caminho.
5 तुम्ही ज्या कोणत्याही घरात जाल तेथे पहिल्याने, या घराला शांती असो असे म्हणा.
5 Em toda casa em que entrardes, dizei primeiro: Paz a esta casa!
6 जर तेथे कोणी शांतिप्रिय मनुष्य असला तर तुमची शांती त्याच्यावर राहील; पण तो नसला तर ती तुमच्याकडे परत येईल.
6 Se ali houver algum homem pacífico, repousará sobre ele a vossa paz; mas, se não houver, ela tornará para vós.
7 तुम्ही त्याच घरात राहून ते देतील ते खातपीत जा; कारण कामकरी आपल्या मजुरीस योग्य आहे; घरोघरी फिरू नका.
7 Permanecei na mesma casa, comei e bebei do que eles tiverem, pois o operário é digno do seu salário. Não andeis de casa em casa.
8 आणि तुम्ही ज्या कोणत्याही नगरांत जाल आणि ते तुम्हास स्वीकारतो, त्यामध्ये ते जे तुमच्यापुढे वाढतील ते खा,
8 Em qualquer cidade em que entrardes e vos receberem, comei o que se vos servir.
9 आणि त्यामध्ये जे दुखणाईत असतील त्यांना बरे करा व त्यांना सांगा की, देवाचे राज्य तुमच्याजवळ आले आहे.
9 Curai os enfermos que nela houver e dizei-lhes: O Reino de Deus está próximo.
10 परंतु तुम्ही ज्या कोणत्याही नगरांत जाल आणि ते तुमचे स्वागत नाही केले तर रस्त्यांवर बाहेर जाऊन असे म्हणा,
10 Mas se entrardes nalguma cidade e não vos receberem, saindo pelas suas praças, dizei:
11 तुमच्या नगराची धूळ आमच्या पायांला लागली ती देखील आम्ही तुमच्याविरुध्द झाडून टाकतो; तरी हे जाणा की देवाचे राज्य जवळ आले आहे.
11 Até o pó que se nos pegou da vossa cidade, sacudimos contra vós; sabei, contudo, que o Reino de Deus está próximo.
12 मी तुम्हास सांगतो की त्यादिवशी सदोमाला त्या नगरापेक्षा अधिक सोपे जाईल.
12 Digo-vos: naqueles dias haverá um tratamento menos rigoroso para Sodoma.
13 “हे खोराजिना, तुला हाय! हे बेथसैदा, तुला हाय! कारण तुमच्यामध्ये जी सामर्थ्याची कृत्ये होत आहेत ती जर सोर व सिदोन यांच्यामध्ये झाली असती तर त्यांनी मागेच गोणताट अंगावर घेऊन व राखेत बसून पश्चात्ताप केला असता.
13 Ai de ti, Corozaim! Ai de ti, Betsaida! Porque, se em Tiro e Sidônia tivessem sido feitos os prodígios que foram realizados em vosso meio, há muito tempo teriam feito penitência, cobrindo-se de saco e cinza.
14 यामुळे न्यायकाळी सोर व सिदोन यांना अधिक सोपे जाईल.
14 Por isso haverá no dia do juízo menos rigor para Tiro e Sidônia do que para vós.
15 हे कफर्णहूमा, तू आकाशापर्यंत उंचावला जाशील काय? तू नरकापर्यंत उतरशील.
15 E tu, Cafarnaum, que te elevas até o céu, serás precipitada até aos infernos.
16 जो शिष्यांचे ऐकतो तो माझे ऐकतो आणि जो शिष्यांना नाकारतो तो मला नाकारतो आणि जो मला नाकारतो तो ज्याने मला पाठवले त्यास नाकारतो.”
16 Quem vos ouve, a mim ouve; e quem vos rejeita, a mim rejeita; e quem me rejeita, rejeita aquele que me enviou.
17 ते सत्तर लोक आनंदाने परतले आणि म्हणाले, “प्रभू, तुझ्या नावाने भूतेसुद्धा आम्हास वश होतात!”
17 Voltaram alegres os setenta e dois, dizendo: Senhor, até os demônios se nos submetem em teu nome!
18 तेव्हा तो त्यांना म्हणाला, “मी सैतानाला आकाशातून विजेसारखे पडताना पाहिले!
18 Jesus disse-lhes: Vi Satanás cair do céu como um raio.
19 पाहा, मी तुम्हास साप आणि विंचू यांना तुडविण्याचा व शत्रूच्या सर्व सामर्थ्यावर अधिकार दिला आहे आणि कशानेच तुम्हास अपाय होणार नाही.
19 Eis que vos dei poder para pisar serpentes, escorpiões e todo o poder do inimigo.
20 तथापि तुम्हास दुष्ट आत्मे वश होतात याचा आनंद मानू नका तर तुमची नावे स्वर्गात लिहिली आहेत याचा आनंद माना.”
20 Contudo, não vos alegreis porque os espíritos vos estão sujeitos, mas alegrai-vos de que os vossos nomes estejam escritos nos céus.
21 त्या क्षणी तो पवित्र आत्म्यात आनंदीत झाला आणि म्हणाला, “हे पित्या, स्वर्गाच्या आणि पृथ्वीच्या प्रभू मी तुझी स्तुती करतो, कारण तू या गोष्टी ज्ञानी आणि बुद्धीमान लोकांपासून लपवून ठेवून त्या लहान बालकांस प्रकट केल्या आहेस. होय, पित्या कारण तुला जे योग्य वाटले ते तू केलेस.
21 Naquele mesma hora, Jesus exultou de alegria no Espírito Santo e disse: Pai, Senhor do céu e da terra, eu te dou graças porque escondeste estas coisas aos sábios e inteligentes e as revelaste aos pequeninos. Sim, Pai, bendigo-te porque assim foi do teu agrado.
22 माझ्या पित्याने सर्व गोष्टी माझ्यासाठी दिल्या होत्या आणि पुत्र कोण आहे हे पित्याशिवाय कोणालाच ठाऊक नाही आणि पुत्राशिवाय कोणालाही पिता कोण आहे हे माहीत नाही व ज्या कोणाला ते प्रकट करण्याची पुत्राची इच्छा असेल त्यालाच फक्त माहीत आहे.”
22 Todas as coisas me foram entregues por meu Pai. Ninguém conhece quem é o Filho senão o Pai, nem quem é o Pai senão o Filho, e aquele a quem o Filho o quiser revelar.
23 आणि शिष्यांकडे वळून तो एकांतात बोलला, “तुम्ही जे पाहता ते पाहणारे डोळे धन्य.
23 E voltou-se para os seus discípulos, e disse: Ditosos os olhos que vêem o que vós vedes,
24 मी तुम्हास सांगतो, अनेक राजांनी व संदेष्ट्यांनी तुम्ही जे पाहता ते पाहण्याची इच्छा बाळगली, परंतु त्यांनी ते पाहिले नाही आणि तुम्ही जे ऐकता ते ऐकण्याची इच्छा बाळगली, परंतु त्यांनी ते ऐकले नाही.”
24 pois vos digo que muitos profetas e reis desejaram ver o que vós vedes, e não o viram; e ouvir o que vós ouvis, e não o ouviram.
25 नंतर एक नियमशास्त्राचा शिक्षक उभा राहिला आणि त्याने येशूची परीक्षा पाहण्याचा प्रयत्न केला, तो म्हणाला, “गुरुजी, अनंतकाळचे जीवन मिळण्यासाठी मी काय केले पाहीजे?”
25 Levantou-se um doutor da lei e, para pô-lo à prova, perguntou: Mestre, que devo fazer para possuir a vida eterna?
26 तेव्हा येशू त्यास म्हणाला, “नियमशास्त्रात काय लिहिले आहे? तू त्यामध्ये काय वाचतोस?”
26 Disse-lhe Jesus: Que está escrito na lei? Como é que lês?
27 तो म्हणाला, “तू तुझा देव प्रभू याच्यावर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण आत्म्याने, पूर्ण शक्तीने प्रीती कर.” व स्वतःवर जशी प्रीती करतोस तशी तू आपल्या शेजाऱ्यावरही प्रीती कर.
27 Respondeu ele: Amarás o Senhor teu Deus de todo o teu coração, de toda a tua alma, de todas as tuas forças e de todo o teu pensamento {Dt 6,5}; e a teu próximo como a ti mesmo {Lv 19,18}.
28 तेव्हा येशू त्यास म्हणाला, “तू बरोबर उत्तर दिलेस, हेच कर म्हणजे तू जगशील.”
28 Falou-lhe Jesus: Respondeste bem; faze isto e viverás.
29 पण आपण योग्य प्रश्न विचारला आहे हे इतरांना दाखवून देण्यासाठी त्याने येशूला विचारले, “मग माझा शेजारी कोण?”
29 Mas ele, querendo justificar-se, perguntou a Jesus: E quem é o meu próximo?
30 येशूने उत्तर दिले, “एक मनुष्य यरूशलेम शहराहून यरीहोस निघाला होता आणि तो लुटारुंच्या हाती सापडला. त्यांनी त्याचे कपडे काढून घेऊन त्यास मारले व त्यास अर्धमेला टाकून ते निघून गेले.
30 Jesus então contou: Um homem descia de Jerusalém a Jericó, e caiu nas mãos de ladrões, que o despojaram; e depois de o terem maltratado com muitos ferimentos, retiraram-se, deixando-o meio morto.
31 तेव्हा त्याचवेळी एक याजक त्या रस्त्याने जात होता. याजकाने त्यास पाहिले, पण तो रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने निघून गेला.
31 Por acaso desceu pelo mesmo caminho um sacerdote, viu-o e passou adiante.
32 त्याच रस्त्याने एक लेवी त्याठिकाणी आला. लेव्याने त्यास पाहिले व तो सुद्धा रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने निघून गेला.
32 Igualmente um levita, chegando àquele lugar, viu-o e passou também adiante.
33 मग एक शोमरोनी त्याच रस्त्याने प्रवास करीत असता तो होता तेथे आला त्या मनुष्यास पाहून त्यास त्याचा कळवळा आला
33 Mas um samaritano que viajava, chegando àquele lugar, viu-o e moveu-se de compaixão.
34 तो त्याच्याजवळ आला त्याच्या जखमांवर तेल व द्राक्षरस ओतून त्या बांधल्या आणि त्यास आपल्या गाढवावर बसवून त्यास उतारशाळेत आणले व त्याची देखभाल केली.
34 Aproximando-se, atou-lhe as feridas, deitando nelas azeite e vinho; colocou-o sobre a sua própria montaria e levou-o a uma hospedaria e tratou dele.
35 दुसऱ्या दिवशी त्याने दोन चांदीचे नाणे काढले आणि उतारशाळेच्या मालकाला दिले व म्हणाला, ‘याची चांगली देखभाल कर म्हणजे यापेक्षा जे तू अधिक खर्च करशील ते मी परत आल्यावर तुला देईन.’
35 No dia seguinte, tirou dois denários e deu-os ao hospedeiro, dizendo-lhe: Trata dele e, quanto gastares a mais, na volta to pagarei.
36 लुटारुंच्या तावडीत जो मनुष्य सापडला होता, त्याचा त्या तिघांपैकी कोण खरा शेजारी होता असे तुला वाटते?”
36 Qual destes três parece ter sido o próximo daquele que caiu nas mãos dos ladrões?
37 तो नियमशास्त्राचा शिक्षक म्हणाला, “ज्याने त्याच्यावर दया केली तो.” तेव्हा येशू त्यास म्हणाला, “जा आणि तूही तसेच कर.”
37 Respondeu o doutor: Aquele que usou de misericórdia para com ele. Então Jesus lhe disse: Vai, e faze tu o mesmo.
38 मग येशू आणि त्याचे शिष्य त्याच्या मार्गाने जात असता, तो एका गावात आला. तेथे मार्था नावाच्या स्त्रीने त्याचे स्वागत करून आदरातिथ्य केले.
38 Estando Jesus em viagem, entrou numa aldeia, onde uma mulher, chamada Marta, o recebeu em sua casa.
39 तिला मरीया नावाची एक बहीण होती, ती प्रभूच्या पायाजवळ बसली व तो काय बोलतो हे ऐकत राहिली.
39 Tinha ela uma irmã por nome Maria, que se assentou aos pés do Senhor para ouvi-lo falar.
40 पण मार्थेची अति कामामुळे तारांबळ झाली. ती येशूकडे आली आणि म्हणाली, “प्रभू, माझ्या बहिणीने सर्व काम माझ्यावर टाकले याची तुला काळजी नाही काय? तेव्हा मला मदत करायला तिला सांग.”
40 Marta, toda preocupada na lida da casa, veio a Jesus e disse: Senhor, não te importas que minha irmã me deixe só a servir? Dize-lhe que me ajude.
41 प्रभूने उत्तर दिले, “मार्था, मार्था, तू पुष्कळ गोष्टीविषयी दगदग करतेस.
41 Respondeu-lhe o Senhor: Marta, Marta, andas muito inquieta e te preocupas com muitas coisas;
42 पण एकच गोष्ट आवश्यक आहे. हे मी सांगतो आणि मरीयेने तिच्यासाठी चांगला वाटा निवडला आहे. तो तिच्यापासून काढून घेतला जाणार नाही.”
42 no entanto, uma só coisa é necessária; Maria escolheu a boa parte, que lhe não será tirada.

Ler em outra tradução

Comparar com outra

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Lucas 10, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.