Juízes 2
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (MAR) vs NTLH
1 परमेश्वराचा दूत गिलगालाहून वर बोखीमास चढून आला आणि तो म्हणाला, “मी तुम्हाला मिसरातून काढले आणि तुमच्या पूर्वजांना शपथेवर देऊ केलेल्या देशात आणले; तुमच्याशी केलेला माझा करार मी कधी मोडणार नाही;
1 O Anjo do Senhor foi de Gilgal a Boquim e disse aos israelitas: — Eu tirei vocês da terra do Egito e os trouxe à terra que havia prometido aos seus pais. Eu disse: “Nunca quebrarei a
2 तुम्ही या देशात राहणाऱ्यांशी काही करार करू नका; तुम्ही त्यांच्या वेद्या मोडून टाका, असे मी तुम्हाला सांगितले होते, पण तुम्ही माझी वाणी ऐकली नाही. तुम्ही हे काय केले?
2 Não façam nenhum acordo com os moradores desta terra. Pelo contrário, derrubem os altares deles.” Mas vocês não fizeram o que eu disse. Em vez disso, vejam o que fizeram!
3 आणि म्हणून मी देखील म्हणालो, मी कनानी लोकांस तुमच्यासमोरून घालवून देणार नाही; पण ते तुमच्या कुशीला काट्यासारखे होतील आणि त्यांचे देव तुम्हाला पाश होतील.”
3 Agora eu digo que não tirarei este povo do caminho de vocês. Eles serão seus inimigos, e os deuses deles vão ser tentações para vocês.
4 परमेश्वराचा दूत जेव्हा सर्व इस्राएल लोकांस हे शब्द बोलला, तेव्हा त्यांनी मोठा आक्रोश केला आणि रडले
4 Quando o Anjo terminou de falar, todo o povo de Israel começou a chorar.
5 त्यांनी त्या जागेचे नाव बोखीम असे ठेवले. तेथे त्यांनी परमेश्वरास यज्ञ अर्पण केले.
5 Por isso aquele lugar é chamado de Boquim . E ali eles ofereceram sacrifícios a Deus, o Senhor .
6 जेव्हा यहोशवाने लोकांस निरोप देऊन पाठवून दिले तेव्हा इस्राएलाचे लोक देश आपल्या मालकीचा करून घ्यायला प्रत्येकजण आपल्या वतनास गेले.
6 Josué mandou embora todo o povo de Israel, e cada homem foi tomar conta do seu pedaço de terra.
7 यहोशवाच्या सर्व दिवसात, आणि यहोशवाच्या मरणानंतर जिवंत राहिलेल्या ज्या वडील लोकांनी परमेश्वराने इस्राएलासाठी केलेली महान कामे पाहिली होती त्यांच्या सर्व दिवसात लोकांनी परमेश्वराची सेवा केली.
7 O povo de Israel serviu a Deus, o Senhor , enquanto Josué viveu. Depois que ele morreu, eles ainda continuaram a servir o Senhor enquanto viveram os líderes que tinham visto tudo o que o Senhor havia feito por Israel.
8 परमेश्वराचा सेवक नूनाचा मुलगा यहोशवा हा एकशे दहा वर्षांचा होऊन मरण पावला.
8 Josué, filho de Num, servo do Senhor , morreu com a idade de cento e dez anos.
9 एफ्राइमाच्या डोंगराळ प्रदेशातील गाश डोंगराच्या उत्तरेस तिम्नाथ-हेरेस येथे त्यांच्या वतनाच्या सीमेवर त्यांनी त्यास पुरले.
9 Ele foi sepultado no seu próprio pedaço de terra, em Timnate-Heres, na região montanhosa de Efraim, ao norte do monte Gaás.
10 ती सर्व पिढी पूर्वजांना मिळाल्यानंतर जी दुसरी पिढी उदयास आली तिला परमेश्वराची आणि त्याने इस्राएलासाठी केलेल्या कामाची ओळख नव्हती.
10 Todas as pessoas daquela geração também morreram e os seus filhos esqueceram o Senhor e as coisas que ele havia feito pelo povo de Israel.
11 इस्राएल लोक परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ते करून बआल देवांची सेवा करू लागले;
11 Então o povo de Israel pecou contra Deus, o Senhor , adorando os deuses dos cananeus.
12 आपल्या पूर्वजांचा देव जो परमेश्वर, ज्याने त्यांना मिसर देशातून बाहेर आणले त्याचा त्यांनी त्याग केला व अन्य लोकांच्या देवांच्या नादी लागले, आणि त्यांच्या पाया पडले. त्यांनी परमेश्वरास क्रोधाविष्ट केले.
12 Eles deixaram de adorar o Senhor , o Deus dos seus antepassados, que os havia tirado do Egito. Começaram a seguir outros deuses, os deuses dos povos que viviam ao seu redor. Eles adoraram esses deuses e assim fizeram o Senhor ficar muito irado .
13 परमेश्वराचा त्याग करून त्यांनी बआल आणि अष्टारोथ यांची उपासना केली;
13 Abandonaram a Deus, o Senhor , e adoraram Baal e Astarote .
14 इस्राएलावर परमेश्वराचा कोप भडकला, त्याने त्यांना लुटणाऱ्यांच्या हवाली केले, त्यांनी त्यांची मालमत्ता लुटली; त्याने त्यांना त्यांच्या आसपासच्या शत्रूंच्या हाती गुलाम म्हणून विकले, म्हणून त्यांचा आपल्या शत्रूंसमोर टिकाव लागेना.
14 O Senhor ficou muito irado com o povo de Israel e deixou que eles fossem atacados e roubados por povos vizinhos. Ele entregou os israelitas nas mãos dos inimigos que viviam ao redor, e por isso eles não puderam mais resistir.
15 परमेश्वराने त्यांना शपथपूर्वक सांगितल्याप्रमाणे जेथे इस्राएल लढण्यास जात तेथे त्यांच्याविरुद्ध परमेश्वराचा हात पडून त्यांचा पराभव होई आणि ते फार संकटात पडत.
15 Sempre que saíam para lutar, o Senhor ficava contra eles, como tinha dito. Assim eles ficaram numa situação muito difícil.
16 मग परमेश्वर न्यायाधीश उभे करी, ते त्यांना त्यांची मालमत्ता लुटणाऱ्याच्या हातून सोडवीत;
16 Então o Senhor Deus deu ao povo de Israel líderes fortes, chamados juízes, que os salvaram dos que os atacavam e roubavam.
17 तरी ते आपल्या न्यायाधीशांचे ऐकत नसत; ते व्यभिचारी बुद्धीने अन्य देवांच्या मागे लागले आणि त्यांची उपासना केली. त्यांचे पूर्वज परमेश्वराच्या आज्ञा पाळून ज्या मार्गाने चालले होते तो त्यांनी त्वरीत सोडून दिला आणि त्यांनी आपले पूर्वज करत असत तसे केले नाही.
17 Mas eles não deram atenção a esses líderes. Continuaram a desprezar a Deus e a adorar outros deuses. Os pais deles haviam obedecido aos mandamentos do Senhor , mas eles não obedeceram.
18 परमेश्वर जेव्हा त्यांच्यासाठी न्यायाधीश उभे करी तेव्हा त्या न्यायाधीशाबरोबर परमेश्वर असे आणि त्या न्यायाधीशाच्या सर्व दिवसात तो त्यांना त्यांच्या शत्रूंच्या हातून बचावीत असे; कारण त्यांच्यावर जुलूम करणारे व त्यांना गांजणारे यांच्यामुळे ते कण्हत असत; म्हणून देवाला त्यांची दया येई.
18 O Senhor lhes dava um líder e o ajudava. Enquanto esse líder vivia, o Senhor salvava o povo dos seus inimigos. Ele tinha pena dos israelitas porque eles sofriam na escravidão.
19 पण न्यायाधीश मरण पावला म्हणजे ते पुन्हा उलटून अन्य देवांची सेवा करीत व उपासना करीत व आपल्या पूर्वजांपेक्षा अधिक बिघडत. ते आपला दुराचार व दुराग्रह सोडीत नसत.
19 Mas, quando o líder morria, eles voltavam a viver como antes e se tornavam ainda piores do que os seus pais. Iam atrás de outros deuses, e os serviam, e adoravam. Teimavam em continuar nos seus maus caminhos.
20 तेव्हा इस्राएलावर परमेश्वराचा कोप भडकून तो म्हणाला, “मी या राष्ट्राच्या पूर्वजांशी केलेला करार ह्याने मोडला आहे आणि माझी वाणी ऐकली नाही;
20 Por isso o Senhor Deus ficou muito irado com o povo de Israel e disse: — Esta nação quebrou a
21 म्हणून यहोशवाच्या मृत्यू वेळी उरलेल्या राष्ट्रांपैकी कोणालाही मी देखील येथून पुढे त्यांच्या समोरून घालवून देणार नाही;
21 não expulsarei mais desta terra nenhuma das nações que Josué deixou quando morreu.
22 पण त्यांच्याकरवी मी इस्राएलाची परीक्षा करीन आणि त्यांच्या पूर्वजांनी परमेश्वराचे जसे मार्ग पाळले तसे ते चालतात की नाही हे मी पाहीन.”
22 Assim verei se os israelitas seguirão fielmente os meus caminhos, como os seus antepassados seguiram.
23 म्हणून परमेश्वराने त्या राष्ट्रांना घालवून देण्याची घाई केली नाही, त्यांना राहू दिले आणि त्यांना यहोशवाच्या हाती दिले नाही.
23 Assim o Senhor não expulsou logo da terra as nações que ele não tinha entregado a Josué, mas deixou que ficassem ali.
Atalhos do teclado
- Capítulo anterior←
- Próximo capítulo→
- Versículo anteriork
- Próximo versículoj
- Limpar seleçãoEsc
- Esta ajuda?
Estude este capítulo no WhatsApp
Peça à IA da Bíblia Fala para explicar Juízes 2, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.