Juízes 18
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (MAR) vs BKJ
1 त्या दिवसात इस्राएलावर कोणी राजा नव्हता, आणि त्या दिवसात दानाचा वंश वस्ती करण्यासाठी आपले वतन मिळवायाला पाहत होता; कारण त्या दिवसापर्यंत त्यास इस्राएलाच्या वंशांमध्ये वतनातला भाग मिळाला नव्हता.
1 Naqueles dias não havia rei em Israel; e naqueles dias a tribo dos danitas buscava para si uma herança para nela habitar; pois até aquele dia toda a sua herança ainda não lhes havia caído entre as tribos de Israel.
2 दानाच्या लोकांनी आपल्या सगळ्या वंशातून, सरा व अष्टावोल यांतून अनुभवी असे पाच शूर योद्धे पुरुष निवडून त्यांना देशाची टेहळणी व पाहणी करण्यासाठी पाठवले; तेव्हा त्यांनी त्यांना सांगितले, जा आणि तो देश पाहा. मग ते एफ्राइमाच्या डोंगराळ प्रदेशात मीखाच्या घरापर्यंत आले आणि त्यांनी रात्र तेथे घालवली.
2 E os filhos de Dã enviaram, das suas famílias, cinco homens dos seus termos, homens valentes, de Zorá e de Estaol, para espionar a terra, e para investigá-la; e eles lhes disseram: Ide, investigai a terra; os quais, quando chegaram ao monte Efraim, à casa de Mica, ali se alojaram.
3 ते मीखाच्या घराजवळ होते, तेव्हा त्यांनी त्या तरुण लेव्याचा शब्द ओळखला; यास्तव ते तिकडे वळून त्यास बोलले, “तुला इकडे कोणी आणले? आणि तू या ठिकाणी काय करतोस? तू येथे का आहेस?”
3 Quando eles estavam junto à casa de Mica, reconheceram a voz do moço, o levita; e se voltaram para lá, e lhe disseram: Quem te trouxe para cá? E o que fazes tu neste lugar? E, o que tens tu aqui?
4 तो त्यांना म्हणाला, “मीखाने माझ्यासाठी जे काही केले ते असे आहे, आणि मला मोलाने नियुक्त केले आणि मी त्याचा याजक झालो आहे.”
4 E ele lhes disse: Assim e assim tratou Mica comigo, e me contratou, e sou o seu sacerdote.
5 तेव्हा त्यांनी त्यास म्हटले, “तू कृपा करून देवाला सल्ला विचार की, आम्ही जो प्रवास करत आहोत तो सफल होईल किंवा नाही.”
5 E eles lhe disseram: Pede conselho, rogamos-te, de Deus, para que saibamos se o caminho no qual seguimos será próspero.
6 तेव्हा तो याजक त्यांना बोलला, “तुम्ही शांतीने जा; ज्या मार्गाने तुम्हाला जायचे आहे, त्यामध्ये परमेश्वर देव तुमचे मार्गदर्शन करील.”
6 E o sacerdote lhes disse: Ide em paz, diante do SENHOR está o caminho pelo qual vós seguis.
7 मग ती पाच माणसे निघाली आणि लईश येथे आली, आणि त्यांनी पाहिले की; ज्या प्रकारे सीदोनी अबाधित व सुरक्षित राहत होते; तसेच त्यामध्ये राहणारे लोक हे तेथे सुरक्षित आहेत. आणि देशात त्यांना कशा प्रकारेही त्रास देणारा किंवा त्यांच्यावर अधिकार गाजवणारा एकही जण तेथे नव्हता. ते सीदोन्यांपासून फार दूर राहत होते, आणि त्यांचे कोणाबरोबरही व्यावहारीक संबंध नव्हते.
7 Então os cinco homens partiram, e chegaram a Laís, e viram o povo que lá estava, como viviam de modo negligente, segundo o modo dos sidônios, tranquilos e seguros; e não havia nenhum magistrado na terra, que pudesse levá-los à vergonha em coisa alguma; e eles estavam longe dos sidônios, e não faziam negócios com homem algum.
8 नंतर ते सरा व अष्टावोल तेथे आपल्या वंशाजवळ आले; तेव्हा त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना विचारले, “तुमचा अहवाल काय आहे?”
8 E eles vieram até os seus irmãos em Zorá e Estaol; e os seus irmãos lhes disseram: O que dizeis vós?
9 ते म्हणाले, “चला! आपण त्यांच्यावर हल्ला करू! कारण आम्ही तो देश पाहिला आणि तो फार चांगला आहे. तुम्ही काहीच करणार नाही का? तुम्ही तो देश जिंकण्यासाठी आणि त्यावर चढाई करून ताब्यात घेण्यासाठी कंटाळा करू नका.
9 E eles disseram: Levantai-vos para que possamos subir contra eles; pois vimos a terra, e eis que é muito boa; e estais vós imóveis? Não sejais indolentes em ir, e em adentrar e possuir a terra.
10 तुम्ही तेथे जाल, तेव्हा ‘आम्ही अगदी सुरक्षित आहोत’ असा विचार करणाऱ्या लोकांकडे जाल, तसेच त्यांचा देश विस्तीर्ण आहे. देवाने ते तुम्हाला दिले आहेत. ती जागा अशी आहे की पृथ्वीवरील कोणत्याही गोष्टीची उणीव तेथे नाही.”
10 Quando vós partirdes, ireis a um povo seguro, e a uma terra vasta; pois Deus a tem dado nas vossas mãos; um lugar onde não há escassez de nada que esteja na terra.
11 मग तेथून, म्हणजे सरा व अष्टावोल यांतून दानाच्या कुळातले सहाशे पुरुष लढाईसाठी शस्त्रे घेऊन निघाले.
11 E partiram dali, da família dos danitas, de Zorá e de Estaol, seiscentos homens escolhidos com armas de guerra.
12 तेव्हा त्यांनी जाऊन यहूदातल्या किर्याथ-यारीम जवळ तळ दिला; यास्तव आजपर्यंत त्या ठिकाणाला महाने-दान, दानाची छावणी असे म्हणतात; ते किर्याथ-यारीमाच्या पश्चिमेस आहे.
12 E eles subiram, e acamparam em Quiriate-Jearim, em Judá; por isso eles chamaram aquele lugar de Maané-Dã até este dia; eis que fica atrás de Quiriate-Jearim.
13 मग ते तेथून पुढे एफ्राइमाच्या डोंगराळ प्रदेशात गेले आणि मीखाच्या घरापर्यंत आले.
13 E dali passaram ao monte Efraim, e chegaram até a casa de Mica.
14 तेव्हा जी पाच माणसे लईश प्रदेश हेरावयास गेली होती, त्यांनी आपल्या नातेवाईकांना असे सांगितले की, “या घरामध्ये याजकाचे एफोद व कुलदेवता, आणि कोरीव मूर्ती व ओतीव धातूची मूर्ती आहेत; हे तुम्हाला माहीत आहे काय? तर आता काय करायचे ते तुम्ही ठरवा.”
14 Então, responderam os cinco homens que foram espionar a região de Laís, e disseram aos seus irmãos: Sabeis que existe naquelas casas um éfode, e terafins, e uma imagem esculpida, e uma imagem fundida? Agora, portanto, considerai o que tendes de fazer.
15 मग त्यांनी तिकडे वळून मीखाच्या घरी त्या तरुण लेव्याच्या घरात जाऊन त्याचे क्षेमकुशल विचारले.
15 E eles se voltaram para aquela direção, e chegaram à casa do moço levita, à casa de Mica, e o saudaram.
16 नंतर दानाच्या वंशातली ती सहाशे माणसे आपल्या लढाईची शस्त्रे घेऊन प्रवेशद्वाराशी उभी राहिली.
16 E os seiscentos homens escolhidos, com as suas armas de guerra, que eram dos filhos de Dã, ficaram de pé à entrada do portão.
17 आणि जी पाच माणसे देश हेरायला गेली होती, त्यांनी आत शिरून, ती कोरीव मूर्त्ती, एफोद, कुलदेवता व ओतीव मूर्ती घेतली; त्या वेळी तो याजक शस्त्रसज्ज असणाऱ्या सहाशे मनुष्यांबरोबर दरवाजापुढे उभा होता.
17 E os cinco homens que foram espionar a terra subiram, e lá chegaram, e tomaram a imagem esculpida, e o éfode, e os terafins, e a imagem fundida; e o sacerdote estava de pé à entrada do portão com os seiscentos homens escolhidos, com as armas de guerra.
18 तर त्यांनी मीखाच्या घरात जाऊन ती कोरीव मूर्ती व ते एफोद व ते कुलदेवता व ती ओतीव धातूची मूर्ती घेतली असता, तो याजक त्यांना म्हणाला, “तुम्ही हे काय करत आहात?”
18 E estes entraram na casa de Mica, e removeram a imagem esculpida, o éfode, e os terafins, e a imagem fundida. Então, o sacerdote disse a eles: O que fazeis?
19 त्यांनी त्यास म्हटले, “तू शांत राहा! आपला हात आपल्या तोंडावर ठेव व आमच्याबरोबर चल, आणि आमचा बाप व आमचा याजक हो. एका मनुष्याचा याजक होऊन राहणे बरे की एका वंशाचा, आणि इस्राएलाच्या कुळाचा याजक व्हावे हे बरे? कोणते बरे?”
19 E eles lhe disseram: Fica em silêncio, repousa a tua mão sobre a tua boca, e vai conosco, e sê para nós pai e sacerdote; é melhor para ti ser um sacerdote da casa de um homem, ou que sejas sacerdote de uma tribo e de uma família de Israel?
20 तेव्हा त्या याजकाच्या मनास आनंद झाला; यास्तव तो, ते एफोद व ते कुलदेवता व ती कोरीव मूर्ती घेऊन त्या लोकांबरोबर गेला.
20 E o coração do sacerdote se alegrou, e ele tomou o éfode, e os terafins, e a imagem esculpida, e entrou no meio do povo.
21 अशा रीतीने ते तेथून वळले आणि दूर गेले. लहान मुलेबाळे, गुरेढोरे व त्यांची मालमत्ता ते आपल्यापुढे घेऊन चालले.
21 Assim, eles voltaram e partiram, e colocaram os pequenos e o gado e a carruagem adiante deles.
22 मीखाच्या घरापासून ते बरेच अंतर दूर गेल्यावर, ज्यांची घरे मीखाच्या घराजवळ होती, त्यांनी माणसे एकत्र बोलावली आणि ते दान वंशाच्या लोकांच्या पाठीस लागले.
22 E quando estavam a um bom caminho da casa de Mica, os homens que estavam nas casas próximas à casa de Mica se reuniram, e alcançaram os filhos de Dã.
23 त्यांनी दान वंशाच्या लोकांस हाक मारली; तेव्हा ते मागे वळून मीखाला म्हणाले, “तुला काय झाले म्हणून तू समुदाय घेऊन आलास.”
23 E eles gritaram aos filhos de Dã. E eles viraram as suas faces, e disseram a Mica: O que te aflige, para que venhas com tamanha companhia?
24 तो म्हणाला, “मी केलेले देव तुम्ही चोरले आणि माझ्या याजकाला तुम्ही घेऊन चालला, आणि आता मला दुसरे काही राहिले आहे काय? तर तुला काय झाले हे तुम्ही मला कसे विचारू शकता?”
24 E ele disse: Vós retirastes os meus deuses, os quais eu fabriquei, e o sacerdote, e fostes embora; e o que mais tenho eu? E o que é isto que vós me dizeis: O que te aflige?
25 मग दान वंशाच्या लोकांनी त्यास म्हटले, “तू आपला आवाज आम्हांला ऐकू देऊ नको; नाही तर आमच्यातली फार रागीट माणसे तुझ्यावर हल्ला करतील, आणि तू व तुझ्या घराण्याला मारून टाकतील.”
25 E os filhos de Dã lhe disseram: Que a tua voz não seja ouvida no meio de nós, para que companheiros furiosos não se lancem sobre ti, e percas a tua vida, junto com as vidas daqueles da tua casa.
26 मग दानाचे लोक आपल्या मार्गाने गेले, आणि मीखाने पाहिले की आपल्यापेक्षा ते बलवान आहेत, म्हणून तो माघारी फिरून आपल्या घरी गेला.
26 E os filhos de Dã seguiram o seu caminho; e quando Mica viu que eles eram demasiadamente poderosos para ele, volveu e retornou para a sua casa.
27 मीखाने ज्या मूर्ती केल्या होत्या त्या आणि त्याचा जो याजक होता, त्यास त्यांनी घेतले; मग ते लईश नगरास आले. तेथील लोक शांत व निश्चिंत होते. त्यांना तलवारीने मारले, आणि नगराला आग लावून जाळले.
27 E eles levaram as coisas que Mica havia feito, e o sacerdote que ele tinha, e chegaram a Laís, a um povo que estava tranquilo e seguro; e eles os feriram com o fio da espada, e queimaram a cidade com fogo.
28 तेव्हा त्यांना कोणी सोडवणारा नव्हता, कारण ते सीदोनापासून दूर होते, आणि त्यांचा कोणाशीही व्यवहार नव्हता; ते नगर बेथ-रहोबच्या खोऱ्याजवळ होते. दानी लोकांनी तेथे पुन्हा नगर बांधले आणि ते त्यामध्ये राहिले.
28 E não havia libertador, porque ela era distante de Sidom, e eles não faziam negócios com nenhum homem; e ficava no vale que está junto a Bete-Reobe. E eles edificaram uma cidade, e nela habitaram.
29 त्यांनी आपला पूर्वज दान, जो इस्राएलाचा एक पुत्र होता त्याचे नाव त्या नगराला दिले, परंतु पहिल्याने त्या नगराचे नाव लईश होते.
29 E eles chamaram o nome da cidade Dã, segundo o nome de Dã, o seu pai, que nasceu a Israel; todavia, o nome da cidade era, inicialmente, Laís.
30 नंतर दानाच्या लोकांनी आपल्यासाठी ती कोरीव मूर्ती केली; आणि मनश्शेचा पुत्र गेर्षोम याचा वंशज योनाथान तो व त्याची मुले, देश बंदिवासात जाईपर्यंत दानाच्या वंशाचे याजक होते.
30 E os filhos de Dã ergueram a imagem esculpida; e Jônatas, o filho de Gérson, filho de Moisés; ele e os seus filhos foram sacerdotes da tribo de Dã até o dia do cativeiro da terra.
31 देवाचे मंदिर शिलोमध्ये होते, तोपर्यंत त्यांनी आपल्यासाठी मीखाची कोरीव मूर्ती जी त्याने केली होती तिची उपासना केली.
31 E eles ergueram para si a imagem esculpida de Mica, a qual ele fabricou, durante todo o tempo em que a casa de Deus esteve em Siló.
Atalhos do teclado
- Capítulo anterior←
- Próximo capítulo→
- Versículo anteriork
- Próximo versículoj
- Limpar seleçãoEsc
- Esta ajuda?
Estude este capítulo no WhatsApp
Peça à IA da Bíblia Fala para explicar Juízes 18, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.