Juízes 15
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (MAR) vs VC
1 काही दिवसानंतर गव्हाच्या हंगामात शमशोन एक करडू घेऊन आपल्या पत्नीला भेटण्यास गेला; तेव्हा तो स्वत:शी म्हणाला, “मी माझ्या पत्नीच्या खोलीत जाईन” परंतु तिच्या पित्याने त्यास आत जाऊ दिले नाही.
1 Passado algum tempo, estando próxima a ceifa do trigo, Sansão foi ver a sua mulher, levando-lhe um cabrito. Quero, dizia ele, entrar no quarto de minha mulher. O pai dela, porém, impediu-lhe a entrada:
2 तिचा पिता म्हणाला, “मला वाटले तू तिचा अगदी द्वेष करतोस, म्हणून मी तिला तुझ्या मित्राला देऊन टाकली; तिची लहान बहीण तिच्यापेक्षा सुंदर आहे, आहे की नाही? तिच्याऐवजी तिला घे.”
2 Eu pensei, disse ele a Sansão, que a aborrecias, e por isso dei-a a um teu amigo. Não é, porventura, mais formosa do que ela sua irmã mais nova? Toma-a por mulher em seu lugar.
3 तेव्हा शमशोन त्यांना म्हणाला, “या वेळेस मी पलिष्ट्यांची हानी केली, तरी त्यासंबंधी मी निर्दोष राहीन.”
3 Desta vez, respondeu Sansão, não se me poderá censurar o mal que farei aos filisteus.
4 शमशोन गेला आणि त्याने जाऊन तीनशे कोल्हे पकडले, आणि शेपटाला शेपूट अशी एकएक जोडीच्या बांधली. नंतर त्याने मशाली घेऊन प्रत्येक जोडीच्या शेपटांमध्ये बांधल्या.
4 Ele se retirou, apanhou trezentas raposas e, tomando tochas, prendeu as raposas duas a duas pelas caudas e atou entre as duas caudas uma tocha.
5 मग मशाली पेटवून त्याने त्यांना पलिष्ट्यांच्या उभ्या पिकात सोडले, आणि त्यांनी दोन्ही उभे पिके आणि धान्याच्या रचलेल्या सुड्यांसह जाळली आणि त्याबरोबर जैतूनाचे मळेही जाळले.
5 Pôs-lhes fogo e soltou-as nas searas dos filisteus. Incendiou assim tanto o trigo que estava enfeixado como o que estava ainda em pé, queimando até mesmo as vinhas e os olivais.
6 तेव्हा पलिष्ट्यांनी विचारले, “हे कोणी केले?” नंतर त्यांनी म्हटले, “तिम्नाकराचा जावई शमशोन याने केले, कारण त्याने त्याची पत्नी घेऊन त्याच्या मित्राला दिली. मग पलिष्ट्यांनी जाऊन तिला व तिच्या पित्याला आग लावून जाळून टाकले.
6 Quem fez isso?, perguntaram os filisteus. Responderam: Foi Sansão, genro do tamneu, porque este tomou sua mulher e a deu a um de seus amigos. Então subiram os filisteus e queimaram a mulher juntamente com o seu pai.
7 शमशोन त्यांना म्हणाला, जरी तुम्ही हे केले, तरी त्याचा मी तुमच्याविरुध्द सूड घेईन, आणि ते केल्यानंतरच मग मी थांबेन.”
7 Sansão disse-lhes: Ah, é assim que fazeis? Pois bem: não descansarei enquanto não me tiver vingado de vós.
8 नंतर त्याने त्यांना मांडीवर व कंबरेवर मारून त्यांचे तुकडे तुकडे करून मोठी कत्तल केली. नंतर तो खाली गेला आणि उंच कड्याच्या एटाम दरीत गुहेमध्ये जाऊन राहिला.
8 E feriu-os vigorosamente, sem compaixão alguma. Depois disso, desceu e habitou na gruta da rocha de Etão.
9 मग पलिष्टी बाहेर आले आणि त्यांनी यहूदामध्ये येऊन लढाईची तयारी केली, आणि त्यांनी लेहीत त्यांच्या सैन्याची व्यूहरचना केली.
9 Então subiram os filisteus e acamparam em Judá, espalhando-se até Lequi.
10 तेव्हा यहूदी माणसे म्हणाली, “तुम्ही आमच्यावर का हल्ला केला आहे?” तेव्हा ते म्हणाले, “शमशोनाला पकडण्यासाठी म्हणून आम्ही हल्ला केला आहे; त्याने आमच्याशी जसे केले, तसेच त्याच्याशी करण्यासाठी आम्ही आलो आहो.”
10 Os homens de Judá disseram: Por que subistes contra nós? Eles responderam: Subimos para prender Sansão e pagar-lhe o que ele nos fez.
11 नंतर यहूदातली तीन हजार माणसे खाली एटाम दरीच्या उंच कड्याजवळ जाऊन शमशोनाला म्हणाली, “पलिष्टी आमच्यावर राज्य करतात, हे तुला माहीत नाही काय? तर तू हे काय केले?” शमशोन त्यांना म्हणाला, “जसे त्यांनी माझे केले, तसे मी त्यांचे केले आहे.”
11 Três mil homens de Judá desceram então à gruta do rochedo de Etão e disseram a Sansão: Não sabes que os filisteus nos dominam? Que é isso que nos fizeste? Eu tratei-os como eles mesmos me trataram a mim, respondeu Sansão.
12 ते शमशोनाला म्हणाले, “आम्ही तुला बांधून पलिष्ट्यांच्या हाती देण्यासाठी आलो आहोत. तेव्हा शमशोन त्यांना म्हणाला,” तुम्ही स्वत: मला मारून टाकणार नाही, “अशी माझ्याजवळ शपथ घ्या.”
12 Eles replicaram: Viemos prender-te para entregar-te aos filisteus. Jurai-me, disse Sansão, que não me haveis de matar.
13 मग त्यांनी त्यास सांगितले की, “नाही, आम्ही फक्त तुला दोरीने बांधू आणि तुला त्यांच्या हाती सोपवू. आम्ही तुला वचन देतो, आम्ही तुला मारून टाकणार नाही.” तेव्हा त्यांनी दोन नव्या दोरांनी त्यास बांधून खडकातून वर नेले.
13 Não te mataremos, mas entregar-te-emos a eles amarrado. Ligaram-no, pois, com duas cordas novas e tiraram-no da gruta.
14 जेव्हा तो लेहीस पोहचला, तेव्हा पलिष्ट्यांनी त्यास पाहून पलिष्टी आनंदाने ओरडू लागले; आणि परमेश्वराचा आत्मा सामर्थ्याने त्याच्यावर आला आणि त्याच्या हातांना बांधलेले दोर ताग जळतो तसे झाले आणि दोर हातातून गळून पडले.
14 Chegando a Lequi, os filisteus acolheram-no com gritos de alegria. Apoderou-se, porém, de Sansão o Espírito do Senhor, e as duas cordas que ligavam seus braços tornaram-se como fios de linho queimado, caindo de suas mãos as amarraduras.
15 नंतर त्यास गाढवाचे ताजे जाभाड सापडले आणि त्याने ते उचलले आणि त्याच्याने एक हजार माणसे मारली.
15 Apanhando uma queixada ainda fresca de jumento, feriu com ela mil homens.
16 शमशोन म्हणाला, “गाढवाच्या जाभाडाने ढिगावर ढिग, गाढवाच्या जाभाडाने मी हजार माणसे मारली.”
16 Sansão dizia: Com a queixada de um jumento, eu os destrocei! Com a queixada de um jumento mil homens feri!
17 शमशोनाने बोलणे संपवल्यावर, आपल्या हातातून ते जाभाड फेकून दिले, यावरुन त्या ठिकाणाचे नाव रामाथ-लेही ठेवले.
17 Dito isso, lançou ao longe a queixada e deu àquele lugar o nome de Ramat-Lequi.
18 तेव्हा शमशोनाला फार तहान लागली आणि त्याने परमेश्वरास हाक मारून म्हटले, “तू आपल्या सेवकाला हा मोठा विजय दिला आहे; परंतु आता मी तहानेने मरत आहे आणि न्यायासाठी बेसुंती लोकांच्या हाती पडत आहे.”
18 Sentindo uma sede intensa, clamou ao Senhor: Vós destes, disse ele, ao vosso servo esta grande vitória. Morrerei eu agora de sede e cairei nas mãos dos incircuncisos?
19 तेव्हा देवाने लेहीमधील खोलगट जागा दुभंगून फोडली, आणि त्यातून पाणी निघाले; जेव्हा तो ते प्याला, तेव्हा त्यास परत शक्ती आली आणि त्याच्या जीवात जीव आला. यावरुन त्या जागेचे नाव एन-हक्कोरे पडले; ती जागा आजपर्यंत लेहीमध्ये आहे.
19 Então Deus fendeu a rocha côncava que está em Lequi, e dela jorrou água. Sansão, tendo bebido dessa água, recobrou ânimo e recuperou as forças. Daí o nome que traz essa fonte: En-Hacoré. Ainda hoje ela existe em Lequi.
20 शमशोनाने पलिष्ट्यांच्या काळात इस्राएलाचा वीस वर्षे न्याय केला.
20 Sansão foi juiz em Israel durante vinte anos no tempo dos filisteus.
Atalhos do teclado
- Capítulo anterior←
- Próximo capítulo→
- Versículo anteriork
- Próximo versículoj
- Limpar seleçãoEsc
- Esta ajuda?
Estude este capítulo no WhatsApp
Peça à IA da Bíblia Fala para explicar Juízes 15, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.