Juízes 14
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (MAR) vs ARIB
1 नंतर शमशोन खाली तिम्ना नगरात गेला, आणि त्याने तिम्नामध्ये पलिष्ट्यांच्या मुलींमध्ये एक स्त्री पाहिली.
1 Desceu Sansão a Timnate; e vendo em Timnate uma mulher das filhas dos filisteus,
2 तो जेव्हा माघारी आला तेव्हा त्याने आपल्या बापाला व आईला ह्याविषयी सांगितले, “मी तिम्नात पलिष्ट्यांची एक मुलगी पाहिली आहे; तर आता तुम्ही ती मला पत्नी करून द्या.”
2 subiu, e declarou-o a seu pai e a sua mãe, dizendo: Vi uma mulher em Timnate, das filhas dos filisteus; agora pois, tomai-ma por mulher.
3 परंतु त्याचे आई व बाप त्यास म्हणाले, “तुझ्या नातेवाईकांत किंवा तुझ्या लोकांमध्ये कोणी मुली नाहीत काय, म्हणून तू बेसुंती पलिष्ट्यांतली पत्नी करून घ्यायला जात आहेस?” तथापि शमशोन आपल्या बापाला म्हणाला, “तीच मजसाठी मिळवून द्या; कारण जेव्हा मी तिच्याकडे बघितले तेव्हाच मला ती पसंत पडली आहे.”
3 Responderam-lhe, porém, seu pai e sua mãe: Não há, porventura, mulher entre as filhas de teus irmãos, nem entre todo o nosso povo, para que tu vás tomar mulher dos filisteus, daqueles incircuncisos? Disse, porém, Sansão a seu pai: Toma esta para mim, porque ela muito me agrada.
4 परंतु ही तर परमेश्वराची इच्छा होती की पलिष्ट्यांबरोबर परस्पर विरोध व्हावा, त्याच्या आई आणि बापाला हे समजले नव्हते; कारण त्या वेळेस पलिष्टी इस्राएलावर राज्य करत होते.
4 Mas seu pai e sua mãe não sabiam que isto vinha do Senhor, que buscava ocasião contra os filisteus; porquanto naquele tempo os filisteus dominavam sobre Israel.
5 यानंतर शमशोन आणि त्याचे आईबाप खाली तिम्ना येथे जात होते, आणि तिम्नातल्या द्राक्षमळ्यांपर्यंत ते पोहचले, तेव्हा तेथे तरुण सिंह गर्जना करून आला आणि त्याच्या अंगावर येऊ लागला.
5 Desceu, pois, Sansão com seu pai e com sua mãe a Timnate. E, chegando ele às vinhas de Timnate, um leão novo, rugindo, saiu-lhe ao encontro.
6 तेव्हा परमेश्वराचा आत्मा अचानक त्याच्यावर आला, आणि त्याच्या हाती काही नसताही त्याने जसे करडू फाडावे, तसे सिंहाला सहजरीत्या फाडून टाकले; परंतु त्याने जे केले होते ते त्याने आपल्या आईबापांना सांगितले नाही.
6 Então o Espírito do Senhor se apossou dele, de modo que ele, sem ter coisa alguma na mão, despedaçou o leão como se fosse um cabrito. E não disse nem a seu pai nem a sua mãe o que tinha feito.
7 तो गेला आणि जाऊन त्या स्त्रीसोबत बोलला; आणि जेव्हा त्याने तिच्याकडे पाहिले, तेव्हा शमशोनाला ती पसंत पडली.
7 Depois desceu e falou àquela mulher; e ela muito lhe agradou.
8 काही दिवसानंतर तो तिच्याशी लग्न करण्यास परत गेला, तेव्हा तो त्या सिंहाचे मृत शरीर पाहायला बाजूला वळला; आणि त्या सिंहाच्या मृत शरीरात मधमाश्यांचा थवा व मध तेथे त्याने पाहिला.
8 Passado algum tempo, Sansão voltou para recebê-la; e apartando-se de caminho para ver o cadáver do leão, eis que nele havia um enxame de abelhas, e mel.
9 त्याने तो मध आपल्या हाताने वर काढून घेतला आणि तो चालता चालता खात गेला, जेव्हा आपल्या आईबापाकडे आला तेव्हा त्याने त्यांनाही त्यातला काही दिला, आणि त्यांनी तो खाल्ला; परंतु त्यांना तो मध त्या सिंहाच्या मृत शरीरातून घेतला आहे हे त्याने सांगितले नाही.
9 E tirando-o nas mãos, foi andando e comendo dele; chegando aonde estavam seu pai e sua mãe, deu-lhes do mel, e eles comeram; porém não lhes disse que havia tirado o mel do corpo do leão.
10 नंतर शमशोनाचा बाप ती स्त्री जिथे होती तिथे उतरून खाली गेला, आणि शमशोनाने तेथे मेजवानी दिली, कारण तरुण पुरुषांमध्ये तशी रुढी होती.
10 Desceu, pois, seu pai à casa da mulher; e Sansão fez ali um banquete, porque assim os mancebos costumavam fazer.
11 तिच्या नातेवाईकांनी त्यास पाहताच त्याच्याबरोबर राहण्यासाठी त्यास तीस मित्र आणून दिले.
11 E sucedeu que, quando os habitantes do lugar o viram, trouxeram trinta companheiros para estarem com ele.
12 मग शमशोन त्यांना म्हणाला, “आता मी तुम्हाला कोडे सांगतो; मेजवानीच्या सात दिवसात जर तुमच्यातील कोणी जर त्याचे उत्तर शोधून मला सांगितले, तर मी तुम्हाला तागाचे तीस झगे व कपड्यांचे तीस संच जोड देईन.
12 Disse-lhes, pois, Sansão: Permiti-me propor-vos um enigma; se nos sete dias das bodas o decifrardes e mo descobrirdes, eu vos darei trinta túnicas de linho e trinta mantos;
13 परंतु जर तुम्हाला त्याचे उत्तर मिळाले नाही, तर, तुम्ही मला तागाचे तीस झगे व कपड्याचे तीस संच जोड द्यावे.” तेव्हा ते त्यास म्हणाले, “तुझे कोडे आम्हांला सांग, म्हणजे आम्ही ते ऐकू.”
13 mas se não puderdes decifrar, vós me dareis a mim as trinta túnicas de linho e os trinta mantos. Ao que lhe responderam eles: Propõe o teu enigma, para que o ouçamos.
14 तो त्यास म्हणाला, खाणाऱ्यामधून खाण्याजोगे काही बाहेर निघते, बळकटातून काहीतरी गोड बाहेर निघते. परंतु तीन दिवसात तर त्याच्या पाहुण्यांना त्याचे उत्तर मिळाले नाही.
14 Então lhes disse: Do que come saiu comida, e do forte saiu doçura. E em três dias não puderam decifrar o enigma.
15 नंतर चौथ्या दिवशी ते शमशोनाच्या पत्नीला म्हणाले, “तू आपल्या नवऱ्याकडून युक्तीने कोड्याचे उत्तर मिळवून आम्हांला सांग, नाही तर आम्ही तुला व तुझ्या वडिलाच्या कुटुंबाला जाळून टाकू; तुम्ही आम्हांला दरिद्री करण्यासाठी म्हणून बोलावले आहे काय?”
15 Ao quarto dia, pois, disseram à mulher de Sansão: Persuade teu marido a que declare o enigma, para que não queimemos a fogo a ti e à casa de teu pai. Acaso nos convidastes para nos despojardes?
16 तेव्हा शमशोनाची पत्नी त्याच्यासमोर रडून म्हणू लागली, “तुम्ही केवळ माझा द्वेष करता! माझ्यावर प्रीती करतच नाही. तुम्ही माझ्या लोकांस तर कोडे सांगितले आहे, परंतु त्याचे उत्तर मला सांगितले नाही.” परंतु शमशोन तिला म्हणाला, “पहा, मी आपल्या आईबापाला ते सांगितले नाही, तर तुला कसे सांगू?”
16 E a mulher de Sansão chorou diante dele, e disse: Tão-somente me aborreces, e não me amas; pois propuseste aos filhos do meu povo um enigma, e não mo declaraste a mim. Respondeu-lhe ele: Eis que nem a meu pai nem a minha mãe o declarei, e to declararei a ti.
17 मेजवानीच्या सातही दिवसांपर्यंत ती त्याच्याकडे रडतच होती; आणि सातव्या दिवशी त्याने तिला त्याचे उत्तर सांगितले, कारण तिने त्याच्यावर खूप दबाव आणला होता. मग तिने त्या कोड्याचे उत्तर तिच्या लोकांच्या नातेवाईकांना सांगितले.
17 Assim ela chorava diante dele os sete dias em que celebravam as bodas. Sucedeu, pois, que ao sétimo dia lho declarou, porquanto o importunava; então ela declarou o enigma aos filhos do seu povo.
18 आणि सातव्या दिवशी सूर्य मावळण्यापूर्वी त्या नगरातल्या मनुष्यांनी त्यास म्हटले, “मधापेक्षा गोड ते काय? सिंहापेक्षा बळकट काय आहे?” तेव्हा शमशोन त्यांना म्हणाला, “जर तुम्ही माझ्या कालवडीला नांगराला जुंपले नसते, तर तुम्हाला माझे कोडे उलगडता आलेच नसते.”
18 Os homens da cidade, pois, ainda no sétimo dia, antes de se pôr o sol, disseram a Sansão: Que coisa há mais doce do que o mel? e que coisa há mais forte do que o leão? Respondeu-lhes ele: Se vós não tivésseis lavrado com a minha novilha, não teríeis descoberto o meu enigma.
19 नंतर परमेश्वराचा आत्मा एकाएकी सामर्थ्याने त्याच्यावर आला. शमशोन खाली अष्कलोन नगरास गेला आणि त्याने त्यांच्यातले तीस पुरुष मारले, त्यांना लुबाडून घेतले आणि त्याच्या कोड्याचे उत्तर सांगणाऱ्यांना त्याने ते कपड्यांचे जोड दिले; त्यास खूप राग आला होता, आणि तो त्याच्या वडिलाच्या घरी निघून गेला.
19 Então o Espírito do Senhor se apossou dele, de modo que desceu a Asquelom, matou trinta dos seus homens e, tomando as suas vestes, deu-as aos que declararam o enigma; e, ardendo em ira, subiu à casa de seu pai.
20 इकडे शमशोनाची पत्नी त्याच्या जवळच्या मित्राला देऊन टाकण्यात आली.
20 E a mulher de Sansão foi dada ao seu companheiro, que lhe servira de paraninfo.:
Atalhos do teclado
- Capítulo anterior←
- Próximo capítulo→
- Versículo anteriork
- Próximo versículoj
- Limpar seleçãoEsc
- Esta ajuda?
Estude este capítulo no WhatsApp
Peça à IA da Bíblia Fala para explicar Juízes 14, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.