Juízes 13
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (MAR) vs VC
1 तेव्हा इस्राएलाच्या लोकांनी परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते परत केले, यास्तव परमेश्वराने पलिष्ट्यांना त्यांच्यावर चाळीस वर्षे राज्य करण्याची परवानगी दिली.
1 Os israelitas continuaram a fazer o mal aos olhos do Senhor, que os entregou nas mãos dos filisteus durante quarenta anos.
2 तेव्हा सरा येथला दानांच्या कुळाचा कोणी मनुष्य होता; त्याचे नाव मानोहा होते, आणि त्याची स्त्री वांझ होती, यास्तव तिला लेकरू झाले नव्हते.
2 Ora, havia em Sorá um homem da família dos danitas, chamado Manué. Sua mulher, sendo estéril, não tinha ainda gerado filhos.
3 तेव्हा परमेश्वराच्या दूताने त्या स्त्रीला दर्शन दिले, आणि तिला म्हटले, “पाहा, तू गरोदर राहण्यास असमर्थ होतीस, म्हणून तू पुत्राला जन्म देऊ शकली नाहीस, परंतु आता तू गरोदर होऊन पुत्राला जन्म देशील.
3 O anjo do Senhor apareceu a esta mulher e disse-lhe: Tu és estéril, e nunca tiveste filhos; mas conceberás e darás à luz um filho.
4 आता तू काळजीपूर्वक राहा मद्य किंवा मादक द्रव्य पिऊ नको, आणि जे नियमाप्रमाणे अशुद्ध जाहीर केले ते अन्न खाऊ नको.
4 Toma, pois, muito cuidado; não bebas doravante nem vinho, nem bebida forte, e não comas coisa alguma impura, porque vais conceber e dar à luz um filho.
5 पाहा, तू गरोदर होशील आणि तू पुत्राला जन्म देशील आणि त्याचे केस कधीच कापू नकोस कारण तो मुलगा गर्भावस्थेपासूनच देवाचा नाजीर होईल. आणि तो इस्राएलाला पलिष्टयाच्या जाचातून सोडवण्याचा आरंभ करील.”
5 A navalha não tocará a sua cabeça, porque esse menino será nazareno de Deus desde o seio de sua mãe, e será ele quem livrará Israel da mão dos filisteus.
6 तेव्हा त्या स्त्रीने जाऊन आपल्या पतीला असे सांगितले की, “देवाचा मनुष्य माझ्याजवळ आला, आणि त्याचे रूप देवाच्या दूताच्या रूपासारखे फार भयंकर होते. म्हणून, तो कोठला, हे मी त्यास विचारले नाही, आणि त्याने आपले नाव मला सांगितले नाही.
6 A mulher foi ter com o seu marido: Apresentou-se a mim um homem de Deus, disse ela, que tinha o aspecto de um anjo de Deus, em extremo terrível. Não lhe perguntei de onde era, nem ele me deu o seu nome,
7 परंतु तो मला म्हणाला, पाहा, तू गरोदर होशील, आणि तू पुत्राला जन्म देशील; तर आता तू दारू आणि मादक द्रव्य पिऊ नको आणि जे काही नियमाप्रमाणे अशुद्ध जाहीर केले आहे ते अन्न खाऊ नको; कारण तो बाळ तुझ्या गर्भावस्थेपासून त्याच्या मरणापर्यंत देवाचा नाजीर होईल.
7 mas disse-me: Vais conceber e dar à luz um filho; não bebas, pois, nem vinho nem bebida forte e não comas coisa alguma impura, porque esse menino será nazareno desde o seio de sua mãe até o dia de sua morte.
8 तेव्हा मानोहाने परमेश्वराजवळ विनंती करून म्हटले, हे माझ्या प्रभू, माझे ऐक, जो देवाचा मनुष्य तू पाठवला होता, त्याने आमच्याजवळ पुन्हा यावे, आणि जो पुत्र जन्मेल, त्याच्यासाठी आम्ही काय करावे, हे आम्हांला शिकवावे.”
8 Então Manué invocou o Senhor, dizendo: Rogo-vos, Senhor, que o homem de Deus que nos enviastes volte novamente e nos ensine o que devemos fazer acerca do menino que há de nascer.
9 तेव्हा देवाने मानोहाचा शब्द ऐकला, यास्तव देवाचा दूत त्या स्त्रीजवळ ती शेतात बसली असता पुन्हा आला तिचा पती मानोहा तिच्यासोबत नव्हता.
9 Deus ouviu essa oração, e o anjo de Deus veio de novo visitar a mulher, quando esta se achava no campo; Manué, seu marido, não estava com ela.
10 तेव्हा ती स्त्री त्वरीत पळाली आणि आपल्या पतीला म्हणाली: “पाहा, जो पुरुष त्यादिवशी माझ्याजवळ आला होता, तो माझ्या दृष्टीस पडला आहे.”
10 Ela correu imediatamente a dar ao seu marido a notícia, dizendo: O homem que vi outro dia apareceu-me de novo.
11 मग मानोहा उठून आपल्या पत्नीच्यामागे चालून त्या पुरुषाजवळ गेला, आणि त्यास बोलला, “जो पुरुष माझ्या पत्नीबरोबर बोलला होता,” तो तूच आहेस काय? तेव्हा तो म्हणाला, “होय मीच आहे.”
11 Manué levantou-se e seguiu a sua mulher até junto do homem: És tu, disse ele, o homem que falou à minha mulher?
12 मग मानोहा म्हणाला, “तुझे शब्द खरे ठरोत; परंतु त्या मुलासाठी काय नियम ठरवले आहेत आणि त्याचे काम काय असेल?”
12 Sou eu mesmo, respondeu {o desconhecido}. Manué replicou: Quando se cumprir a tua palavra, de que maneira havemos de criar esse menino, e o que teremos de fazer por ele?
13 तेव्हा परमेश्वराच्या दूताने मानोहाला म्हटले, “जे मी या स्त्रीला सांगितले, त्याविषयी हिने काळजीपूर्वक रहावे.
13 O anjo do Senhor respondeu: Abstenha-se tua mulher de tudo o que eu lhe disse:
14 द्राक्षवेलापासून जे येते त्यातले काहीही हिने खाऊ नये, आणि मद्य व मादक द्रव्य पिऊ नये, आणि नियमाप्रमाणे जे काही अशुद्ध जाहीर केले आहे ते खाऊ नये; जे सर्व मी हिला आज्ञापिले त्याचे तिने पालन करावे.”
14 não prove nada do que venha da videira; não beba nem vinho, nem bebida forte, nada coma que seja impuro e observe tudo o que lhe prescrevi.
15 तेव्हा मानोहा परमेश्वराच्या दूताला म्हणाला, “आम्ही तुला विनंती करतो थोडा वेळ थांब, तुझ्यासाठी करडू तयार करण्यास आम्हांला वेळ दे,”
15 Manué disse ao anjo do Senhor: Rogo-te que te detenhas até que te ofereçamos um cabrito que vamos preparar.
16 परंतु परमेश्वराचा दूत मानोहाला बोलला, “मी जरी थांबलो तरी, मी तुझे अन्न खाणार नाही; परंतु जर तू होमार्पण करशील, तर ते तुला परमेश्वर देवाला अर्पण करावे लागेल,” (तेव्हा तो परमेश्वर देवाचा दूत होता, हे मानोहाला कळले नव्हते)
16 Ainda que tu me retivesses, respondeu o anjo do Senhor, eu não comeria de tua mesa; mas se queres fazer um holocausto, oferece-o ao Senhor. Manué ignorava que era o anjo do Senhor.
17 मग मानोहाने परमेश्वराच्या दूताला म्हटले, “तुझे नाव काय आहे, कारण की तुझे बोलणे खरे ठरल्यावर आम्ही तुझा आदर करू?”
17 Qual é o teu nome, perguntou-lhe ele, para que te honremos quando se cumprir tua promessa?
18 तेव्हा परमेश्वराचा दूत त्यास म्हणाला, “तू माझे नाव कशासाठी विचारतोस? ते आश्चर्यजनक आहे.”
18 O anjo do Senhor respondeu-lhe: Por que me perguntas o meu nome? Ele é Magnífico.
19 मग मानोहाने अन्नार्पणासह करडू घेऊन, परमेश्वर, जो आश्चर्यकर्म करणारा त्यास खडकावर होमार्पण केले; तेव्हा मानोहा व त्याची पत्नी पाहत असताना,
19 Tomou, pois, Manué o cabrito com uma oferta e ofereceu-o ao Senhor sobre a rocha. Coisa maravilhosa! Enquanto Manué e sua mulher olhavam
20 जेव्हा अग्नी वेदीवरून आकाशात चढला, तेव्हा परमेश्वराचा दूत त्या वेदीच्या अग्नीतून वर आकाशात चढला. मानोहा व त्याची पत्नी यांनी हे पाहिले आणि आपली तोंडे भूमीस लावून नमन केले.
20 subir para o céu a chama do sacrifício que estava sobre o altar, viu que o anjo do Senhor subia na chama. À vista disso, Manué e sua mulher caíram com o rosto por terra.
21 मग परमेश्वराचा दूत मानोहाच्या व त्याच्या पत्नीच्या दृष्टीस फिरून पडला नाही; तेव्हा मानोहाला कळले की, तो परमेश्वराचा दूत होता.
21 E o anjo do Senhor desapareceu diante dos olhos de Manué e sua mulher. Manué compreendeu logo que era o anjo do Senhor,
22 मग मानोहा आपल्या पत्नीला म्हणाला, आपण खचीत मरू, कारण आपण देवाला पाहिले आहे.
22 e disse à sua mulher: Vamos morrer seguramente, porque vimos Deus!
23 तेव्हा त्याची पत्नी त्यास म्हणाली, “जर परमेश्वर देवाला आपल्याला मारायची इच्छा असती, तर त्याने आपल्या हातातून होमार्पण व अन्नार्पण स्वीकारले नसते, आणि या सर्व गोष्टी आपल्याला दाखवल्या नसत्या, तसेच या वेळेसारखे वर्तमान आपल्याला ऐकवले नसते.”
23 Sua mulher respondeu-lhe: Se o Senhor nos quisesse matar, não teria aceitado de nossas mãos o holocausto e a oferta; não nos teria mostrado tudo o que vimos, nem nos teria dito o que hoje nos revelou.
24 नंतर त्या स्त्रीला पुत्र झाला, आणि तिने त्याचे नाव शमशोन ठेवले; तो पुत्र वाढत गेला, या प्रकारे परमेश्वराने त्यास आशीर्वाद दिला.
24 Ela deu à luz um filho e pôs-lhe o nome de Sansão. O menino cresceu e o Senhor o abençoou.
25 तेव्हा सरा व अष्टावोल यांच्या दरम्यान महने-दानाच्या छावणीत त्यास परमेश्वराचा आत्मा प्रेरणा करू लागला.
25 E o Espírito do Senhor começou a incitá-lo, em Mahanê-Dã, entre Sorea e Estaol.
Atalhos do teclado
- Capítulo anterior←
- Próximo capítulo→
- Versículo anteriork
- Próximo versículoj
- Limpar seleçãoEsc
- Esta ajuda?
Estude este capítulo no WhatsApp
Peça à IA da Bíblia Fala para explicar Juízes 13, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.