Juízes 12
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (MAR) vs VC
1 सर्व एफ्राइमी लोक एकत्र झाले आणि यार्देन नदी पार करून उत्तरेस साफोन नगरात जाऊन इफ्ताहाला म्हणाले, “तू अम्मोनी लोकांविरुद्ध लढायला गेलास, तेव्हा आम्हांला का बोलावले नाहीस? आम्ही तुझ्यासह घराला आग लावून जाळून टाकू.”
1 Os efraimitas, tendo-se sublevado, passaram a Safon e disseram a Jefté: Por que saíste a combater os amonitas, sem nos chamar para irmos contigo? Por isso vamos queimar a tua casa.
2 तेव्हा इफ्ताह त्यांना म्हणाला, “अम्मोन्यांशी माझे व माझ्या लोकांचे फार भांडण होत होते; तेव्हा मी तुम्हाला बोलावले, परंतु तुम्ही मला त्यांच्या हातातून सोडवले नाही.
2 Jefté respondeu: Eu e meu povo tivemos graves contendas com os amonitas; chamei-vos e vós não me livrastes de suas mãos.
3 तेव्हा तुम्ही सोडवत नाही, हे पाहून मी माझा जीव धोक्यात घालून माझ्या स्वत:च्या सामर्थ्याने अम्मोनी लोकांविरुद्ध लढायला पलीकडे गेलो, या प्रकारे परमेश्वराने मला विजय दिला; तर आजच्या दिवशी तुम्ही माझ्याशी लढायला मजवर आला आहात?”
3 Vendo que não podia contar convosco, arrisquei a minha vida marchando {sozinho} contra os amonitas, e o Senhor entregou-os nas minhas mãos. Por que, pois, viestes contender comigo?
4 तेव्हा इफ्ताहाने गिलादाची सर्व माणसे एकत्र जमवून आणि एफ्राइमाशी लढाई केली, आणि गिलादी मनुष्यांनी एफ्राइमावर हल्ला केला, कारण ते म्हणाले होते, “एफ्राइम व मनश्शे यांच्यामध्ये राहत आहा ते तुम्ही गिलादी एफ्राइमातले पळपुटे आहात.”
4 Jefté reuniu todos os homens de Galaad e combateu contra Efraim. Os habitantes de Galaad derrotaram os de Efraim, que lhes haviam dito: Vós sois fugitivos de Efraim que habitais entre Efraim e Manassés!
5 तेव्हा गिलाद्यांनी एफ्राइम्यांसमोर यार्देनेचे उतार रोखून धरले, आणि असे झाले की, जेव्हा कोणी एफ्राइमी पळताना बोलला, “तुम्ही मला पार जाऊ द्या,” असे म्हणे. तेव्हा गिलादी माणसे त्यास म्हणत असत, “तू एफ्राथी आहेस की काय?” आणि तो जर “नाही” असे बोलला,
5 Galaad ocupou os vaus do Jordão, e cada vez que um fugitivo de Efraim queria passar, perguntavam-lhe: És tu efraimita? Ele respondia: Não.
6 तर ते त्यास म्हणत, “आता तू शिब्बोलेथ असे म्हण,” तेव्हा तो “सिब्बोलेथ” असे म्हणत असे (कारण त्यांना त्या शब्दाचा बरोबर उच्चार करता येत नव्हता). मग ते त्यास धरून यार्देनेच्या उताराजवळ जिवे मारत असत; तर त्या वेळी एफ्राइमातली बेचाळीस हजार माणसे मारली गेली.
6 Pois bem, diziam eles então, dize: Chibólet. E ele dizia: Sibólet, não podendo pronunciar corretamente. Prendiam-no logo e o degolavam junto aos vaus do Jordão. Naquele dia pereceram quarenta e dois mil homens de Efraim.
7 इफ्ताहाने सहा वर्षे इस्राएलाचा न्याय केला; मग इफ्ताह गिलादी मेला, आणि गिलादातल्या एका नगरात त्यास पुरण्यात आले.
7 Jefté, o galaadita, foi juiz em Israel durante seis anos; depois morreu, e foi sepultado em uma das cidades de Galaad.
8 मग त्याच्यामागे बेथलेहेमातल्या इब्सानाने इस्राएलाचा न्याय केला.
8 Depois de Jefté, foi juiz de Israel Ibsã, de Belém,
9 तेव्हा त्यास तीस पुत्र व तीस कन्या होत्या; त्या त्याने बाहेर दिल्या आणि आपल्या पुत्रांसाठी बाहेरून तीस कन्या आणल्या; त्याने सात वर्षे इस्राएलाचा न्याय केला.
9 o qual teve trinta filhos; casou suas trinta filhas fora de sua família, e mandou vir de fora trinta jovens para os seus filhos. Julgou Israel durante sete anos.
10 नंतर इब्सान मेला, आणि त्यास बेथलेहेमात पुरण्यात आले.
10 Morreu e foi enterrado em Belém.
11 आणि त्याच्यामागे जबुलूनी एलोन इस्राएलाचा न्यायाधीश झाला; त्याने तर दहा वर्षे इस्राएलाचा न्याय केला.
11 Depois dele, Elon, de Zabulon, foi juiz em Israel, e sua judicatura durou dez anos.
12 नंतर तो जबुलूनी एलोन मेला, आणि त्यास जबुलून देशातल्या अयालोन येथे पुरण्यात आले.
12 Morreu, e foi enterrado em Ajalon, na terra de Zabulon.
13 आणि त्यानंतर हिल्लेलाचा पुत्र अब्दोन जो पिराथोनी, तो इस्राएलाचा न्यायाधीश झाला.
13 Em seguida teve Israel por juiz Abdon, filho de Ilel, de Faraton.
14 आणि त्यास चाळीस पुत्र व तीस नातू होते; त्यांच्याकडे आपापले गाढव होते ज्यावर जे सवार होत होते; त्याने आठ वर्षे इस्राएलाचा न्याय केला.
14 Teve quarenta filhos e trinta netos, que montavam em setenta jumentinhos. Julgou Israel durante oito anos.
15 मग पिराथोनी हिल्लेलाचा पुत्र अब्दोन मेला, आणि त्यास एफ्राइम प्रांतातील अमालेक्यांच्या डोंगराळ प्रदेशात पिराथोनात पुरण्यात आले.
15 Depois disso, Abdon, filho de Ilel, de Faraton, morreu e foi sepultado em Faraton, na terra de Efraim, na montanha dos amalecitas.
Atalhos do teclado
- Capítulo anterior←
- Próximo capítulo→
- Versículo anteriork
- Próximo versículoj
- Limpar seleçãoEsc
- Esta ajuda?
Estude este capítulo no WhatsApp
Peça à IA da Bíblia Fala para explicar Juízes 12, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.