Juízes 11
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (MAR) vs ARA
1 गिलादी इफ्ताह पराक्रमी वीर होता, परंतु तो वेश्येचा पुत्र होता, आणि गिलाद त्याचा पिता होता.
1 Era, então, Jefté, o gileadita, homem valente, porém filho de uma prostituta; Gileade gerara a Jefté.
2 गिलादाच्या पत्नीने त्यापासून दुसऱ्या पुत्रांना जन्म दिला, आणि जेव्हा त्या स्त्रीचे पुत्र मोठे झाले, तेव्हा त्यांनी इफ्ताहाला घालवून दिले आणि म्हटले, “आमच्या वडिलाच्या घरी तुला वतन प्राप्त होणार नाही; कारण तू दुसऱ्या स्त्रीचा पुत्र आहेस.”
2 Também a mulher de Gileade lhe deu filhos, os quais, quando já grandes, expulsaram Jefté e lhe disseram: Não herdarás em casa de nosso pai, porque és filho doutra mulher.
3 यास्तव इफ्ताह आपल्या भावांपुढून पळाला, आणि टोब देशात जाऊन राहिला; तेव्हा रिकामटेकडी माणसे इफ्ताहाजवळ मिळून त्याच्याबरोबर चालली.
3 Então, Jefté fugiu da presença de seus irmãos e habitou na terra de Tobe; e homens levianos se ajuntaram com ele e com ele saíam.
4 मग काही वेळानंतर असे झाले की अम्मोनी लोकांनी इस्राएलाशी लढाई केली.
4 Passado algum tempo, pelejaram os filhos de Amom contra Israel.
5 जेव्हा अम्मोनी लोक इस्राएलाशी लढत असताना असे झाले की गिलादाचे वडील मंडळ इफ्ताहाला टोब देशातून परत आणायला गेले.
5 Quando pelejavam, foram os anciãos de Gileade buscar Jefté da terra de Tobe.
6 तेव्हा ते इफ्ताहाला म्हणाले, “तू येऊन आमचा सेनापती हो, कारण आम्ही अम्मोनी लोकांशी लढत आहो.”
6 E disseram a Jefté: Vem e sê nosso chefe, para que combatamos contra os filhos de Amom.
7 इफ्ताह गिलादाच्या वडीलजनांना बोलला, “तुम्ही माझा द्वेष करून माझ्या पित्याच्या घरातून मला घालवले की नाही? तर आता तुम्ही संकटात असता, माझ्याजवळ कशाला आला?”
7 Porém Jefté disse aos anciãos de Gileade: Porventura, não me aborrecestes a mim e não me expulsastes da casa de meu pai? Por que, pois, vindes a mim, agora, quando estais em aperto?
8 तेव्हा गिलादाच्या वडीलांनी इफ्ताहाला म्हटले, “आम्ही आता तुझ्याकडे यासाठी आलो आहो की, तू आमच्याबरोबर येऊन अम्मोनी लोकांशी लढाई करावी, मग तू गिलादातल्या सर्व राहणाऱ्यांवर आमचा अधिकारी असा होशील.”
8 Responderam os anciãos de Gileade a Jefté: Por isso mesmo, tornamos a ti. Vem, pois, conosco, e combate contra os filhos de Amom, e sê o nosso chefe sobre todos os moradores de Gileade.
9 तेव्हा इफ्ताह गिलादाच्या वडीलास म्हणाला, “जर तुम्ही मला अम्मोनी लोकांशी लढायास माघारी नेले, आणि परमेश्वराने त्यांना माझ्या स्वाधीन केले, तर मी तुमचा अधिकारी असा होईन काय?”
9 Então, Jefté perguntou aos anciãos de Gileade: Se me tornardes a levar para combater contra os filhos de Amom, e o Senhor mos der a mim, então, eu vos serei por cabeça?
10 तेव्हा गिलादातील वडीलजन इफ्ताहाला बोलले, “जर तुझ्या सांगण्याप्रमाणे आम्ही करीत नाही, तर आपल्यामध्ये परमेश्वर साक्षी होवो.”
10 Responderam os anciãos de Gileade a Jefté: O Senhor será testemunha entre nós e nos castigará se não fizermos segundo a tua palavra.
11 मग इफ्ताह गिलादाच्या वडीलांबरोबर गेला, आणि त्या लोकांनी त्यास आपल्यावर अधिकारी व सेनापती असे करून ठेवले; तेव्हा इफ्ताह आपली सर्व वचने मिस्पात परमेश्वरासमोर बोलला.
11 Então, Jefté foi com os anciãos de Gileade, e o povo o pôs por cabeça e chefe sobre si; e Jefté proferiu todas as suas palavras perante o Senhor , em Mispa.
12 मग इफ्ताहाने अम्मोनी लोकांच्या राजाजवळ वकील पाठवून म्हटले, “माझ्यात आणि तुझ्यात काय भांडण आहे? तू माझ्याशी लढावयास सैन्य घेऊन माझ्या देशात आमचा देश घेण्यास येत आहेस?”
12 Enviou Jefté mensageiros ao rei dos filhos de Amom, dizendo: Que há entre mim e ti que vieste a mim a pelejar contra a minha terra?
13 तेव्हा अम्मोनी लोकांचा राजा इफ्ताहाच्या वकिलांना बोलला, “कारण की जेव्हा इस्राएल मिसरातून आले, तेव्हा त्यांनी आर्णोन नदीपासून याब्बोक व यार्देन या नद्यापर्यंत माझा देश होता तो त्यांनी हिरावून घेतला; तर आता तो देश शांतीने परत दे.”
13 Respondeu o rei dos filhos de Amom aos mensageiros de Jefté: É porque, subindo Israel do Egito, me tomou a terra desde Arnom até ao Jaboque e ainda até ao Jordão; restitui-ma, agora, pacificamente.
14 तेव्हा इफ्ताहाने पुन्हा दुसरे वकील अम्मोनी लोकांच्या राजाजवळ पाठवले.
14 Porém Jefté tornou a enviar mensageiros ao rei dos filhos de Amom,
15 आणि त्यास म्हटले, इफ्ताह असे सांगतो की इस्राएलाने मवाबाचा देश व अम्मोनी लोकांचा देश घेतला नाही.
15 dizendo-lhe: Assim diz Jefté: Israel não tomou nem a terra dos moabitas nem a terra dos filhos de Amom;
16 परंतु जेव्हा इस्राएल मिसरातून निघाले, तेव्हा ते सूफ समुद्राजवळच्या रानांतून तांबड्या समुद्रावरून कादेश येथे आले.
16 porque, subindo Israel do Egito, andou pelo deserto até ao mar Vermelho e chegou a Cades.
17 मग इस्राएलांनी अदोमी राजाजवळ वकील पाठवून म्हटले, “तू कृपा करून आपल्या देशावरून मला जाऊ दे,” परंतु अदोमी राजाने ऐकले नाही, आणि मवाबी राजाजवळही पाठवले, परंतु तोसुद्धा मान्य झाला नाही; यास्तव इस्राएल कादेशात राहिले.
17 Então, Israel enviou mensageiros ao rei dos edomitas, dizendo: Rogo-te que me deixes passar pela tua terra. Porém o rei dos edomitas não lhe deu ouvidos; a mesma coisa mandou Israel pedir ao rei dos moabitas, o qual também não lhe quis atender; e, assim, Israel ficou em Cades.
18 आणि त्यांनी रानात चालून अदोम देश व मवाब देश यांना फेरी घातली. असे सूर्याच्या उगवतीकडून मवाब देशास येऊन आर्णोनच्या काठी तळ दिला परंतु ते मवाब सीमेत गेले नाहीत; कारण आर्णोन मवाबाची सीमा आहे.
18 Depois, andou pelo deserto, e rodeou a terra dos edomitas e a terra dos moabitas, e chegou ao oriente da terra destes, e se acampou além do Arnom; por isso, não entrou no território dos moabitas, porque Arnom é o limite deles.
19 तेव्हा इस्राएलानी अमोऱ्यांचा राजा सीहोन याजवळ, म्हणजे हेशबोनातल्या राजाजवळ वकील पाठवले, “आणि इस्राएलांनी त्यास म्हटले, तू कृपेने आपल्या देशावरून आम्हांला आमच्या ठिकाणापर्यंत जाऊ दे.”
19 Mas Israel enviou mensageiros a Seom, rei dos amorreus, rei de Hesbom; e disse-lhe: Deixa-nos, peço-te, passar pela tua terra até ao meu lugar.
20 पण सीहोनाला इस्राएलावर विश्वास नव्हता म्हणून आपल्या सीमेवरून जाऊ देण्याविषयी तयार झाला नाही, परंतु सीहोनाने आपले सर्व लोक मिळवून आणि याहाज गावात तळ देऊन इस्राएलाशी लढाई केली.
20 Porém Seom, não confiando em Israel, recusou deixá-lo passar pelo seu território; pelo contrário, ajuntou todo o seu povo, e se acampou em Jaza, e pelejou contra Israel.
21 तेव्हा इस्राएलाचा देव परमेश्वर याने सीहोन व त्याचे सर्व लोक इस्राएलाच्या हाती दिले; यास्तव इस्राएलानी त्यांचा नाश केला, आणि त्या देशात राहिलेले जे अमोरी त्यांचा सर्व देश वतन करून घेतला.
21 O Senhor , Deus de Israel, entregou Seom e todo o seu povo nas mãos de Israel, que os feriu; e Israel desapossou os amorreus das terras que habitavam.
22 असे त्यांनी आर्णोनपासून याब्बोकपर्यंत आणि रानापासून यार्देनेपर्यंत अमोऱ्यांचे सर्व प्रांत वतन करून घेतले.
22 Tomou posse de todo o território dos amorreus, desde o Arnom até ao Jaboque e desde o deserto até ao Jordão.
23 तर आता इस्राएलाचा देव परमेश्वर याने आपले लोक इस्राएल याच्यापुढून अमोऱ्यांना घालवले; आणि आता तू त्यांच्या देशाच्या मालमत्तेचा ताबा घेतोस काय?
23 Assim, o Senhor , Deus de Israel, desapossou os amorreus ante o seu povo de Israel. E pretendes tu ser dono desta terra?
24 तुझा देव कमोश तुला जे वतन देतो, ते तू ठेवशील की नाही? तसे आमचा देव परमेश्वर याने ज्या लोकांस घालवून दिले त्यांच्या सर्व वतनावर आमचा ताबा असावा.
24 Não é certo que aquilo que Quemos, teu deus, te dá consideras como tua possessão? Assim, possuiremos nós o território de todos quantos o Senhor , nosso Deus, expulsou de diante de nós.
25 तर आता सिप्पोरपुत्र बालाक मवाब राजा यापेक्षा तू चांगला आहेस की काय? इस्राएलाशी वाद करण्यास त्याने आव्हान दिले काय? त्याने त्याच्याशी कधी लढाई पुकारली काय?
25 És tu melhor do que o filho de Zipor, Balaque, rei dos moabitas? Porventura, contendeu este, em algum tempo, com Israel ou pelejou alguma vez contra ele?
26 जेव्हा इस्राएल हेशबोनात व त्याच्या गावात, आणि अरोएर व त्याच्या गावांत, आणि आर्णोनच्या तीरावरल्या सर्व नगरांत तीनशे वर्षे राहिले, त्या वेळेमध्ये तुम्ही ती का काढून घेतली नाहीत.
26 Enquanto Israel habitou trezentos anos em Hesbom e nas suas vilas, e em Aroer e nas suas vilas, e em todas as cidades que estão ao longe do Arnom, por que vós, amonitas, não as recuperastes durante esse tempo?
27 मी तर तुझा काही अपराध केला नाही, परंतु तू माझ्याशी लढण्याने माझे वाईट करतोस; परमेश्वर जो न्यायाधीश तो आज इस्राएली लोक व अम्मोनी लोक यांमध्ये न्याय करो.
27 Não sou eu, portanto, quem pecou contra ti! Porém tu fazes mal em pelejar contra mim; o Senhor , que é juiz, julgue hoje entre os filhos de Israel e os filhos de Amom.
28 तथापि अम्मोनी लोकांच्या राजाने आपल्याजवळ इफ्ताहाने जी चेतावणी पाठवली ती नाकारली.
28 Porém o rei dos filhos de Amom não deu ouvidos à mensagem que Jefté lhe enviara.
29 आणि परमेश्वराचा आत्मा इफ्ताहाला प्राप्त झाला, नंतर गिलाद व मनश्शे यामध्ये तो चहूकडे गेला, आणि गिलादी मिस्पा त्यामध्ये चहूकडे गेला, मग तेथून अम्मोनी लोकांकडे गेला.
29 Então, o Espírito do Senhor veio sobre Jefté; e, atravessando este por Gileade e Manassés, passou até Mispa de Gileade e de Mispa de Gileade passou contra os filhos de Amom.
30 इफ्ताहाने परमेश्वराजवळ नवस करून म्हटले “जर तू माझ्या हाती अम्मोनी लोक देशील तर,
30 Fez Jefté um voto ao Senhor e disse: Se, com efeito, me entregares os filhos de Amom nas minhas mãos,
31 असे होईल की मी अम्मोनी लोकांपासून शांतीने माघारी आलो तेव्हा मला भेटावयाला जे काही माझ्या घराच्या दाराबाहेर येईल, ते परमेश्वराचे होईल, आणि मी त्याचे होमार्पण यज्ञ करीन.”
31 quem primeiro da porta da minha casa me sair ao encontro, voltando eu vitorioso dos filhos de Amom, esse será do Senhor , e eu o oferecerei em holocausto.
32 तर इफ्ताह अम्मोनी लोकांविरुद्ध लढावयाला त्याकडे गेला, या प्रकारे परमेश्वराने त्यास विजय दिला.
32 Assim, Jefté foi de encontro aos filhos de Amom, a combater contra eles; e o Senhor os entregou nas mãos de Jefté.
33 आणि अरोएरापासून मिन्नीथाजवळ येईपर्यंत त्यास मारून वीस नगरे घेतली, आणि द्राक्षमळ्यांच्या आबेल-करामीमपर्यंत त्यांची फार मोठी कत्तल केली; असे अम्मोनी लोक इस्राएल लोकांच्या स्वाधीन झाले.
33 Este os derrotou desde Aroer até às proximidades de Minite (vinte cidades ao todo) e até Abel-Queramim; e foi mui grande a derrota. Assim, foram subjugados os filhos de Amom diante dos filhos de Israel.
34 मग इफ्ताह मिस्पात आपल्या घरी आला; तेव्हा पाहा, त्याची कन्या त्यास भेटायला डफ व नाचणारे यांच्यासह बाहेर आली; ती तर त्याचे एकुलते एक मूल होती; तिच्याशिवाय त्यास पुत्र किंवा कन्या नव्हती.
34 Vindo, pois, Jefté a Mispa, a sua casa, saiu-lhe a filha ao seu encontro, com adufes e com danças; e era ela filha única; não tinha ele outro filho nem filha.
35 तेव्हा असे झाले की त्याने तिला पाहताच आपली वस्त्रे फाडून म्हटले, “हाय! माझ्या मुली! तू मला दु:खाने पिळून टाकले आहे, आणि मला दुःख देणारी यामध्ये तूही आहेस! मी परमेश्वराकडे शपथ वाहिली आहे; यास्तव मला वचनाविरूद्ध वळता येत नाही.”
35 Quando a viu, rasgou as suas vestes e disse: Ah! Filha minha, tu me prostras por completo; tu passaste a ser a causa da minha calamidade, porquanto fiz voto ao Senhor e não tornarei atrás.
36 तेव्हा ती त्यास बोलली, “हे माझ्या बापा, तू परमेश्वराकडे नवस केला आहे, तर तू जे वचन दिले त्याप्रमाणे तू माझ्याशी सर्वकाही कर; कारण परमेश्वराने तुझे शत्रू अम्मोनी लोक यांचा तुझ्यासाठी सूड घेतला आहे.”
36 E ela lhe disse: Pai meu, fizeste voto ao Senhor ; faze, pois, de mim segundo o teu voto; pois o Senhor te vingou dos teus inimigos, os filhos de Amom.
37 आणखी तिने आपल्या बापाला म्हटले, “माझ्यासाठी ही एक गोष्ट करा की मला दोन महिन्यांची रजा द्या, म्हणजे मी आपल्या मैत्रीणीबरोबर डोंगरावर जाऊन आपल्या कुमारीपणाबद्दल शोक करेल.”
37 Disse mais a seu pai: Concede-me isto: deixa-me por dois meses, para que eu vá, e desça pelos montes, e chore a minha virgindade, eu e as minhas companheiras.
38 तेव्हा त्याने म्हटले, “जा.” असे त्याने तिला दोन महिने सोडले, आणि ती आपल्या मैत्रिणीबरोबर डोंगरांवर जाऊन आपल्या कुमारीपणाबद्दल रडली.
38 Consentiu ele: Vai. E deixou-a ir por dois meses; então, se foi ela com as suas companheiras e chorou a sua virgindade pelos montes.
39 मग दोन महिन्यांच्या शेवटी असे झाले की ती आपल्या बापाजवळ माघारी आली, नंतर त्याने आपण केलेल्या नवसाप्रमाणे तिचे केले. तिचा पुरुषाबरोबर कधीच शारीरीक संबंध आला नव्हता, आणि इस्राएलात अशी रित झाली की,
39 Ao fim dos dois meses, tornou ela para seu pai, o qual lhe fez segundo o voto por ele proferido; assim, ela jamais foi possuída por varão. Daqui veio o costume em Israel
40 प्रत्येक वर्षी इस्राएलातल्या मुलींनी इफ्ताह गिलादी याच्या कन्येचे स्मरण करायाला वर्षातील चार दिवस जात जावे.
40 de as filhas de Israel saírem por quatro dias, de ano em ano, a cantar em memória da filha de Jefté, o gileadita.
Atalhos do teclado
- Capítulo anterior←
- Próximo capítulo→
- Versículo anteriork
- Próximo versículoj
- Limpar seleçãoEsc
- Esta ajuda?
Estude este capítulo no WhatsApp
Peça à IA da Bíblia Fala para explicar Juízes 11, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.