Josué 9

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (MAR) vs NAA

Sair da comparação
NAA Nova Almeida Atualizada 2017
1 मग यार्देन नदीच्या पश्चिमी डोंगराळ प्रदेशात, तळवटीत आणि लबानोनासमोरील महासमुद्राच्या किनाऱ्यावर राहणारे हित्ती, अमोरी, कनानी, परिज्जी, हिव्वी आणि यबूसी यांचे जे सर्व राजे होते.
1 Todos os reis que estavam do lado oeste do Jordão, nas montanhas e nas campinas, em toda a costa do mar Grande até o Líbano ficaram sabendo disso. Eram os reis dos heteus, dos amorreus, dos cananeus, dos ferezeus, dos heveus e dos jebuseus.
2 त्यांनी एका आदेशाखाली एकत्र जमून यहोशवा व इस्राएल यांच्या विरुद्ध लढाई पुकारली.
2 Então eles se ajuntaram de comum acordo, para guerrear contra Josué e contra Israel.
3 यहोशवाने यरीहो आणि आय या नगरांचे काय केले हे जेव्हा गिबोनाच्या रहिवाश्यांनी ऐकले,
3 Mas os moradores de Gibeão, ouvindo o que Josué tinha feito com Jericó e com Ai,
4 तेव्हा त्यांनी फसवेगिरीची योजना केली; त्यांनी राजदुतांप्रमाने वर्तणूक केली, आणि आपल्या गाढवावर जुनी गोणताटे व झिजलेले, फाटलेले, शिवलेले द्राक्षरसाचे बुधले घेतले;
4 usaram de astúcia: foram e se fingiram de embaixadores, levando sacos velhos sobre os seus jumentos e odres de vinho, velhos, rasgados e cheios de remendos,
5 त्यांनी आपल्या पायात झिजलेले व ठिगळाचे जोडे आणि अंगात जुनेपुराणे कपडे घातले; त्यांच्या खाण्याच्या सर्व भाकरी वाळलेल्या आणि बुरसटल्या होत्या.
5 calçando sandálias velhas e remendadas e vestindo roupas velhas. E todo o pão que traziam para comer era seco e bolorento.
6 ते गिलगाल येथील छावणीत यहोशवाकडे येऊन त्यास व इस्राएल लोकांस म्हणाले, “आम्ही दूर देशाहून आलो आहोत म्हणून आता आमच्याबरोबर करार करा.”
6 Foram a Josué, no arraial, em Gilgal, e lhe disseram, a ele e aos homens de Israel: — Viemos de uma terra distante e queremos que vocês façam uma aliança conosco.
7 इस्राएल लोकांनी त्या हिव्वी लोकांस म्हटले, “आम्ही तुमच्याबरोबर करार कसा करणार? कदाचित न जाणो तुम्ही आमच्याजवळ राहणारे असाल.”
7 Mas os homens de Israel responderam aos heveus: — Talvez vocês morem aqui perto. Como podemos fazer uma aliança com vocês?
8 ते यहोशवाला म्हणाले, “आम्ही तुझे दास आहो.” यहोशवाने त्यांना विचारले, “तुम्ही कोण व कोठून आला?”
8 Então disseram a Josué: — Somos seus servos. Mas Josué perguntou: — Quem são vocês? De onde vêm?
9 त्यांनी त्यास म्हटले, “तुझा देव परमेश्वर ह्याचे नाव ऐकून आम्ही तुझे दास फार दूर देशाहून आलो आहोत. कारण त्याने मिसरात जी प्रत्येक गोष्ट केली त्याची कीर्ती आम्ही ऐकली आहे;
9 Eles responderam: — Estes seus servos vieram de uma terra muito distante, por causa do nome do
10 आणि यार्देनेच्या पलीकडील अमोरी लोकांचे दोन राजे, हेशबोनाचा राजा सीहोन आणि अष्टारोथातला बाशानाचा राजा ओग, यांना जे काय केले तेही आम्ही ऐकले आहे.
10 e tudo o que fez com os dois reis dos amorreus que estavam do outro lado do Jordão, a saber, Seom, rei de Hesbom, e Ogue, rei de Basã, que estava em Astarote.
11 तेव्हा आमचे वडील आणि आमच्या देशातील सर्व रहिवासी आम्हांला म्हणाले, प्रवासासाठी आपल्याबरोबर शिदोरी घ्या व त्यांना भेटायला जा आणि त्यांना म्हणा, आम्ही तुमचे दास आहोत, तेव्हा आता आमच्याशी करार करा.”
11 Por isso os nossos anciãos e todos os moradores da nossa terra nos disseram: “Levem com vocês alimentos para a viagem e vão ao encontro deles, dizendo: ‘Somos seus servos; façam uma aliança conosco.’
12 या पाहा आमच्या भाकरी! आम्ही घरून तुमच्याकडे येण्यास निघालो त्या दिवशी, प्रवासात शिदोरी म्हणून घेतल्या तेव्हा त्या गरम होत्या; पण आता त्या वाळून बुरसटल्या आहेत.
12 Este nosso pão nós pegamos em nossas casas quando ainda estava quente, no dia em que saímos para vir falar com vocês, e agora aqui está ele, já seco e bolorento.
13 हे द्राक्षरसाचे बुधले आम्ही भरून घेतले तेव्हा नवे होते, पण आता ते फाटून तुटून गेले आहेत; हे आमचे कपडे आणि जोडे फार लांबच्या प्रवासाने जीर्ण झाले आहेत.
13 Estes odres eram novos quando os enchemos de vinho, mas agora já estão rasgados. E estas nossas roupas e estas nossas sandálias já envelheceram, por causa da longa viagem.”
14 तेव्हा लोकांनी त्यांचे काही अन्न स्वीकारले; पण त्यांनी मार्गदर्शनासाठी परमेश्वर देवाचा सल्ला घेतला नाही.
14 Então os israelitas aceitaram os alimentos deles e não pediram conselho ao Senhor .
15 मग यहोशवाने त्यांच्याशी समेट केला आणि त्यांना जीवन बहाल करून सुरक्षित ठेवण्याचे अभिवचन दिले. लोकांच्या नेत्यांनीही त्यांच्याशी शपथ घेतली.
15 Josué concedeu-lhes paz e fez com eles a aliança de lhes poupar a vida; e os chefes da congregação confirmaram isso com juramento.
16 इस्राएल लोकांनी त्यांच्याशी करार केल्यानंतर तीन दिवसानी त्यांना समजले की, हे आपले शेजारी असून आपल्यामध्ये राहणारे आहेत.
16 Ao fim de três dias, depois de terem feito a aliança com eles, souberam que eram seus vizinhos e que moravam perto deles.
17 नंतर इस्राएल लोक कूच करीत तिसऱ्या दिवशी त्यांच्या नगरास जाऊन पोहचले. त्यांच्या नगरांची नावे गिबोन, कफीरा, बैरोथ व किर्याथ-यारीम.
17 Pois, partindo os filhos de Israel, chegaram às cidades deles ao terceiro dia. E as cidades deles eram Gibeão, Cefira, Beerote e Quiriate-Jearim.
18 पण इस्राएल लोकांनी त्यांना मारून टाकले नाही, कारण त्यांच्या नेत्यांनी इस्राएलाचा देव परमेश्वर याची शपथ घेतली होती; तेव्हा सर्व इस्राएल लोकांनी त्यांच्या नेत्यांविरुद्ध कुरकुर केली.
18 Os filhos de Israel não os atacaram, porque os chefes da congregação lhes haviam jurado pelo Senhor , Deus de Israel. Por isso toda a congregação murmurou contra os chefes.
19 परंतु सर्व नेत्यांनी सगळ्या लोकांस सांगितले, “आम्ही त्यांच्यासमोर इस्राएलाचा देव परमेश्वर याची शपथ घेतली आहे, म्हणून आता आम्हांला त्यांना हात लावता येत नाही.
19 Então todos os chefes disseram a toda a congregação: — Nós juramos a eles pelo
20 त्यांच्याशी आम्ही असेच वागणार; त्यांना आम्ही जिवंत राखणार; तसे न केल्यास त्यांच्याशी शपथ वाहिल्यामुळे आम्ही क्रोधास पात्र ठरू.”
20 Isto, porém, lhes faremos: vamos deixá-los viver, para que não venha grande ira sobre nós, por causa do juramento que lhes fizemos.
21 नेत्यांनी लोकांस सांगितले की, “त्यांना जिवंत राहू द्या.” नेत्यांनी त्यांना सांगितल्याप्रमाणे गिबोनी लोक सर्व इस्राएली लोकांचे लाकूडतोडे व पाणक्ये झाले.
21 E os chefes acrescentaram: — Deixem que vivam. E assim eles se tornaram rachadores de lenha e tiradores de água para toda a congregação, como os chefes lhes tinham dito.
22 यहोशवाने त्यांना बोलावून म्हटले, “तुम्ही आमच्यामध्ये राहत असून आम्ही फार दूरचे आहोत असे सांगून आम्हांला का फसवले?
22 Josué chamou os gibeonitas e lhes disse: — Por que vocês nos enganaram, dizendo que moravam bem longe de nós, quando na verdade moram aqui perto?
23 म्हणून आता तुम्ही या कारणासाठी शापित आहात, आणि तुमच्यातले काही नेहमी दास होऊन रहाल; तुम्ही माझ्या देवाच्या घरासाठी लाकूड तोडणारे व पाणी काढणारे असे होऊन रहाल.”
23 Agora vocês estão sob maldição e entre vocês nunca deixará de haver escravos, rachadores de lenha e tiradores de água para a casa do meu Deus.
24 त्यांनी यहोशवाला उत्तर दिले, “हा सर्व देश तुम्हाला द्यावा आणि तुमच्यासमोर देशांतील सर्व रहिवाश्यांचा नाश करावा असे तुझा देव परमेश्वर याने आपला सेवक मोशे याला आज्ञापिले होते, हे तुझ्या दासांना पक्के कळले होते; तुमच्यामुळे आम्हांला आमच्या जीवाची फार भीती वाटली म्हणून आम्ही हे काम केले.
24 Então eles responderam a Josué: — É que foi anunciado a estes seus servos, como certo, que o
25 आता पाहा, आम्ही तुझ्या हातात आहोत; तुला बरे व योग्य दिसेल तसे आमचे कर.”
25 Eis que estamos nas suas mãos; trate-nos segundo lhe parecer bom e reto.
26 त्यामुळे यहोशवाने त्यांचे तसे केले; त्यांना इस्राएल लोकांच्या हातातून सोडवले; इस्राएल लोकांनी त्यांना जिवे मारले नाही,
26 Josué fez como tinha dito e livrou-os das mãos dos filhos de Israel; e não os mataram.
27 यहोशवाने त्या दिवशी मंडळीसाठी आणि परमेश्वर निवडणार होता त्या स्थानी त्याच्या वेदीसाठी गिबोन्यांना लाकूड तोडणारे व पाणी काढणारे म्हणून नेमले; तसे ते आजपर्यंत आहेत.
27 Naquele dia, Josué os fez rachadores de lenha e tiradores de água para a congregação e para o altar do Senhor , até o dia de hoje, no lugar que Deus escolhesse.

Ler em outra tradução

Comparar com outra

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Josué 9, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.