Josué 15

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (MAR) vs NVI

Sair da comparação
NVI Nova Versão Internacional
1 यहूदी वंशाला त्याच्या कुळाप्रमाणे नेमून दिलेला जो भाग चिठ्ठ्या टाकून मिळाला तो अदोमाच्या सीमेपर्यंत आणि दक्षिणकडे सीन रानापर्यंत अगदी दक्षिणेच्या सीमेपर्यंत पसरला आहे.
1 As terras distribuídas à tribo de Judá, clã por clã, estendiam-se para o sul até a fronteira com Edom, até o deserto de Zim, no extremo sul.
2 आणि त्यांची दक्षिण सीमा क्षारसमुद्राच्या शेवटची खाडी, जिचे तोंड दक्षिणेस आहे, तेथून झाली.
2 Sua fronteira sul começava na ponta de terra do extremo sul do mar Salgado,
3 ती तशीच अक्रब्बीम नावाच्या चढणीच्या दक्षिणेकडे जाऊन सीन रानाच्या कडेने कादेश-बर्ण्याच्या दक्षिणेस गेली असून हेस्रोन नगराजवळून अद्दारा नगरावरून जाऊन कर्का नगराकडे वळली आहे.
3 passava pelo sul da subida de Acrabim, prosseguia até Zim e daí até o sul de Cades-Barnéia. Depois passava por Hezrom, indo até Adar e fazia uma curva em direção a Carca.
4 आणि ती असमोना जवळून मिसरी नदीस गेली; नंतर तिचा शेवट पश्चिम समुद्रा नजीक आहे; अशी तुमची दक्षिण सीमा व्हावी.
4 Dali continuava até Azmom, indo até o ribeiro do Egito e terminando no mar. Essa é a fronteira sul deles.
5 आणि पूर्व सीमा क्षार समुद्रावरून यार्देनेच्या मुखापर्यंत आहे; आणि उत्तरेस कोपऱ्याची सीमा समुद्राच्या काठी यार्देनेचा मुखाजवळील समुद्राची खाडी तेथून आहे.
5 A fronteira oriental é o mar Salgado, até a foz do Jordão. A fronteira norte começava na enseada, na foz do Jordão,
6 मग ती सीमा बेथ-होग्ला नगराच्या चढावावरून जाऊन बेथ-अराबा नगराच्या उत्तरेस जाते; नंतर ती सीमा रऊबेनाचा पुत्र बोहन याची धोंड तेथवर चढून गेली;
6 subia até Bete-Hogla e passava ao norte de Bete-Arabá, até a Pedra de Boã, filho de Rúben.
7 मग ती सीमा अखोरच्या खोऱ्यापासून दबीरापर्यंत जाऊन उत्तरेस गिलगालकडे वळली आहे; हे गिलगाल नदीच्या दक्षिणेस अदुम्मीमाच्या चढणीसमोर आहे, ती नदी दक्षिणेस आहे; नंतर ती सीमा एन-शेमेशाच्या नावाच्या झऱ्याजवळून जाऊन तिचा शेवट एन-रोगेलास होतो.
7 A fronteira subia então do vale de Acor até Debir, e virava para o norte, na direção de Gilgal, que fica defronte da subida de Adumim, ao sul do ribeiro. Passava pelas águas de En-Semes, indo até En-Rogel.
8 मग ती सीमा हिन्नोमाच्या पुत्राच्या खिंडीजवळून यबूसी म्हणजे यरूशलेम त्याच्या दक्षिण भागास चढून जाते; नंतर पश्चिमेस हिन्नोम खिंडीच्या समोर जो डोंगर, जो रेफाईमांच्या उत्तरेस आहे, खोऱ्याच्या शेवटी शिखरावर सीमा चढून गेली.
8 Depois subia pelo vale de Ben-Hinom, ao longo da encosta sul da cidade dos jebuseus, isto é, Jerusalém. Dali subia até o alto da montanha, a oeste do vale de Hinom, no lado norte do vale de Refaim.
9 मग डोंगराच्या शिखरापासून नेफ्तोहाच्या पाण्याच्या झऱ्यापर्यंत सीमा पुढे गेली; आणि एफ्रोन डोंगरावरच्या नगरात जाऊन, बाला म्हणजेच किर्याथ-यारीम तिकडे ती सीमा पुढे गेली,
9 Do alto da montanha a fronteira prosseguia para a fonte de Neftoa, ia para as cidades do monte Efrom e descia na direção de Baalá, que é Quiriate-Jearim.
10 मग बालापासून ती सीमा पश्चिमेस सेईर डोंगराकडे फिरून यारीम डोंगर, म्हणजेच कसालोन त्याच्या उत्तरेकडल्या भागा जवळून गेली, आणि बेथ-शेमेशाकडे उतरून तिम्ना शहराकडे गेली.
10 De Baalá fazia uma curva em direção ao oeste, até o monte Seir, prosseguia pela encosta norte do monte Jearim, isto é Quesalom; em seguida continuava descendo até Bete-Semes e passava por Timna.
11 मग ती सीमा एक्रोन शहराच्या बाजूस उत्तरेकडे गेली, आणि शिक्रोन नगरापर्यंत सीमा गेली आहे; मग बाला डोंगराजवळून जाऊन यबनेल नगरास गेली; या सीमेचा शेवट समुद्रात होता.
11 Depois ia para a encosta norte de Ecrom, virava na direção de Sicrom, continuava até o monte Baalá e chegava a Jabneel, terminando no mar.
12 आणि पश्चिमेची सरहद्द महासमुद्रचा किनारा हीच सीमा होती, ही चहुकडली सीमा यहूदाच्या वंशास त्यांच्या कुळाप्रमाणे जो विभाग मिळाला त्याची होती.
12 A fronteira ocidental era o litoral do mar Grande. Eram essas as fronteiras que demarcavam Judá por todos os lados, de acordo com os seus clãs.
13 आणि परमेश्वराने यहोशवास सांगितल्यानुसार यहोशवाने यफुन्नेचा पुत्र कालेब याला यहूदाच्या वंशाबरोबर वाटा दिला, त्याने किर्याथ-आर्बा, म्हणजेच हेब्रोन शहर हे त्यास दिले; हा आर्बा अनाक्यांचा पूर्वज होता.
13 Conforme a ordem dada pelo Senhor, Josué deu a Calebe, filho de Jefoné, uma porção de terra em Judá, que foi Quiriate-Arba, isto é, Hebrom. Arba era antepassado de Enaque.
14 मग तेथून कालेबाने अनाकाची तीन मुले शेशय व अहीमान व तलमय म्हणजे अनाकाचे वंशज यांना वतनातून घालवले.
14 Calebe expulsou de Hebrom os três enaquins: Sesai, Aimã e Talmai, descendentes de Enaque.
15 नंतर तो तेथून दबीर शहरात राहणाऱ्यांवर चालून गेला; दबीराचे पूर्वीचे नाव किर्याथ-सेफर होते.
15 Dali avançou contra o povo de Debir, anteriormente chamada Quiriate-Sefer.
16 तेव्हा कालेब म्हणाला, “जो किर्याथ-सेफर लढून काबीज करून घेईल, त्यास मी आपली कन्या अखसा पत्नी करून देईन.
16 E Calebe disse: "Darei minha filha Acsa por mulher ao homem que atacar e conquistar Quiriate-Sefer".
17 तेव्हा कालेबाचा भाऊ कनाज याचा पुत्र अथनिएल याने ते काबीज केले; यास्तव त्याने आपली कन्या अखसा त्यास पत्नी करून दिली.”
17 Otoniel, filho de Quenaz, irmão de Calebe, a conquistou; e Calebe lhe deu sua filha Acsa por mulher.
18 आणि ती त्याच्याकडे आली तेव्हा असे झाले की तिने आपल्या बापाजवळ शेत मागायला त्यास गळ घातली, आणि ती गाढवावरून उतरली, तेव्हा कालेबाने तिला म्हटले, तुला काय पाहिजे?
18 Quando Acsa foi viver com Otoniel, ela o pressionou para que pedisse um campo ao pai dela. Assim que ela desceu do jumento, perguntou-lhe Calebe: "O que você quer? "
19 अखसाने उत्तर दिले, “मला आशीर्वाद द्या; कारण तुम्ही मला नेगेब दिले आहे तर मला पाण्याचे झरेही द्या.” त्याने तिला वरचे झरे व खालचे झरे दिले.
19 "Quero um presente", respondeu ela. "Já que me deu terras no Neguebe, dê-me também fontes de água. " Então Calebe lhe deu as fontes superiores e as inferiores.
20 यहूदाच्या वंशाचे वतन त्यांच्या कुळाप्रमाणे हेच आहे;
20 Esta é a herança da tribo de Judá, clã por clã:
21 यहूदाच्या वंशजांना दक्षिणेस अदोमाच्या सीमेजवळील नगरे मिळाली ती ही; कबसेल व एदेर व यागूर;
21 As cidades que ficavam no extremo sul da tribo de Judá, no Neguebe, na direção da fronteira de Edom, eram: Cabzeel, Eder, Jagur,
22 कीना व दीमोना व अदादा;
22 Quiná, Dimona, Adada,
23 आणि केदेश व हासोर व इथनान;
23 Quedes, Hazor, Itnã,
24 जीफ, टेलेम व बालोथ;
24 Zife, Telém, Bealote,
25 हासोर-हदत्ता व करीयोथ हस्रोन (यालाच हासोरसुद्धा म्हणत)
25 Hazor-Hadata, Queriote-Hezrom, que é Hazor,
26 अमाम व शमा व मोलादा;
26 Amã, Sema, Moladá,
27 आणि हसर-गदा व हेष्मोन व बेथ-पेलेट;
27 Hazar-Gada, Hesmom, Bete-Pelete,
28 आणि हसर-शुवाल व बैर-शेबा व बिजोथा;
28 Hazar-Sual, Berseba, Biziotiá,
29 बाला, ईयीम व असेम;
29 Baalá, Iim, Azém,
30 आणि एल्तोलाद व कसील व हर्मा;
30 Eltolade, Quesil, Hormá,
31 आणि सिकलाग व मद्मन्ना व सन्सन्ना;
31 Ziclague, Madmana, Sansana,
32 आणि लबावोथ, शिलहीम, अईन व रिम्मोन; ही सर्व नगरे एकोणतीस त्यांची गावे.
32 Lebaote, Silim, Aim e Rimom. Eram um total de vinte e nove cidades com seus povoados.
33 तळवटीतली नगरे ही, एष्टावोल, सरा व अषणा;
33 Na Sefelá: Estaol, Zorá, Asná,
34 जानोहा व एन-गन्नीम तप्पूहा व एनाम;
34 Zanoa, En-Ganim, Tapua, Enã,
35 यर्मूथ व अदुल्लाम, सोखो व अजेका;
35 Jarmute, Adulão, Socó, Azeca,
36 आणि शाराईम व अदीथईम व गदेरा व गदेरोथईम, अशी चौदा नगरे, आणि त्यांची गावे;
36 Saaraim, Aditaim, e Gederá ou Gederotaim. Eram catorze cidades com seus povoados.
37 सनान व हदाशा व मिग्दल-गाद;
37 Zenã, Hadasa, Migdal-Gade,
38 दिलन, मिस्पा व यकथेल;
38 Dileã, Mispá, Jocteel,
39 लाखीश व बसकाथ व एग्लोन;
39 Láquis, Bozcate, Eglom,
40 कब्बोन व लहमाम व किथलीश;
40 Cabom, Laamás, Quitlis,
41 गदेरोथ बेथ-दागोन व नामा व मक्केदा; अशी सोळा नगरे, आणि त्यांची गावे.
41 Gederote, Bete-Dagom, Naamá e Maquedá. Eram dezesseis cidades com seus povoados.
42 लिब्ना व एथेर व आशान;
42 Libna, Eter, Asã,
43 इफ्ताह व अष्णा व नजीब;
43 Iftá, Asná, Nezibe,
44 आणि कईला व अकजीब व मारेशा; अशी नऊ नगरे, आणि त्यांची गावे.
44 Queila, Aczibe e Maressa. Eram nove cidades com seus povoados.
45 एक्रोन आणि त्याच्या उपनगरांसह त्याची गावे;
45 Ecrom, com suas vilas e seus povoados;
46 एक्रोनाजवळची आणि पश्चिमेची अश्दोदाची बाजूकडली सर्व वसाहत, त्याच्याजवळच्या खेडेगावांसह.
46 de Ecrom até o mar, todas as cidades nas proximidades de Asdode, juntamente com os seus povoados;
47 अश्दोद, त्याच्या सभोवतीची उपनगरे व खेडी; गज्जा, त्याच्या सभोवतीची उपनगरे आणि खेडी; मिसराचा ओहोळ व महासमुद्राच्या किनाऱ्यावरची नगरे.
47 Asdode, com suas vilas e seus povoados; e Gaza, com suas vilas e seus povoados, até o ribeiro do Egito e o litoral do mar Grande.
48 आणि डोंगराळ प्रदेशातली नगरे ही, शामीर व यत्तीर व सोखो;
48 Na região montanhosa: Samir, Jatir, Socó,
49 दन्ना व किर्याथ-सन्ना तेच दबीर;
49 Daná, Quiriate-Sana, que é Debir,
50 अनाब व एष्टमो व अनीम,
50 Anabe, Estemo, Anim,
51 आणि गोशेन व होलोन व गिलो. अशी अकरा नगरे, आणि त्याकडील खेडी,
51 Gósen, Holom e Gilo. Eram onze cidades com seus povoados.
52 अरब व दूमा व एशान,
52 Arabe, Dumá, Esã,
53 यानीम व बेथ-तप्पूहा व अफेका,
53 Janim, Bete-Tapua, Afeca,
54 हुमटा व किर्याथ-आर्बा तेच हेब्रोन व सियोर, अशी नऊ नगरे, आणि त्यांची खेडी.
54 Hunta, Quiriate-Arba, que é Hebrom e Zior. Eram nove cidades com seus povoados.
55 मावोन, कर्मेल व जीफ व यूटा,
55 Maom, Carmelo, Zife, Jutá,
56 इज्रेल व यकदाम व जानोहा,
56 Jezreel, Jocdeão, Zanoa,
57 काइन, गिबा, व तिम्ना, ही दहा नगरे आणि त्यांची खेडी.
57 Caim, Gibeá e Timna. Eram dez cidades com seus povoados.
58 हल्हूल, बेथ-सूर व गदोर,
58 Halul, Bete-Zur, Gedor,
59 माराथ, बेथ-अनोथ व एल्तकोन; ही सहा नगरे आणि त्यांची खेडी.
59 Maarate, Bete-Anote e Eltecom. Eram seis cidades com seus povoados.
60 किर्याथ-बाल म्हणजेच किर्याथ-यारीम व राब्बा ही दोन नगरे आणि त्यांची खेडी.
60 Quiriate-Baal, que é Quiriate-Jearim e Rabá. Eram duas cidades com seus povoados.
61 रानातली नगरे ही, बेथ-अराबा, मिद्दीन व सखाखा;
61 No deserto: Bete-Arabá, Midim, Secacá,
62 आणि निबशान व मिठाचे नगर व एन-गेदी; ही सहा नगरे आणि त्यांची खेडी.
62 Nibsã, Cidade do Sal e En-Gedi. Eram seis cidades com seus povoados.
63 तथापि यरूशलेमात राहणाऱ्या यबूसी लोकांस यहूदाच्या वंशजाना घालवता आले नाही; यास्तव यबूसी यरूशलेमात यहूदाच्या वंशजाजवळ आजपर्यंत राहत आहेत.
63 Os descendentes de Judá não conseguiram expulsar os jebuseus, que viviam em Jerusalém; até hoje os jebuseus vivem ali com o povo de Judá.

Ler em outra tradução

Comparar com outra

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Josué 15, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.