Josué 11
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (MAR) vs NVI
1 जेव्हा हासोराचा राजा याबीन याने हे ऐकले तेव्हा त्याने मादोनाचा राजा योबाब आणि शिम्रोनाचा राजा व अक्षाफाचा राजा ह्यांना,
1 Quando Jabim, rei de Hazor, soube disso, enviou mensagem a Jobabe, rei de Madom, aos reis de Sinrom e Acsafe,
2 आणि तसेच उत्तरेकडील डोंगराळ प्रदेशांत, किन्नेरोथाच्या दक्षिणेकडील अराबात. तळवटीत आणि पश्चिमेकडील दोरात असलेल्या राजांना,
2 e aos reis do norte que viviam nas montanhas, na Arabá ao sul de Quinerete, na Sefelá e em Nafote-Dor, a oeste;
3 आणि पूर्वेकडले व पश्चिमेकडले कनानी, तसेच अमोरी, हित्ती, परिज्जी व डोंगरवटीतले यबूसी आणि हर्मोन डोंगराच्या तळाशी मिस्पा प्रातांत राहणारे हिव्वी यांना बोलावणे पाठवले.
3 aos cananeus a leste e a oeste; aos amorreus, aos hititas, aos ferezeus e aos jebuseus das montanhas; e aos heveus do sopé do Hermom, na região de Mispá.
4 तेव्हा त्यांचे सर्व सैन्य समुद्रकिनाऱ्यावरील वाळूसारखा अगणित समुदाय घेऊन निघाले. त्यांच्याबरोबर पुष्कळ घोडे व रथ होते.
4 Saíram com todas as suas tropas, um exército imenso, tão numeroso como a areia da praia, além de um grande número de cavalos e carros.
5 या सर्व राजांनी एकत्र जमून इस्राएलाशी लढावयास मेरोम सरोवराजवळ तळ दिला.
5 Todos esses reis se uniram e acamparam junto às águas de Merom, para lutar contra Israel.
6 मग परमेश्वर यहोशवाला म्हणाला, “त्यांच्या उपस्थितीला भिऊ नको, कारण उद्या मी या वेळी त्या सर्वांना इस्राएलाच्या हाती देऊन मारणार आहे. त्यांच्या घोड्यांच्या घोडशिरा तोडून टाक व त्यांचे रथ अग्नीत जाळून टाक.”
6 E o Senhor disse a Josué: "Não tenha medo deles, porque amanhã a esta hora entregarei todos mortos a Israel. A você cabe cortar os tendões dos cavalos deles e queimar os seus carros".
7 तेव्हा यहोशवा आपल्या सर्व योद्ध्यांसह मेरोम पाण्याजवळ अकस्मात येऊन त्यांच्यावर तुटून पडला.
7 Josué e todo o seu exército os surpreenderam junto às águas de Merom e os atacaram,
8 परमेश्वराने त्यांना इस्राएलाच्या हाती दिले; त्यांनी त्यांना मार देऊन सीदोन महानगरापर्यंत व मिस्रफोथ माईमापर्यंत आणि पूर्वेस मिस्पा खोऱ्यापर्यंत पाठलाग करून त्यांचा एवढा संहार केला की त्यातला एकही जिवंत राहिला नाही.
8 e o Senhor os entregou nas mãos de Israel, que os derrotou e os perseguiu até Sidom, a grande, até Misrefote-Maim e até o vale de Mispá, a leste. Eles os mataram sem deixar sobrevivente algum.
9 परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे यहोशवाने केले, म्हणजे त्यांच्या घोड्यांच्या घोडशिरा तोडल्या व त्यांचे रथ अग्नीत जाळून टाकले.
9 Josué os tratou como o Senhor lhe tinha ordenado. Cortou os tendões dos seus cavalos e queimou os seus carros.
10 त्या वेळी यहोशवाने माघारी येऊन हासोर घेतले, व त्याच्या राजाला तलवारीने ठार मारले. पूर्वी हासोर त्या सर्व राज्यांमध्ये प्रमुख होते.
10 Na mesma ocasião Josué voltou, conquistou Hazor e matou o seu rei à espada. ( Hazor tinha sido a capital de todos esses reinos. )
11 तेथल्या प्रत्येक जिवंत प्राण्यांना त्यांनी तलवारीने ठार मारून त्यांचा समूळ नाश केला; आणि कोणताही जिवंत प्राणी जिवंत ठेवला नाही; नंतर त्याने हासोर नगराला आग लावून ते जाळून टाकले.
11 Matou à espada todos os que nela estavam. Exterminou-os totalmente, sem poupar nada que respirasse, e incendiou Hazor.
12 परमेश्वराचा सेवक मोशे याच्या आज्ञेप्रमाणे यहोशवाने त्या राजांची सर्व नगरे सर्व राजासह हस्तगत करून त्यांना तलवारीने ठार मारले व त्यांचा समूळ नाश केला.
12 Josué conquistou todas essas cidades e matou à espada os reis que as governavam. Destruiu-as totalmente, como Moisés, servo do Senhor, tinha ordenado.
13 टेकड्यांवर वसलेली कोणतीही नगरे इस्राएलाने जाळली नाहीत; हासोर मात्र यहोशवाने जाळले.
13 Contudo, Israel não incendiou nenhuma das cidades construídas nas colinas, com exceção de Hazor, que Josué incendiou.
14 या नगरातील सर्व मालमत्ता व गुरेढोरे इस्राएल लोकांनी लुटून नेली, पण त्यांनी तलवार चालवून प्रत्येक मनुष्य मारून टाकला, एकही जिवंत प्राणी जिवंत ठेवला नाही.
14 Os israelitas tomaram posse de todos os despojos e dos animais dessas cidades, mas mataram todo o povo à espada, até exterminá-lo completamente, sem poupar ninguém.
15 परमेश्वराने आपला सेवक मोशे याला आज्ञा केल्याप्रमाणे मोशेने यहोशवाला आज्ञा केली; आणि त्याप्रमाणे यहोशवाने केले. यहोशवाने मोशेला आज्ञा दिलेली कोणतीही गोष्ट करण्याचे त्याने सोडले नाही.
15 Tudo o que o Senhor tinha ordenado a seu servo Moisés, Moisés ordenou a Josué, e Josué obedeceu, sem deixar de cumprir nada de tudo o que o Senhor tinha ordenado a Moisés.
16 अशा प्रकारे यहोशवाने इस्राएलाचा डोंगरी मुलूख, सर्व नेगेब, सर्व गोशेन प्रांत, तळवट, असा सर्व देश घेतला.
16 Assim Josué conquistou toda aquela terra: a serra central, todo o Neguebe, toda a região de Gósen, a Sefelá, a Arabá e os montes de Israel e suas planícies,
17 तसेच सेईरच्या वाटेवरील हालाक डोंगरापासून हर्मोन पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या लबानोनाच्या खोऱ्यातील बाल-गाद येथपर्यंतचा सर्व प्रदेश त्याने हस्तगत केला; त्यांच्या सर्व राजांना त्याने धरून ठार मारले.
17 desde o monte Halaque, que se ergue na direção de Seir, até Baal-Gade, no vale do Líbano, no sopé do monte Hermom. Ele capturou todos os seus reis e os matou.
18 त्या सर्व राजाशी यहोशवाने पुष्कळ दिवस युद्ध केले.
18 Josué guerreou contra todos esses reis por muito tempo.
19 गिबोनात राहणाऱ्या हिव्व्याखेरीज कोणत्याही नगराने इस्राएल लोकांशी समेट केला नाही; ती सर्व त्यांनी लढून घेतली,
19 Com exceção dos heveus que viviam em Gibeom, nenhuma cidade fez a paz com os israelitas, que a todas conquistou em combate.
20 कारण परमेश्वराने त्यांची मने कठीण केली होती, अशासाठी की त्यांनी इस्राएलाविरुद्ध युद्ध करण्यासाठी पुढे यावे आणि त्याने त्यांचा समूळ नाश करावा. परमेश्वराने मोशेला अज्ञापिल्याप्रमाणे त्यांचा समूळ नाश करण्याच्या निर्णयापर्यंत, त्याने त्यांच्या दया-याचनेची गय केली नाही.
20 Pois foi o próprio Senhor que endureceu os seus corações para guerrearem contra Israel, para que ele os destruísse totalmente, exterminando-os sem misericórdia, como o Senhor tinha ordenado a Moisés.
21 तेव्हा यहोशवाने डोंगराळ प्रदेशांत जाऊन हेब्रोन, दबीर व अनाब यहूदा व इस्राएलाच्या सबंध डोंगराळ प्रदेशांत राहणाऱ्या अनाकी लोकांचा नाश केला. त्यांचा व त्यांच्या नगरांचा समूळ नाश केला.
21 Naquela ocasião Josué exterminou os enaquins dos montes de Hebrom, de Debir e de Anabe, de todos os montes de Judá, e de Israel. Josué destruiu-os totalmente, e também as suas cidades.
22 इस्राएल लोकांच्या देशात एकही अनाकी उरला नाही; मात्र गज्जा, गथ व अश्दोद यांतले थोडे उरले.
22 Nenhum enaquim foi deixado vivo no território israelita; somente em Gaza, em Gate e em Asdode é que alguns sobreviveram.
23 परमेश्वराने मोशेला सांगितले होते त्याप्रमाणे यहोशवाने सर्व देश काबीज केला. यहोशवाने तो इस्राएल लोकांस वंशांच्या नियमाप्रमाणे वाटून वतन करून दिला; तेव्हा देशाला युद्धापासून विसावा मिळाला.
23 Foi assim que Josué conquistou toda a terra, conforme o Senhor tinha dito a Moisés, e deu-a por herança a Israel, repartindo-a entre as suas tribos. E a terra teve descanso da guerra.
Atalhos do teclado
- Capítulo anterior←
- Próximo capítulo→
- Versículo anteriork
- Próximo versículoj
- Limpar seleçãoEsc
- Esta ajuda?
Estude este capítulo no WhatsApp
Peça à IA da Bíblia Fala para explicar Josué 11, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.