Josué 10

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (MAR) vs BKJ

Sair da comparação
1 यहोशवाने आय नगर जिंकून त्याचा कसा पूर्णपणे नाश केला, आणि जसे त्याने यरीहोचे व त्याच्या राजाचे केले तसेच आय नगराचे व त्याच्या राजाचे केले, पण गिबोनाचे रहिवासी इस्राएल लोकांशी समेट करून त्यांच्यामध्ये राहत आहेत, हे सर्व यरूशलेमेचा राजा अदोनीसदेक याने ऐकले होते.
1 Ora, sucedeu que, quando Adoni-Zedeque, rei de Jerusalém, ouviu como Josué tomou Ai e a destruiu por completo; assim como havia feito a Jericó e ao seu rei, assim também o fez a Ai e ao seu rei; e que os habitantes de Gibeão haviam feito paz com Israel, e estavam no meio deles;
2 तेव्हा यरूशलेमातील लोक फार भयभीत झाले, कारण गिबोन हे मोठे शहर असून एखाद्या राजकीय नगरासारखे मोठे होते. ते आय नगरापेक्षा मोठे असून तेथले सगळे पुरुष पराक्रमी योद्धे होते.
2 ele temeu grandemente, porque Gibeão era uma cidade grande, como uma das cidades reais, e porque era maior do que Ai, e todos os seus homens eram fortes.
3 मग यरूशलेमेचा राजा अदोनीसदेक याने हेब्रोनाचा राजा होहाम, यर्मूथाचा राजा पिराम, लाखीशाचा राजा याफीय आणि एग्लोनाचा राजा दबीर यांना निरोप पाठवला,
3 Por isso Adoni-Zedeque, rei de Jerusalém, enviou a Hoão, rei de Hebrom, a Pirã, rei de Jarmute, a Jafia, rei de Laquis e a Debir, rei de Eglom, dizendo:
4 “वर माझ्याकडे येऊन मला मदत करा, आपण गिबोनाला मार देऊ; कारण त्याने यहोशवाशी व इस्राएल लोकांशी समेट केला आहे.”
4 Subi até mim e me ajudai, para que possamos ferir a Gibeão, pois fez paz com Josué e com os filhos de Israel.
5 तेव्हा यरूशलेमेचा राजा, हेब्रोनाचा राजा, यर्मूथाचा राजा, लाखीशाचा राजा आणि एग्लोनाचा राजा या पाच अमोरी राजांनी एकत्र मिळून आपल्या सर्व सैन्यांसह चढाई केली आणि गिबोनासमोर तळ देऊन ते त्यांच्याशी लढू लागले.
5 Portanto, reuniram-se e subiram os cinco reis dos amorreus, o rei de Jerusalém, o rei de Hebrom, o rei de Jarmute, o rei de Laquis, o rei de Eglom, eles e todos os seus exércitos, e acamparam diante de Gibeão, e guerrearam contra ela.
6 हे पाहून गिबोनातल्या मनुष्यांनी गिलगालच्या छावणीत यहोशवाला निरोप केला की, “आपल्या दासांवरील मदतीचा हात काढून घेऊ नको; आमच्याकडे लवकर येऊन आमचा बचाव कर व आम्हांला मदत कर; कारण डोंगरवटीतले सर्व अमोरी राजे एकत्र जमून आमच्यावर चालून आले आहेत.
6 E os homens de Gibeão enviaram a Josué, ao acampamento de Gilgal, dizendo: Não afrouxes a tua mão diante dos teus servos; sobe a nós depressa, e nos salva, e nos ajuda; pois todos os reis dos amorreus que habitam nos montes estão reunidos contra nós.
7 तेव्हा यहोशवा आपले सर्व योद्धे व शूर वीर यांना बरोबर घेऊन गिलगाल येथून निघाला.”
7 Então, Josué subiu de Gilgal, ele e todo o povo de guerra com ele, e todos os homens fortes e valentes.
8 परमेश्वर यहोशवाला म्हणाला, “त्यांना भिऊ नको; कारण मी त्यांना तुझ्या हाती दिले आहे; त्यांच्यातला कोणीही तुझ्यापुढे टिकणार नाही.”
8 E o SENHOR disse a Josué: Não os temas porque eu os entreguei na tua mão; não haverá homem que fique de pé diante de ti.
9 यहोशवा गिलगालाहून सारी रात्र चालत चढून जाऊन त्यांच्यावर एकाएकी चाल करून आला
9 Josué, portanto, veio até eles subitamente, e subiu desde Gilgal a noite toda.
10 आणि परमेश्वर देवाने इस्राएलापुढे शत्रूंत गोंधळ उडवला. त्यांनी गिबोनापाशी त्यांची मोठी कत्तल करून बेथ-होरोनाच्या चढावाच्या वाटेने त्यांचा पाठलाग केला आणि अजेका व मक्केदा येथपर्यंत ते त्यांना मारत गेले.
10 E o SENHOR os derrotou diante de Israel, e os matou com um grande massacre em Gibeão, e os perseguiu ao longo do caminho que sobe a Bete-Horom, e os feriu até Azeca, e até Maquedá.
11 ते इस्राएलापुढून बेथ-होरोनाच्या उतरणीवरून पळून जात असताना परमेश्वराने अजेकापर्यंत आकाशातून त्यांच्यावर गारांचे मोठे दगड फेकल्यामुळे ते ठार झाले. इस्राएल लोकांनी तलवारीने मारले त्यांपेक्षा जास्त लोक गारांच्या दगडांनी मरण पावले.
11 E sucedeu que, enquanto eles fugiam de diante de Israel, e estavam na descida para Bete-Horom, o SENHOR lançou do céu grandes pedras sobre eles até Azeca, e morreram; e foram mais os que morreram com as pedras da saraiva do que aqueles que os filhos de Israel mataram à espada.
12 परमेश्वराने अमोऱ्यांना इस्राएल लोकांच्या हाती दिले त्या दिवशी यहोशवा देवाशी बोलला; इस्राएलासमक्ष तो असे म्हणाला, “हे सूर्या, तू गिबोनावर स्थिर हो; हे चंद्रा, तू अयालोनाच्या खोऱ्यावर स्थिर हो.”
12 Então, Josué falou ao SENHOR, no dia em que o SENHOR entregou os amorreus diante dos filhos de Israel, e disse ele diante de Israel: Sol, fica tu imóvel sobre Gibeão; e tu, lua, no vale de Aijalom.
13 तेव्हा राष्ट्राने आपल्या शत्रूंचा बदला घेईपर्यंत सूर्य स्थिर झाला आणि चंद्र थांबला. याशाराच्या ग्रंथात ही कथा लिहिली आहे ना? सूर्य आकाशाच्या मधोमध सुमारे एक संपूर्ण दिवस थांबला; त्याने अस्तास जाण्याची घाई केली नाही.
13 E o sol permaneceu imóvel, e a lua se deteve, até que o povo tivesse se vingado dos seus inimigos. Isto não está escrito no livro do Jaser? Assim, o sol permaneceu imóvel no meio do céu, e não se apressou a se pôr quase um dia inteiro.
14 असा दिवस त्यापुर्वी किंवा त्यानंतरही आला नाही; त्या दिवशी परमेश्वराने मानवाचा शब्द ऐकला, कारण परमेश्वर इस्राएलासाठी लढत होता.
14 E não houve dia como aquele antes ou depois, em que o SENHOR atentou para a voz de um homem, pois o SENHOR lutou por Israel.
15 मग यहोशवा सर्व इस्राएलासह गिलगाल येथील छावणीकडे परत आला.
15 E Josué retornou, e todo o Israel com ele, até o acampamento de Gilgal.
16 ते पाच राजे पळून जाऊन मक्केदा येथील एका गुहेत लपून बसले.
16 Só que estes cinco reis fugiram, e se esconderam em uma caverna em Maquedá.
17 मक्केदा येथील गुहेत ते पाच राजे लपलेले सापडले आहेत असे यहोशवाला कोणी कळवले.
17 E foi dito a Josué: Os cinco reis foram encontrados escondidos em uma caverna em Maquedá.
18 तेव्हा यहोशवा म्हणाला, गुहेच्या तोंडावर मोठमोठे धोंडे लोटा आणि तिच्यावर मनुष्यांचा पहारा बसवा.
18 E Josué disse: Rolai grandes pedras sobre a entrada da caverna, e posicionai homens junto a ela para guardá-los;
19 पण तुम्ही स्वतः तेथे थांबू नका; आपल्या शत्रूंचा पाठलाग करा; त्यांच्या पिछाडीच्या लोकांस ठार मारा; त्यांना त्यांच्या नगरांत जाऊ देऊ नका; कारण तुमचा देव परमेश्वर याने त्यांना तुमच्या हाती दिले आहे.
19 e não vos detenhais, mas persegui os vossos inimigos, e feri os que estiverem mais atrás, não tolereis que eles entrem nas suas cidades, pois o SENHOR, vosso Deus, entregou-os na vossa mão.
20 यहोशवा आणि इस्राएल लोक यांनी त्यांची मोठी कत्तल करून त्यांचा नाश करण्याचे काम संपवले; पण त्यांच्यातले काही लोक बचावून तटबंदीच्या नगरांत गेले.
20 E sucedeu que, quando Josué e os filhos de Israel haviam terminado de matá-los com um massacre muito grande, até que fossem consumidos, que os que restaram deles entraram nas cidades fortificadas.
21 मग सर्व सैन्य मक्केदाच्या छावणीत यहोशवाकडे शांतीने माघारी आले; इस्राएलाविरुद्ध कोणी चकार शब्द काढण्याचे धाडस केले नाही.
21 E todo o povo retornou em paz a Josué, ao acampamento em Maquedá; ninguém moveu a sua língua contra qualquer um dos filhos de Israel.
22 मग यहोशवा म्हणाला, “गुहेचे तोंड उघडून त्या पाच राजांना तेथून माझ्याकडे घेऊन या.”
22 Então, disse Josué: Abri a boca da caverna, e trazei para fora da caverna os cinco reis até mim.
23 त्याप्रमाणे त्यांनी केले, म्हणजे यरूशलेमेचा राजा, हेब्रोनाचा राजा, यर्मूथाचा राजा, लाखीशाचा राजा आणि एग्लोनाचा राजा या पाच राजांना त्यांनी गुहेतून काढून त्याच्याकडे आणले.
23 E eles assim o fizeram, e trouxeram da caverna aqueles cinco reis até ele: o rei de Jerusalém, o rei de Hebrom, o rei de Jarmute, o rei de Laquis, e o rei de Eglom.
24 ते त्या राजांना यहोशवाकडे घेऊन आले तेव्हा त्याने सर्व इस्राएल लोकांस बोलावून आणले. मग तो आपल्याबरोबर लढाईवर गेलेल्या योद्ध्यांच्या सेनानायकांना म्हणाला, “पुढे येऊन त्यांच्या मानेवर पाय द्या.” तेव्हा त्यांनी पुढे येऊन त्यांच्या मानेवर पाय दिले.
24 E sucedeu que, quando eles trouxeram até Josué aqueles reis, este convocou todos os homens de Israel e disse aos capitães dos homens de guerra que seguiam com ele: Aproximai-vos, ponde os vossos pés sobre o pescoço destes reis. E eles se aproximaram e colocaram os pés sobre o seu pescoço.
25 यहोशवा त्यांना म्हणाला, “भिऊ नका, कचरू नका, बलवान व निर्भय व्हा; कारण ज्यांच्याशी तुम्ही लढाल त्या तुमच्या सर्व शत्रूचे परमेश्वर असेच करील.”
25 E Josué disse a eles: Não temais, tampouco fiqueis desanimados, sede forte e de boa coragem, pois assim há de fazer o SENHOR a todos os vossos inimigos, contra os quais lutardes.
26 नंतर यहोशवाने त्यांना ठार मारून पाच झाडांवर त्यांना टांगले, आणि ते संध्याकाळपर्यंत त्या झाडांवर टांगलेले होते.
26 E, depois disso, Josué os feriu e os matou, e os pendurou em cinco árvores; e eles ficaram pendurados sobre as árvores até o anoitecer.
27 सूर्यास्ताच्या वेळी यहोशवाच्या आज्ञेवरून लोकांनी त्यांना त्या झाडांवरून उतरविले आणि ज्या गुहेत ते लपले होते तिच्यात त्यांना टाकले आणि त्या गुहेच्या तोंडावर त्यांनी मोठमोठे धोंडे रचले. आजपर्यंत ते तसेच आहेत.
27 E sucedeu que, na hora do pôr do sol, Josué ordenou, e eles os desceram das árvores, e os lançaram na caverna na qual haviam se escondido, e colocaram grandes pedras na entrada da caverna, as quais permanecem ali até este dia.
28 त्या दिवशी यहोशवाने मक्केदा घेऊन तलवारीने त्यांचा व त्याच्या राजाचा पूर्णपणे नाश केला; त्यांच्याबरोबर तेथल्या प्रत्येक जिवंत प्राण्यांचाही त्याने नाश केला; त्याने कोणालाही जिवंत ठेवले नाही. त्याने यरीहोच्या राजाचे जे केले तेच मक्केदाच्या राजाचेही केले.
28 E, naquele dia, Josué tomou Maquedá e a feriu com o fio da espada, e destruiu o seu rei por completo, eles e a todas as almas que nela estavam; ele não deixou restar ninguém; e fez ao rei de Maquedá como fez ao rei de Jericó.
29 मग मक्केदाहून निघून सर्व इस्राएलांना बरोबर घेऊन यहोशवा लीब्नावर चालून गेला व लिब्नाच्याविरुद्ध त्यांनी लढाई केली;
29 Então, Josué e com ele todo o Israel, passou de Maquedá até Libna, e lutou contra Libna.
30 परमेश्वराने ते नगर व त्याचा राजा यांना इस्राएलाच्या हाती दिले आणि यहोशवाने त्याचा व त्यातल्या सर्व जिवंत प्राण्यांचा तलवारीने संहार केला; त्यांच्यातल्या कोणालाही जिवंत ठेवले नाही; यरीहोच्या राजाचे त्याने जे केले तेच येथल्याही राजाचे केले.
30 E o SENHOR também a entregou na mão de Israel, junto com o seu rei, e ele a feriu com o fio da espada, e a todas as almas que nela estavam; ele não deixou ninguém restar; mas fez ao seu rei como fez ao rei de Jericó.
31 त्यानंतर लिब्ना सोडून सर्व इस्राएलासह यहोशवा लाखीशावर चालून गेला. त्याने त्यासमोर तळ दिला आणि त्याच्याविरुध्द लढला.
31 E Josué passou de Libna, e com ele todo o Israel, para Laquis, e acampou contra ela, e lutou contra ela;
32 परमेश्वराने लाखीश इस्राएलाच्या हाती दिले व त्यांनी ते दुसऱ्या दिवशी घेतले, लिब्नाचा केला तसाच लाखीशाचा व तेथल्या प्रत्येक जिवंत प्राण्याचा त्याने तलवारीने नाश केला.
32 e o SENHOR entregou Laquis na mão de Israel, o qual a tomou no segundo dia, e a feriu com o fio da espada, e a todas as almas que nela estavam, conforme tudo o que havia feito a Libna.
33 तेव्हा गेजेराचा राजा होरम लाखीशाला मदत देण्यासाठी चालून आला, पण यहोशवाने त्यास व त्याच्या लोकांस एवढा मार दिला की त्यातला एकही जिवंत राहिला नाही.
33 Então, Horão, rei de Gezer subiu para ajudar Laquis; e Josué feriu a ele e ao seu povo, até que deles não restou mais nenhum.
34 मग लाखीश सोडून यहोशवा सर्व इस्राएलासह एग्लोनावर चालून गेला; त्यासमोर तळ देऊन ते त्याच्याशी लढले.
34 E de Laquis, Josué passou a Eglom, e com ele todo o Israel; e eles acamparam contra ela, e lutaram contra ela;
35 त्याच दिवशी त्यांनी ते घेतले आणि तलवारीने त्यांचा संहार केला; लाखीशातल्याप्रमाणे तेथील प्रत्येक जिवंत प्राण्यांचा त्या दिवशी त्याने समूळ नाश केला.
35 e eles a tomaram naquele dia, e a feriram com o fio da espada, e a todas as almas que nela estavam, ele destruiu por completo naquele dia, conforme tudo o que havia feito a Laquis.
36 मग एग्लोन सोडून यहोशवा सर्व इस्राएलासह हेब्रोनावर चढाई करून गेला. आणि ते त्याच्याशी लढले;
36 E Josué subiu de Eglom, e com ele todo o Israel, até Hebrom; e eles lutaram contra ela;
37 त्यांनी ते घेतले आणि ते नगर, त्याचा राजा, त्याची सर्व उपनगरे आणि त्यातले सर्व प्राणी यांचा तलवारीने संहार केला; यहोशवाने एग्लोनातल्याप्रमाणेच येथेही कोणाला जिवंत राहू दिले नाही. त्याने त्याचा आणि त्यातल्या प्रत्येक जिवंत प्राण्यांचा समूळ नाश केला.
37 e eles a tomaram, e a feriram com o fio da espada, e ao seu rei, e a todas as suas cidades, e a todas as almas que nela estavam; ele não deixou restar nenhuma, conforme tudo o que havia feito a Eglom; mas a destruiu por completo, e a todas as almas que nela estavam.
38 नंतर यहोशवा सर्व इस्राएलासह मागे वळून दबीरास चालून गेला आणि त्याच्याविरुध्द लढला.
38 E Josué retornou, e com ele todo o Israel, para Debir; e lutou contra ela;
39 त्याने ते तेथला राजा व त्याची सर्व नगरे हस्तगत करून त्यांचा तलवारीने संहार केला. तेथील प्रत्येक जिवंत प्राण्यांचा त्याने समूळ नाश केला. कोणालाही जिवंत राहू दिले नाही हेब्रोनाचे, लिब्ना व त्याचा राजा यांचे त्याने जे केले तेच दबीर व त्याचा राजा यांचेही केले.
39 e ele a tomou, junto com o seu rei, e todas as suas cidades; e eles as feriram com o fio da espada, e destruíram por completo todas as almas que nela estavam; ele não deixou restar nenhuma, como havia feito a Hebrom, assim também fez a Debir, e ao seu rei; como havia feito a Libna, e ao seu rei.
40 या प्रकारे यहोशवाने त्या सर्व देशांचा म्हणजे डोंगराळ प्रदेश, नेगेब, तळवट व उतरण यातील सर्व प्रांत आणि त्यांचे राजे यांना काबीज केले; कोणालाही जिवंत राहू दिले नाही; इस्राएलाचा देव परमेश्वर याने आज्ञा केल्याप्रमाणे प्रत्येक जिवंत गोष्टीचा त्याने समूळ नाश केला.
40 Assim Josué feriu toda a região dos montes, e do sul, e do vale, e das fontes, e todos os seus reis; ele não deixou restar nenhum, mas destruiu por completo tudo o que respirava, como o SENHOR Deus de Israel ordenou.
41 यहोशवाने तलवारीने हल्ला करून कादेश-बर्ण्यापासून गज्जापर्यंतचा मुलूख व गिबोनापर्यंतचा सर्व गोशेन प्रांत त्याने मारला.
41 E Josué os feriu de Cades-Barneia até Gaza, e toda a região de Gósen, até Gibeão.
42 हे सर्व राजे व त्यांचे देश यहोशवाने एकाच वेळेस घेतले, कारण इस्राएलाचा देव परमेश्वर इस्राएलासाठी लढत होता.
42 E de uma só vez, Josué tomou todos estes reis e as suas terras, porque o SENHOR Deus de Israel lutou por Israel.
43 मग यहोशवा आणि त्याच्याबरोबर सर्व इस्राएल गिलगाल येथील छावणीकडे माघारी आले.
43 E Josué e todo o Israel com ele, retornou até o acampamento de Gilgal.

Ler em outra tradução

Comparar com outra

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Josué 10, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.