Jeremias 44
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (MAR) vs NVI
1 जे सर्व यहूदी मिसर देशामध्ये राहत होते, जे मिग्दोल, तहपन्हेस, मेमफिस व पथ्रोस येथे राहत होते, त्यांच्याविषयी परमेश्वराचे वचन यिर्मयाकडे आले ते असे होते.
1 Esta é a palavra do Senhor, que foi dirigida a Jeremias, para todos os judeus que estavam no Egito e viviam em Migdol, Tafnes, Mênfis, e na região de Patros:
2 सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव, असे म्हणतो, यरूशलेम व यहूदाच्या सर्व नगरांवर जे अरिष्ट मी आणली, ते तुम्ही पाहिली आहेत. पाहा, आता ती नगरे उजाड झाली आहेत. तेथे राहण्यास कोणीही जिवंत नाही.
2 "Assim diz o Senhor dos Exércitos, Deus de Israel: Vocês viram toda a desgraça que eu trouxe sobre Jerusalém e sobre todas as cidades de Judá. Hoje elas estão em ruínas e desabitadas
3 कारण हे त्यांच्या स्वतःचे नाहीत किंवा तुम्हास किंवा तुमच्या पूर्वजांना माहित नाहीत अशा दुसऱ्या देवांना धूप जाळून आणि त्यांची उपासना करण्यासाठी जाऊन वाईट गोष्टी करून त्यांनी माझे मन दुःखावले.
3 por causa do mal que fizeram. Seus moradores provocaram a minha ira queimando incenso e prestando culto a outros deuses, que nem eles nem vocês nem seus antepassados jamais conheceram.
4 मग मी माझे सर्व सेवक संदेष्टे वारंवार पाठवत आलो. मी त्यांना सांगण्यासाठी पाठवले, ज्यांचा मी द्वेष करतो त्या तिरस्कारणीय गोष्टी थांबवा.
4 Dia após dia, eu lhes enviei meus servos, os profetas, que disseram: ‘Não façam essa abominação detestável! ’
5 पण त्यांनी ऐकले नाही; त्यांनी दुसऱ्या देवाला धूप जाळणाऱ्या दुष्कृत्यापासून वळण्यास किंवा त्यांनी लक्ष देण्याचे नाकारले.
5 Mas eles não me ouviram nem me deram atenção; não se converteram de sua impiedade nem cessaram de queimar incenso a outros deuses.
6 म्हणून माझा क्रोध व संताप ओतला गेला आणि यहूदाच्या नगरांत व यरूशलेमेच्या रस्त्यावर अग्नी पेटला. यास्तव ती ओसाड व उजाड झाली आहेत.
6 Por isso, o meu furor foi derramado e queimou as cidades de Judá e as ruas de Jerusalém, tornando-as na ruína desolada que são no dia de hoje.
7 म्हणून आता, सेनाधीश परमेश्वर आणि इस्राएलाचा देव असे म्हणतो, “तुम्ही आपल्या स्वत:विरूद्ध हे मोठे अनिष्ट का करता? तुम्ही आपणासाठी पुरुष व स्त्रिया, मुले व बालके यांना यहूदापासून तोडण्याचे कारण का होता? तुमचा अवशेष उरणार नाही.
7 "Assim diz o Senhor, o Deus dos Exércitos, o Deus de Israel: Por que trazer uma desgraça tão grande sobre si mesmos, eliminando de Judá homens e mulheres, crianças e recém-nascidos, sem deixar remanescente algum?
8 कारण तुम्ही जेथे राहण्यास गेला आहात त्या मिसर देशात दुसऱ्या देवाला धूप जाळून तुमच्या हातच्या कृत्यांनी मूर्तीपूजा करुन तुम्ही मला दुःखवता. तुम्ही तेथे जात आहात याकरिता की तुमचा नाश व्हावा आणि शापीत व्हावे व पृथ्वीवरच्या सर्व राष्ट्रांमध्ये तुमची निंदा व्हावी.
8 Por que vocês provocam a minha ira com o que fazem, queimando incenso a outros deuses no Egito, onde vocês vieram residir? Vocês se destruirão a si mesmos e se tornarão objeto de desprezo e afronta entre todas as nações da terra.
9 तुमच्या पूर्वजांनी केलेली दुष्कृत्ये आणि यहूदा राजा व त्याच्या बायकांनी केलेली दुष्कृत्ये तुम्ही विसरलात का? तुम्ही आणि तुमच्या बायकांनी यहूदाच्या देशात व यरूशलेमेच्या रस्त्यावर केलेली वाइट कृत्ये विसरलात का?
9 Acaso vocês se esqueceram da impiedade cometida por seus antepassados, pelos reis de Judá e as mulheres deles, e da impiedade cometida por vocês e suas mulheres na terra de Judá e nas ruas de Jerusalém?
10 ते या दिवसापर्यंत, अजून नम्र झालेले नाहीत. ते माझे जे नियमशास्त्र व माझे जे विधी मी तुम्हापुढे आणि तुमच्या पूर्वजांपुढे ठेवले, त्यांचा त्यांनी आदर केला नाही किंवा ते त्याप्रमाणे चालले नाहीत.”
10 Até hoje eles não se humilharam nem mostraram reverência, e não têm seguido a minha lei e os decretos que coloquei diante de vocês e dos seus antepassados".
11 “यास्तव सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव, असे म्हणतो, पाहा, मी तुमचे अनिष्ट करण्यासाठी आणि सर्व यहूदाचा नाश करण्यासाठी तुमच्या विरोधात होईन.
11 "Portanto, assim diz o Senhor dos Exércitos, Deus de Israel: Estou decidido a trazer desgraça sobre vocês e a destruir todo o Judá.
12 कारण मिसर देशात जाऊन तेथे राहण्याचा यहूदाच्या अवशिष्टांनी निश्चय केला. मी हे यासाठी करीन की, ते सर्व मिसर देशात नष्ट होतील. तलवारीने आणि दुष्काळाने त्यांचा नायनाट होईल. लहानापासून थोरापर्यंत सर्व तलवारीने व दुष्काळाने नष्ट होतील. ते मरतील आणि अपशब्द, शाप, निंदा आणि भयानक गोष्टींचे विषय होतील.
12 Tomarei o remanescente de Judá, que decidiu partir e residir no Egito, e todos morrerão no Egito. Cairão pela espada ou pela fome; desde o menor até o maior, morrerão pela espada ou pela fome. Eles se tornarão objeto de maldição e de pavor, de desprezo e de afronta.
13 जशी मी यरूशलेमेला शिक्षा केली, त्याप्रमाणे मिसर देशात राहणाऱ्या लोकांस तलवार, दुष्काळ व मरीने शिक्षा करीन.
13 Castigarei aqueles que vivem no Egito com a guerra, a fome e a peste, como castiguei Jerusalém.
14 म्हणून यहूदाचे जे कोणी उरलेले, फरारी, वाचलेले मिसर देशात उपरी म्हणून राहायला गेले आहेत, त्यातले जे कोणी ज्यांची यहूदा देशात परत जाण्याची आणि तेथे राहण्याची इच्छा आहे. त्यातील कोणीही परत जाणार नाही, कारण जे कोणी थोडके निसटून जातील त्यांच्यावाचून दुसरे कोणी परत जाणार नाहीत.”
14 Ninguém dentre o remanescente de Judá que foi morar no Egito escapará ou sobreviverá para voltar à terra de Judá, para a qual anseiam voltar e nela anseiam viver; nenhum voltará, exceto uns poucos fugitivos".
15 नंतर आपल्या स्त्रिया दुसऱ्या देवास धूप जाळतात असे ज्या सर्व पुरुषांस माहित होते ते आणि ज्या सर्व स्त्रिया मोठ्या मंडळीत होत्या आणि मिसर देशात पथ्रोसात जे लोक राहत होते, अशा सर्वांनी यिर्मयाला उत्तर दिले.
15 Então, todos os homens que sabiam que as suas mulheres queimavam incenso a outros deuses, e todas as mulheres que estavam presentes, em grande número, e todo o povo que morava no Egito, e na região de Patros, disseram a Jeremias:
16 ते म्हणाले, “तू आम्हास परमेश्वराच्या नावात जे वचन सांगितले त्याच्याविषयी आम्ही तुझे ऐकणार नाही.
16 "Nós não daremos atenção à mensagem que você nos apresenta em nome do Senhor!
17 पण जसे आमचे पूर्वज, आमचे राजे व आमचे अधिकारी यहूदाच्या नगरांत आणि यरूशलेमेच्या रस्त्यावर करीत असत, तसे आम्ही आकाशाच्या राणीला धूप जाळणे व तिला पेयार्पणे ओतण्याविषयी जो प्रत्येक शब्द आमच्या मूखातून निघाला आहे तो आम्ही खचित पूर्ण करू. कारण त्यावेळी आम्ही अन्नाने तृप्त होतो आणि कोणत्याही अनिष्टाचा अनुभव न घेता उन्नतीत होतो.
17 É certo que faremos tudo o que dissemos que faríamos: Queimaremos incenso à Rainha dos Céus e derramaremos ofertas de bebidas para ela, tal como fazíamos, nós e nossos antepassados, nossos reis e nossos líderes, nas cidades de Judá e nas ruas de Jerusalém. Naquela época tínhamos fartura de comida, éramos prósperos e em nada sofríamos.
18 जेव्हा आम्ही आकाशाच्या राणीला धूप जाळणे व तिला पेयार्पणे ओतणे यापासून परावृत्त झालो तेव्हापासून आम्ही सर्व दारिद्र्याने दुःखी आहोत व तलवारीने व दुष्काळाने मरत आहोत.”
18 Mas, desde que paramos de queimar incenso à Rainha dos Céus e de derramar ofertas de bebidas a ela, nada temos tido e temos perecido pela espada e pela fome".
19 मग स्त्रिया म्हणाल्या, “जेव्हा आम्ही आकाशाच्या राणीला धूप जाळला व तिला पेयार्पणे ओतली, या गोष्टी आम्ही आपल्या पतीच्या संमतीशिवाय केल्या काय?”
19 E as mulheres acrescentaram: "Quando queimávamos incenso à Rainha dos Céus e derramávamos ofertas de bebidas para ela, será que era sem o consentimento de nossos maridos que fazíamos bolos na forma da imagem dela e derramávamos ofertas de bebidas para ela? "
20 मग यिर्मया सर्व लोकांस, स्त्रिया व पुरुषांस आणि ज्या सर्व लोकांनी त्यास उत्तर दिले, त्याने घोषणा केली व म्हणाला,
20 Então Jeremias disse a todo o povo, tanto aos homens como às mulheres que estavam respondendo a ele:
21 “तुम्ही यहूदाच्या नगरांत आणि यरूशलेमेच्या रस्त्यात, तुम्ही, तुमचे पूर्वज, तुमचे राजे आणि अधिकारी व देशातील लोक जो धूप जाळीत होते, त्याची परमेश्वरास आठवण नव्हती काय? कारण परमेश्वराच्या मनात हे आले. ते त्याच्या विचारात आले.
21 "E o Senhor? Não se lembra ele do incenso queimado nas cidades de Judá e nas ruas de Jerusalém por vocês e por seus antepassados, seus reis e seus líderes e pelo povo da terra? Será que ele não pensa nisso?
22 मग तुमच्या वाईट व्यवहारामुळे, तिरस्करणीय कृत्यामुळे परमेश्वराची सहनशक्ती संपली. नंतर त्याने तुमचा देश ओसाड, भीतीजनक आणि शापीत केला, म्हणून आजपर्यंत तेथे कोणी रहिवासी नाही.
22 Quando o Senhor não pôde mais suportar as impiedades e as práticas repugnantes de vocês, a terra de vocês ficou devastada e desolada, e tornou-se objeto de maldição e desabitada, como se vê no dia de hoje.
23 तुम्ही धूप जाळला आणि परमेश्वराविरूद्ध पाप केले व तुम्ही त्याची वाणी, त्याचे नियमशास्त्र त्याचे विधी किंवा त्याचे कराराचे आदेश, ऐकले नाहीत, हे अनिष्ट तुमच्याविरुध्द आजपर्यंत घडत आहेत.”
23 Foi porque vocês queimaram incenso e pecaram contra o Senhor, e não obedeceram à sua palavra nem seguiram a sua lei, os seus decretos e os seus testemunhos, que esta desgraça caiu sobre vocês, como se vê no dia de hoje".
24 मग यिर्मया त्या सर्व लोकांस आणि स्त्रियांना म्हणाला, “यहूदातले जे तुम्ही मिसर देशामध्ये आहात ते सर्व तुम्ही परमेश्वराचे वचन ऐका.
24 Disse então Jeremias a todo o povo, inclusive às mulheres: "Ouçam a palavra do Senhor, todos vocês, judeus que estão no Egito.
25 सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव, असे म्हणतो, ‘आम्ही आकाशाच्या राणीला धूप जाळायला व तिच्यासाठी पेयार्पणे ओतायला जे नवस केले आहेत ते खचित फेडू असे तुम्ही आणि तुमच्या स्त्रिया तुम्ही दोघांनी आपल्या मुखाने बोलून आणि आपल्या हातांनी पूर्ण केले आहे. तर तुम्ही आपले नवस खचित स्थापित करा आणि आपले नवस फेडा.”
25 Assim diz o Senhor dos Exércitos, Deus de Israel: Vocês e suas mulheres cumpriram o que prometeram quando disseram: ‘Certamente cumpriremos os votos que fizemos de queimar incenso e derramar ofertas de bebidas à Rainha dos Céus’. "Prossigam! Façam o que prometeram! Cumpram os seus votos!
26 यास्तव जे तुम्ही यहूदी देशातले मिसर देशात राहता ते सर्व तुम्ही परमेश्वराची वचने ऐका; पाहा, मी आपल्या थोर नावाची शपथ वाहिली आहे की, सर्व मिसर देशामध्ये राहणाऱ्या यहूदा देशातल्या कोणत्याही मनुष्याच्या मुखाने परमेश्वर जिवंत आहे असे म्हणून माझे नाव पुन्हा घेण्यात येणार नाही.
26 Mas ouçam a palavra do Senhor, todos vocês, judeus que vivem no Egito: ‘Eu juro pelo meu grande nome’, diz o Senhor, ‘que em todo o Egito ninguém de Judá voltará a invocar o meu nome ou a jurar pela vida do Soberano Senhor.
27 पाहा, मी त्यांच्या चांगल्यासाठी नाही तर त्यांच्या अनिष्टासाठी त्यांच्यावर लक्ष ठेवीन. यहूदा देशातला जो प्रत्येक व्यक्ती मिसर देशामध्ये आहे त्यांचा अंत होईपर्यंत ते तलवारीने नाश होईल.
27 Vigiarei sobre eles para trazer-lhes a desgraça e não o bem; os judeus do Egito perecerão pela espada e pela fome até que sejam todos destruídos.
28 नंतर जे काही थोडके लोक तलवारीपासून सुटतील ते मिसर देशामधून यहूदा देशात परत येतील. मग सर्व अवशिष्ट यहूदी मिसर देशात राहण्यास गेलेल्यांना कोणाचे शब्द खरे ठरले आहेत माझे किंवा त्यांचे ते त्यांना समजेल.
28 Serão poucos os que escaparão da espada e voltarão do Egito para a terra de Judá. Então, todo o remanescente de Judá que veio residir no Egito saberá qual é a palavra que se realiza, a minha ou a deles.
29 परमेश्वराचे हे सांगणे आहे की, माझी वचने तुमच्या अनिष्टाची ठरतील हे तुम्हास कळून यावे म्हणून मी या जागी तुम्हास शिक्षा करीन. हेच तुम्हास चिन्ह होय.
29 " ‘Este será o sinal para vocês de que os castigarei neste lugar’, declara o Senhor, ‘e então vocês ficarão sabendo que as minhas ameaças de trazer-lhes desgraça certamente se realizarão’.
30 परमेश्वर असे म्हणतो, पाहा, जसे मी यहूदाचा राजा सिद्कीयाला त्याचा शत्रू बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर याच्या हाती दिले त्याप्रमाणे मी मिसराचा राजा फारो हफ्रा याला त्याच्या शत्रूंच्या हाती व त्याचा जीव घेऊ पाहणाऱ्यांच्या हाती देईन.
30 Assim diz o Senhor: ‘Entregarei o faraó Hofra, rei do Egito, nas mãos dos seus inimigos que desejam tirar-lhe a vida, assim como entreguei Zedequias, rei de Judá, nas mãos de Nabucodonosor, rei da Babilônia, o inimigo que desejava tirar a vida dele’ ".
Atalhos do teclado
- Capítulo anterior←
- Próximo capítulo→
- Versículo anteriork
- Próximo versículoj
- Limpar seleçãoEsc
- Esta ajuda?
Estude este capítulo no WhatsApp
Peça à IA da Bíblia Fala para explicar Jeremias 44, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.