Jeremias 42

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (MAR) vs NAA

Sair da comparação
NAA Nova Almeida Atualizada 2017
1 नंतर तेव्हा सर्व सेनाधिकारी आणि कारेहाचा मुलगा योहानान, होशायाचा मुलगा यजन्या आणि लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्व लोक यिर्मया संदेष्ट्याकडे पोहचले.
1 Então todos os capitães dos exércitos e Joanã, filho de Careá, e Jezanias, filho de Hosaías, e todo o povo, desde o menor até o maior, se aproximaram
2 ते त्यास म्हणाले, “आमची विनंती तुझ्यासमोर येवो. जे आम्ही संख्येने थोडे लोक उरले आहोत, ते तू पाहत आहेस, त्या आम्हासाठी तुझा देव परमेश्वराकडे प्रार्थना कर.
2 e disseram ao profeta Jeremias: — Apresentamos a você a nossa humilde súplica, para que você ore ao
3 आम्ही कोठे जावे व काय करावे याने आम्हास सांगावे म्हणून तुझा देव परमेश्वर याला विचार.”
3 Ore, pedindo que o Senhor , seu Deus, nos mostre o caminho que devemos seguir e o que devemos fazer.
4 मग यिर्मया संदेष्टा त्यांना म्हणाला, “मी तुमचे ऐकले आहे. पाहा, मी तुमच्या विनंतीप्रमाणे तुमचा देव परमेश्वराकडे प्रार्थना करीन. जे काही परमेश्वर उत्तर देईल, मी तुम्हास सांगीन. मी तुमच्यापासून काहीही लपविणार नाही.”
4 O profeta Jeremias respondeu: — Eu ouvi o pedido de vocês. Vou orar ao
5 मग ते यिर्मयाला म्हणाले, “जर परमेश्वर देव तुझ्याकडून जसे सांगतो तसे आम्ही वागलो नाही, तर परमेश्वर तुझा देव आमच्याविरूद्ध खरा व प्रामाणिक साक्षीदार होवो.
5 Então eles disseram a Jeremias: — Que o
6 ते चांगले असो किंवा जर ते वाईट असले तरी आम्ही परमेश्वर आमचा देव ज्याच्याकडे आम्ही तुला पाठवत आहो त्याची वाणी आम्ही ऐकू. अशासाठी की, जेव्हा आम्ही परमेश्वर आमचा देव याची वाणी ऐकतो तेव्हा आमच्याबरोबर चांगले व्हावे.”
6 Seja ela boa ou má, obedeceremos à voz do Senhor , nosso Deus, a quem pedimos que você ore por nós, para que tudo corra bem conosco, ao obedecermos à voz do Senhor , nosso Deus.
7 मग दहा दिवसानंतर असे झाले की, यिर्मयाकडे परमेश्वराचे वचन आले.
7 Depois de dez dias, a palavra do Senhor veio a Jeremias.
8 म्हणून यिर्मयाने कारेहाचा मुलगा योहानान, त्याच्याबरोबर असलेले सर्व सेनाधिकारी व लहानापासून मोठ्यापर्यंत सर्व लोकांस बोलावले.
8 Então ele chamou Joanã, filho de Careá, todos os capitães dos exércitos que estavam com ele e todo o povo, desde o menor até o maior,
9 आणि तो त्यांना म्हणाला, “परमेश्वर, इस्राएलाचा देव ज्याच्याजवळ तुम्ही मला त्याच्यासमोर तुमची विनंती ठेवायला पाठवले, परमेश्वर असे म्हणतो,
9 e lhes disse: — Assim diz o
10 जर तुम्ही परत गेला नाही आणि या देशात राहिला तर मी तुम्हास बांधीन आणि तुम्हास खाली पाडणार नाही; मी तुम्हास लावीन, उपटून टाकणार नाही, कारण जे अरिष्ट मी तुमच्यावर आणले त्यामुळे मला वाईट वाटते.
10 “Se vocês permanecerem nesta terra, então eu os edificarei e não os derrubarei; eu os plantarei e não os arrancarei, porque estou triste pelo mal que lhes fiz.
11 ज्या बाबेलाच्या राजाला तुम्ही भीत आहात, त्यास भिऊ नका. हे परमेश्वराचे निवेदन आहे. कारण तुमचे रक्षण करणास आणि त्याच्या हातातून तुमची सुटका करण्यास, मी तुमच्याबरोबर आहे.
11 Não tenham medo do rei da Babilônia, de quem agora vocês estão com medo. Não tenham medo dele, diz o Senhor , porque eu estou com vocês, para os salvar e livrar das mãos dele.
12 कारण मी तुमच्यावर दया करीन आणि तुमच्याशी दयाळूपणाने वागेल आणि मी तुम्हास तुमच्या देशात परत आणील.
12 Terei misericórdia de vocês, para que ele tenha misericórdia de vocês e os faça voltar a esta terra.”
13 पण कदाचित् तुम्ही म्हणाल, आम्ही या देशात राहणार नाही. जर परमेश्वर तुमचा देव याची वाणी तुम्ही ऐकणार नाही.
13 — Mas, se vocês disserem: “Não ficaremos nesta terra”; se desobedecerem à voz do Senhor , seu Deus,
14 तुम्ही कदाचित् म्हणाल, नाही, आम्ही मिसर देशामध्ये जाऊन राहू, तेथे आम्हास कोणतेही युध्द दिसणार नाही, तेथे आम्ही रणशिंगाचा आवाज ऐकणार नाही आणि तेथे आम्ही अन्नासाठी भुकेले होणार नाही. आम्ही तेथे राहू.
14 e disserem: “Não! Preferimos ir à terra do Egito, onde não veremos guerra, nem ouviremos som de trombeta, nem passaremos fome, e ali vamos morar”,
15 तर आता यहूदातील वाचलेल्यांनो, परमेश्वराचे वचन ऐका. सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव, असे म्हणतो, जर तुम्ही खरोखर मिसर देशामध्ये जाऊन आणि तेथे राहण्याचे निश्चित करता,
15 nesse caso, ouça a palavra do Senhor , ó remanescente de Judá. Assim diz o Senhor dos Exércitos, o Deus de Israel: “Se tiverem o firme propósito de entrar no Egito para morar,
16 तर ज्या तलवारीची तुम्हास भीती वाटते, ती मिसर देशात तुम्हास गाठेल. ज्या दुष्काळाची तुम्ही काळजी करीता, तो मिसरात तुमचा पाठलाग करील. आणि तुम्ही तेथे मराल.
16 então a guerra da qual vocês têm medo os alcançará, e a fome que vocês receiam irá no encalço de vocês até o Egito, onde vocês morrerão.
17 म्हणून असे घडेल की, जी सर्व माणसे मिसरमध्ये जाऊन राहण्याचे निश्चित करतील, ते तेथे तलवार, दुष्काळ, किंवा मरीने मरतील. तेथे त्यांच्यातील एकही जण वाचणार नाही, मी त्यांच्यावर आणलेल्या संकटातून एकही जण वाचणार नाही.
17 Assim será com todos os que tiverem o propósito de entrar no Egito para morar: morrerão à espada, de fome e de peste. Não haverá um só que sobreviva ou escape do mal que trarei sobre eles.”
18 कारण सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव असे म्हणतो, जसा माझा क्रोध व माझा संताप यरूशलेमेवरचा माझा राग व्यक्त करून दाखविला. यरूशलेमेमध्ये राहणाऱ्यांवर ओतला आहे तसा माझा क्रोध जर तुम्ही मिसरमध्ये जाल तेव्हा तुम्हावर ओतला जाईल. तुम्ही शापाची वस्तू व्हाल व भयचकीत, शाप बोलण्याचा विषय आणि काहीतरी निंदनीय व्हाल. आणि हे ठिकाण तुम्ही पुन्हा कधीही पाहणार नाही.
18 — Porque assim diz o Senhor dos Exércitos, o Deus de Israel: “Assim como se derramou a minha ira e o meu furor sobre os moradores de Jerusalém, o meu furor se derramará sobre vocês, quando entrarem no Egito. Vocês serão objeto de maldição, de horror, de zombaria e de deboche, e nunca mais verão este lugar.”
19 यहूदातील वाचलेल्यांनो, परमेश्वर तुम्हाविषयी बोलला आहे, तुम्ही मिसरात जाऊ नका. तुम्ही खरोखर जाणून घ्या आज मी तुम्हाविरुध्द साक्ष दिली आहे.
19 — O Senhor disse a vocês, que são o remanescente de Judá: “Não vão para o Egito.” Estejam certos de que hoje eu faço esta advertência:
20 कारण परमेश्वर आमचा देव याच्याजवळ आम्हासाठी प्रार्थना करा, आणि जे काही परमेश्वर आमचा देव सांगेल ते आम्ही करू असे बोलून परमेश्वर तुमचा देव याच्याकडे मला पाठवले तेव्हा तुम्ही आपल्या जिवाविरूद्ध कपटाने वागला.
20 Vocês estão se enganando, à custa da própria vida. Porque me enviaram ao Senhor , seu Deus, dizendo: “Ore por nós ao Senhor , nosso Deus. Depois, conte-nos tudo o que o Senhor , nosso Deus, disser, e nós o faremos.”
21 कारण आज मी तुम्हास ते सांगितले आहे, पण त्याने जे काही माझ्याकडून सांगण्यासाठी पाठवले किंवा त्या कशातही तुम्ही तुमच्या परमेश्वर देवाची वाणी ऐकली नाही
21 Mas, agora que eu lhes contei tudo isso, vocês não deram ouvidos à voz do Senhor , seu Deus, não fazendo nada do que ele me mandou dizer.
22 म्हणून आता तुम्ही खरोखर जाणा की ज्या स्थानात तुम्ही जाऊन राहू इच्छिता त्यामध्ये तुम्ही तलवार, दुष्काळ आणि मरीने मराल.”
22 Agora, pois, estejam certos de que morrerão à espada, de fome e de peste no mesmo lugar aonde desejaram ir para morar.

Ler em outra tradução

Comparar com outra

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Jeremias 42, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.