Jeremias 38
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (MAR) vs NAA
1 यिर्मयाने सर्व लोकांस जी वचने सांगितली ती मत्तानाचा मुलगा शफाट्या व पशहूरचा मुलगा गदल्या, शलेम्याचा मुलगा युकाल आणि मल्कीयाचा मुलगा पशहूर यांनी ऐकली. तो सांगत होता,
1 Sefatias, filho de Matã, Gedalias, filho de Pasur, Jucal, filho de Selemias, e Pasur, filho de Malquias, ouviram as palavras que Jeremias anunciava a todo o povo, dizendo:
2 “परमेश्वर असे म्हणतो जो कोणी या नगरात राहतो तो तलवारीने, दुष्काळाने आणि मरीने मारला जाईल. पण कोणी खास्द्यांकडे निघून जाईल तो वाचेल, त्यास आपल्या स्वतःचा जीव लूट असा होईल, कारण तो जिवंत राहील.
2 — Assim diz o Senhor : “Quem ficar nesta cidade morrerá à espada, de fome e de peste; mas aquele que sair e se render aos caldeus viverá; porque a vida lhe será por despojo, e viverá.
3 परमेश्वर असे म्हणतो ‘हे नगर बाबेल राजाच्या सैन्याच्या हाती दिले जाईल आणि तो ते हस्तगत करेल.”
3 Assim diz o Senhor : Esta cidade infalivelmente será entregue nas mãos do exército do rei da Babilônia, e este a tomará.”
4 म्हणून अधिकारी राजाला म्हणाले, या मनुष्यास ठार मारावे, कारण याप्रकारे नगरात उरलेल्या लढणाऱ्या मनुष्यांचे आणि सर्व लोकांचे हात दुर्बल करतो. कारण तो ही वचने सांगून, मनुष्यांचे संरक्षण करत नाही पण अरिष्ट करायला पाहतो.
4 Então as autoridades disseram ao rei: — Este homem tem de ser morto, porque, dizendo essas palavras, desfalece as mãos dos homens de guerra que restam nesta cidade e as mãos de todo o povo. Este homem não procura o bem-estar do povo, e sim o mal.
5 मग सिद्कीया राजा म्हणाला, “पाहा, तो तुमच्या हातात आहे कारण राजाला तुम्हास विरोध करता येत नाही.”
5 O rei Zedequias respondeu: — Eis que ele está nas mãos de vocês, pois o rei nada pode fazer contra vocês.
6 मग त्यांनी यिर्मयाला घेतले आणि राजाचा मुलगा मल्कीया याच्या पाण्याच्या टाकीत टाकले. पाण्याची टाकी पहारेकऱ्यांच्या चौकात होती. त्यांनी यिर्मयाला दोरीने खाली सोडले. कैदखानेत पाणी नव्हते पण चिखल होता आणि तो त्या चिखलात रुतला.
6 Então eles pegaram Jeremias e o lançaram na cisterna de Malquias, filho do rei, que ficava no pátio da guarda. Desceram Jeremias com cordas. Na cisterna não havia água, apenas lama; e Jeremias se atolou na lama.
7 आता राजाच्या घरात एबद-मलेख हा एक कुशी षंढ होता. त्यांनी यिर्मयाला पाण्याच्या टाकीत टाकले आहे हे त्याने ऐकले. त्यासमयी राजा बन्यामिनाच्या प्रवेशद्वाराशी बसला होता.
7 Ebede-Meleque, o etíope, eunuco que estava na casa do rei, ouviu que tinham colocado Jeremias na cisterna. Quando o rei estava sentado junto ao Portão de Benjamim,
8 म्हणून एबद-मलेख राजाच्या घरातून निघाला आणि राजाबरोबर बोलला. तो म्हणाला,
8 Ebede-Meleque saiu da casa do rei e lhe falou:
9 माझ्या स्वामी राजा, या मनुष्यांनी ज्या मार्गाने यिर्मया संदेष्ट्याबरोबर वाईट वागणूक केली. तो भुकेने तेथे मरावा म्हणून त्यांनी त्यास पाण्याच्या टाकीत टाकले, कारण तेथे नगरात काही अन्न नाही.
9 — Ó rei, meu senhor, aqueles homens agiram mal em tudo o que fizeram ao profeta Jeremias, que eles lançaram na cisterna. No lugar onde ele está, morrerá de fome, pois já não há mais pão na cidade.
10 नंतर एबद-मलेख कुशीला राजाने आज्ञा दिली. तो म्हणाला, “येथून तीस माणसे बरोबर घे आणि यिर्मया संदेष्टा मरण्यापूर्वी त्यास पाण्याच्या टाकीतून बाहेर काढ.”
10 Então o rei deu ordem a Ebede-Meleque, o etíope, dizendo: — Leve com você trinta homens e tire da cisterna o profeta Jeremias, antes que morra.
11 म्हणून एबद-मलेख याने त्या मनुष्यांचा ताबा घेतला आणि त्याच्या ताब्यातील मनुष्यांना घेऊन व कपड्यासाठी राजाच्या घरातील भांडारात खाली गेला. तेथून त्याने चिंध्या व झिजलेले कपडे घेतले आणि दोरांनी त्या पाण्याच्या टाकीत खाली सोडल्या.
11 Ebede-Meleque levou os homens consigo e foi à casa do rei, a um lugar debaixo da tesouraria, e pegou algumas roupas usadas e trapos, e os desceu a Jeremias na cisterna, por meio de cordas.
12 एबद-मलेख कुशी यिर्मयाला म्हणाला, “त्या चिंध्या आणि झिजलेले कपडे तुझ्या काखेखाली व दोरांच्यावर ठेव. मग यिर्मयाने तसे केले.
12 Ebede-Meleque, o etíope, disse a Jeremias: — Ponha agora essas roupas usadas e esses trapos nas axilas, por debaixo das cordas. Jeremias o fez.
13 नंतर त्यांनी यिर्मयाला दोरांनी ओढून पाण्याच्या टाकीबाहेर काढले. मग यिर्मया पहारेकऱ्यांच्या चौकात राहिला.
13 Puxaram Jeremias com as cordas e o tiraram da cisterna; e Jeremias ficou no pátio da guarda.
14 नंतर सिद्कीया राजाने निरोप पाठवला आणि यिर्मया संदेष्ट्याला परमेश्वराच्या घराच्या तिसऱ्या प्रवेशद्वाराजवळ आपल्याजवळ बोलावले. मग राजा यिर्मयाला म्हणाला, मी तुला काही विचारायचे आहे. माझ्यापासून काही लपवू नकोस.”
14 Então o rei Zedequias mandou trazer o profeta Jeremias à sua presença, à terceira entrada na Casa do Senhor , e lhe disse: — Eu quero perguntar algo a você; não esconda nada de mim.
15 यिर्मया सिद्कीयाला म्हणाला, “जर मी तुला सांगितले, तर तू मला खचित मारणार नाहीस काय? आणि जर मी तुला सल्ला दिला, तरी तू माझे ऐकणार नाहीस.”
15 Jeremias disse a Zedequias: — Se eu disser algo, por acaso o senhor, ó rei, não me matará? E mesmo que eu lhe dê conselhos, o senhor não me escutará.
16 पण सिद्कीया राजाने गुप्तपणे यिर्मयाकडे शपथ घेतली व म्हणाला, परमेश्वर ज्याने आमचा जीव उत्पन्न केला, तो जिवंत आहे, मी तुला मारणार नाही किंवा जी मनुष्ये तुझा जीव घ्यायला पाहतात त्यांच्या हातात मी तुला देणार नाही.
16 Então Zedequias jurou secretamente a Jeremias, dizendo: — Tão certo como vive o
17 मग यिर्मया सिद्कीयाला म्हणाला, “परमेश्वर, सेनाधीश देव, इस्राएलाचा देव, असे म्हणतो, जर तू बाबेलाच्या राजाच्या अधिकाऱ्याकडे गेलास तर तू मग जिवंत राहशील आणि हे नगर जाळले जाणार नाही. तू आणि तुझा परीवार जिवंत राहील.
17 Então Jeremias disse a Zedequias: — Assim diz o
18 पण जर बाबेलाच्या राजाच्या अधिकाऱ्याकडे गेला नाहीस तर हे नगर खास्द्यांच्या हाती दिले जाईल. ते जाळून टाकतील आणि तू त्यांच्या हातातून सुटणार नाहीस.”
18 Mas, se você não se render aos oficiais do rei da Babilônia, então esta cidade será entregue nas mãos dos caldeus, eles a queimarão, e você não escapará das mãos deles.”
19 सिद्कीया राजा यिर्मयाला म्हणाला, “पण जे यहूदी सोडून खास्द्यांकडे गेले आहेत त्यांची मला भीती वाटते, कारण ते मला त्यांच्या हाती देतील, माझी चेष्टा करतील व मला वाईट वागवतील”
19 O rei Zedequias disse a Jeremias: — Tenho receio dos judeus que passaram para o lado dos caldeus. Pode acontecer que os caldeus me entreguem nas mãos desses judeus, e eles zombem de mim.
20 यिर्मया म्हणाला, “ते तुला त्यांच्या स्वाधीन करणार नाहीत. मी तुला सांगत आहे तो परमेश्वराचा संदेश पाळ याकरिता की सर्व गोष्टी तुझ्यासाठी चांगल्या होतील आणि तुझा जीवही वाचेल.
20 Mas Jeremias respondeu: — Eles não o entregarão. Ouça a voz do
21 पण जर तू बाहेर जाण्यास नकार दिलास, तर काय होईल, हे परमेश्वराने मला दाखविले आहे.
21 Mas, se o senhor, ó rei, não quiser se render, isto é o que o Senhor Deus me mostrou:
22 यहूदाच्या घरात ज्या स्त्रिया मागे राहिल्या आहेत त्या सर्वांना बाहेर बाबेलाच्या राजाच्या अधिकाऱ्याकडे आणले जाईल. नंतर पाहा! त्या स्त्रिया तुला म्हणतील,
22 Todas as mulheres que ficaram na casa do rei de Judá serão levadas aos oficiais do rei da Babilônia e dirão: “Os seus bons amigos, ó rei, o enganaram e dominaram. Mas, agora que os pés do rei se atolaram na lama, eles o abandonaram.”
23 कारण तुझ्या सर्व स्त्रिया आणि मुलांना ते बाहेर खास्द्यांकडे नेतील आणि तू स्वतः त्यांच्या हातातून सुटणार नाहीस. तू बाबेलाच्या राजाच्या हातात सापडशील आणि हे नगर अग्नीने जाळण्यात येईल.”
23 — Assim, todas as suas mulheres e os seus filhos serão levados aos caldeus. O senhor, ó rei, não escapará das mãos deles, mas será prisioneiro na mão do rei da Babilônia, e esta cidade será queimada.
24 मग सिद्कीया यिर्मयाला म्हणाला, या वचनाविषयी कोणालाही कळू देऊ नको. म्हणजे तू मरणार नाही.
24 Então Zedequias disse a Jeremias: — Que ninguém saiba desta conversa, e você não morrerá.
25 मी तुझ्याशी बोललो हे अधिकाऱ्यांनी जर ऐकले, ते जर आले आणि तुला म्हणाले, तू राजाबरोबर काय बोललास ते आम्हास सांग. आमच्यापासून लपवून ठेवू नको अथवा आम्ही तुला ठार मारू आणि राजा तुला काय म्हणाला तेही आम्हास सांग
25 Se as autoridades souberem que falei com você, vierem procurá-lo e lhe disserem: “Conte-nos o que foi que você disse ao rei e o que ele disse a você; não esconda nada de nós, e nós não mataremos você”,
26 मग तू त्यांना असे सांग, मी राजाला विनंती करून सांगितले की, मला योनाथानाच्या घरी मरण्यासाठी परत पाठवू नको.
26 diga: “Apresentei a minha humilde súplica diante do rei para que não me mandasse de volta à casa de Jônatas, para que eu não venha a morrer ali.”
27 नंतर सर्व अधिकारी यिर्मयाकडे आले आणि त्यांनी त्यास प्रश्न विचारले आणि त्याने उत्तर दिले, राजाने सूचना केल्याप्रमाणे त्याने उत्तरे दिली. मग त्यांनी त्याच्याशी बोलणे थांबवले कारण त्यांनी यिर्मया व राजा यांच्यात झालेले संभाषण ऐकले नव्हते.
27 Quando todas as autoridades se dirigiram a Jeremias e o interrogaram, ele lhes falou como o rei havia ordenado. Então o deixaram em paz, porque ninguém mais ficou sabendo o que foi conversado.
28 ह्याप्रमाणे यिर्मया, यरूशलेम जिंकले जाईपर्यंत, पहारेकऱ्याच्या चौकात राहिला.
28 Jeremias ficou no pátio da guarda, até o dia em que Jerusalém foi tomada.
Atalhos do teclado
- Capítulo anterior←
- Próximo capítulo→
- Versículo anteriork
- Próximo versículoj
- Limpar seleçãoEsc
- Esta ajuda?
Estude este capítulo no WhatsApp
Peça à IA da Bíblia Fala para explicar Jeremias 38, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.