João 12

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (MAR) vs NAA

Sair da comparação
NAA Nova Almeida Atualizada 2017
1 मग येशू वल्हांडणाच्या सहा दिवस आधी बेथानीस आला आणि ज्या लाजराला येशूने मरण पावलेल्यातून उठवले होते तो तेथे होता.
1 Seis dias antes da Páscoa, Jesus foi para Betânia, onde estava Lázaro, a quem ele tinha ressuscitado dentre os mortos.
2 म्हणून त्यांनी तेथे त्याच्यासाठी रात्रीचे भोजन केले आणि मार्था वाढीत होती. पण त्याच्याबरोबर भोजनास बसलेल्यात लाजर हा एक होता.
2 Prepararam-lhe, ali, uma ceia. Marta servia, e Lázaro era um dos que estavam à mesa com Jesus.
3 तेव्हा मरीयेने अर्धा शेर, शुद्ध जटामांसीचे, अतिमोलवान सुवासिक तेल घेऊन येशूच्या पायांना लावून आपल्या केसांनी त्याचे पाय पुसले; आणि तेलाच्या सुवासाने घर भरून गेले.
3 Então Maria, pegando um frasco de perfume de nardo puro, muito precioso, ungiu os pés de Jesus e os enxugou com os seus cabelos. E toda a casa se encheu com o cheiro do perfume.
4 तेव्हा, त्याच्या शिष्यांतला एक, त्यास धरून देणार होता तो यहूदा इस्कार्योत म्हणाला,
4 Mas Judas Iscariotes, um dos seus discípulos, aquele que estava para trair Jesus, disse:
5 “हे सुवासिक तेल तीनशे चांदीच्या नाण्यांस विकून ते गरीबास का दिले नाही?”
5 — Por que este perfume não foi vendido por trezentos denários e o valor não foi dado aos pobres?
6 त्यास गरिबांची काळजी होती म्हणून तो हे बोलला असे नाही, तर तो चोर होता म्हणून हे बोलला. त्याच्याजवळ डबी होती आणि तिच्यात जे टाकण्यांत येई ते तो चोरून घेई, म्हणून तो असे बोलला.
6 Ele disse isso não porque se preocupava com os pobres, mas porque era ladrão e, tendo a bolsa do dinheiro, tirava o que era colocado nela.
7 यावरुन येशूने म्हटले, “तिच्या वाटेस जाऊ नका. मला पुरण्याच्या दिवसासाठी तिने हे राखून ठेवले आहे.
7 Mas Jesus disse:
8 कारण गरीब नेहमी तुमच्याजवळ आहेत, पण मी नेहमी तुमच्याजवळ आहे असे नाही.”
8 Porque os pobres estão sempre com vocês, mas a mim vocês nem sempre terão.
9 तो तेथे आहे असे यहूद्यातील पुष्कळ लोकांस कळले आणि केवळ येशूकरता नाही, तर ज्याला त्याने मरण पावलेल्यातून उठवले होते त्या लाजरालाही आपण पाहावे म्हणून ते आले.
9 Uma numerosa multidão dos judeus ficou sabendo que Jesus estava em Betânia. Eles foram até lá não só por causa dele, mas também para ver Lázaro, a quem ele tinha ressuscitado dentre os mortos.
10 पण मुख्य याजकांनी आपण लाजरालाही ठार मारावे असा विचार केला.
10 Mas os principais sacerdotes resolveram matar também Lázaro,
11 कारण त्याच्यामुळे पुष्कळ यहूदी त्यांना सोडून येशूवर विश्वास ठेवत होते.
11 porque muitos dos judeus, por causa dele, voltavam crendo em Jesus.
12 दुसर्‍या दिवशी सणास आलेले पुष्कळ लोक येशू यरूशलेम शहरास येत आहे असे ऐकून,
12 No dia seguinte, a numerosa multidão que tinha vindo à festa, tendo ouvido que Jesus estava a caminho de Jerusalém,
13 खजुरीच्या झावळ्या घेऊन त्याच्या भेटीस घ्यायला बाहेर निघाले आणि गजर करीत म्हणाले, “होसान्ना! प्रभूच्या नावाने येणारा इस्राएलाचा राजा!” धन्यवादित असो.
13 pegou ramos de palmeiras e saiu ao encontro dele, clamando: “Hosana! Bendito o que vem em nome do Senhor e que é Rei de Israel!”
14 आणि येशूला एक शिंगरु मिळाल्यावर तो त्यावर बसला.
14 E Jesus, tendo conseguido um jumentinho, montou-o, segundo está escrito:
15 ‘हे सियोनेच्या कन्ये, भिऊ नको, पाहा, तुझा राजा गाढवीच्या शिंगरावर बसून येत आहे.’ या शास्त्रलेखाप्रमाणे हे घडले.
15 “Não tema, filha de Sião, eis que o seu Rei está vindo, montado num filho de jumenta.”
16 या गोष्टी तर त्याच्या शिष्यांना पहिल्याने समजल्या नव्हत्या, पण येशूचे गौरव झाल्यावर, त्यांना आठवण झाली की, त्याच्याविषयी या गोष्टी लिहिल्या होत्या आणि लोकांनी त्याच्यासाठी असे केले होते.
16 Seus discípulos a princípio não compreenderam isso. Mas, quando Jesus foi glorificado, então eles se lembraram de que essas coisas estavam escritas a respeito dele e também de que tinham feito isso com ele.
17 त्याने लाजराला कबरेतून बोलावून मरण पावलेल्यातून उठवले, त्यावेळेस जो लोकसमुदाय त्याच्याबरोबर होता त्यांने त्याच्याविषयी साक्ष दिली.
17 A multidão que estava com Jesus quando ele chamou Lázaro do túmulo e o levantou dentre os mortos dava testemunho.
18 त्याने हे चिन्ह केले होते असे त्यांनी ऐकले म्हणूनही लोक त्यास भेटावयास गेले.
18 Por causa disso, também, a multidão saiu ao encontro de Jesus, pois ouviu que ele tinha feito esse sinal.
19 मग परूशी एकमेकांस म्हणाले, “तुमचे काहीच चालत नाही, हे तुम्ही पाहता; पाहा, जग त्याच्यामागे चालले आहे.”
19 Então os fariseus disseram entre si: — Vocês podem ver que não estão conseguindo nada! Eis que o mundo vai atrás dele.
20 सणांत उपासना करावयास आलेल्या लोकांपैकी काही लोक ग्रीक होते.
20 Ora, entre os que foram para adorar durante a festa, havia alguns gregos.
21 त्यांनी गालील प्रांतातील बेथसैदाकर फिलिप्प याच्याजवळ येऊन विनंती केली की, “साहेब, येशूला भेटावे अशी आमची इच्छा आहे.”
21 Estes se dirigiram a Filipe, que era de Betsaida da Galileia, e lhe pediram: — Senhor, queremos ver Jesus.
22 फिलिप्पाने येऊन अंद्रियाला सांगितले; अंद्रिया व फिलिप्प यांनी येऊन येशूला सांगितले.
22 Filipe foi dizê-lo a André, e André e Filipe o comunicaram a Jesus.
23 येशूने त्यांना म्हटले, “मनुष्याच्या पुत्राचे गौरव होण्याची वेळ आली आहे.
23 Então Jesus se dirigiu a eles, dizendo:
24 मी तुम्हास खरे खरे सांगतो, गव्हाचा दाणा जमिनीत पडून मरण पावला नाही, तर तो एकटाच राहतो; आणि मरण पावला तर तो पुष्कळ पीक देतो.
24 Em verdade, em verdade lhes digo: se o grão de trigo, caindo na terra, não morrer, fica ele só; mas, se morrer, produz muito fruto.
25 जो आपल्या जीवावर प्रीती करतो तो त्यास मुकेल आणि जो या जगांत आपल्या जीवाचा द्वेष करतो तो त्याचे सार्वकालिक जीवनासाठी रक्षण करील.
25 Quem ama a sua vida perde-a; mas aquele que odeia a sua vida neste mundo irá preservá-la para a vida eterna.
26 जर कोणी माझी सेवा करतो तर त्याने मला अनुसरावे, म्हणजे जेथे मी आहे तेथे माझा सेवकही असेल. जर कोणी माझी सेवा करतो तर पिता त्यास मान करील.
26 Se alguém me serve, siga-me, e, onde eu estou, ali estará também o meu servo. E, se alguém me servir, meu Pai o honrará.
27 आता माझा जीव अस्वस्थ होत आहे आणि मी काय बोलू? हे पित्या, तू या घटकेपासून माझे रक्षण कर. पण मी या कारणासाठीच या घटकेत आलो आहे.
27 — Agora a minha alma está angustiada, e o que direi? “Pai, salva-me desta hora”? Não, pois foi precisamente com este propósito que eu vim para esta hora.
28 हे पित्या, तू आपल्या नावाचे गौरव कर” तेव्हा आकाशवाणी झाली, “मी ते गौरविले आहे आणि पुन्हाही गौरवीन.”
28 Pai, glorifica o teu nome. Então veio uma voz do céu: — Eu já o glorifiquei e ainda o glorificarei.
29 तेव्हा जे लोक सभोवती उभे होते आणि ज्यांनी हे ऐकले ते म्हणाले, “मेघगर्जना झाली.” दुसरे म्हणाले, “त्याच्याशी देवदूत बोलला.”
29 A multidão que ali estava e que ouviu aquela voz dizia ter havido um trovão. Outros diziam: — Foi um anjo que lhe falou.
30 येशूने त्यांना उत्तर देऊन म्हटले, “ही वाणी माझ्यासाठी झाली नाही तर तुमच्यासाठी झाली आहे.
30 Então Jesus explicou:
31 आता या जगाचा न्याय होतो, आता या जगाचा शासक बाहेर टाकला जाईल.
31 Chegou o momento de este mundo ser julgado, e agora o seu príncipe será expulso.
32 आणि मला जर पृथ्वीपासून उंच केले तर मी सर्वांना माझ्याकडे आकर्षून घेईन.”
32 E eu, quando for levantado da terra, atrairei todos a mim.
33 तो तर आपण कोणत्या मरणाने मरणार पाहिजे हे सुचविण्याकरिता हे बोलला.
33 Ele dizia isto, significando com que tipo de morte estava para morrer.
34 लोकांनी त्यास विचारले, ख्रिस्त सर्वकाळ राहील असे आम्ही नियमशास्त्रांतून ऐकले आहे, तर “मनुष्याच्या पुत्राला उंच केले पाहिजे” असे आपण कसे म्हणता? हा मनुष्याचा पुत्र आहे तरी कोण?
34 A multidão disse: — Nós ouvimos da Lei que o Cristo permanece para sempre. Como, então, você diz que é necessário que o Filho do Homem seja levantado? Quem é esse Filho do Homem?
35 यावरुन येशू त्यांना म्हणाला, “आणखी थोडा वेळ तुमच्याबरोबर प्रकाश आहे; तुम्हास प्रकाश आहे तोपर्यंत चाला; यासाठी कि अंधकाराने तुम्हास गाठू नये; कारण जो अंधकारात चालतो त्यास आपण कोठे जातो हे कळत नाही.
35 Jesus respondeu:
36 तुम्ही प्रकाशाचे पुत्र व्हावे म्हणून तुम्हाजवळ प्रकाश आहे तोपर्यंत प्रकाशावर विश्वास ठेवा.” येशू या गोष्टी बोलला आणि तेथून निघून जाऊन त्यांच्यापासून गुप्त राहिला.
36 Enquanto vocês têm a luz, creiam na luz, para que se tornem filhos da luz. Depois de dizer isso, Jesus foi embora e ocultou-se deles.
37 त्याने त्यांच्यासमोर इतकी चिन्हे केली असतांही त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही;
37 E, embora tivesse feito tantos sinais na presença deles, não creram nele,
38 हे यासाठी झाले की, यशया संदेष्ट्याने जे वचन सांगितले होते ते पूर्ण व्हावे, ते असेः
38 para se cumprir a palavra do profeta Isaías, que diz: “Senhor, quem creu em nossa pregação? E a quem foi revelado o braço do Senhor?”
39 म्हणून त्यांना विश्वास ठेवता आला नाही;
39 Por isso, não podiam crer, porque Isaías disse ainda:
40 “त्यांनी डोळ्यांनी पाहू नये,
40 “Cegou os olhos deles e endureceu-lhes o coração, para que não vejam com os olhos, nem entendam com o coração, e se convertam, e sejam por mim curados.”
41 यशयाने त्याचे गौरव पाहिले म्हणून त्याने या गोष्टी सांगितल्या आणि तो त्याच्याविषयी बोलला.
41 Isaías disse isso porque viu a glória dele e falou a respeito dele.
42 तरी यहूदी अधिकार्‍यांतूनही पुष्कळांनी त्याच्यावर विश्वास ठेवला, परंतु आपणांस सभास्थानाच्या बाहेर घालवू नये म्हणून परूश्यांमुळे ते तसे कबूल करीत नव्हते.
42 No entanto, muitos dentre as próprias autoridades creram em Jesus, mas, por causa dos fariseus, não o confessavam, para não serem expulsos da sinagoga.
43 कारण त्यांना देवाकडील गौरवापेक्षा मनुष्याकडील गौरव अधिक प्रिय वाटले.
43 Porque amaram mais a glória dos homens do que a glória de Deus.
44 आणि येशू मोठ्याने म्हणाला, “जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो माझ्यावर नाही, तर ज्याने मला पाठवले त्याच्यावर विश्वास ठेवतो.
44 E Jesus clamou, dizendo:
45 आणि जो मला पाहतो तो ज्याने मला पाठवले त्यास पाहतो.
45 E quem vê a mim vê aquele que me enviou.
46 जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवतो त्याने अंधकारात राहू नये म्हणून मी जगात प्रकाश असा आलो आहे.
46 Eu vim como luz para o mundo, a fim de que todo aquele que crê em mim não permaneça nas trevas.
47 कोणी जर माझी वचने ऐकतो पण ती पाळीत नाही, त्याचा न्याय मी करीत नाही; कारण मी जगाचा न्याय करण्यासाठी नव्हे, तर मी जगाचे तारण करायला आलो आहे.
47 Se alguém ouvir as minhas palavras e não as guardar, eu não o julgo. Porque eu não vim para julgar o mundo, e sim para salvá-lo.
48 जो माझा अवमान करतो आणि माझी वचने स्वीकारीत नाही त्याचा न्याय करणारे कोणी आहे. जे वचन मी सांगितले, तेच शेवटल्या दिवशी, त्याचा न्याय करील.
48 Quem me rejeita e não recebe as minhas palavras tem quem o julgue; a própria palavra que falei, essa o julgará no último dia.
49 कारण मी आपल्या मनाचे बोललो नाही, तर मी काय सांगावे आणि काय बोलावे याविषयी ज्या पित्याने मला पाठवले त्यानेच मला आज्ञा दिली आहे.
49 Porque eu não falei por mim mesmo, mas o Pai, que me enviou, esse me ordenou o que dizer e o que anunciar.
50 त्याची आज्ञा सार्वकालिक जीवन आहे. हे मला ठाऊक आहे. म्हणून जे काही मी बोलतो ते पित्याने मला सांगितल्याप्रमाणे बोलतो.”
50 E sei que o seu mandamento é a vida eterna. Portanto, as coisas que eu digo, digo exatamente assim como o Pai me falou.

Ler em outra tradução

Comparar com outra

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar João 12, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.