Hebreus 12

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (MAR) vs ARIB

Sair da comparação
ARIB Almeida Revisada Imprensa Bíblica
1 म्हणून, आपण एवढया मोठया साक्षीरुपी मेघाने वेढलेले आहोत म्हणून आपणही सर्व भार व सहज अडवणारे पाप टाकून, आपल्याला नेमून दिलेल्या धावेवरून धीराने धावावे.
1 Portanto, nós também, pois estamos rodeados de tão grande nuvem de testemunhas, deixemos todo embaraço, e o pecado que tão de perto nos rodeia, e corramos com perseverança a carreira que nos está proposta,
2 जो आमचे विश्वासात नेतृत्व करतो आणि पूर्णत्वास नेतो त्या येशूवर आपले लक्ष केद्रित करू या. जो आनंद त्याच्यासमोर होता त्यासाठी येशूने वधस्तंभ सहन केला होता. वधस्तंभावरील निंदास्पद मरणाला त्याने तुच्छ मानले आणि आता त्याने देवाच्या राजासनाजवळील उजवीकडे जागा घेतली आहे.
2 fitando os olhos em Jesus, autor e consumador da nossa fé, o qual, pelo gozo que lhe está proposto, suportou a cruz, desprezando a ignomínia, e está assentado à direita do trono de Deus.
3 तुम्ही खचून जाऊ नये आणि धीर सोडू नये म्हणून ज्याने पापी लोकांचा इतक्या मोठ्या प्रमाणातील विरोध सहन केला, त्याचा विचार करा.
3 Considerai, pois aquele que suportou tal contradição dos pecadores contra si mesmo, para que não vos canseis, desfalecendo em vossas almas.
4 तुम्ही पापाविरुद्ध झगडत असता रक्त सांडेपर्यंत अजून प्रतिकार केला नाही.
4 Ainda não resististes até o sangue, combatendo contra o pecado;
5 आणि तुम्हास पुत्राप्रमाणे केलेला हा बोध तुम्ही विसरून गेला आहात काय?
5 e já vos esquecestes da exortação que vos admoesta como a filhos: Filho meu, não desprezes a correção do Senhor, nem te desanimes quando por ele és repreendido;
6 कारण ज्याच्यावर परमेश्वर प्रीती करतो, त्यास तो शिक्षा करतो
6 pois o Senhor corrige ao que ama, e açoita a todo o que recebe por filho.
7 हा कठीण समय आहे म्हणून शिस्त सहन करा. ते असे दर्शवते की, देव तुम्हास मुलांसारखी वागणूक देत आहे; कारण असा कोणता मुलगा आहे ज्याला वडील शिस्त लावीत नाहीत?
7 É para disciplina que sofreis; Deus vos trata como a filhos; pois qual é o filho a quem o pai não corrija?
8 परंतु ज्या शिक्षेचे सर्व भागीदार झाले आहेत अशा शिक्षेवाचून जर तुम्ही आहा, तर तसे तुम्ही दासीपुत्र आहात आणि तुम्ही खरे पुत्र नाही.
8 Mas, se estais sem disciplina, da qual todos se têm tornado participantes, sois então bastardos, e não filhos.
9 याशिवाय आम्हा सर्वांना जगिक पिता असताना त्यांनी आम्हास शिस्त लावली आणि त्याबद्दल आम्ही त्यांचा आदर राखला. तर मग आम्ही आमच्या आध्यात्मिक पित्याच्या कितीतरी अधिक प्रमाणात अधीन होऊन जगले पाहिजे बरे?
9 Além disto, tivemos nossos pais segundo a carne, para nos corrigirem, e os olhávamos com respeito; não nos sujeitaremos muito mais ao Pai dos espíritos, e viveremos?
10 आमच्या मानवी वडिलांनी त्यांच्या दृष्टीने अती उत्तम अशी शिस्त थोड्या काळासाठी लावली. पण देव आम्हास आमच्या चांगल्यासाठी शिस्त लावतो, यासाठी की, त्याच्या पवित्रपणात आपणही वाटेकरी व्हावे.
10 Pois aqueles por pouco tempo nos corrigiam como bem lhes parecia, mas este, para nosso proveito, para sermos participantes da sua santidade.
11 कोणतीही शिक्षा तर सध्या आनंदाची वाटत नाही, तर दुःखाची वाटते तरी तिचा अनुभव ज्यांना मिळाला आहे, त्यांना ती पुढे नीतिमत्त्व हे शांतीकारक फळ देते.
11 Na verdade, nenhuma correção parece no momento ser motivo de gozo, porém de tristeza; mas depois produz um fruto pacífico de justiça nos que por ele têm sido exercitados.
12 म्हणून तुमचे लोंबकळत असलेले हात उंच करा आणि तुमचे लटपटणारे गुडघे बळकट करा!
12 Portanto levantai as mãos cansadas, e os joelhos vacilantes,
13 तुमच्या पावलांकरीता सरळ वाटा तयार करा यासाठी की, जे लंगडे त्यास मार्गातून घालवले जाऊ नये, तर त्यापेक्षा त्याने निरोगी व्हावे.
13 e fazei veredas direitas para os vossos pés, para que o que é manco não se desvie, antes seja curado.
14 सर्व लोकांबरोबर शांतीने राहण्याचा व ज्यावाचून कोणालाही प्रभूला पाहता येत नाही ते पवित्रीकरण मिळवण्याचा झटून प्रयत्न करा.
14 Segui a paz com todos, e a santificação, sem a qual ninguém verá o Senhor,
15 तुम्ही सांभाळून राहा, यासाठी की देवाच्या कृपेला कोणी अंतरू नये, ज्यामुळे पुष्कळ जण बिघडून जातील अशा कोणा कडूपणाच्या मुळाने अंकुरीत होऊन तुम्हास उपद्रव देऊ नये,
15 tendo cuidado de que ninguém se prive da graça de Deus, e de que nenhuma raiz de amargura, brotando, vos perturbe, e por ela muitos se contaminem;
16 कोणीही व्यभिचारी असू नये किंवा एका जेवणासाठी आपला वडील हक्क विकून टाकणाऱ्या एसावासारखे जगिक विचाराचे असू नये याकडे लक्ष द्या.
16 e ninguém seja devasso, ou profano como Esaú, que por uma simples refeição vendeu o seu direito de primogenitura.
17 नंतर तुम्हास माहीत आहे जेव्हा त्यास वारसाहक्काने आशीर्वाद अपेक्षित होता, तेव्हा तो नाकारण्यात आला. जरी त्याने रडून आशीर्वाद मिळविण्याचा प्रयत्न केला, तरी पश्चात्तापाने आपल्या वडिलांचे मन तो बदलू शकला नाही.
17 Porque bem sabeis que, querendo ele ainda depois herdar a bênção, foi rejeitado; porque não achou lugar de arrependimento, ainda que o buscou diligentemente com lágrimas.
18 ज्या पर्वताला हाताने स्पर्श करता येतो; जो अग्नीच्या ज्वालांनी पेटलेला आहे, जो अंधार, दुःख व वादळ यांनी भरलेला आहे, अशा पर्वताकडे तुम्ही आला नाही. तर एका नवीन ठिकाणी आला आहात.
18 Pois não tendes chegado ao monte palpável, aceso em fogo, e à escuridão, e às trevas, e à tempestade,
19 कर्ण्याच्या आवाजाजवळ तुम्ही आला नाहीत किंवा शब्द उच्चारणाऱ्याच्या वाणी याजवळ तुम्ही आला नाही. असा आवाज ज्यांनी ऐकला, देवाकडे त्यांनी अशी विनंती केली की, त्यांनी यापुढे आणखी वाणी ऐकवू नये.
19 e ao sonido da trombeta, e à voz das palavras, a qual os que a ouviram rogaram que não se lhes falasse mais;
20 कारण जी आज्ञा देवाने केली होती ती ते सहन करू शकले नाहीत, “जर एखाद्या प्राण्याने जरी पर्वताला स्पर्श केला तरी त्यास दगडमार करण्यात यावा.”
20 porque não podiam suportar o que se lhes mandava: Se até um animal tocar o monte, será apedrejado.
21 खरोखर ते दृश्य इतके भयंकर होते की, मोशे म्हणाला, “मी अति भयभीत” व कंपित झालो आहे.
21 E tão terrível era a visão, que Moisés disse: Estou todo aterrorizado e trêmulo.
22 परंतु तुम्ही सियोन पर्वताजवळ आणि जिवंत देवाचे नगर म्हणजे स्वर्गीय यरूशलेम, लाखो देवदूत
22 Mas tendes chegado ao Monte Sião, e à cidade do Deus vivo, à Jerusalém celestial, a miríades de anjos;
23 स्वर्गातील यादीतल्या ज्येष्ठांचा समाज व मंडळी, सर्वांचा न्यायाधीश देव व पूर्ण केलेल्या नीतिमानांचे आत्मे,
23 à universal assembléia e igreja dos primogênitos inscritos nos céus, e a Deus, o juiz de todos, e aos espíritos dos justos aperfeiçoados;
24 आणि तुम्ही जो नव्या कराराचा मध्यस्थ येशू त्याच्याकडे आला आहात आणि तुम्ही शिंपडण्यात आलेल्या रक्ताकडे आलात की जे रक्त हाबेलाच्या रक्तापेक्षा अधिक उत्तम बोलते.
24 e a Jesus, o mediador de um novo pacto, e ao sangue da aspersão, que fala melhor do que o de Abel.
25 मोशे जो बोलतो आहे त्याचा अवमान करू नये म्हणून जपा कारण पृथ्वीवर आज्ञा सांगणाऱ्याचा अवमान करणारे इस्राएल लोक जर निभावले नाहीत, तर स्वर्गातून आज्ञा सांगणाऱ्या ख्रिस्तापासून बहकल्यास आपण विशेषेकरून निभावणार नाही.
25 Vede que não rejeiteis ao que fala; porque, se não escaparam aqueles quando rejeitaram o que sobre a terra os advertia, muito menos escaparemos nós, se nos desviarmos daquele que nos adverte lá dos céus;
26 त्यावेळेस देवाच्या आवाजाने भूमी हादरली पण आता त्याने असे अभिवचन दिले आहे की, “पुन्हा एकदा मी केवळ पृथ्वीच नव्हे तर आकाशही हालवीन.”
26 a voz do qual abalou então a terra; mas agora tem ele prometido, dizendo: Ainda uma vez hei de abalar não só a terra, mas também o céu.
27 “पुन्हा एकदा” याचा अर्थ असा होतो की, ज्या गोष्टी उत्पन्न केलेल्या आहेत त्या काढून टाकण्यात येतील. ज्या गोष्टी हलवता येत नाहीत त्या तशाच राहतील.
27 Ora, esta palavra-Ainda uma vez-significa a remoção das coisas abaláveis, como coisas criadas, para que permaneçam as coisas inabaláveis.
28 म्हणून, आम्हास अढळ असे राज्य कृपेने देण्यात येत असताना आपण त्याविषयी कृतज्ञता बाळगू या आणि आदराने व भयभीत होऊन देवाला मान्य होईल अशी त्याची सेवा करू;
28 Pelo que, recebendo nós um reino que não pode ser abalado, retenhamos a graça, pela qual sirvamos a Deus agradavelmente, com reverência e temor;
29 कारण आपला “देव भस्म करणारा अग्नी आहे.”
29 pois o nosso Deus é um fogo consumidor.

Ler em outra tradução

Comparar com outra

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Hebreus 12, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.