Gênesis 45

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (MAR) vs ARA

Sair da comparação
ARA Almeida Revista e Atualizada 1993
1 आता मात्र योसेफाला आपल्याजवळ जे उभे होते त्या सर्व सेवकांसमोर दुःख रोखून धरता येईना. तो मोठ्याने रडला. तो म्हणाला, “येथील सर्व लोकांस येथून बाहेर जाण्यास सांगा.” तेव्हा तेथील सर्वजण निघून गेले. केवळ त्याचे भाऊच त्याच्यापाशी राहिले. मग योसेफाने आपली ओळख त्यांना दिली.
1 Então, José, não se podendo conter diante de todos os que estavam com ele, bradou: Fazei sair a todos da minha presença! E ninguém ficou com ele, quando José se deu a conhecer a seus irmãos.
2 तो मोठ्याने रडला. मिसर देशाच्या लोकांनी व फारो राजाच्या घराण्यातील लोकांनीही त्याचे रडणे ऐकले.
2 E levantou a voz em choro, de maneira que os egípcios o ouviam e também a casa de Faraó.
3 मग योसेफ आपल्या भावांना म्हणाला, “मी योसेफ आहे. माझा बाप अजून जिवंत आहे काय?” परंतु त्याचे भाऊ त्यास काही उत्तर देऊ शकले नाहीत. त्याच्या समोर ते फार घाबरले होते.
3 E disse a seus irmãos: Eu sou José; vive ainda meu pai? E seus irmãos não lhe puderam responder, porque ficaram atemorizados perante ele.
4 तेव्हा योसेफ आपल्या भावांना म्हणाला, “मी विनंती करतो जरा इकडे माझ्याजवळ या.” तेव्हा ते त्याच्या जवळ गेले. आणि तो त्यांना म्हणाला, “तुमचा भाऊ योसेफ मीच आहे. ज्याला तुम्ही मिसरी लोकांस विकले.
4 Disse José a seus irmãos: Agora, chegai-vos a mim. E chegaram-se. Então, disse: Eu sou José, vosso irmão, a quem vendestes para o Egito.
5 आता त्यासाठी काही खिन्न होऊ नका किंवा आपल्या स्वतःवर संताप करून घेऊ नका. मी येथे यावे व त्यामुळे आपणा सर्वांचे प्राण वाचावेत ही देवाचीच योजना होती.
5 Agora, pois, não vos entristeçais, nem vos irriteis contra vós mesmos por me haverdes vendido para aqui; porque, para conservação da vida, Deus me enviou adiante de vós.
6 हा दुष्काळ आता दोन वर्षे पडला आहे आणि आणखी पाच वर्षे पेरणी किंवा कापणी होणार नाही.
6 Porque já houve dois anos de fome na terra, e ainda restam cinco anos em que não haverá lavoura nem colheita.
7 देवाने मला तुमच्या आधी येथे पाठवले आहे, यासाठी की, तुमचा पृथ्वीवर बचाव होऊन तुम्ही शेष रहावे आणि तुम्हास जिवंत ठेवून तुमची वंशवृद्धी होऊ द्यावी.
7 Deus me enviou adiante de vós, para conservar vossa sucessão na terra e para vos preservar a vida por um grande livramento.
8 मला येथे पाठवण्यात तुमचा दोष नव्हता तर ही देवाची योजना होती. देवाने मला फारोच्या वडिलासमान केले आहे. त्यामुळे मी फारोच्या घरादाराचा धनी आणि सर्व मिसर देशाचा अधिकारी झालो आहे.”
8 Assim, não fostes vós que me enviastes para cá, e sim Deus, que me pôs por pai de Faraó, e senhor de toda a sua casa, e como governador em toda a terra do Egito.
9 योसेफ म्हणाला, “तर आता ताबडतोब माझ्या बापाकडे जाण्यास निघा. त्यास सांगा की, तुमचा मुलगा योसेफ याने तुम्हास संदेश पाठवला आहे. देवाने मला अवघ्या मिसर देशाचा धनी केले आहे. तर माझ्याकडे खाली निघून या. उशीर करू नका.
9 Apressai-vos, subi a meu pai e dizei-lhe: Assim manda dizer teu filho José: Deus me pôs por senhor em toda terra do Egito; desce a mim, não te demores.
10 तुम्ही माझ्याजवळ गोशेन प्रांतात राहा. आणि तुम्ही, तुमची मुले, नातवंडे तसेच तुमची शेरडेमेंढरे, गुरेढोरे आणि जे काही तुमचे आहे ते माझ्याजवळ राहील.
10 Habitarás na terra de Gósen e estarás perto de mim, tu, teus filhos, os filhos de teus filhos, os teus rebanhos, o teu gado e tudo quanto tens.
11 येणाऱ्या दुष्काळाच्या पाच वर्षात मी तुम्हास सर्व प्रकारचा पुरवठा करीन त्यामुळे तुम्हावर व तुमच्या कुटुंबावर सर्व काही गमावून गरीब होण्याची वेळ येणार नाही.
11 Aí te sustentarei, porque ainda haverá cinco anos de fome; para que não te empobreças, tu e tua casa e tudo o que tens.
12 पाहा, माझे तोंड तुम्हाशी बोलत आहे हे तुमचे डोळे, व माझा भाऊ बन्यामीन याचे डोळे पाहत आहेत.
12 Eis que vedes por vós mesmos, e meu irmão Benjamim vê também, que sou eu mesmo quem vos fala.
13 मिसर देशातील माझे वैभव आणि तुम्ही येथे जे जे पाहिले आहे त्यासंबंधी माझ्या बापाला सांगा. आता लवकर जाऊन माझ्या बापाला माझ्याकडे खाली घेऊन या.”
13 Anunciai a meu pai toda a minha glória no Egito e tudo o que tendes visto; apressai-vos e fazei descer meu pai para aqui.
14 मग त्याने आपला भाऊ बन्यामीन याला मिठी मारली आणि गळ्यात पडून रडला, आणि बन्यामीनही त्याच्या गळ्यात पडून रडला.
14 E, lançando-se ao pescoço de Benjamim, seu irmão, chorou; e, abraçado com ele, chorou também Benjamim.
15 मग त्याने आपल्या प्रत्येक भावाला मिठी मारली व त्यांचे मुके घेतले आणि तो रडला. यानंतर त्याचे भाऊ त्याच्याबरोबर बोलू लागले.
15 José beijou a todos os seus irmãos e chorou sobre eles; depois, seus irmãos falaram com ele.
16 “योसेफाचे भाऊ त्याजकडे आले आहेत” अशी बातमी फारो, त्याच्या घरची मंडळी व त्याचे सेवक यांना समजली त्यामुळे त्या सर्वांना आनंद झाला.
16 Fez-se ouvir na casa de Faraó esta notícia: São vindos os irmãos de José; e isto foi agradável a Faraó e a seus oficiais.
17 तेव्हा फारो योसेफाला म्हणाला, “तुझ्या भावांना सांग की, ‘तुम्हास गरज असेल तेवढी अन्नसामग्री जनावरांवर लादून कनान देशास जा.
17 Disse Faraó a José: Dize a teus irmãos: Fazei isto: carregai os vossos animais e parti; tornai à terra de Canaã,
18 तसेच तुमचा बाप आणि तुमच्या घरची सर्व मंडळी यांना घेऊन माझ्याकडे या. तुम्हास रहावयास मिसरमधील सर्वांत उत्तम प्रदेश मी देईन आणि तुमच्या घरातील मंडळी, यांना आमच्या येथे असलेले उत्तम पदार्थ खावयास मिळतील.’
18 tomai a vosso pai e a vossas famílias e vinde para mim; dar-vos-ei o melhor da terra do Egito, e comereis a fartura da terra.
19 तुला माझी आज्ञा आहे, तू त्यांना सांग की, ‘असे करा, तुमच्या स्त्रिया व तुमची मुले या सर्वांकरिता मिसर देशातून गाड्या घेऊन जा. तुमच्या वडिलांना घेऊन या.
19 Ordena-lhes também: Fazei isto: levai da terra do Egito carros para vossos filhinhos e para vossas mulheres, trazei vosso pai e vinde.
20 तुमची मालमत्ता व जे काही असेल त्याची चिंता करू नका, कारण मिसर देशामधील जे उत्तम ते सर्व तुमचेच आहे.’”
20 Não vos preocupeis com coisa alguma dos vossos haveres, porque o melhor de toda a terra do Egito será vosso.
21 तेव्हा इस्राएलाच्या मुलांनी तसे केले. योसेफाने त्यांना फारोने आज्ञा दिल्याप्रमाणे गाड्या दिल्या, आणि त्यांच्या प्रवासाकरिता भरपूर अन्नसामग्री दिली.
21 E os filhos de Israel fizeram assim. José lhes deu carros, conforme o mandado de Faraó; também lhes deu provisão para o caminho.
22 तसेच त्याने प्रत्येक भावाला एक एक पोशाख दिला व बन्यामिनाला पाच पोशाख आणि चांदीची तीनशे नाणी दिली.
22 A cada um de todos eles deu vestes festivais, mas a Benjamim deu trezentas moedas de prata e cinco vestes festivais.
23 त्याने आपल्या वडिलासाठीही या देणग्या पाठवल्या: धान्य, भाकरी, आणि इतर पदार्थांनी लादलेल्या दहा गाढवी त्याच्या वडिलाच्या प्रवासासाठी पाठवल्या.
23 Também enviou a seu pai dez jumentos carregados do melhor do Egito, e dez jumentos carregados de cereais e pão, e provisão para o seu pai, para o caminho.
24 मग योसेफाने आपल्या भावांना निरोप दिला आणि ते निघाले. तो त्यांना म्हणाला, “रस्त्यात एकमेकांशी भांडू नका.”
24 E despediu os seus irmãos. Ao partirem, disse-lhes: Não contendais pelo caminho.
25 अशा रीतीने त्याचे भाऊ मिसर सोडून कनान देशास आपला पिता याकोब याच्याकडे गेले.
25 Então, subiram do Egito, e vieram à terra de Canaã, a Jacó, seu pai,
26 त्यांनी आपल्या पित्यास सांगितले, “तुमचा मुलगा योसेफ अजून जिवंत आहे आणि तो अवघ्या मिसर देशाचा अधिकारी आहे.” हे ऐकून त्याचे हृदय विस्मित झाले, कारण त्याचा त्यांच्यावर विश्वास बसला नाही.
26 e lhe disseram: José ainda vive e é governador de toda a terra do Egito. Com isto, o coração lhe ficou como sem palpitar, porque não lhes deu crédito.
27 परंतु त्यांनी त्यास योसेफाने सांगितलेल्या सर्व गोष्टी कळवल्या. मग योसेफाने त्यास मिसरला घेऊन जाण्यासाठी पाठवलेल्या गाड्या याकोबाने पाहिल्या, तेव्हा त्यांचा बाप याकोब संजीवित झाला.
27 Porém, havendo-lhe eles contado todas as palavras que José lhes falara, e vendo Jacó, seu pai, os carros que José enviara para levá-lo, reviveu-se-lhe o espírito.
28 इस्राएल म्हणाला, “हे पुरेसे आहे. माझा मुलगा योसेफ अजून जिवंत आहे. आता मी मरण्यापूर्वी त्यास जाऊन भेटेन.”
28 E disse Israel: Basta; ainda vive meu filho José; irei e o verei antes que eu morra.

Ler em outra tradução

Comparar com outra

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Gênesis 45, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.