Gênesis 40

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (MAR) vs ARC

Sair da comparação
ARC Almeida Revista e Corrigida 2009
1 या गोष्टीनंतर असे झाले की, फारो राजाचा प्यालेबरदार म्हणजे राजाला द्राक्षरस देणारा आणि आचारी यांनी आपल्या धन्याचा, मिसराच्या राजाचा अपराध केला.
1 E aconteceu, depois destas coisas, que pecaram o copeiro do rei do Egito e o padeiro contra o seu senhor, o rei do Egito.
2 फारो राजा त्याच्या या दोन अधिकाऱ्यांवर म्हणजे त्याचा मुख्य प्यालेबरदार व त्याचा मुख्य आचारी यांच्यावर संतापला.
2 E indignou-se Faraó muito contra os seus dois eunucos, contra o copeiro-mor e contra o padeiro-mor.
3 आणि त्याने त्यांना पहारेकऱ्यांचा सरदाराच्या वाड्यात, योसेफ कैदेत होता त्या ठिकाणी, तुरुंगात टाकले.
3 E entregou-os à prisão, na casa do capitão da guarda, na casa do cárcere, no lugar onde José estava preso.
4 तेव्हा पहारेकऱ्यांच्या सरदाराने त्या दोघाही अपराध्यांना योसेफाच्या ताब्यात देऊन त्यांच्यावर लक्ष ठेवण्यास सांगितले. ते दोघे काही काळपर्यंत कैदेत राहिले.
4 E o capitão da guarda pô-los a cargo de José, para que os servisse; e estiveram muitos dias na prisão.
5 मिसरी राजाला प्याला देणारा व त्याचा आचारी हे तुरुंगात असताना, त्या दोघांनाही एकाच रात्री त्यांना लागू पडतील अशी स्वप्ने पडली.
5 E ambos sonharam um sonho, cada um seu sonho na mesma noite; cada um conforme a interpretação do seu sonho, o copeiro e o padeiro do rei do Egito, que estavam presos na casa do cárcere.
6 दुसऱ्या दिवशी सकाळी योसेफ त्यांच्याकडे गेला. तेव्हा पाहा, ते त्यास दुःखी असलेले दिसले.
6 E veio José a eles pela manhã e olhou para eles, e eis que estavam turbados.
7 तेव्हा, त्याच्या धन्याच्या वाड्यात जे फारोचे सेवक त्याच्या बरोबर कैदेत होते, त्यांना त्याने विचारले, “आज तुम्ही असे दुःखी का दिसता?”
7 Então, perguntou aos eunucos de Faraó, que com ele estavam no cárcere da casa de seu senhor, dizendo: Por que estão, hoje, tristes os vossos semblantes?
8 ते त्यास म्हणाले, “आम्हा दोघांनाही रात्री स्वप्ने पडली, परंतु त्यांचा अर्थ सांगणारा कोणी नाही.” योसेफ त्यांना म्हणाला, “स्वप्नांचा अर्थ सांगणे देवाकडे नाही काय? कृपया, आपापले स्वप्न मला सांगा.”
8 E eles lhe disseram: Temos sonhado um sonho, e ninguém há que o interprete. E José disse-lhes: Não são de Deus as interpretações? Contai-mo, peço-vos.
9 तेव्हा राजाला प्याला देणाऱ्या प्यालेबरदाराने योसेफाला आपले स्वप्न सांगितले. तो म्हणाला, “मी माझ्या स्वप्नात पाहिले की, माझ्यासमोर एक द्राक्षवेल आहे.
9 Então, contou o copeiro-mor o seu sonho a José e disse-lhe: Eis que em meu sonho havia uma vide diante da minha face.
10 द्राक्षवेलाला तीन फाटे होते. त्या फाट्यांना पाने फुटली व त्यास फुलवरा आला व नंतर त्याच्या घडास पिकलेली द्राक्षे आली.
10 E, na vide, três sarmentos, e ela estava como que brotando; a sua flor saía, e os seus cachos amadureciam em uvas.
11 फारो राजाचा प्याला माझ्या हातात होता. तेव्हा मी ती द्राक्षे घेतली आणि फारोच्या त्या प्याल्यात पिळली आणि द्राक्षरसाचा तो प्याला मी फारोच्या हातात दिला.”
11 E o copo de Faraó estava na minha mão; e eu tomava as uvas, e as espremia no copo de Faraó, e dava o copo na mão de Faraó.
12 योसेफ त्यास म्हणाला, “तुझ्या स्वप्नाचा अर्थ मी तुला उलगडून सांगतो. ते तीन फाटे म्हणजे तीन दिवस आहेत.
12 Então, disse-lhe José: Esta é a sua interpretação: os três sarmentos são três dias;
13 तीन दिवसानी फारो राजा तुझे मस्तक उंचावील व तुला पुन्हा तुझ्या पूर्वीच्या कामावर परत घेईल. तू आतापर्यंत फारोच्या प्यालेबरदाराचे जे काम करीत होतास तेव्हाच्या त्या पहिल्या रीतीप्रमाणे तू फारोचा प्याला त्याच्या हातात देशील.
13 dentro ainda de três dias, Faraó levantará a tua cabeça e te restaurará ao teu estado, e darás o copo de Faraó na sua mão, conforme o costume antigo, quando eras seu copeiro.
14 परंतु तुझे चांगले होईल तेव्हा माझी आठवण कर, व कृपा करून फारोला माझ्यासंबंधी सांगून मला या तुरुंगातून बाहेर काढ.
14 Porém lembra-te de mim, quando te for bem; e rogo-te que uses comigo de compaixão, e que faças menção de mim a Faraó, e faze-me sair desta casa;
15 कारण मला माझ्या इब्री लोकांच्या देशातून येथे पळवून आणले आहे. मी येथे तुरुंगात रहावे असा कोणाचा काहीच अपराध मी केला नाही.”
15 porque, de fato, fui roubado da terra dos hebreus; e tampouco aqui nada tenho feito, para que me pusessem nesta cova.
16 स्वप्नाचा अर्थ चांगला आहे हे पाहून मुख्य आचाऱ्याने योसेफाला म्हटले, “मलाही एक स्वप्न पडले. आणि पाहा, माझ्या डोक्यावर भाकरीच्या तीन टोपल्या होत्या.
16 Vendo, então, o padeiro-mor que tinha interpretado bem, disse a José: Eu também sonhava, e eis que três cestos brancos estavam sobre a minha cabeça;
17 सगळ्यात वरच्या टोपलीत फारो राजासाठी भट्टीत भाजलेली सर्व प्रकारची पक्वान्ने होती, परंतु माझ्या डोक्यावरील त्या टोपलीतील पदार्थ पक्षी खात होते.”
17 e, no cesto mais alto, havia de todos os manjares de Faraó, obra de padeiro; e as aves os comiam do cesto de sobre a minha cabeça.
18 योसेफाने उत्तर दिले, “तुझ्या स्वप्नाचा अर्थ मी उलगडून सांगतो, त्या तीन टोपल्या म्हणजे तीन दिवस आहेत.
18 Então, respondeu José e disse: Esta é a sua interpretação: os três cestos são três dias;
19 तीन दिवसात फारो राजा तुझे शीर वर करून उडवून टाकील आणि तुला झाडाला टांगील आणि पक्षी तुझे मांस तोडून खातील.”
19 dentro ainda de três dias, Faraó levantará a tua cabeça sobre ti e te pendurará num madeiro, e as aves comerão a tua carne de sobre ti.
20 तीन दिवसानंतर फारो राजाचा वाढदिवस होता. तेव्हा त्याने आपल्या सर्व सेवकवर्गाला एक मेजवानी दिली. त्या वेळी त्याने त्याचा आचारी आणि प्यालेबरदाराकडे त्याच्या इतर सेवकांपेक्षा अधिक लक्ष दिले.
20 E aconteceu, ao terceiro dia, o dia do nascimento de Faraó, que fez um banquete a todos os seus servos; e levantou a cabeça do copeiro-mor e a cabeça do padeiro-mor, no meio dos seus servos.
21 त्याने प्यालेबरदाराची सुटका केली व त्यास पुन्हा पूर्वीप्रमाणे त्याच्या कामावर ठेवले; आणि प्यालेबरदाराने पुन्हा एकदा प्याला फारो राजाच्या हातात दिला.
21 E fez tornar o copeiro-mor ao seu ofício de copeiro, e este deu o copo na mão de Faraó.
22 परंतु, योसेफाने अर्थ सांगितला होता त्याप्रमाणेच त्याने आचाऱ्याला फाशी दिली.
22 Mas ao padeiro-mor enforcou, como José havia interpretado.
23 पण त्या प्यालेबरदाराला योसेफाची आठवण राहिली नाही. त्यास त्याचा विसर पडला.
23 O copeiro-mor, porém, não se lembrou de José; antes, se esqueceu dele.

Ler em outra tradução

Comparar com outra

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Gênesis 40, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.