Gênesis 16

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (MAR) vs VC

Sair da comparação
VC Versão Católica
1 अब्रामाला आपली पत्नी साराय हिच्यापासून मूल झाले नाही, परंतु तिची एक मिसरी दासी होती, जिचे नाव हागार होते.
1 Sarai, mulher de Abrão, não lhe tinha dado filho; mas, possuindo uma escrava egípcia, chamada Agar,
2 साराय अब्रामाला म्हणाली, “परमेश्वराने मला मुले होण्यापासून वंचित ठेवले आहे. तेव्हा तुम्ही माझ्या दासीपाशी जा. कदाचित तिच्यापासून मला मुले मिळतील.” अब्रामाने आपली पत्नी साराय हिचे म्हणणे मान्य केले.
2 disse a Abrão: "Eis que o Senhor me fez estéril; rogo-te que tomes a minha escrava, para ver se, ao menos por ela, eu posso ter filhos." Abrão aceitou a proposta de Sarai.
3 अब्राम कनान देशात दहा वर्षे राहिल्यानंतर, अब्रामाची पत्नी साराय हिने आपली मिसरी दासी हागार ही, आपला पती अब्राम याला पत्नी म्हणून दिली.
3 Sarai tomou, pois, sua escrava, Agar, a egípcia, passado dez anos que Abrão habitava a terra de Canaã, e deu-a por mulher a Abrão, seu marido.
4 त्याने हागार सोबत शरीरसंबंध केले, आणि अब्रामापासून ती गरोदर राहिली. आणि जेव्हा तिने पाहिले की आपण गरोदर आहोत, तेव्हा ती आपल्या मालकीणीकडे तिरस्काराने पाहू लागली.
4 Este aproximou-se de Agar e ela concebeu. Agar, vendo que tinha concebido, começou a desprezar a sua senhora.
5 नंतर साराय अब्रामाला म्हणाली, “माझ्यावरचा अन्याय तुमच्यावर असो. मी आपली दासी तुम्हास दिली, आणि आपण गरोदर आहो हे लक्षात आल्यावर, मी तिच्या दृष्टीने तुच्छ झाले. परमेश्वर तुमच्यामध्ये व माझ्यामध्ये न्याय करो.”
5 Então Sarai disse a Abrão: "Caia sobre ti o ultraje que me é feito! Dei-te minha escrava, e ela, desde que concebeu, olha-me com desprezo. O Senhor seja juiz entre mim e ti!"
6 परंतु अब्राम सारायला म्हणाला, “तू हागारेची मालकीण आहेस, तुला काय पाहिजे तसे तू तिचे कर.” तेव्हा साराय तिच्याबरोबर निष्ठुरपणे वागू लागली म्हणून हागार तिला सोडून पळून गेली.
6 Abrão respondeu-lhe: "Tua escrava está em teu poder, faze dela o que quiseres." E Sarai maltratou-a de tal forma que ela teve de fugir.
7 शूर गावाच्या वाटेवर वाळवंटातील एका पाण्याच्या झऱ्याजवळ हागार परमेश्वराच्या एका देवदूताला आढळली.
7 O anjo do Senhor, encontrando-a no deserto junto de uma fonte que está no caminho de Sur,
8 देवदूत तिला म्हणाला, “सारायचे दासी हागारे, तू येथे का आलीस? तू कोठे जात आहेस?” हागार म्हणाली, “माझी मालकीण साराय हिच्यापासून मी पळून जात आहे.”
8 disse-lhe: "Agar, escrava de Sarai, donde vens? E para onde vais?" "Eu fujo de Sarai, minha senhora", respondeu ela.
9 परमेश्वराचा दूत तिला म्हणाला, “तू आपल्या मालकिणीकडे परत जा आणि तिच्या अधिकारात तिच्या अधीनतेत राहा.”
9 "Volta para a tua senhora, tornou o anjo do Senhor, e humilha-te diante dela."
10 परमेश्वराचा दूत तिला आणखी म्हणाला, “तुझी संतती मी इतकी बहुगुणित करीन, की ती मोजणे शक्य होणार नाही.”
10 E ajuntou: "Multiplicarei tua posteridade de tal forma, e será tão numerosa, que não se poderá contar."
11 परमेश्वराचा दूत तिला असे सुद्धा म्हणाला, “तू आता गरोदर आहेस आणि तुला मुलगा होईल त्याचे नाव तू इश्माएल म्हणजे परमेश्वर ऐकतो असे ठेव, कारण प्रभूने तुझ्या दुःखाविषयी ऐकले आहे.
11 Disse ainda mais: "Estás grávida, e vais dar à luz um filho: dar-te-ás o nome de Ismael, porque o Senhor te ouviu na tua aflição.
12 इश्माएल जंगली गाढवासारखा मनुष्य असेल. तो सर्वांविरूद्ध असेल आणि सर्व लोक त्याच्या विरूद्ध असतील, आणि तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपल्या भावांच्यापासून वेगळा राहील.”
12 Este menino será como um jumento bravo: sua mão se levantará contra todos e a mão de todos contra ele, e levantará sua tenda defronte de todos os seus irmãos."
13 नंतर तिच्याशी बोलणारा जो परमेश्वर त्याचे नाव, “तू पाहणारा देव आहेस,” असे तिने ठेवले, कारण ती म्हणाली, “जो मला पाहतो त्यास मी येथेही मागून पाहिले काय?”
13 Agar deu ao Senhor, que lhe tinha falado, o nome: Vós sois El-roí, "porque, dizia ela, não vi eu aqui mesmo o Deus que me via?"
14 तेव्हा तेथील विहिरीला बैर-लहाय-रोई असे नाव पडले; पाहा, ती कादेश व बेरेद यांच्या दरम्यान आहे.
14 E por isso deu-se àquele poço o nome de poço Lahai-roí; ele se encontra entre Cadés e Barad.
15 हागारेने अब्रामाच्या पुत्राला जन्म दिला, आणि ज्याला हगारेने जन्म दिला त्या त्याच्या पुत्राचे नाव अब्रामाने इश्माएल ठेवले.
15 Agar deu à luz um filho a Abrão, o qual lhe pôs o nome de Ismael.
16 हागारेला अब्रामापासून इश्माएल झाला तेव्हा अब्राम शहाऐंशी वर्षांचा होता.
16 Abrão tinha a idade de oitenta e seis anos quando Agar lhe deu à luz Ismael.

Ler em outra tradução

Comparar com outra

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Gênesis 16, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.