Gálatas 4

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (MAR) vs ARA

Sair da comparação
ARA Almeida Revista e Atualizada 1993
1 आता मी म्हणतो की, वारीस लहान बाळ आहे, तोपर्यंत तो सर्वांचा धनी असूनही त्याच्यामध्ये व दासामध्ये काही फरक नसतो.
1 Digo, pois, que, durante o tempo em que o herdeiro é menor, em nada difere de escravo, posto que é ele senhor de tudo.
2 पण पित्याने ठरवलेल्या मुदतीपर्यंत तो शिक्षकांच्या व कारभाऱ्याच्या स्वाधीन असतो.
2 Mas está sob tutores e curadores até ao tempo predeterminado pelo pai.
3 अशाप्रकारे आपणदेखील बाळ असताना, आपण जगाच्या प्राथमिक शिक्षणाच्या दास्यात होतो.
3 Assim, também nós, quando éramos menores, estávamos servilmente sujeitos aos rudimentos do mundo;
4 पण काळाची पूर्णता झाली तेव्हा देवाने आपल्या पुत्राला पाठवले; तो स्त्रीपासून जन्मास आला, नियमशास्त्राधीन असा जन्मास आला,
4 vindo, porém, a plenitude do tempo, Deus enviou seu Filho, nascido de mulher, nascido sob a lei,
5 ह्यात उद्देश हा होता की, नियमशास्त्राखाली असलेल्यांना त्याने खंडणी भरून सोडवावे; म्हणजे आपल्याला पुत्र होण्याचा हक्क मिळावा.
5 para resgatar os que estavam sob a lei, a fim de que recebêssemos a adoção de filhos.
6 आणि तुम्ही पुत्र आहात म्हणून, देवाने अब्बा-पिता, अशी हाक मारणाऱ्या आपल्या पुत्राच्या आत्म्याला तुमच्याआमच्या अंतःकरणात पाठवले आहे;
6 E, porque vós sois filhos, enviou Deus ao nosso coração o Espírito de seu Filho, que clama: Aba, Pai!
7 म्हणून तू आतापासून दास नाही तर पुत्र आहेस; आणि पुत्र आहेस, तर देवाच्याद्वारे वारीसही आहेस.
7 De sorte que já não és escravo, porém filho; e, sendo filho, também herdeiro por Deus.
8 तथापि पूर्वी तुम्ही देवाला ओळखीत नव्हता, तेव्हा, जे स्वभावतः देव नाहीत त्यांचे दास होता;
8 Outrora, porém, não conhecendo a Deus, servíeis a deuses que, por natureza, não o são;
9 पण आता तुम्ही देवाला ओळखीत असताना किंवा देव तुम्हास ओळखीत असताना तुम्ही त्या दुर्बळ व निःसत्व प्राथमिक शिक्षणाकडे पुन्हा कसे परत जाता? आणि पुन्हा त्यांच्या दास्यात राहण्याची इच्छा करता?
9 mas agora que conheceis a Deus ou, antes, sendo conhecidos por Deus, como estais voltando, outra vez, aos rudimentos fracos e pobres, aos quais, de novo, quereis ainda escravizar-vos?
10 तुम्ही दिवस, महिने, ऋतू आणि वर्षे पाळता.
10 Guardais dias, e meses, e tempos, e anos.
11 तुमच्यासाठी मी केलेले श्रम कदाचित व्यर्थ झाले असतील, अशी मला तुमच्याविषयी भीती वाटते.
11 Receio de vós tenha eu trabalhado em vão para convosco.
12 बंधूंनो, मी तुम्हास विनवणी करतो की, तुम्ही माझ्यासारखे व्हा, कारण मीही तुमच्यासारखा होतो. तुम्ही माझे काहीच वाईट केले नाही.
12 Sede qual eu sou; pois também eu sou como vós. Irmãos, assim vos suplico. Em nada me ofendestes.
13 प्रथम तुम्हास शुभवर्तमान सांगण्याचा पहिला प्रसंग मला माझ्या शारीरीक व्याधीमुळे मिळाला हे तुम्हास माहित आहे.
13 E vós sabeis que vos preguei o evangelho a primeira vez por causa de uma enfermidade física.
14 आणि माझ्या देहाच्या अशक्तपणात तुमची परीक्षा होत असता, तुम्ही तिरस्कार केला नाही पण माझा देवाच्या दूतासारखा, ख्रिस्त येशूसारखा स्वीकार केला.
14 E, posto que a minha enfermidade na carne vos foi uma tentação, contudo, não me revelastes desprezo nem desgosto; antes, me recebestes como anjo de Deus, como o próprio Cristo Jesus.
15 तर तेव्हाचा तुमचा तो आशीर्वाद कोठे आहे? कारण, मी तुमच्याविषयी साक्ष देतो की, शक्य असते तर तुम्ही मला तुमचे स्वतःचे डोळे काढून दिले असते.
15 Que é feito, pois, da vossa exultação? Pois vos dou testemunho de que, se possível fora, teríeis arrancado os próprios olhos para mos dar.
16 मग मी तुम्हास खरे सांगतो म्हणून मी तुमचा वैरी झालो आहे काय?
16 Tornei-me, porventura, vosso inimigo, por vos dizer a verdade?
17 ते लोक तुमच्याविषयी आवेशी आहेत तरी चांगल्या प्रकारे नाही पण तुम्ही त्यांच्याविषयी आवेशी असावे म्हणून ते तुम्हास आमच्यापासून वेगळे करू पाहतात.
17 Os que vos obsequiam não o fazem sinceramente, mas querem afastar-vos de mim, para que o vosso zelo seja em favor deles.
18 तर चांगल्या कारणांसाठी सर्वदा आवेशी असणे हे चांगले आणि मी तुम्हाजवळ प्रत्यक्ष आहे तेव्हाच मात्र आवेशी असावे असे नाही.
18 É bom ser sempre zeloso pelo bem e não apenas quando estou presente convosco,
19 माझ्या मुलांनो, तुमच्यात ख्रिस्ताचे रूप निर्माण होईपर्यंत मला तुमच्यासाठी पुन्हा प्रसूती वेदना होत आहेत.
19 meus filhos, por quem, de novo, sofro as dores de parto, até ser Cristo formado em vós;
20 ह्यावेळी मी तुमच्याबरोबर हजर असतो आणि आवाज चढवून बोलता आले असते तर मला बरे वाटले असते कारण तुमच्याविषयी मी संशयात आहे.
20 pudera eu estar presente, agora, convosco e falar-vos em outro tom de voz; porque me vejo perplexo a vosso respeito.
21 जे तुम्ही नियमशास्त्राधीन व्हावयास पाहता ते तुम्ही नियमशास्त्र ऐकत नाही काय? हे मला सांगा.
21 Dizei-me vós, os que quereis estar sob a lei: acaso, não ouvis a lei?
22 कारण पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की, अब्राहामाला दोन पुत्र होतेः एक दासीपासून व एक स्वतंत्र स्त्रीपासून झालेला.
22 Pois está escrito que Abraão teve dois filhos, um da mulher escrava e outro da livre.
23 पण दासीपासून झालेला देहस्वभावानुसार जन्माला आला होता; तर स्वतंत्र स्त्रीपासून झालेला वचनामुळे जन्मला.
23 Mas o da escrava nasceu segundo a carne; o da livre, mediante a promessa.
24 या गोष्टी दृष्टांतरूपाने समजावल्या जावू शकतात. त्या स्त्रिया दोन करारासारख्या आहेत एक सीनाय पर्वतावरून केलेला व दास्यासाठी मुलांना जन्म देणारा करार म्हणजे हागार होय.
24 Estas coisas são alegóricas; porque estas mulheres são duas alianças; uma, na verdade, se refere ao monte Sinai, que gera para escravidão; esta é Agar.
25 कारण ही हागार अरबस्तानातील सीनाय पर्वत आहे आणि ती आत्ताच्या यरूशलेमेच्या जोडीची आहे. आपल्या मुलांबाळांसह दास्यात आहे.
25 Ora, Agar é o monte Sinai, na Arábia, e corresponde à Jerusalém atual, que está em escravidão com seus filhos.
26 नवीन वरील यरूशलेम स्वतंत्र आहे; ही आपल्या सर्वांची आई आहे.
26 Mas a Jerusalém lá de cima é livre, a qual é nossa mãe;
27 पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की, “अगे वंध्ये, तुला मूल होत नसले तरी, तू आनंदित हो! ज्या तुला प्रसूतिवेदना होत नाही, ती तू आनंदाने जयघोष कर! आनंदाची आरोळी मार! कारण जिला पती आहे तिच्या मुलांपेक्षा, आशा सोडलेल्या स्त्रीची मुले अधिक आहेत.”
27 porque está escrito: Alegra-te, ó estéril, que não dás à luz, exulta e clama, tu que não estás de parto; porque são mais numerosos os filhos da abandonada que os da que tem marido.
28 आता बंधूनो, इसहाकासारखे तुम्ही अभिवचनाची संतती आहात.
28 Vós, porém, irmãos, sois filhos da promessa, como Isaque.
29 परंतु त्यावेळेस देहस्वभावानुसार जो जन्मला होता, त्याने जो आत्म्यानुसार जन्मलेल्या मुलाचा छळ केला, तसा आताही होत आहे.
29 Como, porém, outrora, o que nascera segundo a carne perseguia ao que nasceu segundo o Espírito, assim também agora.
30 पण शास्त्रलेख काय सांगतो? ‘तू त्या दासीला व तिच्या मुलाला घालवून दे; कारण दासीचा मुलगा स्वतंत्र स्त्रीच्या मुलाबरोबर वारीस होणारच नाही.’
30 Contudo, que diz a Escritura? Lança fora a escrava e seu filho, porque de modo algum o filho da escrava será herdeiro com o filho da livre.
31 तर मग, बंधूंनो, आपण दासीची मुले नाही, पण स्वतंत्र स्त्रीची मुले आहोत.
31 E, assim, irmãos, somos filhos não da escrava, e sim da livre.

Ler em outra tradução

Comparar com outra

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Gálatas 4, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.