Ezequiel 36

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (MAR) vs ARC

Sair da comparação
ARC Almeida Revista e Corrigida 2009
1 आता मानवाच्या मुला, तू इस्राएलाच्या पर्वताला भविष्य सांग आणि म्हण, इस्राएलामधील पर्वतांनो, परमेश्वराचे वचन ऐका.
1 E tu, ó filho do homem, profetiza aos montes de Israel e dize: Montes de Israel, ouvi a palavra do Senhor .
2 प्रभू परमेश्वर असे म्हणतो, कारण शत्रू तुमच्याविषयी म्हणतात की, अहा! आणि प्राचीन उंच ठिकाणे आमची मालमत्ता झाली आहे.
2 Assim diz o Senhor Jeová : Pois que diz o inimigo sobre vós: Ah! Ah! Até as eternas alturas serão nossa herança;
3 “म्हणून तू भविष्य सांग आणि म्हण, प्रभू परमेश्वर म्हणतो, ‘कारण त्यांनी तुमचा नाश केला आणि तुम्ही उरलेल्या राष्ट्रांना वतन व्हावे म्हणून त्यांनी सर्व बाजूंनी तुमच्यावर हल्ला केला आहे. तुम्ही लोकांच्या तोंडी व जिभेने व गोष्टीचा निंदेचा विषय असे झाले आहात.”
3 portanto, profetiza e dize: Assim diz o Senhor Jeová : Visto que vos assolaram e devoraram em redor, para que ficásseis feitos herança do resto das nações, e andais em lábios paroleiros e na infâmia do povo,
4 म्हणून, इस्राएलाच्या पर्वतांनो, प्रभू परमेश्वराचे वचन ऐका. प्रभू परमेश्वर पर्वत, व उंच टेकड्या, झरे, व दऱ्या उजाड आणि सोडून दिलेली नगरे यांना असे सांगतो की,
4 portanto, ouvi, ó montes de Israel, a palavra do Senhor Jeová : Assim diz o Senhor Jeová aos montes e aos outeiros, às correntes e aos vales, aos lugares assolados e solitários e às cidades desamparadas, que se tornaram rapina e escárnio para o resto das nações que estão ao redor delas.
5 “यास्तव प्रभू परमेश्वर म्हणतो की, खचित मी आपल्या आवेशाच्या अग्नीने पेटून उरलेल्या राष्ट्रांविषयी व अदोमाविषयी बोललो आहे. त्यांनी माझ्या देशाला लुटून रिकामे करावे म्हणून त्यांनी उल्लासीत हृदयाने, त्यांच्या मनातील तिरस्काराने, त्यांच्या कुरणासाठी घेतली.”
5 Portanto, assim diz o Senhor Jeová : Certamente, no fogo do meu zelo, falei contra o resto das nações e contra todo o Edom. Eles se apropriaram da minha terra, com alegria de todo o coração e com menosprezo de alma, para ser lançada à rapina.
6 “म्हणून, इस्राएल देशाला भविष्य सांग, आणि पर्वत, व टेकड्या, झरे आणि दऱ्या ह्यांच्याशी बोल. प्रभू परमेश्वर असे म्हणतो, पाहा! मी आपल्या आवेशाने आणि रागाने बोललो आहे. कारण, तुम्हास राष्ट्रांकडून अपमान सहन करावा लागला.”
6 Portanto, profetiza sobre a terra de Israel e dize aos montes, e aos outeiros, e às correntes, e aos vales: Assim diz o Senhor Jeová : Eis que falei no meu zelo e no meu furor, porque levastes sobre vós o opróbrio dos gentios.
7 म्हणून, प्रभू परमेश्वर, म्हणतो, “मी आपला हात उंचावून वचन देतो की, तुमच्या भोवतालची राष्ट्रे खचित अप्रतिष्ठा पावतील.”
7 Portanto, assim diz o Senhor Jeová : Eu levantei a mão, para que os gentios que estão ao redor de vós levem o seu opróbrio sobre si mesmos.
8 “पण इस्राएलाच्या पर्वतांनो, तुम्हावरील झाडास फांद्या फुटून तुम्ही माझ्या इस्राएल लोकांसाठी फळे द्याल असे लवकरच घडून येईल.
8 Mas vós, ó montes de Israel, vós produzireis os vossos ramos e dareis o vosso fruto para o meu povo de Israel; porque estão prestes a vir.
9 कारण पाहा, मी तुम्हास अनुकूल आहे, आणि मी तुम्हाकडे वळेल, मग तुम्ही मशागत केलेले, व बी पेरलेले व्हाल.
9 Porque eis que eu estou convosco; e eu me voltarei para vós, e sereis lavrados e semeados.
10 म्हणून मी तुम्हावर मनुष्याची, इस्राएलाचे सर्व घराणे, ते सर्वच बहुतपट करीन, आणि नगरे वसतील आणि ओसाड झालेली ठिकाणे पुन्हा उभारली जातील.
10 E multiplicarei homens sobre vós, a toda a casa de Israel, sim, a toda ela; e as cidades serão habitadas, e os lugares devastados serão edificados.
11 मनुष्य व पशू यांना बहुतपट करीन आणि ते वाढतील व फळ देणारे होतील; पूर्वीच्याप्रमाणे लोक राहू लागतील. आणि तुमच्या पूर्वदिवसात केले त्यापेक्षा तुमचे मी अधिक कल्याण करीन मग तुम्हास समजेल की मी परमेश्वर आहे.
11 E multiplicarei homens e animais sobre vós; e eles se multiplicarão e frutificarão; e vos farei habitar como dantes e farei vosso estado melhor que nos vossos princípios; e sabereis que eu sou o Senhor .
12 मी मनुष्ये, म्हणजे माझे इस्राएल लोक आणीन, ते तुमच्यावर चालतील असे मी करीन. ते तुझा ताबा घेतील आणि तू त्यांचे वतन होशील, आणि तू त्यांच्या मुलांच्या मरणाचे कारण होणार नाहीस.”
12 E farei andar sobre vós os homens, o meu povo de Israel; eles te possuirão, e serás a sua herança e nunca mais os desfilharás.
13 प्रभू परमेश्वर असे म्हणतो, कारण लोक तुम्हास म्हणतात, “तू लोकांस खाणारा देश आहेस, आणि तुझ्या देशाची मुले मरत आहेत.
13 Assim diz o Senhor Jeová : Visto como vos dizem: Tu és uma terra que devora os homens e és uma terra que desfilha os seus povos;
14 यास्तव यापुढे तू लोकांस खाणार नाहीस, आणि पुन्हा तू आपल्या राष्ट्राला त्यांच्या मृत्यूचा शोक करण्यास लावणार नाहीस.” असे प्रभू परमेश्वर म्हणतो.
14 por isso, tu não devorarás mais os homens, nem desfilharás mais os teus povos, diz o Senhor Jeová .
15 “किंवा यापुढे मी तुला पुन्हा राष्ट्रांचा अपमान ऐकू देणार नाही. तुला लोकांची निंदा पुन्हा सहन करावी लागणार नाही किंवा तुझ्या राष्ट्रास पडू देणार नाहीस.” असे प्रभू परमेश्वर, म्हणतो.
15 E farei que nunca mais se ouça em ti a afronta dos gentios; e não levarás mais sobre ti o opróbrio das nações, nem mais desfilharás a tua nação, diz o Senhor Jeová .
16 मग परमेश्वराचे वचन मजकडे आले व म्हणाले,
16 E veio a mim a palavra do Senhor , dizendo:
17 “मानवाच्या मुला, इस्राएलाचे घराणे त्यांच्या देशात वस्ती करून राहिले तेव्हा त्यांनी आपल्या मार्गाने व कृत्यांनी तो देश भ्रष्ट केला. त्यांचे मार्ग माझ्यापुढे रजस्रावी स्त्रीच्या विटाळाप्रमाणे आहेत.
17 Filho do homem, quando a casa de Israel habitava na sua terra, então, a contaminaram com os seus caminhos e com as suas ações; como a imundícia de uma mulher em sua separação, tal era o seu caminho perante o meu rosto.
18 म्हणून त्यांनी जे रक्त भूमीवर पाडले होते त्यामुळे, आणि त्यांनी आपल्या मूर्तींनी तिला अशुद्ध केले होते त्यामुळे मी आपला क्रोध त्यांच्यावर ओतला.
18 Derramei, pois, o meu furor sobre eles, por causa do sangue que derramaram sobre a terra e dos seus ídolos com que a contaminaram.
19 मी त्यांना राष्ट्रांमध्ये पसरविले आणि सर्व देशात विखरुन टाकले. मी त्यांच्या मार्गाप्रमाणे व त्यांच्या कृत्याप्रमाणे न्याय केला.
19 E os espalhei entre as nações, e foram espalhados pelas terras; conforme os seus caminhos e conforme os seus feitos, eu os julguei.
20 मग ते त्या दुसऱ्या राष्ट्रांत गेले आणि ते जेथे कोठे गेले, तेथेही त्यांनी माझे पवित्र नाव भ्रष्ट केले, तेव्हा लोक त्यांना म्हणाले, हे खरेच परमेश्वराचे लोक आहेत का? कारण त्यांना त्याच्या देशातून बाहेर फेकून दिले आहे.
20 E, chegando às nações para onde foram, profanaram o meu santo nome, pois se dizia deles: Estes são o povo do Senhor e saíram da sua terra.
21 पण इस्राएल घराणे ज्या ज्या राष्ट्रात गेले त्यांनी माझे पवित्र नाव भ्रष्ट केले. तेव्हा मी आपल्या नावास जपलो.
21 Mas eu os poupei por amor do meu santo nome, que a casa de Israel profanou entre as nações para onde foi.
22 म्हणून इस्राएलाच्या घराण्यास सांग की, प्रभू परमेश्वर असे म्हणतो, इस्राएल घराण्यांनो, मी हे तुमच्यासाठी करत नाही, तुम्ही जेथे जेथे गेलात, तेथे तेथे तुम्ही माझे पवित्र नाव भ्रष्ट केलेत त्याकरता मी हे करत आहे.
22 Dize, portanto, à casa de Israel: Assim diz o Senhor Jeová : Não é por vosso respeito que eu faço isto, ó casa de Israel, mas pelo meu santo nome, que profanaste entre as nações para onde vós fostes.
23 कारण तुम्ही माझ्या महान नावास राष्ट्रांमध्ये भ्रष्ट केल्यामुळे त्या राष्ट्रांनी अपवित्र मानले, ती ते पवित्र मानतील असे मी करीन आणि त्या राष्ट्राच्या देखत तुमच्या ठायी मला पवित्र मानतील तेव्हा राष्ट्रास समजेल की, मी प्रभू परमेश्वर आहे.
23 E eu santificarei o meu grande nome, que foi profanado entre as nações, o qual profanastes no meio delas; e as nações saberão que eu sou o Senhor , diz o Senhor Jeová , quando eu for santificado aos seus olhos.
24 मी तुम्हास त्या राष्ट्रांतून काढून घेईन आणि तुम्हास प्रत्येक देशातून गोळा करीन व तुम्हास तुमच्या देशात आणीन.
24 E vos tomarei dentre as nações, e vos congregarei de todos os países, e vos trarei para a vossa terra.
25 मग तुमच्यावर शुद्ध पाणी शिंपडेल तेव्हा तुम्ही तुमच्या सर्व अशुद्धतेपासून तुम्ही शुद्ध व्हाल. आणि मी तुम्हास तुमच्या सर्व मूर्तीपासून शुद्ध करीन.
25 Então, espalharei água pura sobre vós, e ficareis purificados; de todas as vossas imundícias e de todos os vossos ídolos vos purificarei.
26 मी तुम्हास नवीन हृदय देईन, तुमच्या ठायी नवीन आत्मा घालीन; तुमच्या देहातून पाषाणमय हृदय काढून टाकीन व तुम्हास मांसमय हृदय देईन.
26 E vos darei um coração novo e porei dentro de vós um espírito novo; e tirarei o coração de pedra da vossa carne e vos darei um coração de carne.
27 मी तुमच्या ठायी माझा आत्मा घालीन. आणि तुम्ही माझ्या नियमांनी चालाल. माझे निर्णय पाळून त्याप्रमाणे आचरण कराल, असे मी करीन.
27 E porei dentro de vós o meu espírito e farei que andeis nos meus estatutos, e guardeis os meus juízos, e os observeis.
28 मग तुम्ही, मी तुमच्या पूर्वजांना दिलेल्या, देशात रहाल. तुम्ही माझे लोक व्हाल व मी तुमचा देव होईन.
28 E habitareis na terra que eu dei a vossos pais, e vós me sereis por povo, e eu vos serei por Deus.
29 कारण मी तुम्हास तुमच्या सर्व अशुद्धेतेपासून वाचवीन. मी धान्यावर हुकूम करून त्याची विपुलता करीन. मी तुमच्यावर दुष्काळ पडू देणार नाही.
29 E vos livrarei de todas as vossas imundícias; e chamarei o trigo, e o multiplicarei, e não trarei fome sobre vós.
30 मी झाडाचे फळ आणि शेतांचे उत्पादन वाढवीन याकरिता की, राष्ट्रांमध्ये तुम्हास दुष्काळामुळे होणारी निंदा सहन करावी लागणार नाही.
30 E multiplicarei o fruto das árvores e a novidade do campo, para que nunca mais recebais o opróbrio da fome entre as nações.
31 मग तुम्ही तुमच्या वाईट मार्गाचे आणि जी तुमची कृत्ये चांगली नव्हती त्यांचा विचार कराल, तेव्हा तुम्ही आपल्या पापाबद्दल आणि घृणीत कृत्यांबद्दल स्वत:चाच द्वेष कराल.
31 Então, vos lembrareis dos vossos maus caminhos e dos vossos feitos, que não foram bons; e tereis nojo em vós mesmos das vossas maldades e das vossas abominações.
32 प्रभू परमेश्वर असे म्हणतो, मी तुमच्याकरिता हे करत नाही, हे तुम्हास माहित असू द्या. म्हणून इस्राएलाच्या घराण्यांनो, तुम्ही आपल्या मार्गाविषयी लज्जित व फजीत व्हा.
32 Não é por amor de vós que eu faço isso, diz o Senhor Jeová ; notório vos seja: envergonhai-vos e confundi-vos pelos vossos caminhos, ó casa de Israel.
33 प्रभू परमेश्वर असे म्हणतो, मी तुम्हास तुमच्या सर्व अन्यायापासून शुद्ध करीन त्या दिवशी मी नगरे वसवीन आणि उजाड स्थाने बांधण्यात येतील.
33 Assim diz o Senhor Jeová : No dia em que eu vos purificar de todas as vossas maldades, então, farei com que sejam habitadas as cidades e sejam edificados os lugares devastados.
34 कारण जी भूमी, तिच्या जवळून जाणाऱ्या सर्वांना, ओसाड दिसत होती, ती ओसाड जमीन मशागत केल्याप्रमाणे दिसेल.
34 E a terra assolada se lavrará, em vez de estar assolada aos olhos de todos os que passam.
35 ते म्हणतील, ‘ही जी जमीन ओसाड होती ती आता एदेन बागेसारखी झाली आहे. जी नगरे ओसाड व उजाड व दुर्गम झाली होती ती आता तटबंदीची होऊन वसली आहेत.
35 E dirão: Esta terra assolada ficou como jardim do Éden; e as cidades solitárias, e assoladas, e destruídas estão fortalecidas e habitadas.
36 मग तुमच्या सभोवतालच्या राष्ट्रांना समजेल की, मी परमेश्वर आहे आणि मीच नष्ट झालेली ठिकाणे बांधून काढोत व ओसाड जमिनीत मी लागवड केली. मी परमेश्वर आहे. मी हे बोललो व ते मी करीनच.
36 Então, saberão as nações que ficarem de resto em redor de vós que eu, o Senhor , tenho reedificado as cidades destruídas e plantado o que estava devastado; eu, o Senhor , o disse e o farei.
37 प्रभू परमेश्वर असे म्हणतो, मी हे त्यांच्यासाठी करावे म्हणून इस्राएलाच्या घराण्याकडून पुन्हा मागणी होईल; कळपाप्रमाणे मी त्यामध्ये लोकांची वाढ करीन.
37 Assim diz o Senhor Jeová : Ainda por isso me pedirá a casa de Israel, que lho faça: multiplicar-lhes-ei os homens, como a um rebanho.
38 पवित्र यज्ञपशूंचा कळप, यरूशलेमेतील सणाचा कळप असतात त्याप्रमाणे ओसाड नगरे लोकांच्या कळपांनी भरून जातील; मग त्यांना समजेल की मी परमेश्वर आहे.”
38 Como o rebanho santificado, como o rebanho de Jerusalém nas suas solenidades, assim as cidades desertas se encherão de famílias; e saberão que eu sou o Senhor .

Ler em outra tradução

Comparar com outra

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Ezequiel 36, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.