Ezequiel 34
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (MAR) vs ARIB
1 मग परमेश्वराचे वचन मजकडे आले आणि म्हणाले,
1 Veio a mim a palavra do Senhor, dizendo:
2 “मानवाच्या मुला, इस्राएलाच्या मेंढपाळाविरूद्ध भविष्य सांग! भविष्य सांग आणि त्यांना म्हण, प्रभू परमेश्वर मेंढपाळाविषयी असे म्हणतो, जे इस्राएलाचे मेंढपाळ स्वत:च चरत आहेत त्यास धिक्कार असो! मेंढपाळाने आपल्या कळपाची काळजी घ्यायला नको का?
2 Filho do homem, profetiza contra os pastores de Israel; profetiza, e dize aos pastores: Assim diz o Senhor Deus: Ai dos pastores de Israel que se apascentam a si mesmos! Não devem os pastores apascentar as ovelhas?
3 तुम्ही चरबी खाता आणि लोकरीचे कपडे घालता. तुम्ही कळपातील धष्टपुष्ट मेंढ्या मारता. पण तुम्ही मेंढरांना कधीच चारत नाही.
3 Comeis a gordura, e vos vestis da lã; matais o cevado; mas não apascentais as ovelhas.
4 जे कोणी दुर्बळ होते त्यांना तुम्ही सबळ केले नाही किंवा तुम्ही आजाऱ्यांना बरे केले नाही. तुम्ही जे कोणी मोडले त्यांना पट्टी बांधली नाही. आणि जे घालवून दिलेले त्यास परत आणले नाही किंवा हरवलेल्यास शोधत नाही. त्याऐवजी तुम्ही त्यांच्यावर सक्तीने व जुलमाने राज्य करता.
4 A fraca não fortalecestes, a doente não curastes, a quebrada não ligastes, a desgarrada não tornastes a trazer, e a perdida não buscastes; mas dominais sobre elas com rigor e dureza.
5 मग मेंढपाळ नसल्याने त्यांची पांगापांग झाली आणि त्यांची पांगापाग झाल्यानंतर ते रानातील सर्व जिवंत पशूंचे भक्ष्य बनले.
5 Assim se espalharam, por não haver pastor; e tornaram-se pasto a todas as feras do campo, porquanto se espalharam.
6 माझा कळप सर्व डोंगरांतून व प्रत्येक उंच टेकड्यांवरुन भटकून गेली, पृथ्वीच्या सर्व पाठीवर पांगविली गेली. तरी त्यांना शोधण्यास कोणीही नव्हते.
6 As minhas ovelhas andaram desgarradas por todos os montes, e por todo alto outeiro; sim, as minhas ovelhas andaram espalhadas por toda a face da terra, sem haver quem as procurasse, ou as buscasse.
7 म्हणून, मेंढपाळांनो, परमेश्वराचे म्हणणे ऐका.
7 Portanto, ó pastores, ouvi a palavra do Senhor:
8 प्रभू परमेश्वर असे म्हणतो, जसा मी जिवंत आहे; माझी मेंढरे लुटीस गेली आहेत; कारण तेथे त्यांना मेंढपाळ नव्हता ती वनपशूस भक्ष्य झाली आणि माझ्या मेंढपाळांनी कोणीही कळपाला शोधले नाही परंतु मेंढपाळाने स्वतःची काळजी घेतली आणि माझ्या कळपाला चारले नाही.
8 Vivo eu, diz o Senhor Deus, que porquanto as minhas ovelhas foram entregues à rapina, e as minhas ovelhas vieram a servir de pasto a todas as feras do campo, por falta de pastor, e os meus pastores não procuraram as minhas ovelhas, pois se apascentaram a si mesmos, e não apascentaram as minhas ovelhas;
9 तेव्हा, मेंढपाळांनो, परमेश्वराचे म्हणणे ऐका.
9 portanto, ó pastores, ouvi a palavra do Senhor:
10 प्रभू परमेश्वर असे म्हणतो, पाहा! मी मेंढपाळांच्याविरूद्ध आहे आणि मी माझी मेंढरे त्यांच्या हातातून मागेन. त्यांचे कळप पाळणे मी बंद करीन; मग मेंढपाळ आपणास पुढे पोसणार नाहीत आणि मी आपली मेंढरे त्यांच्यामुखातून सोडवीन, अशासाठी की, माझी मेंढरे त्यांची भक्ष्य अशी होऊ नयेत.
10 Assim diz o Senhor Deus: Eis que eu estou contra os pastores; das suas mãos requererei as minhas ovelhas, e farei que eles deixem de apascentar as ovelhas, de sorte que não se apascentarão mais a si mesmos. Livrarei as minhas ovelhas da sua boca, para que não lhes sirvam mais de pasto.
11 कारण प्रभू परमेश्वर असे म्हणतो, पाहा! मी स्वत:च आपल्या कळपाचा शोध घेईन आणि मी त्यांची काळजी घेईन,
11 Porque assim diz o Senhor Deus: Eis que eu, eu mesmo, procurarei as minhas ovelhas, e as buscarei.
12 जो मेंढपाळ आपल्या पांगलेल्या मेंढ्यांबरोबर राहून त्यास शोधतो, तसाच मी आपली मेंढरे शोधीन आणि आभाळाच्या व अंधकाराच्या दिवशी त्यांची पांगापाग झाली त्या सर्व ठिकाणाहून मी त्यांना सोडवीन.
12 Como o pastor busca o seu rebanho, no dia em que está no meio das suas ovelhas dispersas, assim buscarei as minhas ovelhas. Livrá-las-ei de todos os lugares por onde foram espalhadas, no dia de nuvens e de escuridão.
13 मग मी त्यांना लोकांतून काढून आणीन. देशातून त्यांना एकत्र करीन व त्यांना त्यांच्या भूमीत परत आणीन. मी त्यांना इस्राएलाच्या पर्वताच्याबाजूला, झऱ्यांकाठी आणि लोक राहत असलेल्या सर्व ठिकाणी कुरणात चारीन.
13 Sim, tirá-las-ei para fora dos povos, e as congregarei dos países, e as introduzirei na sua terra, e as apascentarei sobre os montes de Israel, junto às correntes d'água, e em todos os lugares habitados da terra.
14 मी त्यांना चांगल्या कुरणांत ठेवीन. त्यांचे कुरण इस्राएलाच्या डोंगरावरील उंच ठिकाणी होईल; तेथे ती चांगल्या कुरणात पहुडतील. इस्राएलाच्या डोंगरावर ती उत्तम हिरवळीवर त्या चरतील.
14 Em bons pastos as apascentarei, e nos altos montes de Israel será o seu curral; deitar-se-ão ali num bom curral, e pastarão em pastos gordos nos montes de Israel.
15 मी स्वतः माझा कळप चारीन व त्यांना विश्रांती देईन, असे प्रभू परमेश्वर, म्हणतो.
15 Eu mesmo apascentarei as minhas ovelhas, e eu as farei repousar, diz o Senhor Deus.
16 हरवलेल्या मेंढ्यांचा मी शोध घेईन व भटकलेल्यांना मी परत आणीन. जे मोडलेले त्यास मी पट्टी बांधीन आणि रोगी मेंढीस बरे करीन. व मी पुष्ट व बलिष्ट यांना नामशेष करीन. त्यास मी यथान्याय चारीन.
16 A perdida buscarei, e a desgarrada tornarei a trazer; a quebrada ligarei, e a enferma fortalecerei; e a gorda e a forte vigiarei. Apascentá-las-ei com justiça.
17 आणि प्रभू परमेश्वर, असे म्हणतो, तू माझ्या कळपा, पाहा, मी मेंढरामेंढरामध्ये, एडका व बोकड ह्यांच्यात न्यायनिवाडा करीन.
17 Quanto a vós, ó ovelhas minhas, assim diz o Senhor Deus: Eis que eu julgarei entre ovelhas e ovelhas, entre carneiros e bodes.
18 तुम्ही चांगले कुरण खाऊन टाकता उरलेले कुरण तुम्ही आपल्या पायांनी तुडवता आणि तुम्ही स्वच्छ पाणी पिऊन राहिलेले पायांनी गढूळ करता. हे काहीच नाही असे तुम्हास वाटते का?
18 Acaso não vos basta fartar-vos do bom pasto, senão que pisais o resto de vossos pastos aos vossos pés? e beber as águas limpas, senão que sujais o resto com os vossos pés?
19 पण माझी मेंढरे आता तुमच्या पावलांनी, चिरडलेले गवत खातात आणि तुमच्या पायांनी गढूळ झालेले पाणी पितात.
19 E as minhas ovelhas hão de comer o que haveis pisado, e beber o que haveis sujado com os vossos pés.
20 म्हणून, प्रभू परमेश्वर, त्यांना असे म्हणतो, पाहा! मी स्वत: पुष्ट मेंढी आणि बारीक ह्यांच्यात निवाडा करीन.
20 Por isso o Senhor Deus assim lhes diz: Eis que eu, eu mesmo, julgarei entre a ovelha gorda e a ovelha magra.
21 तुम्ही बाजूने व खांद्याने ढकलता. आणि जी सर्व दुर्बळ झालेली त्यांना तुम्ही देशा बाहेर घालवून लावीपर्यंत त्यांना तुम्ही भोसकता,
21 Porquanto com o lado e com o ombro dais empurrões, e com as vossas pontas escorneais todas as fracas, até que as espalhais para fora,
22 म्हणून, मी माझ्या कळपाला वाचवीन. यापुढे त्यांची लूट होणार नाही. आणि मी मेंढ्या-मेंढ्यात न्यायनिवाडा करीन.
22 portanto salvarei as minhas ovelhas, e não servirão mais de presa; e julgarei entre ovelhas e ovelhas.
23 मग मी त्यांच्यावर एक मेंढपाळ नेमीन व तो त्यांना चारील आणि माझा सेवक दावीद, ह्याला मी मेंढपाळ म्हणून नेमीन. तो त्यांस चारील; तो त्यांच्यावर मेंढपाळ होईल.
23 E suscitarei sobre elas um só pastor para as apascentar, o meu servo Davi. Ele as apascentará, e lhes servirá de pastor.
24 कारण मी परमेश्वर त्यांचा देव होईन. व त्यांच्यामध्ये माझा सेवक दावीद त्यामध्ये अधिपती होईल मी परमेश्वर बोललो आहे.
24 E eu, o Senhor, serei o seu Deus, e o meu servo Davi será príncipe no meio delas; eu, o Senhor, o disse.
25 मग मी त्यांच्याबरोबर एक शांततेचा करार करीन आणि दुष्ट वन्य पशू देशातून नाहीसे करीन, मग माझ्या मेंढ्या वाळवंटातही सुरक्षित राहतील आणि रानात झोपतील.
25 Farei com elas um pacto de paz; e removerei da terra os animais ruins, de sorte que elas habitarão em segurança no deserto, e dormirão nos bosques.
26 मग मी त्यास व डोंगराभोवतालच्या स्थानांस आशीर्वाद असे करीन. कारण मी योग्य वेळी पाऊस पाडीन. ते आशीर्वादांचे वर्षाव होतील.
26 E delas e dos lugares ao redor do meu outeiro farei uma bênção; e farei descer a chuva a seu tempo; chuvas de bênçãos serão.
27 नंतर शेतातली झाडे त्यांचे फळ उत्पन्न करतील. आणि पृथ्वी आपला उपज देईल. माझी मेंढरे त्यांच्या देशात सुरक्षित राहतील; मी त्यांच्या जोखडाचे बंधने तोडून ज्यांनी त्यांना आपले दास केले त्यांच्या हातातून सोडवले म्हणजे ते जाणतील की मी परमेश्वर आहे.
27 E as árvores do campo darão o seu fruto, e a terra dará a sua novidade, e estarão seguras na sua terra; saberão que eu sou o Senhor, quando eu quebrar os canzis do seu jugo e as livrar da mão dos que se serviam delas.
28 यापुढे ते राष्ट्रांसाठी लूट असे होणार नाहीत आणि पृथ्वीवरील वनपशू त्यांना खाऊन टाकणार नाहीत. कारण ते सुखरुप राहतील. व कोणीही त्यांना भयभीत करणार नाही.
28 Pois não servirão mais de presa aos gentios, nem as devorarão mais os animais da terra; mas habitarão seguramente, e ninguém haverá que as espante.
29 कारण मी त्यांच्यासाठी नावाजण्याजोगी लागवड करीन, मग त्यांची पुन्हा देशात दुष्काळाने उपासमार होणार नाही. यापुढे राष्ट्रांकडून त्यांना अपमान सहन करावा लागणार नाही.
29 Também lhes levantarei uma plantação de renome, e nunca mais serão consumidas pela fome na terra, nem mais levarão sobre si o opróbrio das nações.
30 मग त्यांना समजून येईल की मीच त्यांचा परमेश्वर देव आहे, व मी त्यांच्याबरोबर आहे, इस्राएलाचे घराणे माझे लोक आहेत, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.
30 Saberão, porém, que eu, o Senhor seu Deus, estou com elas, e que elas são o meu povo, a casa de Israel, diz o Senhor Deus.
31 कारण तुम्ही माझी मेंढरे आहात, माझ्या कुरणातील मेंढरे आहात. आणि माझे लोक! मी तुमचा देव आहे! असे प्रभू परमेश्वर म्हणतो.”
31 Vós, ovelhas minhas, ovelhas do meu pasto, sois homens, e eu sou o vosso Deus, diz o Senhor Deus.
Atalhos do teclado
- Capítulo anterior←
- Próximo capítulo→
- Versículo anteriork
- Próximo versículoj
- Limpar seleçãoEsc
- Esta ajuda?
Estude este capítulo no WhatsApp
Peça à IA da Bíblia Fala para explicar Ezequiel 34, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.