Êxodo 9

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (MAR) vs NTLH

Sair da comparação
NTLH Nova Tradução na Linguagem de Hoje 2000
1 नंतर परमेश्वराने मोशेला फारोकडे जाऊन असे बोलण्यास सांगितले, “इब्र्यांचा देव परमेश्वर म्हणतो, ‘माझी उपासना करण्याकरिता माझ्या लोकांस जाऊ दे.’
1 O Senhor Deus disse a Moisés: — Vá falar com o rei e diga que o
2 जर तू त्यांना जाण्यापासून सतत असाच नाकारीत राहशील व जर तू त्यांना मागे ठेवून घेशील.
2 Pois, se você não deixar e continuar impedindo que ele vá,
3 तर पाहा, घोडे, गाढवे, उंट, गुरेढोरे व शेरडेमेंढरांचे कळप, ही जी तुझी जनावरे रानांत आहेत त्यांच्यावर परमेश्वराचा हात पडेल. भयंकर मरी उद्भवेल.
3 eu o castigarei com uma doença horrível, que atacará todos os seus animais, isto é, os cavalos, os jumentos, os camelos, o gado, as ovelhas e as cabras.
4 परंतु परमेश्वर इस्राएलाची व मिसराची गुरेढोरे यांच्यात भेद करील; इस्राएली लोकांचे एकही जनावर मरणार नाही.”
4 Farei diferença entre os animais dos israelitas e os dos egípcios, e não morrerá nenhum animal dos israelitas.
5 याकरिता परमेश्वराने वेळही नेमलेली आहे. “या देशात उद्या हे सर्व घडून येईल.”
5 Eu, o Senhor , marquei um prazo: farei isso amanhã.”
6 दुसऱ्या दिवशी परमेश्वराने ही गोष्ट केली आणि मिसरमधील सर्व गुरे मरण पावली. परंतु इस्राएल लोकांच्या गुरांपैकी एकही मरण पावले नाही.
6 No dia seguinte o Senhor fez como tinha dito, e todos os animais dos egípcios morreram; porém não morreu nenhum dos animais dos israelitas.
7 फारोने बारकाईने चौकशी केली आणि पाहा, इस्राएल लोकांच्या जनावरांपैकी एकही मरण पावले नव्हते. तरीपण फारोचे मन कठीणच राहिले. त्याने इस्राएल लोकांस जाऊ दिले नाही.
7 O rei mandou ver o que havia acontecido e foi informado de que não havia morrido nenhum animal dos israelitas. Apesar disso o rei continuou teimando e não deixou o povo ir.
8 नंतर परमेश्वर मोशे व अहरोन यांना म्हणाला, “मोशेने ओंजळभर भट्टीची राख घेऊन फारोदेखत आकाशाकडे उधळावी.
8 Então o Senhor Deus disse a Moisés e a Arão: — Peguem punhados de cinza de um forno, e que Moisés jogue essa cinza para o ar diante do rei do Egito.
9 त्या राखेचे बारीक कण सगळ्या मिसरभर पसरतील आणि त्यांच्या स्पर्शाने मनुष्यांना व पशूंना फोड येऊन गळवे येतील.”
9 Ela se espalhará como um pó fino sobre toda a terra do Egito, e em todos os lugares a cinza produzirá tumores que se abrirão em úlceras nas pessoas e nos animais.
10 तेव्हा मोशे व अहरोन यांनी भट्टीतून राख घेतली व ते फारो राजासमोर उभे राहिले. मोशेने ती राख हवेत उधळली आणि त्यामुळे मनुष्यांना व पशूंना फोड व गळवे आले.
10 Assim, Moisés e Arão pegaram cinza e ficaram de pé na frente do rei. Moisés jogou a cinza para cima, e ela produziu tumores, que viraram úlceras nas pessoas e nos animais.
11 गळव्यामुळे जादूगारांना मोशेपुढे उभे राहवेना. कारण जादूगारांना व सर्व मिसरी लोक यांना गळवे आली होती.
11 Os mágicos não puderam aparecer diante de Moisés porque eles e todos os outros egípcios estavam cobertos de tumores.
12 परंतु परमेश्वराने फारोचे मन कठीण केले आणि त्याने मोशे व अहरोन यांचे ऐकले नाही, व लोकांस जाऊ दिले नाही. परमेश्वराने मोशेला असे सांगितलेच होते.
12 Porém o Senhor Deus fez com que o rei continuasse teimando. E, como o Senhor tinha dito a Moisés, o rei não atendeu o pedido de Moisés e Arão.
13 मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “तू पहाटेस उठून फारोपुढे उभा राहा; आणि त्यास सांग की इब्र्यांचा देव परमेश्वर असे म्हणतो, माझी उपासना करण्याकरिता माझ्या लोकांस जाऊ दे.
13 O Senhor Deus disse a Moisés: — Amanhã cedo vá se encontrar com o rei e diga-lhe que o
14 कारण या वेळेस मी आपल्या सर्व पीडा तुझ्यावर, तुझ्या सेवकांवर व तुझ्या लोकांवर पाठवीन म्हणजे सर्व पृथ्वीवर माझ्यासारखा कोणी देव नाही, हे यावरुन तुला कळेल.
14 Pois desta vez eu vou fazer todas as minhas pragas caírem sobre você, sobre os seus funcionários e sobre o seu povo, para que você fique sabendo que em todo o mundo não há ninguém como eu.
15 मी आपला हात उगारून तुझ्यावर व तुझ्या लोकांवर मरीचा प्रहार केला असता तू पृथ्वीवरून नष्ट झाला असता.
15 Se eu tivesse atacado você e o seu povo com doenças, você já teria sido completamente destruído.
16 परंतु मी तुला एका हेतूने ठेवले आहे की मी तुला माझे सामर्थ्य दाखवावे आणि माझे नाव सर्व पृथ्वीवर विख्यात व्हावे यासाठीच मी तुला राखले आहे.
16 Mas estou deixando que você viva para mostrar a você o meu poder e para fazer com que o meu nome seja conhecido no mundo inteiro.
17 तू अजूनही माझ्या लोकांविरुद्ध आहेस. तू त्यांना जाऊ देत नाहीस.
17 Você ainda continua orgulhoso e não quer deixar o meu povo ir.
18 म्हणून उद्या याच वेळेस मी गारांचा असा काही वाईट वादळी वर्षाव मिसरावर आणीन की असा गारांचा वादळी वर्षाव मिसर राष्ट्राची स्थापना झाल्यापासून कधी आला नाही.
18 Porém amanhã a esta hora eu vou fazer cair uma chuva de pedra tão forte como nunca houve igual em toda a história do Egito.
19 तर आता माणसे पाठवून रानांतून तुझी गुरेढोरे व दुसरे जे काही रानात असेल ते आण. कारण जर एखादा मनुष्य किंवा पशू शेतात राहील तर तो मारला जाईल. जे जे तुम्ही तुमच्या घरात गोळा करून ठेवणार नाही त्यावर गारांचा भडीमार पडेल.”
19 Portanto, agora mande recolher o seu gado e tudo o que você tem no campo. Se as pessoas e os animais que estiverem no campo não forem para casa, quando cair a chuva de pedra, todos eles morrerão.”
20 फारोच्या सेवकांपैकी काहींना परमेश्वराच्या संदेशाची भीती वाटली त्यांनी लगेच आपली गुरेढोरे व गुलाम यांना आसऱ्याला घरी आणले व सुरक्षित जागी ठेवले.
20 Alguns funcionários do rei ficaram com medo daquilo que o Senhor tinha dito e levaram os seus escravos e os seus animais para os abrigos.
21 परंतु इतर सेवकांनी परमेश्वराच्या संदेशाकडे दुर्लक्ष केले व रानांतील त्यांचे सर्व दास व गुरेढोरे, रानात राहू दिली.
21 Mas os que não deram atenção ao que o Senhor tinha dito deixaram os seus escravos e os seus animais nos campos.
22 परमेश्वराने मोशेला सांगितले, “तू आपले हात आकाशाकडे उगार आणि मग सर्व मिसरभर गारांच्या वर्षावाला सुरुवात होईल. गारांचा मारा सर्व लोकांवर, गुरांवर आणि मिसर देशातील सर्व शेतांवर होईल.”
22 Então o Senhor Deus disse a Moisés: — Levante a mão para o céu, e cairá chuva de pedra em toda a terra do Egito. Cairá sobre o povo, sobre os animais e sobre todas as plantas do campo.
23 तेव्हा मोशेने आपली काठी आकाशाकडे उगारली आणि मग परमेश्वराने मेघगर्जना, लखलखणाऱ्या विजा व गारा यांचा पृथ्वीवर वर्षाव केला. अशा प्रकारे परमेश्वराने मिसर देशावर भडीमार केला.
23 Moisés levantou o bastão para o céu, e o Senhor mandou trovões, chuva de pedra e raios sobre o país. Ele fez cair
24 गारांचा मारा व त्यासोबत विजांच्या अग्नीचा लोळ जमिनीवर आला. मिसर राष्ट्राची स्थापना झाल्यापासून गारांचे असे भयंकर व वाईट वादळ मिसरावर कधी आले नव्हते.
24 uma pesada chuva de pedra sobre todo o Egito, e a chuva e os raios caíram sem parar. Essa foi a pior tempestade que o Egito já teve em toda a sua história.
25 त्या गारांच्या वादळाच्या माऱ्याने मिसर देशात, मनुष्ये, गुरेढोरे वगैरे जे काही वनांत होते त्या सर्वांवर गारांचा मारा झाला. शेतांतील सर्व वनस्पतींवर मारा झाला. तसेच वनांतील सर्व मोठमोठी झाडे मोडून पडली.
25 Em todo o Egito a chuva de pedra acabou com tudo o que estava no campo, incluindo as pessoas e os animais. Destruiu todas as plantas e quebrou todas as árvores.
26 गोशेन प्रांतात इस्राएल लोक राहत होते तेथे गारांचा मुळीच वर्षाव झाला नाही.
26 Somente na região de Gosém, onde estavam os israelitas, a chuva de pedra não caiu.
27 फारोने मोशे व अहरोन यांना बोलावून आणले व त्यांना सांगितले, “या वेळी मी पाप केले आहे. परमेश्वर न्यायी आहे; मी व माझे लोक, आम्ही अपराधी आहोत.
27 Então o rei mandou chamar Moisés e Arão e disse: — Desta vez eu pequei. O
28 तुम्ही परमेश्वराकडे विनवणी करा. हा झालेला गारांचा मारा व मेघांचा गडगडाट फार भयंकर झाला तेवढे पुरे, मी तुम्हास जाऊ देतो. तुम्ही यापुढे राहणार नाही.”
28 Orem ao Senhor . Chega de trovões e de chuva de pedra! Eu os deixarei ir; vocês não precisam esperar mais.
29 मोशेने फारोला सांगितले, “जेव्हा मी हे शहर सोडून जाईन तेव्हा माझे हात पसरून मी परमेश्वरापुढे विनंती करीन आणि मग ही मेघगर्जना व हा गारांचा मारा थांबेल; तेव्हा तुला कळेल की पृथ्वी परमेश्वराची आहे.
29 Moisés respondeu: — Quando sair da cidade, eu levantarei as mãos em oração a Deus, o
30 परंतु तू व तुझे सेवक अजूनही परमेश्वर देवाचे भय बाळगीत नाहीत हे मला माहीत आहे.”
30 Mas eu sei que o senhor e os seus funcionários ainda não temem a Deus , o Senhor .
31 या वेळी सातूचे दाणे तयार होऊन तो कापणीला आला होता व जवसास बोंडे आली होती. या पिकांचा आता नाश झाला.
31 O linho e a cevada foram destruídos, pois a cevada já estava com espigas, e o linho estava em flor.
32 परंतु साधा गहू व काठ्या गहू इतर धान्यापेक्षा उशिरा पिकतात; त्याची उशिरा पेरणी झाल्यामुळे ते अजून उगवले नव्हते, म्हणून त्यांचा नाश झाला नाही.
32 Porém o trigo e o centeio não foram destruídos, pois ainda não haviam brotado.
33 मोशे फारोपुढून निघून नगराबाहेर गेला. त्याने परमेश्वराकडे हात पसरून प्रार्थना केली, आणि मेघगर्जना व गारांचा वर्षाव थांबला आणि पृथ्वीवर पाऊस पडणे बंद झाले.
33 Depois de ter estado com o rei, Moisés saiu da cidade e levantou as mãos em oração a Deus, o Senhor . Aí os trovões, a chuva e a chuva de pedra pararam. Porém, quando o rei viu que tinha parado de chover e que não trovejava mais, nem caía chuva de pedra, ele tornou a pecar. Ele e os seus funcionários continuaram teimando. E, como o Senhor tinha dito por meio de Moisés, o rei não deixou que os israelitas fossem embora.
34 पाऊस, गारा व मेघांचा गडगडाट बंद झाल्याचे फारोने पाहिले तेव्हा फारो व त्याचे सेवक यांनी मन कठोर करून पुन्हा पाप केले.
34 — ausente —
35 फारोने आपण दिलेल्या वचनाप्रमाणे करण्याचे नाकारले व इस्राएल लोकांस मोकळे करून त्याने जाऊ दिले नाही. परमेश्वराने मोशेद्वारे सांगितल्याप्रमाणेच हे झाले.
35 — ausente —

Ler em outra tradução

Comparar com outra

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Êxodo 9, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.