Êxodo 5

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (MAR) vs NVI

Sair da comparação
NVI Nova Versão Internacional
1 या गोष्टी घडल्यानंतर, मोशे व अहरोन फारोकडे गेले व त्यास म्हणाले, “इस्राएली लोकांचा देव परमेश्वर म्हणतो, माझ्या लोकांनी माझ्यासाठी रानात उत्सव करावा म्हणून त्यांना जाऊ दे.”
1 Depois disso Moisés e Arão foram falar com o faraó e disseram: "Assim diz o Senhor, o Deus de Israel: ‘Deixe o meu povo ir para celebrar-me uma festa no deserto’ ".
2 फारो म्हणाला, “हा परमेश्वर कोण आहे? मी त्याचा शब्द का ऐकावा आणि इस्राएलाला जाऊ द्यावे? मी त्या परमेश्वरास ओळखत नाही. म्हणून इस्राएलाला मी जाऊ देणार नाही.”
2 O faraó respondeu: "Quem é o Senhor, para que eu lhe obedeça e deixe Israel sair? Não conheço o Senhor, e não deixarei Israel sair".
3 मग अहरोन व मोशे म्हणाले, “इब्री लोकांचा देव आम्हांशी बोलला आहे. म्हणून आम्हांला रानात तीन दिवसाच्या वाटेवर जाऊ द्यावे आणि तेथे आमचा देव परमेश्वर याल यज्ञार्पण करू द्यावे अशी आम्ही आपणाला विनंती करतो. आणि आम्ही जर असे केले नाही तर तो मरीने किंवा तलवारीने आमच्यावर तुटून पडेल.”
3 Eles insistiram: "O Deus dos hebreus veio ao nosso encontro. Agora, permite-nos caminhar três dias no deserto, para oferecer sacrifícios ao Senhor, o nosso Deus; caso contrário, ele nos atingirá com pragas ou com a espada".
4 परंतु मिसराचा राजा फारो त्यांना म्हणाला, “हे मोशे, हे अहरोना, तुम्ही लोकांस काम सोडून जायला का लावता? तुम्ही आपल्या कामावर माघारी चालते व्हा.
4 Mas o rei do Egito respondeu: "Moisés e Arão, por que vocês estão fazendo o povo interromper suas tarefas? Voltem ao trabalho! "
5 फारो त्यांना असेही म्हणाला, येथे आता आमच्या देशात खूप इब्री आहेत आणि तुम्ही त्यांना काम करण्यापासून थांबवत आहात.”
5 E acrescentou: "Essa gente já é tão numerosa, e vocês ainda os fazem parar de trabalhar! "
6 त्याच दिवशी फारोने मुकादमांना व नायकांना आज्ञा दिली.
6 No mesmo dia o faraó deu a seguinte ordem aos feitores e capatazes responsáveis pelo povo:
7 तो त्यांना म्हणाला, “तुम्ही लोकांस विटा बनवण्याकरिता आजपर्यंत सतत गवत दिलेले आहे. परंतु आता त्यांना लागणारे गवत त्यांना स्वत: शोधून आणायला सांगा.
7 "Não forneçam mais palha ao povo para fazer tijolos, como faziam antes. Eles que tratem de ajuntar palha!
8 तरी पूर्वी इतक्याच विटा त्यांनी बनवल्या पाहिजेत. त्यामध्ये काही कमी करून स्वीकारू नका. कारण ते आळशी झाले आहेत. म्हणूनच ते ओरड करून म्हणतात, आम्हांला जाण्याची परवानगी दे आणि आमच्या देवाला यज्ञ करू दे.
8 Mas exijam que continuem a fazer a mesma quantidade de tijolos; não reduzam a cota. São preguiçosos, e por isso estão clamando: ‘Iremos oferecer sacrifícios ao nosso Deus’.
9 तेव्हा त्यांच्यावर अधिक काम लादून त्यांना सतत कामात ठेवा. म्हणजे मग खोट्या बोलण्यावर विश्वास ठेवणार नाहीत.”
9 Aumentem a carga de trabalho dessa gente para que cumpram suas tarefas e não dêem atenção a mentiras".
10 म्हणून लोकांचे मुकादम व नायक लोकांकडे जाऊन म्हणाले, “फारो असे म्हणतो, तुम्हास विटा बनवण्यासाठी लागणारे गवत देणार नाही.
10 Os feitores e os capatazes foram dizer ao povo: "Assim diz o faraó: ‘Já não lhes darei palha.
11 तेव्हा तुम्हास लागणारे गवत तुम्ही स्वत:च आणले पाहिजे. तुमचे काम काही कमी होणार नाही.”
11 Saiam e recolham-na onde puderem achá-la, pois o trabalho de vocês em nada será reduzido’ ".
12 म्हणून मग लोक गवत शोधण्याकरता सर्व मिसर देशभर पांगले.
12 O povo então espalhou-se por todo o Egito, a fim de ajuntar restolho em lugar da palha.
13 त्यांच्यावर नेमलेले मुकादम त्यांच्याकडून अधिक काम करवून घेऊन पूर्वी इतक्याच विटा तयार करण्याकरता त्यांच्यामागे सतत तगादा लावत.
13 Enquanto isso, os feitores os pressionavam, dizendo: "Completem a mesma tarefa diária que lhes foi exigida quando tinham palha".
14 मिसराच्या मुकादमांनी इस्राएली लोकांवर नायक नेमले होते. त्यांना फारोच्या मुकादमांनी मार देऊन विचारले की, “तुम्ही पूर्वी जेवढ्या विटा बनवत होता तेवढ्या आता का बनवत नाही?”
14 Os capatazes israelitas indicados pelos feitores do faraó eram espancados e interrogados: "Por que não completaram ontem e hoje a mesma cota de tijolos dos dias anteriores? "
15 मग इस्राएली नायक तक्रार घेऊन फारोकडे गेले व म्हणाले, “आम्ही जे तुमचे सेवक त्या आमच्याशी तुम्ही अशा प्रकारे का वागत आहा?
15 Então os capatazes israelitas foram apelar para o faraó: "Por que tratas os teus servos dessa maneira?
16 तुम्ही आम्हांला गवत देत नाही, परंतु पूर्वी इतक्याच विटा बनवण्याचा हुकूम करता, आणि आता आपल्या दासांना मार मिळत आहे. पण सारा दोष आपल्या लोकांचा आहे.”
16 Não se fornece a nós, teus servos, a palha, e contudo nos dizem: ‘Façam tijolos! ’ Os teus servos têm sido espancados, mas a culpa é do teu próprio povo".
17 फारो म्हणाला, “तुम्ही आळशी आहात, म्हणूनच तुम्ही म्हणता, आम्हांला परमेश्वरास यज्ञ करायला जाऊ देण्याची परवानगी दे.
17 Respondeu o faraó: "Preguiçosos, é o que vocês são! Preguiçosos! Por isso andam dizendo: ‘Iremos oferecer sacrifícios ao Senhor’.
18 आता आपल्या कामावर माघारी जा. तुम्हास गवत काही मिळायचे नाही, परंतु पूर्वीप्रमानेच विटा तुम्ही केल्या पाहिजेत.
18 Agora, voltem ao trabalho. Vocês não receberão palha alguma! Continuem a produzir a cota integral de tijolos! "
19 आपण संकटात आहोत हे इस्राएली नायकांना समजले. कारण पूर्वी इतक्याच विटा व रोजचे काम त्यांना शक्य नव्हते.”
19 Os capatazes israelitas se viram em dificuldade quando lhes disseram que não poderiam reduzir a quantidade de tijolos exigida a cada dia.
20 फारोच्या भेटीनंतर परत जाताना त्यांना वाटेत मोशे व अहरोन भेटले;
20 Ao saírem da presença do faraó, encontraram-se com Moisés e Arão, que estavam à espera deles,
21 तेव्हा ते मोशे व अहरोन ह्यांना म्हणाले, “परमेश्वर तुम्हांकडे पाहो व तुम्हास शिक्षा करो. कारण फारो व त्याचे सेवक यांच्या दृष्टीने तुम्ही आम्हांला अपमानकारक केले आहे. आम्हांला मारून टाकण्यासाठी तुम्ही त्यांच्या हातात जणू तलवारच दिली आहे.”
21 e lhes disseram: "O Senhor os examine e os julgue! Vocês atraíram o ódio do faraó e dos seus conselheiros sobre nós, e lhes puseram nas mãos uma espada para que nos matem".
22 मग मोशेने परमेश्वराकडे परत जाऊन प्रार्थना करून म्हटले, “प्रभू, तू या लोकांस का त्रास देत आहेस? पहिली गोष्ट म्हणजे तू मला का पाठवलेस?
22 Moisés voltou-se para o Senhor e perguntou: "Senhor, por que maltrataste a este povo? Afinal, por que me enviaste?
23 मी तुझ्या नावाने बोलण्यासाठी फारोकडे आलो, तेव्हापासून तो या लोकांस त्रास देत आहे. आणि तू आपल्या लोकांस मुक्त तर मुळीच केले नाहीस.”
23 Desde que me dirigi ao faraó para falar em teu nome, ele tem maltratado a este povo, e tu de modo algum libertaste o teu povo! "

Ler em outra tradução

Comparar com outra

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Êxodo 5, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.