Êxodo 36

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (MAR) vs NVI

Sair da comparação
NVI Nova Versão Internacional
1 “परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे पवित्रस्थानाचे सेवेसाठी सर्व तऱ्हेचे काम कसे करावे ते समजण्यासाठी ज्यांच्या ठायी परमेश्वराने बुध्दी व समज घातली आहे ते बसालेल व अहलियाब आणि प्रत्येक ज्ञानी मनुष्य ह्यानी हे बांधकाम करावे.”
1 "Assim farão Bezalel, Aoliabe e todos os homens capazes, a quem o Senhor concedeu destreza e habilidade para fazerem toda a obra de construção do santuário, realizarão a obra como o Senhor ordenou. "
2 नंतर बसालेल व अहलियाब ह्यांना आणि ज्या ज्ञानी मनुष्यांच्या मनात परमेश्वराने बुध्दी घातली होती व ज्यांना हे कार्य करण्याची स्फूर्ती झाली होती, त्यांना मोशेने बोलावले.
2 Então Moisés chamou Bezalel e Aoliabe e todos os homens capazes a quem o Senhor dera habilidade e que estavam dispostos a vir realizar a obra.
3 आणि पवित्रस्थानाच्या सेवेसाठी म्हणजे ते बांधण्यासाठी इस्राएल लोकांनी जी एकंदर अर्पणे आणली होती ती त्यांनी मोशेच्या पुढून घेतली. लोकांनी रोज सकाळी आपली स्वखुशीची अर्पणे त्याच्यापाशी आणण्याचा क्रम चालू ठेवला.
3 Receberam de Moisés todas as ofertas que os israelitas tinham trazido para a obra de construção do santuário. E o povo continuava a trazer voluntariamente ofertas, manhã após manhã.
4 शेवटी मग सर्व बुध्दिमान पुरुष पवित्रस्थानाचे करीत असलेले आपले काम सोडून मोशेकडे आले.
4 Por isso, todos os artesãos habilidosos que trabalhavam no santuário interromperam o trabalho
5 आणि ते मोशेला म्हणाले लोकांनी परमेश्वरासाठी खूप अर्पणे आणली आहेत! आम्हांला या पवित्रस्थानाचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी लागणाऱ्या साहित्यापेक्षा कितीतरी अधिक आमच्यापाशी आले आहे!
5 e disseram a Moisés: "O povo está trazendo mais do que o suficiente para realizar a obra que o Senhor ordenou".
6 तेव्हा मोशेने सर्व छावणीभर असा हुकूम दिला की, “कोणाही स्त्रीने किंवा पुरुषाने आता पवित्रस्थानाच्या सेवेसाठी अर्पण म्हणून आणखी कोणतेही कसबाचे वगैरे काम करून आणू नये,” तेव्हा अशा रीतीने आणखी अर्पणे आणण्यास बंदी घालण्यात आली.
6 Então Moisés ordenou que fosse feita esta proclamação em todo o acampamento: "Nenhum homem ou mulher deverá fazer mais nada para ser oferecido ao santuário". Assim, o povo foi impedido de trazer mais,
7 त्यांच्या हाती जी सामग्री जमली होती ती ते सर्व काम करण्यास पुरून उरेल इतकी होती.
7 pois o que já haviam recebido era mais que suficiente para realizar toda a obra.
8 मग त्या कसबी कारागिरांनी दहा पडद्यांचा निवासमंडप बनविला. त्यांनी कातलेल्या तलम सणाच्या कापडाचे आणि निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताचे पडदे तयार केले व त्यांच्यावर त्यांनी कुशल कारागिराकडून करुब काढले.
8 Todos os homens capazes dentre os trabalhadores fizeram o tabernáculo com dez cortinas internas de linho fino trançado e de fios de tecido azul, roxo e vermelho, com os querubins bordados sobre eles.
9 प्रत्येक पडद्याचे मोजमाप अठ्ठावीस हात लांब व रुंदी चार हात असे सारखेच होते.
9 Todas as cortinas internas tinham o mesmo tamanho: doze metros e sessenta centímetros de comprimento por um metro e oitenta centímetros de largura.
10 त्यांनी त्यापैकी पाच पडदे जोडून एक भाग व दुसरे पाच पडदे जोडून दुसरा भाग असे केले.
10 Prendeu cinco cortinas internas, e fez o mesmo com as outras cinco.
11 नंतर त्यांनी त्या दोन्हीही भागांच्या शेवटच्या किनारीवर निळ्या सुताची बिरडी केली; तसेच दुसऱ्या पडद्याच्या किनारीवरही तशीच बिरडी केली.
11 Em seguida fez laçadas de tecido azul ao longo da borda da última cortina interna do primeiro conjunto de cortinas internas, fazendo o mesmo com o segundo conjunto.
12 त्यांनी एका पडद्याखाली किनारीवर पन्नास बिरडी व दुसऱ्या पडद्याच्या किनारीवरही पन्नास बिरडी केली; ती बिरडी समोरासमोर होती.
12 Fez também cinqüenta laçadas na primeira cortina interna e cinqüenta laçadas na última cortina interna do segundo conjunto; as laçadas estavam opostas umas às outras.
13 नंतर ते दोन पडदे एकत्र जोडण्यासाठी त्यांनी सोन्याचे पन्नास गोल आकडे बनविले; त्या आकड्यांनी ते पडदे एकत्र जोडल्यावर त्या सर्वांचा मिळून अखंड पवित्र निवासमंडप तयार झाला.
13 Depois fez cinqüenta ganchos de ouro e com eles prendeu um conjunto de cortinas internas ao outro, para que o tabernáculo formasse um todo.
14 नंतर पवित्र निवासमंडप झाकण्यासाठी त्या कारागिरांनी बकऱ्याच्या केसांच्या अकरा पडद्यांचा एक तंबू बनविला.
14 Com o total de onze cortinas internas de pêlos de cabra fez uma tenda para cobrir o tabernáculo.
15 या सर्व पडद्यांचे मोजमाप सारखेच होते म्हणजे ते तीस हात लांब व चार हात रुंद होते.
15 As onze cortinas internas tinham a mesma medida: treze metros e meio de comprimento por um metro e oitenta centímetros de largura.
16 त्या कारागिरांनी त्यांपैकी पाच पडदे जोडून एक भाग व दुसरे सहा पडदे जोडून दुसरा भाग तयार केला.
16 Prendeu cinco cortinas internas num conjunto e as outras seis noutro conjunto.
17 नंतर त्यांनी एका कनातीच्या बाहेरील शेवटच्या पडद्याच्या किनारीवर पन्नास बिरडी व तशीच दुसऱ्या कनातीच्या बाहेरील शेवटच्या पडद्याच्या किनारीवर पन्नास बिरडी केली.
17 Depois fez cinqüenta laçadas em volta da borda da última cortina interna de um dos conjuntos e também na borda da última cortina interna do outro conjunto.
18 हे दोन पडदे जोडून एक तंबू करण्यासाठी त्यांनी पितळेचे पन्नास आकडे केले.
18 Fez também cinqüenta ganchos de bronze para unir a tenda, formando um todo.
19 मग त्यांनी पवित्र निवासमंडप झाकण्यासाठी लाल रंग दिलेल्या मेंढ्याच्या कातड्याचे व दुसरे तहशाच्या कमावलेल्या कातड्याचे अशी दोन आच्छादने केली.
19 Em seguida fez para a tenda uma cobertura de pele de carneiro tingida de vermelho, e por cima desta uma cobertura de couro.
20 पवित्र निवासमंडपाला आधार देण्यासाठी त्यांनी बाभळीच्या लाकडाच्या फळ्या तयार केल्या.
20 Fez ainda armações verticais de madeira de acácia para o tabernáculo.
21 प्रत्येक फळी दहा हात लांब व दीड हात रुंद होती.
21 Cada armação tinha quatro metros e meio de comprimento por setenta centímetros de largura,
22 त्यांनी प्रत्येक फळी दुसऱ्या फळीशी जोडण्यासाठी त्यांनी तिला दोन कुसे केली. त्यांनी निवासमंडपाच्या सर्व फळ्या अशाच केल्या.
22 com dois encaixes paralelos um ao outro. E fez todas as armações do tabernáculo dessa madeira.
23 निवासमंडपासाठी ज्या फळ्या त्यांनी केल्या त्यांपैकी दक्षिण बाजूस लावण्यासाठी वीस फळ्या केल्या;
23 Fez também vinte armações para o lado sul do tabernáculo
24 त्या वीस फळ्यांच्या खाली लावण्यासाठी त्यांनी चांदीच्या चाळीस उथळ्या केल्या, एका फळीच्या खाली कुसासाठी दोन दोन उथळ्या त्यांनी केल्या.
24 e quarenta bases de prata para serem colocadas debaixo delas; duas bases para cada armação, uma debaixo de cada encaixe.
25 त्याचप्रमाणे निवासमंडपाच्या दुसऱ्या म्हणजे उत्तर बाजूस लावण्यासाठी त्यांनी वीस फळ्या केल्या.
25 Para o outro lado, o lado norte do tabernáculo, fez vinte armações
26 त्यांनी त्याच्यासाठी चांदीच्या चाळीस उथळ्या केल्या म्हणजे एकेका फळीच्या खाली दोन दोन उथळ्या.
26 e quarenta bases de prata, duas debaixo de cada armação.
27 निवासमंडपाच्या मागील बाजूस म्हणजे पश्चिम बाजूस लावण्यासाठी सहा फळ्या केल्या,
27 Fez ainda seis armações na parte de trás do tabernáculo, isto é, para o lado ocidental,
28 आणि मागच्या बाजूस निवासमंडपाच्या कोपऱ्यासाठी दोन फळ्या त्यांनी केल्या.
28 e duas armações foram montadas nos cantos, na parte de trás do tabernáculo.
29 या फळ्या खालपासून दोन दोन असून त्या दोन्ही वरच्या भागी एकेका कडीने त्यांनी जोडल्या होत्या; दोन्ही कोपऱ्यांसाठी त्यांनी अशाच फळ्या केल्या.
29 Nesses dois cantos as armações eram duplas, desde a parte inferior até a mais alta, colocadas numa só argola, ambas feitas do mesmo modo.
30 या प्रकारे आठ फळ्या व त्यांना चांदीच्या सोळा उथळ्या झाल्या. अर्थात एकेका फळीखाली दोन दोन उथळ्या होत्या.
30 Havia, pois, oito armações e dezesseis bases de prata, duas debaixo de cada armação.
31 त्यांनी बाभळीच्या लाकडाचे अडसर तयार केले. निवासमंडपाच्या एका बाजूच्या फळ्यांसाठी पाच,
31 Também fez travessões de madeira de acácia: cinco para as armações de um lado do tabernáculo,
32 दुसऱ्या बाजूच्या फळ्यांसाठी पाच आणि पश्चिमेच्या म्हणजे मागल्या बाजूसाठी पांच;
32 cinco para as do outro lado e cinco para as do lado ocidental, na parte de trás do tabernáculo.
33 आणि त्यांनी फळ्याच्या मध्यभागी लावावयाचा अडसर एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत पोहचेल असा केला.
33 Fez o travessão central de uma extremidade à outra, passando pelo meio das armações.
34 त्या फळ्या त्यांनी सोन्याने मढवल्या, अडसर लावण्याच्या कड्या सोन्याच्या बनवल्या आणि अडसरही सोन्याने मढवले.
34 Revestiu de ouro as armações e fez argolas de ouro para sustentar os travessões, os quais também revestiu de ouro.
35 मग त्यांनी निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताचा आणि तलम सणाच्या कापडाचा एक अंतरपट बनविला व त्यावर करुब काढले,
35 Fez o véu de linho fino trançado e de fios de tecido azul, roxo e vermelho, e mandou bordar nele querubins.
36 आणि त्यासाठी त्यांनी बाभळीच्या लाकडाचे चार खांब केले व ते सोन्याने मढवले; त्याच्या आकड्या सोन्याच्या केल्या आणि त्याच्यासाठी चांदीच्या चार उथळ्या ओतल्या.
36 Fez-lhe quatro colunas de madeira de acácia e as revestiu de ouro. Fez-lhe ainda ganchos de ouro e fundiu as suas bases de prata.
37 मग त्यांनी निवासमंडपाच्या प्रवेशद्वारासाठी निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताचा व कातलेल्या तलम सणाच्या कापडाचा नक्षीदार पडदा बनवला.
37 Para a entrada da tenda fez uma cortina de linho fino trançado e de fios de tecido azul, roxo e vermelho, obra de bordador;
38 व त्या पडद्यासाठी त्यांनी पाच खांब व त्यांच्या आकड्या बनवल्या; त्यांचा वरचा भाग व त्यांच्या बांधपट्ट्या सोन्याने मढविल्या; आणि खांबासाठी पितळेच्या पाच उथळ्या बनवल्या.
38 e fez-lhe cinco colunas com ganchos. Revestiu de ouro as partes superior e lateral das colunas e fez de bronze as suas cinco bases.

Ler em outra tradução

Comparar com outra

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Êxodo 36, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.