Êxodo 33
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (MAR) vs VC
1 मग परमेश्वराने मोशेला सांगितले, “तू आणि तुझ्याबरोबर मिसर देशातून तू आणलेले लोक, तुम्ही येथून पुढच्या प्रवासास निघा; आणि जो देश मी तुझ्या संततीला देईन अशी मी अब्राहाम, इसहाक व याकोब यांना शपथ वाहिली होती त्या देशाला तुम्ही जा.
1 O Senhor disse a Moisés: "Vai, parte daqui com o povo que tiraste do Egito; ide para a terra que prometi a Abraão, a Isaac e a Jacó, com o juramento de dá-la à sua posteridade.
2 तुमच्यापुढे चालण्यासाठी मी माझ्या दूताला पाठवीन आणि कनानी, अमोरी, हित्ती, परिज्जी, हिव्वी व यबूसी लोकांस तेथून घालवून देईन.
2 Enviarei um anjo adiante de ti, e expulsarei os cananeus, os amorreus, os hiteus, os ferezeus, os heveus e os jebuseus.
3 दुधामधाचे प्रवाह वाहत असलेल्या देशात तू जा; मी तुमच्याबरोबर येणार नाही, कारण तुम्ही फार ताठ मानेचे लोक आहात. मी आलो तर रस्त्यातच तुम्हास नष्ट करीन.”
3 Ide para essa terra que mana leite e mel. Mas não subirei convosco, porque sois um povo de cabeça dura; eu vos aniquilaria em caminho."
4 ही वाईट बातमी ऐकल्यावर लोक फार दु:खी झाले आणि त्यानंतर कोणीही आपल्या अंगावर दागदागिने घातले नाहीत;
4 Ouvindo o povo estas duras palavras, pôs-se a chorar e cada um tirou os seus enfeites.
5 कारण परमेश्वर मोशेला म्हणाला, “तू इस्राएल लोकांस असे सांग, ‘तुम्ही फार ताठ मानेचे लोक आहात; मी तुमच्याबरोबर थोडा वेळ जरी असलो तरी मी तुम्हास भस्म करीन; म्हणून तुम्ही तुमचे दागदागिने काढून ठेवा; मग तुमचे काय करावयाचे ते मी पाहीन.”
5 Então o Senhor disse a Moisés: "Dize aos israelitas: vós sois um povo de cabeça dura; se eu viesse um só instante no meio de vós, eu vos aniquilaria. Arrancai, pois, todos os vossos enfeites e verei o que posso fazer por vós."
6 म्हणून होरेब पर्वतापासून पुढे इस्राएल लोक दागदागिन्यांवाचून राहिले.
6 Os israelitas despojaram-se de seus enfeites ao partir do monte Horeb.
7 मोशे छावणीबाहेर बऱ्याच अंतरावर तंबू लावत असे. मोशेने त्यास दर्शनमंडप असे नाव दिले होते; ज्या कोणाला परमेश्वरास काही विचारावयाचे असेल तो छावणीबाहेरील दर्शनमंडपाकडे जाई.
7 Moisés foi levantar a tenda a alguma distância fora do acampamento. {E chamou-a tenda de reunião.} Quem queria consultar o Senhor, dirigia-se à tenda de reunião, fora do acampamento.
8 ज्या वेळी मोशे छावणीतून मंडपाकडे जाई त्या वेळी सर्व लोक आपापल्या तंबूच्या दारात उभे राहत आणि मोशे मंडपाच्या आत जाईपर्यंत त्यास निरखून बघत.
8 Quando Moisés se dirigia para a tenda, todo mundo se levantava, cada um diante da entrada de sua tenda, para segui-lo com os olhos até que entrasse na tenda.
9 जेव्हा मोशे मंडपात जाई तेव्हा मेघस्तंभ खाली उतरून येई आणि मंडपाच्या दारापाशी तो उभा राही; ह्याप्रमाणे परमेश्वर मोशेशी बोलत असे.
9 E logo que ele acabava de entrar, a coluna de nuvem descia e se punha à entrada da tenda, e o Senhor se entretinha com Moisés.
10 जेव्हा लोक दर्शनमंडपाच्या दारात ढग बघत तेव्हा ते आपापल्या तंबूच्या दारात उभे राहून देवाला नमन करीत.
10 À vista da coluna de nuvem, todo o povo, em pé à entrada de suas tendas, se prostrava no mesmo lugar.
11 मित्रांशी बोलावे त्याप्रमाणे परमेश्वर मोशेबरोबर समोरासमोर बोलत असे. मोशे छावणीकडे माघारी जात असे. तरी मोशेचा मदतनीस नूनाचा मुलगा यहोशवा, हा तरुण मंडप सोडून बाहेर येत नसे.
11 O Senhor se entretinha com Moisés face a face, como um homem fala com seu amigo. Voltava depois Moisés ao acampamento, mas seu ajudante, o jovem Josué, filho de Nun, não se apartava do interior da tenda.
12 मोशे परमेश्वरास म्हणाला, “पाहा या लोकांस घेऊन जाण्यास तू मला सांगितलेस, परंतु तू माझ्याबरोबर कोणाला पाठविणार ते तू सांगितले नाहीस; तू मला म्हणालास, मी तुला तुझ्या नावाने ओळखतो आणि तुझ्यावर माझी कृपादृष्टी आहे.
12 Moisés disse ao Senhor: "Vós dizeis-me que faça subir o povo, mas não me fazeis saber quem haveis designado para acompanhar-me. E, entretanto, dissestes-me: 'Conheço-te pelo teu nome' e: 'Tens todo o meu favor.'
13 आता माझ्यावर तुझी कृपादृष्टी असल्यास तुझे मार्ग मला दाखव म्हणजे मला तुझी ओळख पटेल आणि त्यामुळे तुझी कृपादृष्टी माझ्यावर होईल. पाहा, हे राष्ट्र तुझी प्रजा आहे.”
13 Se é verdade que tenho todo o vosso favor, dai-me a conhecer os vossos desígnios, para que eu saiba que tenho todo o vosso favor; e considerai que esta nação é o vosso povo."
14 परमेश्वराने उत्तर दिले, “मी स्वत: तुझ्याबरोबर येईन व तुला विसावा देईन.”
14 O Senhor respondeu: "Minha face irá contigo, e serei o teu guia."
15 मग मोशे परमेश्वरास म्हणाला, “जर तू स्वतः येणार नाहीस तर मग आम्हांला या येथून पुढे नेऊ नकोस.
15 "Se vossa face não vier conosco, disse Moisés, não nos façais partir deste lugar.
16 तसेच तुझी कृपादृष्टी माझ्यावर व तुझ्या लोकांवर झाली आहे हे कशावरून समजावे? जर तू आमच्याबरोबर आल्याने मी व हे तुझे लोक पृथ्वीवरील इतर सर्व लोकांहून वेगळे झालो आहो यावरूनच ते समजायचे ना?”
16 Por onde se saberá que temos todo o vosso favor, eu e o vosso povo? Porventura, não é necessário para isso justamente que marcheis conosco? É o que nos distinguirá, eu e o vosso povo, de todas as outras nações da terra."
17 मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “तू मागतोस त्याप्रमाणे मी करीन, कारण माझी कृपादृष्टी तुझ्यावर झाली आहे आणि मी व्यक्तीशः तुला तुझ्या नावाने ओळखतो.”
17 "O que pedes, replicou o Senhor, fá-lo-ei, porque tens todo o meu favor, e te conheço pelo teu nome."
18 नंतर मोशे म्हणाला, “आता कृपा करून मला तुझे तेज दाखव.”
18 Moisés disse: "Mostrai-me vossa glória."
19 मग परमेश्वराने मोशेला उत्तर दिले, “मी माझे सर्व चांगुलपण तुझ्यापुढे चालवीन; मी परमेश्वर आहे आणि हे माझे नाव मी जाहीर करीन. ज्याच्यावर कृपा करावीशी वाटेल त्याच्यावर मी कृपा करीन आणि ज्याच्यावर दया करावीशी वाटते त्याच्यावर दया करीन.
19 E Deus respondeu: "Vou fazer passar diante de ti todo o meu esplendor, e pronunciarei diante de ti o nome de Javé. Dou a minha graça a quem quero, e uso de misericórdia com quem me apraz.
20 परंतु” तू माझा “चेहरा पाहू शकणार नाहीस, कारण माझा चेहरा पाहिलेला कोणीही मनुष्य जिवंत राहणार नाही.”
20 Mas, ajuntou o Senhor, não poderás ver a minha face, pois o homem não me poderia ver e continuar a viver.
21 परमेश्वर म्हणाला, “माझ्याजवळ या ठिकाणी एक खडक आहे; तू त्यावर उभा राहा.
21 Eis um lugar perto de mim, disse o Senhor; tu estarás sobre a rocha.
22 माझे तेज त्या जागेजवळून पुढे जाईल, तेव्हा मी तुला त्या खडकातील मोठ्या भेगेत ठेवीन; आणि मी निघून जाईपर्यंत माझ्या हाताने तुला झाकीन;
22 Quando minha glória passar, te porei na fenda da rocha e te cobrirei com a mão, até que eu tenha passado.
23 नंतर मी माझा हात काढून घेईन आणि तू माझी पाठ पाहशील; परंतु तू माझा चेहरा पाहणार नाहीस.”
23 Retirarei depois a mão, e me verás por detrás. Quanto à minha face, ela não pode ser vista".
Atalhos do teclado
- Capítulo anterior←
- Próximo capítulo→
- Versículo anteriork
- Próximo versículoj
- Limpar seleçãoEsc
- Esta ajuda?
Estude este capítulo no WhatsApp
Peça à IA da Bíblia Fala para explicar Êxodo 33, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.