Êxodo 10
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (MAR) vs NTLH
1 नंतर परमेश्वर मोशेला म्हणाला, “तू फारोकडे जा. त्याचे मन व त्याच्या सेवकांची मने मीच कठीण केली आहेत. माझ्या सामर्थ्याची चिन्हे त्यांच्यामध्ये दाखवावी म्हणून मी हे केले.
1 O Senhor Deus disse a Moisés: — Vá falar com o rei, pois eu fiz com que ele e os seus funcionários continuassem teimando, para que eu pudesse fazer esses milagres no meio deles.
2 मी मिसऱ्यांना कसे कठोरपणे वागवले आणि त्यांच्यामध्ये अनेक सामर्थ्याची चिन्हे कशी केली हे तुम्ही तुमच्या मुलांना व नातवांना सांगावे म्हणून मी हे केले. या प्रकारे मी परमेश्वर आहे हे तुम्हास कळेल.”
2 E também para que você pudesse contar aos seus filhos e aos seus netos como eu zombei dos egípcios e quantas coisas espantosas fiz no meio deles. Assim vocês ficarão sabendo que eu sou Deus, o Senhor .
3 मग मोशे व अहरोन फारोकडे गेले. त्यांनी त्यास सांगितले, “इब्र्यांचा देव परमेश्वर म्हणतो, ‘तू माझ्यापुढे नम्र होण्याचे कोठवर नाकारशील? माझी उपासना करण्याकरिता माझ्या लोकांस जाऊ दे.
3 Moisés e Arão foram falar com o rei do Egito e lhe disseram: — O
4 जर तू माझ्या लोकांस जाऊ देण्याचे नाकारशील, तर उद्या मी तुझ्या देशावर टोळधाड आणीन.
4 Se não, amanhã eu vou trazer gafanhotos para o seu país.
5 ते टोळ सर्व जमीन झाकून टाकतील. ते इतके असतील की तुला जमीन दिसणार नाही. गारा व पावसाच्या तडाख्यातून जे काही वाचले असेल त्यास टोळ खाऊन टाकतील. शेतांतील सर्व झाडांचा पाला ते खाऊन फस्त करतील.
5 O chão não poderá mais ser visto, pois eles cobrirão a terra do Egito. Eles comerão tudo o que a chuva de pedra não destruiu e até as árvores que sobraram.
6 ते टोळ तुझी घरे, तुझ्या सेवकांची घरे, व मिसरमधील घरे, व्यापून टाकतील. तुझ्या वाडवडिलांनी आजपर्यंत पाहिले नसतील त्यापेक्षा कितीतरी पटींनी अधिक ते असतील.” नंतर मोशे फारोसमोरून निघून गेला.
6 Eles encherão as suas casas, as casas de todos os seus funcionários e de todo o seu povo. E essa desgraça será pior do que tudo o que os seus pais e os seus antepassados já viram!” Moisés disse isso e saiu do palácio.
7 फारोचे सेवक फारोला म्हणाले, “हा मनुष्य आम्हावर कोठपर्यंत संकटे आणणार आहे? या इस्राएलांना आपला देव परमेश्वर ह्यांची उपासना करण्याकरिता जाऊ द्यावे. मिसराचा नाश झाला आहे हे तुम्हास अजून कळत नाही काय?”
7 Então os funcionários do palácio disseram ao rei: — Até quando esse sujeito vai ser um perigo para nós? Deixe que os homens vão embora, para adorarem o
8 मोशे व अहरोन यांना पुन्हा फारोकडे आणले, तो त्यांना म्हणाला, “जा व तुमचा देव परमेश्वर याची उपासना करा. परंतु कोण कोण जाणार आहेत?”
8 Aí Moisés e Arão foram levados de novo até a presença do rei, e este lhes disse: — Vocês podem ir adorar o
9 मोशेने उत्तर दिले, “आमची तरुण व वृध्द मंडळी, तसेच आम्ही, आमची मुले व कन्या, आमचे शेरडामेंढरांचे कळप व गुरेढोरे या सर्वांस आम्ही घेऊन जाणार. कारण आम्हांला परमेश्वराचा उत्सव करायचा आहे.”
9 Moisés respondeu: — Iremos todos nós, com as nossas crianças e os nossos velhos. Levaremos os nossos filhos e filhas, as nossas ovelhas e cabras e o nosso gado, pois temos de dar uma festa em honra de Deus, o
10 फारो त्यांना म्हणाला, “तुम्ही व तुमची मुलेबाळे यांना मिसरमधून जाऊ दिले तर परमेश्वराची शपथ. सांभाळा, पाहा, तुमच्या मनात काहीतरी वाईट आहे.
10 Então o rei disse: — Pois que o
11 नाही! फक्त तुमच्यातील पुरुषांनी तुमच्या परमेश्वराची उपासना करावयास जावे. कारण तेच तर तुम्हास पाहिजे आहे.” त्यानंतर त्यांना फारोपुढून घालवून दिले.
11 Não! Somente os homens podem ir adorar ao Senhor , se é isso o que vocês querem. E Arão e Moisés foram expulsos da presença do rei.
12 मग परमेश्वराने मोशेला सांगितले, “आपली काठी मिसर देशावर उगार म्हणजे टोळधाड येईल! ते टोळ मिसर देशभर पसरतील आणि पाऊस व गारा यांच्या सपाट्यातून वाचलेल्या वनस्पती खाऊन टाकतील.”
12 Aí o Senhor Deus disse a Moisés: — Estenda a mão sobre o Egito para que venham gafanhotos. Eles virão e comerão todas as plantas da terra, tudo o que a chuva de pedra não destruiu.
13 मग मोशेने आपल्या हातातील काठी मिसर देशावर उगारली तेव्हा परमेश्वराने एक दिवसभर व रात्रभर पूर्वेकडून वारा वाहविला, तेव्हा सकाळी वाऱ्याबरोबर टोळच टोळ आले.
13 Moisés estendeu o bastão sobre o Egito, e o Senhor mandou do Leste um vento que soprou sobre o país o dia inteiro e a noite inteira. Quando amanheceu, o vento tinha trazido os gafanhotos.
14 ते उडत आले व अवघ्या मिसर देशभर जमिनीवर पसरले. इतके टोळ ह्यापूर्वी मिसर देशावर कधी आले नव्हते व इतके येथून पुढेही कधी येणार नाहीत.
14 Eles se espalharam sobre todo o Egito e invadiram toda aquela região em quantidades enormes, como nunca havia acontecido antes e nunca mais acontecerá.
15 त्या टोळांनी सर्व जमीन झाकून टाकली, आणि त्यांच्या आकाशात उडण्यामुळे सर्व देशभर अंधार पडला. गारांच्या तडाख्यातून वाचलेल्या वनस्पती आणि झाडावरील वाचलेली फळे त्यांनी खाऊन फस्त केली; आणि मिसरातील कुठल्याच झाडाझुडपांवर एकही पान राहिले नाही.
15 Eles cobriram de tal maneira o chão, que este ficou preto. Devoraram toda a vegetação e todas as frutas das árvores que haviam sobrado da chuva de pedra. Em todo o Egito não sobrou nada verde nas árvores e nas plantas.
16 फारोने तातडीने मोशे व अहरोन यांना बोलावून आणले. तो म्हणाला, “तुमचा देव परमेश्वर याच्याविरुद्ध व तुम्हाविरुध्द मी पाप केले आहे.
16 Então o rei mandou chamar imediatamente Moisés e Arão e lhes disse: — Eu pequei contra o
17 तेव्हा या वेळी माझ्या पापाबद्दल मला क्षमा करा आणि हे टोळ माझ्यापासून दूर करण्याकरिता तुमचा देव परमेश्वर याकडे प्रार्थना करा.”
17 Agora peço que perdoem o meu pecado ainda esta vez e que orem ao Senhor , seu Deus, para que ele tire de mim este castigo terrível.
18 मोशे फारोसमोरून निघून गेला व त्याने परमेश्वराची प्रार्थना केली.
18 Moisés saiu do palácio e orou a Deus, o Senhor .
19 तेव्हा परमेश्वराने पश्चिमेकडून जोराचा वारा वाहविला तेव्हा त्या वाऱ्याने सर्व टोळांना उडवून तांबड्या समुद्रात लोटले. मिसरमध्ये एकही टोळ राहिला नाही.
19 Aí o Senhor fez soprar um vento oeste muito forte, que levantou os gafanhotos e os jogou no mar Vermelho; e não ficou um só gafanhoto em todo o Egito.
20 तरी परमेश्वराने फारोचे मन पुन्हा कठीण केले आणि त्याने इस्राएल लोकांस जाऊ दिले नाही.
20 Porém o Senhor fez com que o rei continuasse teimando, e este não deixou que os israelitas fossem embora.
21 मग परमेश्वराने मोशेला सांगितले, “तू आपला हात आकाशात उंच कर म्हणजे अवघा मिसर देश अंधारात गडप होईल तो अंधार इतका दाट असेल की तुम्हास चाचपडत जावे लागेल.”
21 Então o Senhor Deus disse a Moisés: — Levante a mão para o céu a fim de que em todo o Egito haja uma escuridão tão grossa, que possa até ser tocada.
22 तेव्हा मोशेने आपला हात आकाशाकडे उभारिला आणि तीन दिवस सर्व मिसर देशात निबिड अंधकार झाला.
22 Moisés levantou a mão para o céu, e durante três dias uma grande escuridão cobriu todo o Egito.
23 कोणालाही काहीही दिसेना आणि म्हणून कोणीही उठून तीन दिवस आपले घर सोडून गेले नाही; परंतु जिथे इस्राएली लोकांची वस्ती होती तेथे प्रकाश होता.
23 Os egípcios não podiam ver uns aos outros, e naqueles dias ninguém saiu de casa. Porém em todas as casas dos israelitas havia claridade.
24 तेव्हा फारोने मोशेला बोलावले. तो म्हणाला, “तुम्ही जा व तुमच्या परमेश्वराची उपासना करा. तुम्ही तुमची मुलेबाळेही बरोबर न्या. परंतु तुमचे कळप व गुरेढोरे येथेच राहिली पाहिजेत.”
24 Aí o rei mandou chamar Moisés e lhe disse: — Vocês podem ir adorar a Deus, o
25 मोशे म्हणाला, “आमचा देव परमेश्वर याच्यासाठी यज्ञ करण्यास यज्ञपशू व होमबली तू आमच्या हाती दिले पाहिजेत.
25 Moisés respondeu: — Nesse caso o senhor deveria nos dar os animais para oferecermos em
26 यज्ञ व होमार्पणासाठी आम्ही आमची गुरेढोरेही आमच्याबरोबर नेऊ. एक खूरही आम्ही मागे ठेवणार नाही. आमचा देव परमेश्वर याला यज्ञ व होमार्पण करण्यासाठी यातूनच घ्यावे लागेल आणि परमेश्वराची सेवा करण्यास आम्हांला काय लागेल ते आम्ही तेथे पोहचेपर्यंत सांगता येणार नाही;”
26 Nós não queremos isso. Nós vamos levar também os nossos animais, e não ficará nenhum, pois temos de escolher alguns para usá-los na adoração a Deus, o Senhor . Enquanto não chegarmos lá, não saberemos quais os animais que deveremos oferecer em sacrifício ao Senhor .
27 परमेश्वराने फारोचे मन पुन्हा कठीण केले. तेव्हा फारो इस्राएली लोकांस जाऊ देईना.
27 Porém o Senhor fez com que o rei continuasse teimando, e este não deixou que os israelitas saíssem do Egito.
28 मग फारो मोशेवर ओरडला व म्हणाला, “तू येथून चालता हो! आपले तोंड मला पुन्हा दाखवू नकोस! यानंतर तू आपले तोंड मला दाखवशील त्या दिवशी तू मरशील!”
28 O rei disse a Moisés: — Saia da minha presença e nunca mais apareça aqui! Pois, no dia em que tornar a me ver, você morrerá!
29 मोशे म्हणाला, “तू बरोबर बोललास, मी तुझे तोंड पुन्हा कधीही पाहणार नाही!”
29 — O senhor está certo — respondeu Moisés. — Nunca mais eu o verei.
Atalhos do teclado
- Capítulo anterior←
- Próximo capítulo→
- Versículo anteriork
- Próximo versículoj
- Limpar seleçãoEsc
- Esta ajuda?
Estude este capítulo no WhatsApp
Peça à IA da Bíblia Fala para explicar Êxodo 10, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.