Eclesiastes 7

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (MAR)

1 किंमती सुगंधी द्रव्यापेक्षा चांगले नाव असणे हे उत्तम आहे,

2 मेजवाणीच्या घरी जाण्यापेक्षा,

3 हास्यापेक्षा शोक करणे चांगले आहे.

4 शहाण्याचे मन शोक करणाऱ्याच्या घरात असते,

5 मूर्खाचे गायन ऐकण्यापेक्षा

6 भांड्याखाली जळत असलेल्या काट्यांच्या कडकडण्यासारखे

7 पिळवणूक खात्रीने शहाण्या मनुष्यास मूर्ख करते

8 एखाद्या गोष्टीच्या सुरुवातीपेक्षा तिचा शेवट उत्तम आहे.

9 तू आपल्या आत्म्यात रागावयाला उतावळा असू नको.

10 या दिवसापेक्षा पूर्वीचे दिवस बरे होते, हे का? असे म्हणू नको.

11 आमच्या पूर्वजापासून आम्हास वतनाबरोबर मिळालेल्या मौल्यवान वस्तूपेक्षा शहाणपण असल्यास अति उत्तम आहे.

12 कारण जसा पैसा रक्षणाची तरतूद करतो तसेच ज्ञानपण रक्षणाची तरतूद करू शकते.

13 देवाच्या कृत्यांचा विचार कराः

14 जेव्हा समय चांगला असतो, तेव्हा त्या समयात आनंदाने राहा.

15 मी माझ्या अर्थहीन दिवसात पुष्कळ गोष्टी पाहिल्या आहेत.

16 स्वनीतिमान होऊ नका,

17 दुष्टतेचा किंवा मूर्खतेचा अतिरेक करू नका,

18 तू हे ज्ञान धरून ठेवावे ते चांगले आहे,

19 एका शहरातील दहा अधिकाऱ्यांपेक्षा ज्ञान शहाण्या मनुष्यास अधिक बलवान करते,

20 जो कोण चांगले करतो आणि कधीही पाप करत नाही.

21 बोललेले प्रत्येक शब्द ऐकू नका.

22 त्याचप्रमाणे, तुझ्या स्वतःच्या मनास तुला माहित आहे

23 मी हे सर्व माझ्या ज्ञानाने सिद्ध केले. मी म्हणालो,

24 ज्ञान जे आहे ते दूर व फारच खोल आहे. ते कोण शोधू शकेल?

25 मी माझे मन अभ्यास आणि निरीक्षण याकडे वळवले.

26 मला मृत्यूपेक्षाही अधिक कडू अशी पाशरूप असलेली स्त्री सापडली,

27 मी काळजीपूर्वक काय शोधून काढले, उपदेशक म्हणतो, मी वास्तविकतेचे स्पष्टीकरण करण्यासाठी एका मागून एक गोळाबेरीज शोधून एकत्र केल्या.

28 मी माझ्या मनात अजूनही त्याचा शोध करीत आहे, परंतु मला हे मात्र सापडले नाही. मला हजारात एक नीतिमान मनुष्य मिळाला. पण मला सर्व स्त्रियात एकही सापडली नाही.

29 मला यातून सापडले की, देवाने मनुष्यास सरळ असे निर्माण केले पण तो अनेक योजनांच्या मागे गेले आहे.

Ler em outra tradução

Comparar lado a lado

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Eclesiastes 7, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.