Deuteronômio 6

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (MAR) vs BKJ

Sair da comparação
1 तुमचा देव परमेश्वर ह्याने तुम्हास सांगण्यासाठी सांगितलेले विधी, नियम व आज्ञा दिल्या त्या या आहेत. जो प्रदेश तुम्ही वतन करून घेण्यासाठी यार्देनेच्या पैलतीरी जात आहात तेथे हे नियम पाळा.
1 Agora estes são os mandamentos, os estatutos e os juízos que o SENHOR vosso Deus ordenou que vos ensinasse, para que pudésseis cumpri-los na terra que vais possuir;
2 तुम्ही, तुमची मुले व नातवंडे या सर्वांनी आमरण आपला देव परमेश्वर याचे भय धरावे. त्याने घालून दिलेले नियम पाळावे, म्हणजे तुम्ही दीर्घायुषी व्हाल.
2 para que possas temer o SENHOR teu Deus, para guardar todos os seus estatutos e mandamentos, que eu te ordeno, a ti, e a teu filho, e ao filho do teu filho, todos os dias da tua vida, e para que se prolonguem os teus dias.
3 इस्राएल लोकहो, काळजीपूर्वक ऐका व हे नियम पाळा. मग तुमचे कल्याण होईल. तुम्ही बहुगुणित व्हाल आणि तुमच्या देशात दुधामधाचे पाट वाहतील. परमेश्वर देवाने कबूल केल्याप्रमाणे सर्वकाही मिळेल.
3 Portanto ouve, ó Israel, e guarda-os, para que tudo te vá bem, e para que te multipliques, como o SENHOR Deus dos teus pais te prometeu, na terra que mana leite e mel.
4 हे इस्राएल लोकहो, ऐका! परमेश्वर हाच आपला देव आहे. परमेश्वर एकच आहे.
4 Ouve, ó Israel: O SENHOR nosso Deus é o único SENHOR.
5 आणि आपला देव परमेश्वर ह्यावर संपूर्ण अंत:करणाने, संपूर्ण मनाने व संपूर्ण शक्तीने प्रेम करा.
5 E amarás ao SENHOR teu Deus com todo o teu coração, e com toda a tua alma, e com todas as suas forças.
6 मी आज दिलेल्या आज्ञा तुमच्या कायम लक्षात असू द्या.
6 E estas palavras, que te ordeno neste dia, estarão no teu coração;
7 त्या आपल्या मुलाबाळांनाही शिकवा. घरी-दारी, झोपता उठता त्याविषयी बोलत राहा.
7 e as ensinarás diligentemente a teus filhos, e falarás delas, quando te assentares em tua casa, e quando andares pelo caminho, e quando te deitares, e quando te levantares.
8 त्या लिहून आठवणीसाठी हाताला चिन्हादाखल बांधा व कपाळावर चिकटवा.
8 E as levarás atadas como sinal em tua mão, e elas serão como testeiras entre os teus olhos,
9 दरवाजाच्या खांबांवर व फाटकांवर त्या लिहून ठेवा.
9 e as escreverás nos umbrais de tua casa e nas tuas portas.
10 अब्राहाम, इसहाक आणि याकोब या तुमच्या पूर्वजांना तुम्हास हा देश देण्याचे तुमचा देव परमेश्वर ह्याने वचन दिले होते. तो तुम्हास मिळेल. तुम्ही स्वत: वसवलेली नाहीत अशी मोठी, समृध्द नगरे तो तुम्हास देईल.
10 E acontecerá que, quando o SENHOR teu Deus tiver te trazido à terra que jurou aos teus pais, a Abraão, a Isaque, e a Jacó, dar-te cidades grandes e boas, que tu não edificaste,
11 उत्तम वस्तूंनी भरलेली घरे परमेश्वर तुम्हास देईल. तुम्हास खोदाव्या न लागलेल्या विहिरी परमेश्वर तुम्हास देईल. तुम्ही लागवड न केलेले द्राक्षांचे आणि जैतून वृक्षांचे मळे तुम्हास देईल. आणि मुबलक अन्नधान्याने तुम्ही तृप्त व्हाल.
11 e casas cheias de todas as boas coisas, que não encheste, e poços cavados, que não cavaste, e vinhas e oliveiras, que não plantaste; quando comeres e te saciares;
12 पण सावध राहा! परमेश्वरास विसरु नका. मिसरमध्ये तुम्ही गुलाम होता पण तेथून त्याने तुम्हास बाहेर आणले.
12 então cuidado, para que não te esqueças do SENHOR, que te tirou da terra do Egito, da casa de servidão.
13 तुमचा देव परमेश्वर याचे भय धरा व त्याचीच सेवा करा. शपथ घेताना त्याच्या नावाने शपथ वाहा, खोट्या देवांच्या नावाने वाहू नका.
13 Temerás ao SENHOR teu Deus, e o servirás, e jurarás pelo seu nome.
14 तुमच्या आसपासच्या राष्ट्रांतील लोकांच्या दैवतांच्या नादी लागू नका.
14 Não buscareis outros deuses, os deuses dos povos que houver à sua volta;
15 कारण तुमच्यामध्ये असणारा तुमचा देव परमेश्वर ईर्ष्यावान आहे. त्याच्या लोकांनी इतर दैवतांची पूजा केलेली परमेश्वरास आवडत नाही. भलत्याच दैवतांची तुम्ही पूजा केल्यास त्याचा कोप होईल. त्या क्रोधाने तो तुम्हास पृथ्वीच्या पाठीवरुन नष्ट करील.
15 (porque o SENHOR teu Deus é um Deus ciumento entre vós), para que a ira do SENHOR teu Deus não se acenda contra ti, e não te destrua da face da terra.
16 मस्सा येथे तुम्ही आपला देव परमेश्वर याची परीक्षा पाहिलीत, तसे इथे करु नका.
16 Não tentareis ao SENHOR vosso Deus, como o tentastes em Massá.
17 तुमचा देव परमेश्वर ह्याने दिलेल्या आज्ञा कटाक्षाने पाळा. त्याच्या शिकवणीचे व नियमांचे पालन करा.
17 Guardareis diligentemente os mandamentos do SENHOR vosso Deus, e os seus testemunhos, e os seus estatutos, que ele vos ordenou.
18 उचित आणि चांगले आहे तेच करा. त्यानेच परमेश्वर प्रसन्न होतो. त्याने तुमचे कल्याण होईल. परमेश्वराने जो चांगला प्रदेश तुम्हास द्यायचे तुमच्या पूर्वजांना कबूल केले आहे, त्यामध्ये तुमचा प्रवेश होऊन त्याचे वतन तुम्हास मिळेल.
18 E farás o que é correto e bom aos olhos do SENHOR; para que tudo vá bem contigo e para que possas entrar e possuir a boa terra que o SENHOR jurou a teus pais,
19 परमेश्वराने कबूल केल्याप्रमाणे, तुम्ही आपल्या शत्रूंना हुसकावून लावाल.
19 para que expulses todos os teus inimigos de diante de ti, como o SENHOR falou.
20 आपल्या परमेश्वर देवाने जी शिकवण दिली, विधी नियम सांगितले त्याचा अर्थ काय असे पुढे तुमची मुले विचारतील.
20 E quando teu filho te perguntar, no tempo que virá, dizendo: O que significam os testemunhos, e os estatutos, e os juízos que o SENHOR nosso Deus vos ordenou?
21 तेव्हा त्यांना सांगा की आम्ही मिसरमध्ये फारोचे गुलाम होतो. परंतु परमेश्वराने आपल्या प्रचंड सामर्थ्याने आम्हास तेथून बाहेर आणले.
21 Então dirás a teu filho: Nós éramos servos de Faraó no Egito, mas o SENHOR nos tirou do Egito com mão forte;
22 परमेश्वराने मिसरी लोक, फारो व त्याचे कुटुंब यांच्याविरूद्ध मोठे प्रभावी चमत्कार करून दाखवले ते आम्ही प्रत्यक्ष पाहिले आहेत.
22 e o SENHOR mostrou sinais e prodígios, grandes e dolorosos ao Egito, a Faraó, e a toda sua casa, diante de nossos olhos;
23 आपल्या पूर्वजांना कबूल केलेला प्रदेश आपल्याला द्यायला त्याने आम्हांला मिसरमधून बाहेर आणले.
23 e nos tirou de lá, para que pudesse nos trazer, para nos dar a terra que jurou aos nossos pais.
24 ही सर्व शिकवण पाळायची आज्ञा परमेश्वराने आम्हास दिली आहे. आपण आपला देव परमेश्वर ह्याचे भय बाळगावे. मग तो आपल्याला कायम जिवंत ठेवील व आपले भले करील.
24 E o SENHOR ordenou que fizéssemos todos estes estatutos, que temêssemos ao SENHOR nosso Deus para o nosso bem eterno, para que ele pudesse nos preservar vivos, como somos neste dia.
25 जर आपण काळजीपूर्वक आपला देव परमेश्वर याचे सर्व नियम पाळले तर ते आपले नीतिमत्व ठरेल.
25 E será nossa justiça, se observarmos todos esses mandamentos diante do SENHOR nosso Deus, como ele nos ordenou.

Ler em outra tradução

Comparar com outra

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Deuteronômio 6, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.