Deuteronômio 4

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (MAR) vs VC

Sair da comparação
VC Versão Católica
1 आता अहो इस्राएल लोकहो, मी जे नियम आणि आज्ञा सांगतो त्या नीट ऐकून घ्या. त्यांचे पालन केलेत तर जिवंत रहाल आणि तुमच्या पूर्वजांचा देव परमेश्वर जो देश तुम्हास देणार आहे त्याचा ताबा घ्याल.
1 E agora, ó Israel, ouve as leis e os preceitos que hoje vou ensinar-vos. Ponde-os em prática para que vivais e entreis na posse da terra que o Senhor, Deus de vossos pais, vos dá.
2 माझ्या आज्ञांमध्ये तुम्ही कमी किंवा अधिक असे काही करु नका. अशासाठी की, तुमचा देव ह्याच्या ज्या आज्ञा मी तुम्हास देत आहे. त्या तुम्ही पाळाव्या.
2 Não ajuntareis nada a tudo o que vos prescrevo, nem tirareis nada daí, mas guardareis os mandamentos do Senhor, vosso Deus, exatamente como vos prescrevi.
3 बआल-पौराच्या विषयी परमेश्वराने काय केले हे तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पाहीले आहे; जे बआल-पौराच्या नादी लागले त्यांना तुमचा देव परमेश्वर याने तुमच्यामधून नष्ट केले आहे.
3 Os vossos olhos viram o que o Senhor fez a Baal-Fogor, como exterminou todos aqueles dentre vós que tinham seguido o Baal de Fogor.
4 परंतु तुमचा देव परमेश्वर याच्याशी जे जडून राहिले ते तुम्ही आज जिवंत आहा.
4 Mas vós, que estais unidos ao Senhor, vosso Deus, estais hoje todos vivos.
5 पाहा माझा देव परमेश्वर याने आज्ञा दिली त्याप्रमाणे विधी आणि नियम मी तुम्हास शिकवले. तुम्ही जो देश ताब्यात घेण्यास जात आहात तेथे तुम्ही ते पाळावे म्हणून मी ते सांगितले.
5 Vede: ensinei-vos leis e ordenações, conforme o Senhor, meu Deus, me ordenou, a fim de as praticardes na terra que ides possuir.
6 त्यांचे काटेकोरपणे पालन करा. म्हणजे तुम्ही सूज्ञ व समजूतदार आहात हे इतर देशवासीयांना कळेल. हे नियम ऐकून ते म्हणतील, खरेच, हे महान राष्ट्र बुद्धिमान व समंजस लोकांचे आहे.
6 Observai-as, praticai-as, porque isto vos tornará sábios e inteligentes aos olhos dos povos, que, ouvindo todas essas prescrições, dirão: eis uma grande nação, um povo sábio e inteligente. _
7 आपण आपला देव परमेश्वर ह्याचा धावा करतो तेव्हा तो आपल्या जवळच असतो, असे देव जवळ असणारे महान राष्ट्र दूसरे कोणते आहे?
7 Haverá, com efeito, nação tão grande, cujos deuses estejam tão próximos de si como está de nós o Senhor, nosso Deus, cada vez que o invocamos?
8 ज्या विधी आणि नियमांची शिकवण मी तुम्हास दिली तसे नियमशास्त्र असणारे दुसरे राष्ट्र तरी कोठे आहे?
8 Qual é a grande nação que tem mandamentos e preceitos tão justos como esta lei que vos apresento hoje?
9 पण तुम्ही हे डोळ्यांत तेल घालून जपले पाहिजे. नाहीतर तुम्ही ज्या गोष्टी पाहिल्या आहेत त्या विसरून जाल. आपल्या मुला-नातवंडांना त्याची माहिती द्या.
9 Guarda-te, pois, a ti mesmo: cuida de nunca esquecer o que viste com os teus olhos, e toma cuidado para que isso não saia jamais de teu coração, enquanto viveres; e ensina-o aos teus filhos, e aos filhos de teus filhos.
10 ज्या दिवशी तुम्ही सर्व होरेब पर्वतापाशी तुमचा देव परमेश्वर याच्यामोर उभे होता, तो दिवस आठवा. परमेश्वर मला म्हणाला होता, मला काही सांगायचे आहे तेव्हा सर्वांना एकत्र बोलाव, म्हणजे आयुष्यभर ते माझ्याबद्दल भय बाळगतील. आपल्या मुलाबाळांनाही तशीच शिकवण देतील.
10 Lembra-te do dia em que te apresentaste diante do Senhor teu Deus em Horeb, quando o Senhor me falou, dizendo: ajunta-me o povo, para que ouçam as minhas palavras, e aprendam a temer-me ao longo de toda a sua vida, e o ensinem aos seus filhos.
11 मग तुम्ही जवळ आलात व पर्वताच्या पायथ्याशी उभे राहिलात. तेव्हा डोंगर उभा पेटला होता व त्याच्या ज्वाला आकाशाला भिडल्या होत्या. सर्वत्र काळेकुट्ट ढग आणि अंधार पसरला होता.
11 Aproximastes-vos então e estivestes ao pé do monte: e eis que o abrasava um fogo que subia até as profundezas do céu, onde havia trevas, nuvens e escuridão.
12 परमेश्वर त्या अग्नीतून तुमच्याशी बोलला. तुम्हास आवाज ऐकू आला पण तुम्ही कोणती आकृतीही पाहीली नाही, फक्त वाणी ऐकू आली.
12 Do meio do fogo o Senhor falou. Ouvistes o som de suas palavras, mas não víeis no entanto nenhuma forma, somente uma voz.
13 परमेश्वराने आपला करार करून तुम्हास सांगितले. त्याने तुम्हास दहा आज्ञा सांगितल्या व त्यांचे पालन करण्याविषयी तुम्हास आज्ञा दिली. त्याने त्या आज्ञा दोन दगडी पाट्यांवर लिहून दिल्या.
13 Ele deu-vos a conhecer a sua aliança, e ordenou-vos que a observásseis: as dez palavras que escreveu nas duas tábuas de pedra.
14 त्याचवेळी तुम्ही ज्या देशात वस्ती करणार होता, तेथे पाळण्यासाठी आणखीही काही विधी नियम परमेश्वराने मला तुम्हास शिकवण्यास सांगितले.
14 Ordenou-me o Senhor naquele mesmo tempo que vos ensinasse as leis e os preceitos que deveríeis observar na terra que ides possuir.
15 होरेब पर्वतावरुन अग्नीतून परमेश्वर तुमच्याशी बोलला. त्यादिवशी तो तुम्हास दिसला नाही. कारण त्यास कोणताही आकार नव्हता.
15 Tende cuidado com a vossa vida. No dia em que o Senhor, vosso Deus, vos falou do seio do fogo em Horeb, não vistes figura alguma.
16 तेव्हा जपून असा. कोणत्याही सजीवाची प्रतिमा किंवा खोटी दैवते उभारण्याचे पाप करून स्वत:ला बिघडवू नका. स्त्री किंवा पुरुषासारखी दिसणारी मूर्ती करु नका.
16 Guardai-vos, pois, de fabricar alguma imagem esculpida representando o que quer que seja, figura de homem ou de mulher,
17 जमिनीवरील संचार करणारे प्राणी किंवा आकाशात उडणारा पक्षी,
17 representação de algum animal que vive na terra ou de um pássaro que voa nos céus,
18 जमिनीवर सरपटणारा जीव किंवा समुद्रातील मासा अशासारख्या कशाचीही प्रतीमा करू नका.
18 ou de um réptil que se arrasta sobre a terra, ou de um peixe que vive nas águas, debaixo da terra.
19 तसेच आकाशातील सूर्य, चंद्र, तारे आणि इतर गोष्टी पाहाताना हबकून जावू नका. त्यांच्यापुढे लोटांगण घालून त्यांची उपासना करु नका. या गोष्टी तुमचा देव परमेश्वर याने आकाशाखालील सर्व लोकांस देऊन ठेवल्या आहेत.
19 Quando levantares os olhos para o céu, e vires o sol, a lua, as estrelas, e todo o exército dos céus, guarda-te de te prostrar diante deles e de render um culto a esses astros, que o Senhor, teu Deus, deu como partilha a todos os povos que vivem debaixo do céu.
20 पण तुम्हास परमेश्वराने मिसर देशाबाहेर आणले आणि तुम्हास स्वत:चे खास लोक केले. जणू लोखंड वितळविन्याच्या धधगत्या भट्टीतून त्याने तुम्हास बाहेर काढले आणि तुम्ही त्याच्या वतनाचे लोक आहा!
20 Quanto a vós, o Senhor vos escolheu e vos retirou da fornalha de ferro que era o Egito, para serdes o seu povo, o povo de sua herança, como o sois presentemente.
21 तुमच्यामुळे परमेश्वराचा माझ्यावर कोप झाला व त्याने शपथेने सांगितले की मी यार्देन नदीपलीकडे पाऊल ठेवू शकणार नाही. तुमचा देव परमेश्वर याने तुम्हास दिलेल्या वतनात तुम्ही प्रवेश करणार आहात, तेथे मला प्रवेश नाही.
21 O Senhor irritou-se contra mim por causa de vós, e jurou que eu não passaria o Jordão, nem entraria na boa terra que ele, o Senhor, vosso Deus, vos dá como herança.
22 त्यामुळे मी येथेच देह ठेवणार आहे. मी यार्देन नदीपलीकडे येऊ शकत नसलो तरी तुम्ही तो चांगला प्रदेश ताब्यात घ्या.
22 Vou morrer nesta terra, sem atravessar o Jordão; mas vós o passareis e possuireis essa boa terra.
23 तेथे तुमचा देव परमेश्वर ह्याने तुमच्याशी केलेला पवित्र करार विसरू नका व त्याच्या आज्ञा पाळा. कोणत्याही प्रकारे कोणत्याही आकाराची मूर्ती करु नका.
23 Tende cuidado para não esquecer a aliança que o Senhor, vosso Deus, fez convosco, e não façais uma imagem esculpida, representando o que quer que seja, como vos proibiu o Senhor vosso Deus,
24 कारण मूर्तीपूजेचा त्यास तिटकारा आहे. परमेश्वर देव ईर्ष्यावान असून तो क्षणात भस्म करणारा अग्नी आहे.
24 porque o Senhor vosso Deus é um fogo devorador, um Deus zeloso.
25 तुम्हास पुत्रपौत्र होऊन त्या देशात तुम्ही दीर्घकाळ राहिल्यावर जर तुम्ही बिघडून कोणत्याही वस्तूची कोरीव मूर्ती कराल आणि आपला देव परमेश्वर ह्याच्या दृष्टीने जे वाईट ते कराल तर त्यास क्रोध येईल.
25 Quando tiverdes filhos e netos, e, depois de vos terdes envelhecido nessa terra, vos corromperdes e fabricardes alguma imagem esculpida do que quer que seja, fazendo o que é mau aos olhos de vosso Deus e provocando assim a sua ira
26 तर आज मी तुम्हास सावध करत आहे; याला स्वर्ग आणि पृथ्वी साक्षी आहेत, ज्या देशाचे वतन मिळवायला तुम्ही यार्देन नदी ओलांडून जात आहात तेथून तुमचा लवकरच अगदी नायनाट होईल; तेथे तुम्ही फार दिवस राहणार नाहीत, पण तुमचा समूळ नाश होईल.
26 _ tomo hoje como testemunha contra vós os céus e a terra _, certamente não tardareis a desaparecer da terra cuja possessão ides tomar agora, depois de atravessado o Jordão. Não prolongareis nela os vossos dias, mas sereis exterminados.
27 परमेश्वर देव तुम्हास वेगवेगळ्या राष्ट्रात विखरून टाकील. आणि जेथे जेथे तो पाठवील तेथे तुमची संख्या अगदीच अल्प राहील.
27 O Senhor vos espalhará entre todos os povos, e restareis poucos entre as nações, aonde vos conduzir o Senhor.
28 तेथे तुम्ही मनुष्यांनी घडवलेल्या दगडी अगरलाकडी दैवतांची, जे पाहू शकत नाहीत, ऐकत नाहीत, खात नाहीत की वास घेत नाहीत अशांची सेवा कराल.
28 Lá, adorareis deuses feitos pela mão do homem, deuses de madeira e de pedra, que não podem ver, nem ouvir, nem comer, nem sentir.
29 परंतु तेथूनही तुम्ही परमेश्वरास, आपल्या देवाला पूर्ण जिवेभावे शरण गेला तर तो तुम्हास पावेल.
29 Então procurarás o Senhor, teu Deus, e o encontrarás, contanto que o busques de todo o teu coração e de toda a tua alma.
30 या सर्व गोष्टी घडतील, तुम्ही संकटात पडाल तेव्हा तुम्ही पुन्हा आपला देव परमेश्वर ह्याच्याकडेच परतून याल व त्यास शरण जाल.
30 Quando todos esses males tiverem caído sobre ti, mais tarde, em tal tribulação voltar-te-ás para o Senhor, teu Deus, e ouvirás a sua voz,
31 आपला देव परमेश्वर दयाळू आहे. तो तुम्हास अंतर देणार नाही. तो तुमचा सर्वनाश होऊ देणार नाही. तो तुमच्या पूर्वजांशी त्याने शपथपूर्वक केलेला करार तो विसरणार नाही.
31 porque o Senhor é um Deus misericordioso, e ele não te quer abandonar nem te extinguir, e não se esquecerá da aliança que jurou aos teus pais.
32 असा चमत्कार कधी घडला आहे का? कधीच नाही. पूर्वीचे आठवून बघा. तुमच्या जन्मा आधीपासूनच्याही सर्व गोष्टी आठवा. देवाने पृथ्वीवर मनुष्य निर्माण केला. तेव्हापासून आजपर्यंत जगाच्या कानाकोपऱ्यात घडलेल्या सर्व गोष्टी पाहा. असा महान चमत्कार कोणाच्या ऐकण्यात तरी आहे का?
32 Escruta os tempos que te precederam, desde o dia em que Deus criou o homem na terra. Pergunta se houve jamais, de uma extremidade dos céus à outra, uma coisa tão extraordinária como esta, e se jamais se ouviu coisa semelhante.
33 अग्नीमधून साक्षात देव तुमच्याशी बोलला, ते तुम्ही ऐकले आणि तरीही तुम्ही जिवंत आहात. असे कधी दुसऱ्या राष्ट्राच्या बाबतीत घडले आहे?
33 Houve, porventura, um povo que, como tu, tenha ouvido a voz de Deus falando do seio do fogo, sem perder a vida?
34 दुसऱ्या राष्ट्रात जाऊन त्यातून एक राष्ट्र आपलेसे करायचे असा दुसऱ्या कुठल्या देवाने प्रयत्न तरी केला आहे का? नाही ना? पण आपल्या परमेश्वर देवाने मिसर देशात तुमच्यासाठी महान गोष्टी केल्याचे तुम्ही स्वत: पाहिले, त्याने तुमच्यासाठी संकटे, चिन्हे, चमत्कार, युद्धे, पराक्रमी हात आणि उगारलेला भूज ह्याद्ववारे भयप्रद कार्ये केली.
34 Algum deus tentou jamais escolher para si uma nação do meio de outra, por meio de provas e de sinais, de prodígios e de guerras, com mão poderosa e braço estendido, e de prodígios espantosos, como o Senhor, vosso Deus, fez por vós no Egito diante de vossos olhos?
35 परमेश्वर हाच खरा देव आहे हे तुम्हास कळावे म्हणून त्याने तुम्हास हे दाखवले. त्याच्यासारखा दुसरा देव नाही.
35 Tu foste testemunha de tudo isso para que reconheças que o Senhor é Deus, e que não há outro fora dele.
36 तुम्हास शिकवण द्यावी म्हणून त्याने आकाशातून आपली वाणी ऐकवली. पृथ्वीवर आपला महान अग्नी त्याने दाखवला व त्यातून त्याचे शब्द तुम्ही ऐकले.
36 Fez-te ouvir a sua voz do céu para a tua instrução, e na terra mostrou-te o seu grande fogo, e o ouviste falar do meio das chamas.
37 त्याचे तुमच्या पूर्वजांवर प्रेम होते. म्हणून त्याने तुमची निवड केली. त्यामुळेच त्याने तुम्हास आपल्या महान सामर्थ्याने मिसर देशातून बाहेर आणले. तो तुमच्या पाठीशी राहिला.
37 Porque amou teus pais, e elegeu a sua posteridade depois deles, tirou-te do Egito com a força de seu poder,
38 तुम्ही जसे पुढे जाल तसे त्याने तुमच्यापेक्षा मोठ्या व समर्थ राष्ट्रांना हुसकून लावले आणि तेथे तुमचा शिरकाव करून दिला. त्यांचा प्रदेश त्याने तुम्हास राहण्यासाठी दिला. आजही तो हे करत आहे.
38 despojando em teu favor povos mais numerosos e mais robustos do que tu, para introduzir-te em suas terras e dá-las a ti em herança, como estás vendo hoje.
39 तेव्हा, वर आकाशात आणि खाली पृथ्वीवर परमेश्वर हाच देव आहे, दुसरा कोणीही नाही. हे आज तुम्ही नीट समजून घ्या व लक्षात ठेवा.
39 Sabe, pois, agora, e grava em teu coração que o Senhor é Deus, e que não há outro em cima no céu, nem embaixo na terra.
40 आज मी तुम्हास त्याचे नियम व आज्ञा सांगणार आहे, त्या पाळा. त्याने तुमचे व तुमच्या मुलाबाळांचे भले होईल. तुमच्या परमेश्वर देवाने दिलेल्या प्रदेशात तुमचे वास्तव्य दीर्घकाळ राहील. तो प्रदेश कायमचा तुमचाच होईल.
40 Observa suas leis e suas prescrições que hoje te prescrevo, para que sejas feliz, tu e teus filhos depois de ti, e prolongues teus dias para sempre na terra que te dá o Senhor, teu Deus.
41 मग मोशेने यार्देन नदीच्या पूर्वेला तीन नगरांची निवड केली.
41 Então Moisés separou três cidades além do Jordão, a oriente,
42 अशासाठी की, पूर्वी काही वैर नसताना, अजाणतेपणी एखाद्याने कोणाची चुकून हत्या केली तर त्यास ह्यातल्या एखाद्या नगराचा आसरा घेता यावा. मृत्यूदंडाला सामोरे जावे लागू नये.
42 para que se refugiasse nelas o homicida que tivesse matado alguém por imprudência, sem ódio premeditado, e pudesse assim conservar a sua vida refugiando-se ali.
43 ती नगरे अशी: रऊबेन वंशासाठी रानातील माळावरचे बेसेर नगर, गाद वंशासाठी गिलाद प्रदेशातील रामोथ नगर आणि मनश्शेच्या वंशासाठी बाशान प्रदेशातील गोलान नगर.
43 Estas são as cidades: Bosor, no deserto, na terra do planalto, para os rubenitas; Ramot, em Galaad, para os gaditas, e Golã, em Basã, para os manassitas.
44 इस्राएल लोक मिसर देशातून बाहेर पडल्यावर मोशेने त्यांना हे नियमशास्त्र, दिले.
44 Eis a lei que Moisés apresentou aos israelitas:
45 इस्राएली लोक मिसरातून बाहेर आले तेव्हा मोशेने हे निर्बंध सांगितले. ते बेथपौरच्या समोरच्या खोऱ्यात यार्देन नदीच्या पूर्वेला होते.
45 estes são os mandamentos, as leis e os preceitos que Moisés propôs aos israelitas depois de sua partida do Egito,
46 म्हणजेच हेशबोन नगरातील अमोऱ्यांचा राजा सीहोन याला पराजित केले त्याच्या देशात यार्देनेच्या पूर्वेस म्हणजे बेथ-पौराच्या समोरील खोऱ्यात (मोशे आणि इस्राएलाच्या लोकांनी मिसर देशातून बाहेर पडल्यावर सीहोनचा पराभव केला होता.)
46 do outro lado do Jordão, no vale situado em frente de Bet-Fogor, na terra de Seon, rei dos amorreus, que habitava em Hesebon. Moisés e os israelitas os tinham vencido depois de sua saída do Egito,
47 त्यांनी हा देश आणि बाशानाचा राजा ओग याचाही देश ताब्यात घेतला. अमोऱ्यांचे हे दोन्ही राजे यार्देन नदीच्या पूर्वेकडे राहत असत.
47 e tinham conquistado a sua terra, assim como a de Og, rei de Basã {os dois reis dos amorreus que ocupavam a região além do Jordão},
48 आर्णोन खोऱ्याच्या सीमेवरील अरोएर नगरापासून सरळ सिर्योन (म्हणजेच हर्मोन) पर्वतापर्यंत हा प्रदेश पसरलेला आहे.
48 desde Aroer, situada sobre a margem da torrente do Arnon, até a montanha de Sirion, também chamada Hermon,
49 यार्देन नदीच्या पूर्वेकडील संपूर्ण खोरे, दक्षिणेला अराबा (मृत) समुद्रापर्यंतचा विस्तार, आणि पूर्वेला पिसगा पर्वताच्या पायथ्यापर्यंत एवढा हा प्रदेश त्यांनी काबीज केला होता.
49 e toda a planície que se estende além do Jordão, ao oriente, até o mar da planície, ao pé do Fasga.

Ler em outra tradução

Comparar com outra

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Deuteronômio 4, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.