Deuteronômio 30

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (MAR) vs VC

Sair da comparação
VC Versão Católica
1 मी सांगितलेल्या या सर्व गोष्टी तुमच्याबाबतीत घडतील. आशीर्वाद तसेच शापही खरे होतील. तुमचा देव परमेश्वर तुम्हास इतर राष्ट्रांमध्ये घालवून देईल. तेव्हा तुम्हास या सर्व गोष्टींची आठवण होईल.
1 Quando, pois, tiverem acontecido todas essas coisas e postas diante de ti a bênção ou a maldição, se tu as tomares a peito no meio de todas as nações entre as quais o Senhor, teu Deus, te tiver espalhado,
2 तेव्हा तुम्ही तुमच्या मुलांबाळासह संपूर्ण मनाने व संपुर्ण जीवाने तुमचा देव परमेश्वर ह्याच्याकडे वळाल आणि मी आज दिलेल्या सर्व आज्ञांचे पालन करून त्याची वाणी ऐकाल.
2 e voltares então para o Senhor, e obedeceres à sua voz de todo o teu coração e de toda a tua alma, tu e os teus filhos, conformando-vos a tudo o que hoje vos ordeno,
3 तेव्हा तुमचा देव परमेश्वर तुमच्यावर दया दाखवील आणि ज्या ज्या राष्ट्रांमध्ये तुझी पांगापांग केली असेल तेथून तुला पुन्हा एकत्र आणील तो तुम्हास मुक्त करील.
3 então o Senhor, teu Deus, reconduzirá teus cativos e terá piedade de ti, e te ajuntará de novo do meio das nações entre as quais te houver espalhado.
4 तुमची त्याने जेथे जेथे पांगापांग करून टाकली होती तेथून तुझा देव परमेश्वर तुम्हास परत आणील. मग ते देश किती का लांबचे असेनात!
4 Ainda que os teus exilados se encontrassem na extremidade dos céus, dali te tiraria o Senhor, teu Deus, e ali mesmo iria ele buscar-te.
5 पुन्हा आपल्या पूर्वजांच्या देशात तुम्ही याल आणि तो देश तुमचा होईल. परमेश्वर तुमचे कल्याण करील आणि पूर्वजांना मिळाले त्यापेक्षा कितीतरी अधिक कल्याण करील आणि तुम्हास अधीक बहूगुणीत करील.
5 O Senhor, teu Deus, te reconduzirá à terra que possuíam os teus pais e te dará a sua possessão. E far-te-á prosperar e multiplicar mais que os teus pais.
6 तुमचा देव परमेश्वर तुमच्या हृदयाची सुंता व तुमच्या पुर्वंजांच्या हृदयाची सुंता करील आणि आपण जिवंत रहावे म्हणून तुम्ही आपला देव परमेश्वर ह्यांच्यावर संपूर्ण मनाने व संपुर्ण जीवाने प्रेम कराल.
6 O Senhor, teu Deus, circuncidar-te-á o coração e o de tua descendência, para que ames o Senhor de todo o teu coração e de toda a tua alma, a fim de que possas viver.
7 मग हे सर्व शाप तुमचा देव परमेश्वर तुमच्या शत्रूंवर व तिरस्कार करणाऱ्यावर आणील.
7 O Senhor, teu Deus, fará cair todas essas maldições sobre os teus inimigos e sobre aqueles que te perseguem com ódio.
8 आणि तुम्ही पुन्हा परमेश्वराची वाणी ऐकाल. आज मी देत असलेल्या सर्व आज्ञा तुम्ही पाळाल.
8 Tu, porém, voltarás a ouvir a voz do Senhor, e porás em prática todas as ordens que hoje te prescrevo.
9 मी तुम्हास सर्व कार्यात यश देईल. त्याच्या आशीर्वादाने तुम्हास भरपूर संतती होईल. गाईना भरपूर वासरे होतील. शेतात भरघोसपीक येईल. तुमचा देव परमेश्वर तुमचे भले करील. तुमच्या पूर्वजांप्रमाणेच तुमचे कल्याण करण्यात त्यास आनंद वाटेल.
9 O Senhor, teu Deus, encher-te-á de bens em todas as obras de tuas mãos, no fruto de tuas entranhas, no fruto de teus animais e nos produtos de teu solo, porque o Senhor se comprazerá de novo em fazer-te feliz, como se comprazia no tempo de teus pais,
10 पण तुम्ही तुमचा देव परमेश्वर ह्याने सांगितल्याप्रमाणे आचरण ठेवले पाहिजे. नियमशास्त्रातील ग्रंथात सांगितलेल्या आज्ञा व नियम यांचे कसोशीने पालन केले पाहिजे. संपूर्ण अंत:करणाने व संपूर्ण जीवाने तुमचा देव परमेश्वर ह्याला अनुसरले पाहिजे. तर तुमचे कल्याण होईल.
10 contanto que obedeças à voz do Senhor, teu Deus, observando seus mandamentos e seus preceitos escritos neste livro da lei, e que voltes para o Senhor, teu Deus, de todo o teu coração e de toda a tua alma.
11 जी आज्ञा मी आता तुम्हास देत आहे ती पाळायला फारशी अवघड नाही. ती तुमच्या आवाक्याबाहेर नाही.
11 O mandamento que hoje te dou não está acima de tuas forças, nem fora de teu alcance.
12 ती काही स्वर्गात नाही की, “आम्ही ती पाळावी म्हणून कोण स्वर्गात जाऊन ती आमच्यापर्यंत आणील व आम्हांला ऐकवील?” असे तुम्हास म्हणावे लागावे.
12 Ele não está nos céus, para que digas: quem subirá ao céu para no-lo buscar e no-lo fazer ouvir para que o observemos?
13 ती समुद्रापलीकडे नाही की, “आम्ही ती पाळावी म्हणून कोण समुद्र पार करून जाईल व तेथून आणून आम्हांला ऐकवील?” असे तुम्हास म्हणावे लागेल.
13 Não está tampouco do outro lado do mar, para que digas: quem atravessará o mar para no-lo buscar e no-lo fazer ouvir para que o observemos?
14 हे वचन तर अगदी तुमच्याजवळ आहे. ते तुमच्याच मुखी आणि मनी वसत आहे. म्हणून तुम्हास ते पाळता येईल.
14 Mas essa palavra está perto de ti, na tua boca e no teu coração: e tu a podes cumprir.
15 आज मी तुमच्यापुढे जीवन आणि मृत्यू, चांगले आणि वाईट हे पर्याय ठेवले आहेत.
15 Olha que hoje ponho diante de ti a vida com o bem, e a morte com o mal.
16 तुमच्या परमेश्वर देवावर प्रेम करा, त्याच्या मार्गाने जा व त्याच्या आज्ञा, नियम पाळा अशी माझी तुम्हास आज्ञा आहे. म्हणजे तुम्ही जो प्रदेश आपलासा करायला जात आहात तेथे दीर्घकाळ रहाल, तुमच्या देशाची भरभराट होईल, तुम्हास तुमचा देव परमेश्वर ह्याचे आशीर्वाद मिळतील.
16 Mando-te hoje que ames o Senhor, teu Deus, que andes em seus caminhos, observes seus mandamentos, suas leis e seus preceitos, para que vivas e te multipliques, e que o Senhor, teu Deus, te abençoe na terra em que vais entrar para possuí-la.
17 पण तुम्ही परमेश्वराकडे पाठ फिरवलीत, त्याचे ऐकले नाहीत, इतर दैवतांचे भजन पूजन केलेत;
17 Se, porém, o teu coração se afastar, se não obedeceres e se te deixares seduzir para te prostrares diante de outros deuses e adorá-los,
18 तर मात्र तुमचा नाश ठरलेलाच आहे हे मी तुम्हास बजावून सांगतो. यार्देन नदीपलीकडच्या प्रदेशात मग तुम्ही फार काळ राहणार नाही.
18 eu te declaro neste dia: perecereis seguramente e não prolongareis os vossos dias na terra em que ides entrar para possuí-la, ao passar o Jordão.
19 “आज स्वर्ग आणि पृथ्वीच्या साक्षीने मी तुम्हास जीवन आणि मृत्यू या दोहोतून एकाची निवड करायला सांगत आहे. जीवनाचा पर्याय स्विकारलात तर आशीर्वाद मिळेल. दुसऱ्याची निवड केलीत तर शाप मिळेल. तेव्हा जीवनाची निवड करा म्हणजे तुम्ही व तुमची मुलेबाळे जिवंत राहतील.
19 Tomo hoje por testemunhas o céu e a terra contra vós: ponho diante de ti a vida e a morte, a bênção e a maldição. Escolhe, pois, a vida, para que vivas com a I tua posteridade,
20 तुमचा देव परमेश्वर ह्याजवर प्रेम करा. त्याच्या आज्ञा पाळा. त्यास सोडू नका. कारण परमेश्वर म्हणजेच जीवन. तसे केलेत तर अब्राहाम, इसहाक, व याकोब या तुमच्या पूर्वजांना वचन दिल्याप्रमाणे परमेश्वर तुम्हास त्या प्रदेशात दीर्घायुष्य देईल.”
20 amando o Senhor, teu Deus, obedecendo à sua voz e permanecendo unido a ele. Porque é esta a tua vida e a longevidade dos teus dias na terra que o Senhor jurou dar a Abraão, Isaac e Jacó, teus pais.

Ler em outra tradução

Comparar com outra

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Deuteronômio 30, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.