Deuteronômio 28
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (MAR) vs ARIB
1 आज, मी दिलेल्या सर्व आज्ञा तुम्ही काळजीपूर्वक पाळल्यात व तुमचा देव परमेश्वर याची वाणी तुम्ही ऐकाल तर तुमचा देव परमेश्वर तुम्हास पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांपेक्षा उच्चस्थानी नेईल.
1 Se ouvires atentamente a voz do Senhor teu Deus, tendo cuidado de guardar todos os seus mandamentos que eu hoje te ordeno, o Senhor teu Deus te exaltará sobre todas as nações da terra;
2 तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याची वाणी ऐकाल तर हे सर्व आशीर्वाद तुमच्याकडे येतील:
2 e todas estas bênçãos virão sobre ti e te alcançarão, se ouvires a voz do Senhor teu Deus:
3 तुम्हास तुमच्या नगरात आणि शेतात परमेश्वराचे आशीर्वाद मिळतील.
3 Bendito serás na cidade, e bendito serás no campo.
4 परमेश्वराच्या आशीर्वादाने तुमची मुलेबाळे, तुमच्या भूमीचा उपज, व तुमची गुरेढोरे व त्यांची पिल्ले आशीर्वादीत होतील.
4 Bendito o fruto do teu ventre, e o fruto do teu solo, e o fruto dos teus animais, e as crias das tuas vacas e das tuas ovelhas.
5 तुमच्या टोपल्या आणि पराती परमेश्वराच्या आशीर्वादाने भरलेल्या राहतील.
5 Bendito o teu cesto, e a tua amassadeira.
6 तुम्ही आत याल तेव्हा आशीर्वादीत व्हाल आणि बाहेर जाल तेव्हा आशीर्वादीत व्हाल.
6 Bendito serás quando entrares, e bendito serás quando saíres.
7 तुमच्यावर चाल करून येणाऱ्या शत्रूला पराभूत करण्यास तुम्हास परमेश्वराचे साहाय्य होईल. एका वाटेने आलेला शत्रू सात वाटांनी पळत सुटेल.
7 O Senhor entregará, feridos diante de ti, os teus inimigos que se levantarem contra ti; por um caminho sairão contra ti, mas por sete caminhos rugirão da tua presença.
8 परमेश्वराच्या कृपेने तुमची कोठारे भरलेली राहतील. तुम्ही हाती घेतलेल्या कार्यात त्याचे आशीर्वाद मिळतील. तुमचा देव परमेश्वर तुम्हास जो देश देत आहे त्यामध्ये तुमची भरभराट होईल.
8 O Senhor mandará que a bênção esteja contigo nos teus celeiros e em tudo a que puseres a tua mão; e te abençoará na terra que o Senhor teu Deus te dá.
9 परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे आचरण ठेवलेत आणि त्याच्या आज्ञा पाळल्यात तर आपल्या वचनाला जागून तो तुम्हास आपली पवित्र प्रजा करून घेईल.
9 O Senhor te confirmará para si por povo santo, como te jurou, se guardares os mandamentos do Senhor teu Deus e andares nos seus caminhos.
10 परमेश्वराच्या नावाने तुम्ही ओळखले जाता हे पाहिल्यावर इतर राष्ट्रांतील लोकांस तुमचा धाक वाटेल.
10 Assim todos os povos da terra verão que és chamado pelo nome do Senhor, e terão temor de ti.
11 परमेश्वराने द्यायचे कबूल केलेल्या या देशात तुम्हास भरपूर संतती होईल. गाईचे खिल्लार वाढेल. पीक चांगले येईल.
11 E o Senhor te fará prosperar grandemente no fruto do teu ventre, no fruto dos teus animais e no fruto do teu solo, na terra que o Senhor, com juramento, prometeu a teus pais te dar.
12 आपले आशीर्वादाचे भांडार परमेश्वर तुमच्यासाठी खुले करील. योग्यवेळी तुमच्या भूमीवर पाऊस पडेल. तुमच्या सर्व कामात त्याचे आशीर्वाद मिळतील. तुम्ही इतर राष्ट्रांना कर्ज द्याल पण तुम्हास कर्ज काढावे लागणार नाही.
12 O Senhor te abrirá o seu bom tesouro, o céu, para dar à tua terra a chuva no seu tempo, e para abençoar todas as obras das tuas mãos; e emprestarás a muitas nações, porém tu não tomarás emprestado.
13 आज मी सांगितलेल्या तुमचा देव परमेश्वर ह्याच्या आज्ञांप्रमाणे वागलात तर तुम्ही नेते व्हाल, अनुयायी होणार नाही, उच्चस्थानी जाल, तळाला जाणार नाही. तेव्हा काळजीपूर्वक या नियमांचे पालन करा.
13 E o Senhor te porá por cabeça, e não por cauda; e só estarás por cima, e não por baixo; se obedeceres aos mandamentos do Senhor teu Deus, que eu hoje te ordeno, para os guardar e cumprir,
14 या शिकवणीपासून परावृत्त होऊ नका. उजवीडावीकडे वळू नका. इतर दैवतांची उपासना करु नका.
14 não te desviando de nenhuma das palavras que eu hoje te ordeno, nem para a direita nem para a esquerda, e não andando após outros deuses, para os servires.
15 पण तुमचा देव परमेश्वर ह्याचे जर तुम्ही ऐकले नाहीत, त्याच्या ज्या आज्ञा आणि विधी मी आज सांगत आहे त्यांचे पालन केले नाहीत तर पुढील सर्व शाप तुमच्यामागे लागतील:
15 Se, porém, não ouvires a voz do Senhor teu Deus, se não cuidares em cumprir todos os seus mandamentos e os seus estatutos, que eu hoje te ordeno, virão sobre ti todas estas maldições, e te alcançarão:
16 नगरात आणि शेतात तुम्ही शापित व्हाल.
16 Maldito serás na cidade, e maldito serás no campo.
17 तुमच्या टोपल्या आणि पराती शापित होतील आणि त्या रिकाम्या राहतील.
17 Maldito o teu cesto, e a tua amassadeira.
18 परमेश्वराच्या शापाने तुम्हास फार संतती होणार नाही, जमिनीत पीक चांगले येणार नाही, गुराढोरांचे खिल्लार फार वाढणार नाही. वासरे करडे शापित होतील.
18 Maldito o fruto do teu ventre, e o fruto do teu solo, e as crias das tuas vacas e das tuas ovelhas.
19 बाहेर जाताना आणि आत येताना परमेश्वर तुम्हास शाप देईल.
19 Maldito serás ao entrares, e maldito serás ao saíres.
20 तुम्ही दुष्कृत्ये करून परमेश्वरापासून परावृत झालात तर तुमच्यावर संकटे कोसळतील. हाती घेतलेल्या प्रत्येक कामात शाप येतील व तुम्ही हताश व्हाल. तुमचा विनाविलंब समूळ नाश होईपर्यंत हे चालेल. परमेश्वराच्या मार्गापासून विचलीत होऊन तुम्ही भलतीकडे गेल्यामुळे असे होईल.
20 O Senhor mandará sobre ti a maldição, a derrota e o desapontamento, em tudo a que puseres a mão para fazer, até que sejas destruído, e até que repentinamente pereças, por causa da maldade das tuas obras, pelas quais me deixaste.
21 जो प्रदेश काबीज करायला तुम्ही जात आहात तेथून तुम्ही पूर्णपणे नष्ट होईपर्यंत परमेश्वर तुम्हास भयंकर रोगराईने ग्रस्त करील.
21 O Senhor fará pegar em ti a peste, até que te consuma da terra na qual estás entrando para a possuíres.
22 परमेश्वर तुम्हास रोग, ताप, सूज व बुरशी यांनी शिक्षा करील. उष्णता भयंकर वाढेल आणि अवर्षण पडेल. पिके होरपळून आणि कीड पडून करपून जातील. तुमचा नाश होईपर्यंत ही संकटे तुमच्या पाठीस लागतील.
22 O Senhor te ferirá com a tísica e com a febre, com a inflamação, com o calor forte, com a seca, com crestamento e com ferrugem, que te perseguirão até que pereças
23 आकाशात ढग दिसणार नाही. आकाश लखलखीत पितळेसारखे तप्त आणि पायाखालची जमीन लोखंडासारखी घट्ट होईल.
23 O céu que está sobre a tua cabeça será de bronze, e a terra que está debaixo de ti será de ferro.
24 परमेश्वर पाऊस पाडणार नाही. आकाशातून फक्त धूळ आणि वाळू यांचा वर्षाव होईल. तुमचा नाश होईपर्यंत हे चालेल.
24 O Senhor dará por chuva à tua terra pó; do céu descerá sobre ti a poeira, ate que sejas destruído.
25 तुम्ही तुमच्या शत्रूपुढे मार खाल असे परमेश्वर करील. शत्रूवर तुम्ही एका दिशेने चढाई कराल आणि सात दिशांनी पळ काढाल. तुमच्यावरील संकटे पाहून पृथ्वीवरील इतर लोक भयभीत होतील.
25 O Senhor fará que sejas ferido diante dos teus inimigos; por um caminho sairás contra eles, e por sete caminhos fugirás deles; e serás espetáculo horrendo a todos os reinos da terra.
26 तुमच्या प्रेतांवर जंगली श्वापदे आणि पक्षी ताव मारतील आणि त्यांना हुसकावून लावायला कोणी असणार नाही.
26 Os teus cadáveres servirão de pasto a todas as aves do céu, e aos animais da terra, e não haverá quem os enxote.
27 परमेश्वराने पूर्वी मिसरच्या लोकांस गळवांनी पीडित केले तसेच तो यावेळी तुम्हास करील. गळवे, वाहणारी खरुज, सतत कंड सुटणारा नायटा अशा गोष्टींनी तो तुम्हास शासन करील.
27 O Senhor te ferirá com as úlceras do Egito, com tumores, com sarna e com coceira, de que não possas curar-te;
28 परमेश्वर तुम्हास वेडेपणा, अंधत्व, भांबावलेपण यांनी ग्रस्त करील.
28 o Senhor te ferirá com loucura, com cegueira, e com pasmo de coração.
29 तुम्ही भर दिवसा आंधळ्यासारखे चाचपडत चालाल. प्रत्येक कामात अपयशाचे धनी व्हाल. लोक तुम्हास एकसारखे नागवतील, दुखावतील आणि तुम्हास कोणी त्राता राहणार नाही.
29 Apalparás ao meio-dia como o cego apalpa nas trevas, e não prosperarás nos teus caminhos; serás oprimido e roubado todos os dias, e não haverá quem te salve.
30 तुमचे जिच्याशी लग्न ठरले आहे, तिचा उपभोग दुसरा कोणी घेईल. तुम्ही घर बांधाल पण त्यामध्ये राहणार नाही. द्राक्षमळा लावाल पण त्याचे फळ तुम्हास मिळणार नाही.
30 Desposar-te-ás com uma mulher, porém outro homem dormirá com ela; edificarás uma casa, porém não morarás nela; plantarás uma vinha, porém não a desfrutarás.
31 लोक तुमच्यासमोर तुमचा बैल कापतील पण त्याचे मांस तुम्हास खायला मिळणार नाही. तुमची गाढवे लोक पळवून नेतील आणि परत करणार नाही. तुमच्या शेळ्यामेंढ्या शत्रूच्या हाती जातील आणि तुम्हास कोणी सोडवणारा असणार नाही.
31 O teu boi será morto na tua presença, porém dele não comerás; o teu jumento será roubado diante de ti, e não te será restituído a ti; as tuas ovelhas serão dadas aos teus inimigos, e não haverá quem te salve.
32 तुमच्या मुला-मुलींचे इतर लोक अपहरण करतील. दिवसांमागून दिवस तुम्ही त्यांचा शोध घ्याल. वाट पाहता पाहता तुमचे डोळे शिणतील पण ती सापडणार नाहीत, आणि देव तुमच्या मदतीला येणार नाही.
32 Teus filhos e tuas filhas serão dados a outro povo, os teus olhos o verão, e desfalecerão de saudades deles todo o dia; porém não haverá poder na tua mão.
33 तुमच्या जमिनीचे उत्पन्न आणि तुमच्या साऱ्या श्रमाचे फळ एखादे अपरिचित राष्ट्र बळकावेल, लोक तुमची उपेक्षा करतील.
33 O fruto da tua terra e todo o teu trabalho comê-los-á um povo que nunca conheceste; e serás oprimido e esmagado todos os dias.
34 जे दृष्टीस पडेल त्याने तुम्ही चक्रावून जाल.
34 E enlouquecerás pelo que hás de ver com os teus olhos.
35 तुमच्या गुडघ्यांवर, पायांवर, पावलांपासून डोक्यापर्यंत सर्व शरीरावर ठसठसणारी व बरी न होणारी गळवे उठतील. अशा रीतीने परमेश्वर तुम्हास शासन करील.
35 Com úlceras malignas, de que não possas sarar, o Senhor te ferirá nos joelhos e nas pernas, sim, desde a planta do pé até o alto da cabeça.
36 तुम्ही, तुमच्या पूर्वजांनी कधी न पाहिलेल्या अशा देशात तुमची व तुमच्या राजाची रवानगी परमेश्वर करील. तुम्ही तेथे काष्ठपाषाणाच्या अन्य देवतांची पूजाअर्चा कराल.
36 O Senhor te levará a ti e a teu rei, que tiveres posto sobre ti, a uma nação que não conheceste, nem tu nem teus pais; e ali servirás a outros deuses, ao pau e à pedra.
37 आणि ज्या ज्या राष्ट्रात परमेश्वर तुम्हास नेईल तेथील लोक विस्मयचकित होतील. त्यांच्या चेष्टेचा आणि निंदेचा, म्हणीचा तुम्ही विषय व्हाल.
37 E virás a ser por pasmo, provérbio e ludíbrio entre todos os povos a que o Senhor te levar.
38 तुमच्या शेतात भरपूर पीक येईल पण त्यातले तुमच्या पदरात थोडेच पडेल. कारण बरेचसे टोळधाड फस्त करील.
38 Levarás muita semente para o teu campo, porem colherás pouco; porque o gafanhoto a consumirá.
39 तुम्ही द्राक्षमळा लावून त्यामध्ये खूप श्रम कराल. पण द्राक्षे किंवा द्राक्षरस तुम्हास मिळणार नाही. कारण किड ते खाऊन टाकील.
39 Plantarás vinhas, e as cultivarás, porém não lhes beberás o vinho, nem colherás as uvas; porque o bicho as devorará.
40 तुमच्या जमिनीत जैतून वृक्ष जिकडे तिकडे येतील पण त्यांचे तेल मात्र तुम्हास मिळणार नाही. कारण फळे जमिनीवर गळून, तेथेच सडून जातील.
40 Terás oliveiras em todos os teus termos, porém não te ungirás com azeite; porque a azeitona te cairá da oliveira.
41 तुम्हास मुले आणि मुली होतील पण ती तुम्हास लाभणार नाहीत. त्यांचे अपहरण होईल.
41 Filhos e filhas gerarás, porém não te pertencerão; porque irão em cativeiro.
42 तुमच्या भूमीचे, तुमच्या झाडांचे, शेतातील उभ्या पिकाचे टोळधाडीने नुकसान होईल.
42 Todo o teu arvoredo e o fruto do teu solo consumi-los-á o gafanhoto.
43 तुमच्या गावात राहणाऱ्या परकीयांची उन्नती होईल आणि तुमची अधोगती होईल.
43 O estrangeiro que está no meio de ti se elevará cada vez mais sobre ti, e tu cada vez mais descerás;
44 ते तुम्हास कर्ज देतील, तुमच्याजवळ त्यांना उसने द्यायला काही असणार नाही. सर्व शरीरावर मस्तकाचे नियंत्रण असते त्याप्रमाणे ते तुमच्यावर नियंत्रण ठेवतील. तुम्ही जणू तूच्छ बनून रहाल.
44 ele emprestará a ti, porém tu não emprestarás a ele; ele será a cabeça, e tu serás a cauda.
45 तुमचा देव परमेश्वर ह्याने जे सांगितले ते तुम्ही ऐकले नाही, त्याच्या आज्ञा आणि नियम यांचे पालन केले नाही, तर हे सर्व शाप तुमचा नायनाट होईपर्यंत तुमचा पिच्छा पुरवतील.
45 Todas estas maldições virão sobre ti, e te perseguirão, e te alcançarão, até que sejas destruído, por não haveres dado ouvidos à voz do Senhor teu Deus, para guardares os seus mandamentos, e os seus estatutos, que te ordenou.
46 हे शाप तुमच्यावर व तुमच्या सतंतीवर कायमचे चिन्ह व आश्चर्य असे होतील.
46 Estarão sobre ti por sinal e por maravilha, como também sobre a tua descendência para sempre.
47 सर्व तऱ्हेची समृद्धी असताना तुम्ही आनंदाने व उत्साहित मनाने तुमचा देव परमेश्वर ह्याची सेवा केली नाही म्हणून
47 Por não haveres servido ao Senhor teu Deus com gosto e alegria de coração, por causa da abundância de tudo,
48 परमेश्वराने पाठवलेल्या शत्रूसमोर तुम्हास नतमस्तक व्हावे लागेल. आणि तुम्ही त्यांची सेवा तहान भूकेने गांजलेले दीन, सर्व तऱ्हेने वंचित असे होऊन कराल. परमेश्वर तुमच्या मानेवर लोखंडाचे जोखड ठेवील. ते तुम्हास बाजूला करता येणार नाही. तुमच्या अंतापर्यंत ते तुम्हास वागवावे लागेल.
48 servirás aos teus inimigos, que o Senhor enviará contra ti, em fome e sede, e em nudez, e em falta de tudo; e ele porá sobre o teu pescoço um jugo de ferro, até que te haja destruído.
49 दूरच्या राष्ट्रांतील शत्रूला परमेश्वर तुमच्यावर पाठवील. त्यांची भाषा तुम्हास समजणार नाही. गरुडांसारखे ते झेपावत येतील.
49 O Senhor levantará contra ti de longe, da extremidade da terra, uma nação que voa como a águia, nação cuja língua não entenderás;
50 त्या देशातील लोक क्रूर असतील. वृद्धांचा ते मान राखणार नाहीत. लहानांना दया दाखवणार नाहीत.
50 nação de rosto feroz, que não respeitará ao velho, nem se compadecerá do moço;
51 तुमची जनावरे आणि तुम्ही काढलेले पीक ते नेतील. तुम्ही नष्ट होईपर्यंत ते तुमची लूट करतील. धान्य, द्राक्षरस, तेल, गुरेढोरे, शेळ्यामेंढ्या काही म्हणता काही तुम्हास उरणार नाही.
51 e comerá o fruto dos teus animais e o fruto do teu solo, até que sejas destruído; e não te deixará grão, nem mosto, nem azeite, nem as crias das tuas vacas e das tuas ovelhas, até que te faça perecer;
52 ते राष्ट्र तुमच्या नगरांना वेढा घालून हल्ला करील. आपल्या नगराभोवती असणारी उंच आणि भक्कम तटबंदी जिच्यावर तुम्ही विश्वास ठेवता. ती पण तटबंदी कोसळून पडेल. तुमचा देव परमेश्वर तुम्हास देणार असलेल्या देशातील तुमच्या सर्व नगरांना शत्रू वेढा घालेल.
52 e te sitiará em todas as tuas portas, até que em toda a tua terra venham a cair os teus altos e fortes muros, em que confiavas; sim, te sitiará em todas as tuas portas, em toda a tua terra que o Senhor teu Deus te deu.
53 तुम्हास फार यातना भोगाव्या लागतील. शत्रू वेढा घालून तुमची रसद तोडेल. त्यामुळे तुमची उपासमार होईल. तुम्ही भुकेने व्याकुळ होऊन, तुमचा देव परमेश्वर ह्याने तुमच्या पोटी घातलेल्या मुलाबाळांनाच तुम्ही खाल.
53 E, no cerco e no aperto com que os teus inimigos te apertarão, comerás o fruto do teu ventre, a carne de teus filhos e de tuas filhas, que o Senhor teu Deus te houver dado.
54 तुमच्यामधील अत्यंत संवेदनशील आणि हळव्या मनाचा मनुष्यसुध्दा क्रूर बनेल, मग इतरांची काय कथा! क्रूरतेने त्याची नजर इतरांकडे वळेल. आपली प्रिय पत्नी, अजून जिवंत असलेली मुले हीसुध्दा त्यातून सुटणार नाहीत.
54 Quanto ao homem mais mimoso e delicado no meio de ti, o seu olho será mesquinho para com o seu irmão, para com a mulher de seu regaço, e para com os filhos que ainda lhe ficarem de resto;
55 खायला काहीच शिल्लक उरणार नाही तेव्हा तो आपल्या मुलांचाच घास करेल. आणि त्या मांसात तो कोणालाही, अगदी आपल्या घरातल्यांनाही वाटेकरी होऊ देणार नाही. शत्रूच्या वेढ्यामुळे आणि छळामुळे असे विपरीत घडेल.
55 de sorte que não dará a nenhum deles da carne de seus filhos que ele comer, porquanto nada lhe terá ficado de resto no cerco e no aperto com que o teu inimigo te apertará em todas as tuas portas.
56 तुमच्यामधील अतिशय कोमल हृदयाची आणि नाजूक स्त्रीसुद्धा क्रूर बनेल. नाजुकपणाची कमाल म्हणजे आजतागायत तिने चालायला जमिनीवर पावलेही टेकवली नसतील. पण आता आपला प्राणप्रिय पती, आपली लाडकी मुले यांच्याबद्दलही ती निष्ठुर होईल.
56 Igualmente, quanto à mulher mais mimosa e delicada no meio de ti, que de mimo e delicadeza nunca tentou pôr a planta de seu pé sobre a terra, será mesquinho o seu olho para com o homem de seu regaço, para com seu filho, e para com sua filha;
57 पण लपूनछपून मुलाला जन्म देऊन ते नवजात बालक व प्रसूति वेळी बाहेर पडणारे सर्वकाही ती भुकेने व्याकुळ झाल्यामुळे खाऊन टाकील. जेव्हा तुमचा शत्रू तुमच्या शहरांना वेढा घालील आणि यातना सहन करायला लावील, त्यावेळी वरील सर्व वाईट गोष्टी घडून येतील.
57 também ela será mesquinha para com as suas páreas, que saírem dentre os seus pés, e para com os seus filhos que tiver; porque os comerá às escondidas pela falta de tudo, no cerco e no aperto com que o teu inimigo te apertará nas tuas portas.
58 या ग्रंथातील सर्व शिकवण व आज्ञा तुम्ही पाळा. प्रतापी आणि भययोग्य तुमचा देव परमेश्वर ह्याचे भय धरा. याप्रमाणे आचरण ठेवले नाहीत तर
58 Se não tiveres cuidado de guardar todas as palavras desta lei, que estão escritas neste livro, para temeres este nome glorioso e temível, o Senhor teu Deus;
59 तुमच्यावर व तुमच्या वंशजांवर परमेश्वर अनेक संकटे कोसळवील, भयंकर रोगराई पसरेल.
59 então o Senhor fará espantosas as tuas pragas, e as pragas da tua descendência, grandes e duradouras pragas, e enfermidades malignas e duradouras;
60 अशा रोगराईला आणि उपद्रवांना तुम्ही मिसरमध्ये तोंड दिलेले आहे. त्यांची तुम्हास धास्ती वाटत असे. त्या सगळ्यांतून तुम्हास पुन्हा जावे लागेल.
60 e fará tornar sobre ti todos os males do Egito, de que tiveste temor; e eles se apegarão a ti.
61 या ग्रंथात नसलेले उपद्रव आणि रोगसुद्धा परमेश्वर तुमच्या मागे लावील. तुमचा समूळ नाश होईपर्यंत तो हे करील.
61 Também o Senhor fará vir a ti toda enfermidade, e toda praga que não está escrita no livro desta lei, até que sejas destruído.
62 आकाशातील ताऱ्यांइतके तुम्ही संख्येने विपुल असलात तरी तुमचा देव परमेश्वर ह्याचे न ऐकल्यामुळे त्यापैकी फारच थोडे शिल्लक रहाल.
62 Assim ficareis poucos em número, depois de haverdes sido em multidão como as estrelas do céu; porquanto não deste ouvidos à voz do Senhor teu Deus.
63 तुमची भरभराट करायला आणि तुमची संख्या वाढवायला जसा परमेश्वरास आनंद वाटत होता तसाच आनंद त्यास तुमचा नाश करायला आणि तुम्हास रसातळाला न्यायला वाटेल. तुम्ही जो देश काबीज करायला जात आहात तेथून तुम्हास हुसकावून लावले जाईल.
63 E será que, assim como o Senhor se deleitava em vós, para fazer-vos o bem e multiplicar-vos, assim o Senhor se deleitará em destruir-vos e consumir-vos; e sereis desarraigados da terra na qual estais entrando para a possuirdes.
64 परमेश्वर तुम्हास पृथ्वीच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत सर्व लोकांमध्ये विखरुन टाकील. तेथे तुम्ही काष्ठपाषाणाच्या मूर्तीची उपासना कराल. तुम्हास आणि तुमच्या पूर्वजांना माहीत नसलेल्या परकीय देवांची उपासना कराल.
64 E o Senhor vos espalhará entre todos os povos desde uma extremidade da terra até a outra; e ali servireis a outros deuses que não conhecestes, nem vós nem vossos pais, deuses de pau e de pedra.
65 या इतर राष्ट्रांमध्ये तुम्हास शांती लाभणार नाही. परमेश्वर तुमचे मन काळजीने पोखरुन टाकील. तुमचे डोळे शीणतील तुम्ही बेचैन व्हाल.
65 E nem ainda entre estas nações descansarás, nem a planta de teu pé terá repouso; mas o Senhor ali te dará coração tremente, e desfalecimento de olhos, e desmaio de alma.
66 तुम्हास नेहमी आपल्या जीवाची काळजी वाटत राहील, तुम्ही रात्रंदिवस धास्तावलेले रहाल. तुम्हास जिवाची काही खात्री वाटणार नाही.
66 E a tua vida estará como em suspenso diante de ti; e estremecerás de noite e de dia, e não terás segurança da tua própria vida.
67 सकाळी तुम्ही म्हणाल, “ही रात्र असती तर बरे!” आणि रात्री म्हणाल, “ही सकाळ असती तर किती बरे!” तुमच्या मनातील भीती आणि डोळ्यांना दिसणाऱ्या गोष्टी यामुळे असे होईल.
67 Pela manhã dirás: Ah! quem me dera ver a tarde; E à tarde dirás: Ah! quem me dera ver a manhã! pelo pasmo que terás em teu coração, e pelo que verás com os teus olhos.
68 परमेश्वर तुम्हास जहाजातून पुन्हा मिसरला पाठवील. जेथे तुम्हास पुन्हा कधी परतून जावे लागणार नाही असे मी म्हणालो होतो तेथे परमेश्वर तुमची रवानगी करील. मिसरमध्ये तुम्ही शत्रूचे दास म्हणून स्वत:ची विक्री करु बघाल पण कोणीही तुम्हास विकत घेणार नाही.
68 E o Senhor te fará voltar ao Egito em navios, pelo caminho de que te disse: Nunca mais o verás. Ali vos poreis a venda como escravos e escravas aos vossos inimigos, mas não haverá quem vos compre.
Atalhos do teclado
- Capítulo anterior←
- Próximo capítulo→
- Versículo anteriork
- Próximo versículoj
- Limpar seleçãoEsc
- Esta ajuda?
Estude este capítulo no WhatsApp
Peça à IA da Bíblia Fala para explicar Deuteronômio 28, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.