Deuteronômio 1
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (MAR) vs NAA
1 यार्देन नदीच्या पूर्वेकडील रानात अराबामध्ये सुफासमोर, पारान, तोफेल, लाबान, हसेरोथ व दि-जाहाब यांच्या दरम्यान मोशे सर्व इस्राएलाशी वचने बोलला ती ही.
1 São estas as palavras que Moisés falou a todo o Israel, a leste do Jordão, no deserto, na Arabá, diante de Sufe, entre Parã, Tofel, Labã, Hazerote e Di-Zaabe.
2 होरेबपासून कादेश-बर्ण्यापर्यंतचा प्रवास सेईर डोंगरामार्गे अकरा दिवसाचा आहे.
2 É uma jornada de onze dias desde Horebe até Cades-Barneia, pelo caminho dos montes de Seir.
3 हे मिसर सोडल्यानंतर चाळीसाव्या वर्षी घडले, अकराव्या महिन्यातील पहिल्या दिवशी मोशे इस्राएल लोकांशी हे बोलला, परमेश्वराने जे काही सांगायची आज्ञा केली; ते सर्व त्याने सांगितले.
3 Aconteceu que, no quadragésimo ano, no primeiro dia do décimo primeiro mês, Moisés falou aos filhos de Israel, segundo tudo o que o Senhor lhe havia ordenado a respeito deles,
4 अमोऱ्यांचा राजा सीहोन आणि बाशानाचा राजा ओग यांच्यावर परमेश्वराने हल्ला केल्यानंतरची ही गोष्ट आहे. (सीहोन अमोरी लोकांचा राजा होता. तो हेशबोनमध्ये राहत असे. ओग बाशानाचा राजा होता. तो अष्टारोथ व एद्रई येथे राहणारा होता.)
4 depois que derrotou Seom, rei dos amorreus, que habitava em Hesbom, e Ogue, rei de Basã, que habitava em Astarote, em Edrei.
5 परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे मोशे आता यार्देनच्या पलीकडे पुर्वेस मवाबाच्या देशात नियमांचे विवरण करू लागला. तो म्हणाला,
5 A leste do Jordão, na terra de Moabe, Moisés encarregou-se de explicar esta lei, dizendo:
6 आपला देव परमेश्वर होरेबात आपल्याशी बोलला, या डोंगरात तुम्ही पुष्कळ दिवस राहीला आहात.
6 — O Senhor , nosso Deus, nos falou em Horebe, dizendo: “Vocês já ficaram bastante tempo neste monte.
7 आता तुम्ही येथून अमोऱ्यांच्या डोंगराळ प्रदेशात जा आसपासच्या सर्व प्रदेशात प्रवास करा यार्देनेच्या खोऱ्यात, अराबाच्या पहाडी प्रदेशात, पश्चिमेकडील उतारावर, नेगेबमध्ये समुद्रकिनारी कनान आणि लबानोन मार्गे फरात या महानदीपर्यंत जा.
7 Voltem e sigam viagem. Vão à região montanhosa dos amorreus, a todos os seus vizinhos, na Arabá, à região montanhosa, à Sefelá, ao Neguebe, à costa marítima, terra dos cananeus, e ao Líbano, até o grande rio Eufrates.
8 पाहा हा प्रदेश मी तुम्हास देऊ करत आहे जा आणि त्यावर ताबा मिळवा अब्राहाम, इसहाक आणि याकोब या तुमच्या पूर्वजांना व त्यांच्यानंतर त्यांच्या वंशजांना हा प्रदेश देण्याचे परमेश्वराने वचन दिले होते.
8 Eis aqui a terra que eu pus diante de vocês; entrem e tomem posse da terra que o Senhor , com juramento, deu a seus pais, a Abraão, Isaque e Jacó, a eles e à sua descendência depois deles.”
9 तेव्हा मी तुम्हास म्हणालो होतो की “मी एकटा तुमचा सांभाळ करू शकणार नाही.
9 — Nesse mesmo tempo, eu disse a vocês: “Sozinho não poderei levá-los.
10 आणि आता तर तुमची संख्या कितीतरी वाढली आहे परमेश्वर देवाच्या कृपेने ती वाढून आकाशातील ताऱ्यांइतकी झाली आहे.
10 O Senhor , o Deus de vocês, fez com que vocês se multiplicassem e eis que hoje vocês são uma multidão como as estrelas dos céus.
11 तुमच्या पूर्वजांचा देव परमेश्वर, ह्याच्या कृपेने आणखी वाढून आताच्या हजारपट होवो आणि त्याने कबूल केल्याप्रमाणे त्याचा आशीर्वाद तुम्हास मिळो.
11 O Senhor , Deus dos pais de vocês, faça com que vocês sejam mil vezes mais numerosos do que são agora e os abençoe, como prometeu.
12 परंतु मी एकटा तुमचा भार तसेच तुमची आपापसांतली भांडणे कोठवर सहन करू?
12 Mas como poderia eu sozinho suportar o peso e a carga de vocês, e como poderia eu resolver sozinho todas as questões que surgem no meio de vocês?
13 म्हणून मी तुम्हास सांगितले, आपापल्या वंशातून अनुभवी, ज्ञानी व समंजस व्यक्तींची निवड करा. मी त्यांना तुमचे प्रमुख म्हणून नेमतो.”
13 Escolham homens sábios, inteligentes e experimentados, segundo as suas tribos, para que eu os ponha por chefes de vocês.”
14 त्यावर, “हे चांगलेच झाले असे” तुम्ही मला उत्तर देऊन म्हणालात.
14 — Então vocês me responderam que era bom fazer o que eu tinha falado.
15 म्हणून मी त्या ज्ञानी व अनुभवी व्यक्तींना तुमचे प्रमुख म्हणून नेमले. हजारांच्या समूहावर एक अधिकारी, शंभरांवर एक, पन्नासांवर, दहावर तसेच घराण्यावर अशा या अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या.
15 Assim, peguei os chefes de suas tribos, homens sábios e experimentados, e os fiz chefes sobre vocês, chefes de milhares, chefes de cem, chefes de cinquenta, chefes de dez e oficiais, segundo as suas tribos.
16 या न्यायाधीशांना मी त्यावेळी सांगितले की तुमच्या भाऊबंदांतील वाद नीट ऐकून घ्या. निवाडा करताना पक्षपात करू नका मग तो वाद दोन भावांमधला असो की एखादा मनुष्य व त्याचा भाऊबंद व उपरी यांच्यातील असो. नीतिने न्याय करा.
16 Nesse mesmo tempo, ordenei aos juízes, dizendo: “Deem atenção às questões que surgem entre os seus irmãos e julguem com justiça entre um homem e seu irmão ou o estrangeiro que está com ele.
17 न्याय करताना कोणालाही कमी लेखू नका. लहान मोठ्यांचे सारखे ऐकून घ्या. कोणाचे तोंड पाहून घाबरू नका; कारण न्याय करणे देवाचे काम आहे. एखादे प्रकरण तुम्हास विशेष अवघड वाटले तर ते माझ्याकडे आणा. मी त्याचा निवाडा करीन.
17 Não sejam parciais no julgamento. Ouçam tanto o pequeno como o grande; não tenham medo de ninguém, porque o julgamento é de Deus. Porém, se a questão for demasiadamente difícil para vocês, tragam para mim, e eu a ouvirei.”
18 तुमच्या इतर कर्तव्यांबद्दलही मी तेव्हाच तुम्हास आज्ञा केली होती.
18 — Assim, naquele tempo, eu lhes ordenei todas as coisas que vocês deveriam fazer.
19 मग आपला देव परमेश्वर ह्याच्या आज्ञेनुसार आपण होरेबहून पुढे अमोऱ्यांच्या डोंगराळ प्रदेशाकडे निघालो तेव्हा वाटेत तुम्हास ते विस्तीर्ण आणि भयंकर रान लागले ते सर्व ओलांडून आपण कादेश-बर्ण्याला पोहचलो.
19 — Então partimos de Horebe e caminhamos por todo aquele grande e terrível deserto que vocês viram, pelo caminho da região montanhosa dos amorreus, como o Senhor , nosso Deus, nos havia ordenado; e chegamos a Cades-Barneia.
20 मी तुम्हास म्हणालो की पाहा, “अमोऱ्यांच्या पहाडी प्रदेशात तुम्ही पोहोचलात आपला देव परमेश्वर तुम्हास हा प्रदेश देत आहे.
20 Então eu lhes disse: “Vocês chegaram à região montanhosa dos amorreus, que o Senhor , nosso Deus, nos dá.
21 पाहा हा प्रदेश तुझा देव परमेश्वर याने पुढे ठेवला आहे. पूर्वजांचा परमेश्वर ह्याच्या आज्ञेनुसार तो हस्तगत करा. कचरू नका व कशाचीही भीती बाळगू नका.”
21 Eis que o Senhor , seu Deus, colocou esta terra diante de vocês. Vão e tomem posse dessa terra, como o Senhor , o Deus de seus pais, falou. Não tenham medo e não se assustem.”
22 पण तेव्हा तुम्ही सगळे मला म्हणालात, “आधी आपण काही जणांना त्या प्रदेशाच्या पाहाणीसाठी पुढे पाठवू म्हणजे ते त्या देशाची माहिती मिळवून आपल्याला कोणत्या मार्गाने जावे लागेल, कोणकोणती नगरे तेथे लागतील याची खबर आणतील.”
22 — Então todos vocês se aproximaram de mim e disseram: “Vamos mandar alguns homens adiante de nós, para que espiem a terra e nos digam por que caminho devemos seguir e a que cidades devemos ir.”
23 मलाही ते पटले म्हणून प्रत्येक घराण्यातून एक अशी बारा माणसे मी निवडली.
23 Isto me pareceu uma boa ideia, de maneira que escolhi, do meio de vocês, doze homens, um de cada tribo.
24 ते लोक मग निघाले व पहाडी प्रदेशात जाऊन अष्कोल ओढ्यापर्यंत पोहचले व त्यांनी तो देश हेरला.
24 Eles saíram e foram à região montanhosa, e, espiando a terra, foram até o vale de Escol.
25 येताना त्यांनी तिकडची काही फळे बरोबर आणली. त्या प्रदेशाची माहिती सांगितली व ते म्हणाले, “आपला देव परमेश्वर देत असलेला देश हा उत्तम आहे.”
25 Tomaram do fruto da terra nas mãos e o trouxeram até nós. E nos informaram, dizendo: “É boa esta terra que o Senhor , nosso Deus, nos dá.”
26 तथापि तुम्ही तेथे हल्ला करण्याचे नाकारले आपला देव परमेश्वर याच्या आज्ञेविरूद्ध बंड केले.
26 — Porém vocês não quiseram ir, mas foram rebeldes à ordem do Senhor , seu Deus.
27 तुम्ही आपापल्या तंबूत जाऊन कुरकुर करत म्हणालात परमेश्वर आमचा द्वेष करतो अमोऱ्यांच्या हातून आमचा नाश व्हावा म्हणूनच आम्हास त्याने मिसर देशातून बाहेर काढले आहे.
27 Ficaram murmurando em suas tendas e disseram: “O Senhor está com ódio de nós e por isso nos tirou da terra do Egito para nos entregar nas mãos dos amorreus e nos destruir.
28 आता आम्ही कोठे जाणार? आमच्या या भावांच्या बातम्यांमुळे घाबरून आमच्या हृदयाचे पाणीपाणी झाले आहे. त्यांच्यानुसार हे लोक धिप्पाड व आमच्यापेक्षा उंच आहेत. तेथील नगरे मोठी असून त्यांची तटबंदी आकाशाला भिडली आहे. आणि तेथे अनाकी वंशाचे महाकाय आहेत.
28 Para onde iremos? Nossos irmãos nos deixaram com medo, dizendo: ‘Aquele povo é maior e mais alto do que nós. As cidades são grandes e fortificadas até o céu. Também vimos ali os filhos dos anaquins.’”
29 तेव्हा मी तुम्हास म्हणालो, “भिऊ नका, त्या लोकांस घाबरू नका.
29 — Então eu lhes disse: “Não fiquem apavorados, nem tenham medo deles.
30 स्वत: परमेश्वर देव तुमच्यापुढे जात आहे. मिसर देशात तुमच्यासमोर त्याने जे केले तेच तो येथेही करील, तो तुमच्यासाठी लढेल;
30 O Senhor , o seu Deus, que vai adiante de vocês, ele lutará por vocês, segundo tudo o que viram que ele fez conosco no Egito,
31 तसेच रानातल्या वाटचालीतही तुम्ही पाहीले, त्यामध्ये तुमचा देव परमेश्वर तुमच्यापुढे होता. मनुष्य आपल्या मुलाला जपून नेतो तसे त्याने तुम्हास येथपर्यंत सांभाळून आणले.”
31 e também no deserto, onde vocês viram que o Senhor , seu Deus, os levou, como um homem leva o seu filho, por todo o caminho pelo qual vocês andaram, até chegar a este lugar.”
32 तरीही तुम्ही आपल्या परमेश्वर देवावर विश्वास ठेवला नाही.
32 — Mas nem assim vocês creram no Senhor , seu Deus,
33 परमेश्वर प्रवासात तुमच्यासाठी मुक्कामाचे ठिकाण शोधायला तसेच रात्री अग्नीत व दिवसा मेघात प्रकट होऊन तुम्हास मार्गदर्शन करायला तुमच्यापुढे चालत असे.
33 que foi adiante de vocês por todo o caminho, para procurar o lugar onde deveriam acampar; de noite, estava no fogo, para mostrar o caminho por onde vocês deveriam andar, e, de dia, estava na nuvem.
34 परमेश्वराने तुमचे बोलणे ऐकले व तो संतापला शपथपूर्वक तो म्हणाला,
34 — O Senhor ouviu o que vocês disseram, ficou irado e jurou, dizendo:
35 “तुमच्या पूर्वजांना शपथ वाहून देवू केलेला हा उत्तम प्रदेश या दुष्ट पिढीतील एकाच्याही दृष्टीस पडणार नाही,
35 “Nenhum dos homens desta geração perversa verá a boa terra que jurei dar aos pais de vocês,
36 यफुन्नेचा मुलगा कालेब मात्र तो पाहील त्याचे पाय या भूमीला लागले आहेत. त्यास व त्याच्या वंशजांना मी ही भूमी देईल. कारण तो परमेश्वराचा खरा अनुयायी आहे.”
36 com a exceção de Calebe, filho de Jefoné. Ele verá essa terra e darei a ele e aos filhos dele a terra em que ele pisou, porque perseverou em seguir o Senhor .”
37 तुमच्यामुळे परमेश्वराचा माझ्यावरही कोप झाला. तो म्हणाला, मोशे, “तूही या प्रदेशात प्रवेश करणार नाहीस.
37 Também contra mim se indignou o Senhor por causa de vocês, dizendo: “Também você não entrará nessa terra.
38 पण तुझ्या सेवेस हजर राहणारा, नूनाचा मुलगा यहोशवा तेथे जाईल त्यास तू प्रोत्साहन दे, कारण तो इस्राएलांना देश वतन म्हणून मिळवून देईल.
38 Josué, filho de Num, que está diante de você, ele é quem vai entrar; anime-o, porque ele fará com que Israel a receba por herança.
39 परमेश्वर पुढे आपल्याला म्हणाला, शिवाय आपले शत्रू आपल्या मुलाबाळांना पळवतील असे तुम्ही म्हणालात ती आज जी तुमची मुले बरे किंवा वाईट जाणत नाहीत ती मात्र या देशात जातील आणि त्यांना मी तो देश देईन व ते देश ते हस्तगत करतील.
39 E as crianças de vocês, de quem vocês disseram que seriam presa do inimigo, sim, os filhos de vocês, que hoje nem sabem distinguir entre bem e mal, esses ali entrarão, e a eles darei a terra, e eles a possuirão.
40 पण तुम्ही परत फिरून तांबड्या समुद्राच्या वाटेने रानाकडे कूच करा.”
40 Mas vocês voltem e sigam para o deserto, pelo caminho do mar Vermelho.”
41 मग तुम्ही मला असे उत्तर दिले की “आमच्या हातून परमेश्वराविरुध्द पाप घडले आहे आपल्या परमेश्वर देवाच्या आज्ञेनुसार आम्ही वर जाऊन लढू.” मग प्रत्येक मनुष्याने आपली शस्त्रास्त्रे घेतली. आणि तुम्ही डोंगराळ प्रदेशावर चढावयला तयार झाला.
41 — Então vocês responderam: “Pecamos contra o Senhor . Nós iremos e lutaremos, segundo tudo o que o Senhor , nosso Deus, nos ordenou.” Vocês se armaram, cada um com os seus instrumentos de guerra, e pensaram que seria fácil entrar na região montanhosa.
42 परमेश्वर मला म्हणाला, “त्यांना तेथे सांग युद्ध करू नका. कारण मी त्यांच्या बरोबर नाही. शत्रू त्यांना पराभूत करेल.”
42 Mas o Senhor mandou que eu dissesse a vocês: “Não vão, nem comecem a lutar, pois não estou no meio de vocês, e vocês serão derrotados pelos seus inimigos.”
43 त्याप्रमाणे तुम्हास मी सांगितले. पण तुम्ही ऐकले नाही. तुम्ही परमेश्वराची आज्ञा पाळली नाही. आणि धिटाई करून त्या डोंगराळ प्रदेशात चढाई करून गेलात.
43 Isso eu lhes falei, mas vocês não quiseram escutar; pelo contrário, foram rebeldes às ordens do Senhor e, presunçosos, foram na direção das montanhas.
44 तेव्हा तेथील अमोरी तुमच्याशी सामना करायला सामोरे आले. आणि चवताळलेल्या मधमाश्यांप्रमाणे त्यांनी सेईर देशातील हर्मापर्यंत तुम्हास पिटाळून लावले.
44 Os amorreus que habitavam naquela região montanhosa saíram contra vocês e os perseguiram como fazem as abelhas e os derrotaram desde Seir até Horma.
45 मग तुम्ही परत येऊन परमेश्वराकडे रडू लागला. पण त्याने तुमचे काहीही ऐकले नाही.
45 Vocês voltaram e foram se queixar diante do Senhor , porém o Senhor não lhes deu atenção e não inclinou os ouvidos a vocês.
46 तेव्हा तुम्ही कादेश येथे बरेच दिवस राहिला ते तुम्हास माहितच आहे.
46 Assim, vocês permaneceram muitos dias em Cades.
Atalhos do teclado
- Capítulo anterior←
- Próximo capítulo→
- Versículo anteriork
- Próximo versículoj
- Limpar seleçãoEsc
- Esta ajuda?
Estude este capítulo no WhatsApp
Peça à IA da Bíblia Fala para explicar Deuteronômio 1, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.