Deuteronômio 19

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (MAR) vs ARIB

Sair da comparação
ARIB Almeida Revisada Imprensa Bíblica
1 तुझा देव परमेश्वर ज्या राष्ट्रांची भूमी तुला देत आहे, त्या राष्ट्रांना नष्ट केल्यावर त्यांच्या प्रदेशाचा तू ताबा घेतल्यानंतर, त्यांच्या जागी त्यांची नगरे आणि घरे तुम्ही ताब्यात घ्याल,
1 Quando o Senhor teu Deus desarraigar as nações cuja terra ele te dá, e tu as desapossares, e morares nas suas cidades e nas suas casas,
2 तेव्हा तुझा देव परमेश्वर जो देश तुला देत आहे त्यामध्ये तीन नगरे तुम्ही राखून ठेवा.
2 designarás para ti no meio da terra que o Senhor teu Deus te dá para a possuíres, três cidades;
3 म्हणजे कोणाच्या हातून मनुष्यवध झाल्यास त्यास तेथे पळून जाता यावे म्हणून रस्ते तयार कर, आणि जो प्रदेश तुझा देव परमेश्वर तुला देत आहे त्या देशाचे तू तीन भाग कर.
3 preparar-lhe-ás caminhos, e partirás em três os termos da tua terra, que o Senhor teu Deus te dará em herança; isto será para que todo homicida se acolha nessas cidades.
4 मनुष्यवध करून या तीनपैकी एका नगरात आश्रयाला येणाऱ्याबद्दल नियम असा: पूर्वीचे वैर नसताना जर कोणी चुकून आपल्या शेजाऱ्याला ठार मारले तर त्याने येथे जावे.
4 Este, pois é o caso no tocante ao homicida que se acolher ali para que viva: aquele que involuntariamente matar o seu próximo, a quem dantes não odiava;
5 उदाहरणार्थ, एखादा मनुष्य लाकडे तोडायला त्याच्या शेजाऱ्याबरोबर जंगलात गेला. तेथे झाडावर कुऱ्हाड चालवत असताना चूकून कुऱ्हाडीचे पाते दांड्यापासून निसटले आणि ते नक्की दुसऱ्यावर पडून तो मेला. अशावेळी कुऱ्हाड चालवणाऱ्याने यापैकी एखाद्या नगराच्या आश्रयाला जाऊन आपले प्राण वाचवावे.
5 como, por exemplo, aquele que entrar com o seu próximo no bosque para cortar lenha e, pondo força na sua mão com o machado para cortar a árvore, o ferro saltar do cabo e ferir o seu próximo de sorte que venha a morrer; o tal se acolherá a uma dessas cidades, e viverá;
6 हे नगर फार दूर असेल तर त्यास तेथपर्यंत पोचता येणार नाही. मृताचा जवळचा नातेवाईक त्याचा पाठलाग करील व त्यास त्या नगरात पोचण्यापूर्वीच गाठेल. आणि रागाच्या भरात त्याचा वध करील. खरे पाहता त्या मनुष्याच्या हातून वैर नसताना मनुष्य हत्या झाली होती तेव्हा तो प्राणदंडाला पात्र नव्हता.
6 para que o vingador do sangue não persiga o homicida, enquanto estiver abrasado o seu coração, e o alcance, por ser comprido o caminho, e lhe tire a vida, não havendo nele culpa de morte, pois que dantes não odiava o seu próximo.
7 म्हणून मी तुला ही आज्ञा करतो अशी तीन नगरे स्वत:साठी राखून ठेव.
7 Pelo que eu te deu esta ordem: Três cidades designarás para ti.
8 तुमच्या प्रदेशाचा विस्तार करण्याचे तुमचा देव परमेश्वर ह्याने तुमच्या वशंजाना शपथ दिल्याप्रमाणे, त्यांना वचन दिलेला सर्व प्रदेश तो तुम्हास देईल.
8 E, se o Senhor teu Deus dilatar os teus termos, como jurou a teus pais, e te der toda a terra que prometeu dar a teus pais
9 तुमचा देव परमेश्वर ह्याजवर प्रीती करा व त्याने दाखवलेल्या मार्गात नियमीत चालत जा. मी दिलेल्या या आज्ञा तुम्ही पूर्णपणे पाळल्यात तर मग परमेश्वराने तुमच्या प्रदेशाचा विस्तार केला की तुम्ही पहिल्या तीन नगरांच्या भरीला आश्रयासाठी आणखी तीन नगरे निवडा.
9 {quando guardares, para o cumprires, todo este mandamento que eu hoje te ordeno, de amar o Senhor teu Deus e de andar sempre nos seus caminhos}, então acrescentarás a estas três, mais três cidades;
10 म्हणजे तुमचा देव परमेश्वर तुम्हास देणार असलेल्या भूमीवर निर्दोष मनुष्यांचा रक्तपात होणार नाही आणि अशा हत्येचे दोष तुम्हास लागणार नाही.
10 para que não se derrame sangue inocente no meio da tua terra, que o Senhor teu Deus te dá por herança, e não haja sangue sobre ti.
11 पण द्वेषापोटीही एखादा मनुष्य संधीची वाट पाहत लपूनछपून दुसऱ्याच्या जिवावर उठेल, त्याच्यावर प्राणघातक हल्ला करून या नगरात पळून गेला.
11 Mas se alguém, odiando a seu próximo e lhe armando ciladas, se levantar contra ele e o ferir de modo que venha a morrer, e se acolher a alguma destas cidades,
12 अशावेळी त्याच्या नगरातील वडिलधाऱ्यांनी माणसे पाठवून त्यास तेथून बाहेर काढावे व मृताच्या नातेवाईकांच्या हवाली करावे. म्हणजे त्यास मृत्यूची शिक्षा झाली पाहिजे.
12 então os anciãos da sua cidade, mandando tirá-lo dali, o entregarão nas mãos do vingador do sangue, para que morra.
13 त्या मनुष्यावर दया दाखवू नका परंतु निरपराध मनुष्याच्या हत्येचा दोष इस्राएलातून पुसून टाक म्हणजे तुझे कल्याण होईल.
13 O teu olho não terá piedade dele; antes tirarás de Israel o sangue inocente, para que te vá bem.
14 शेजाऱ्याच्या जमिनीची सीमा खूण काढू नको. पूर्वीच्या लोकांनी त्या सीमा आखलेल्या आहेत. हे तुमचा देव परमेश्वर ह्याने तुमच्या वाट्याला जेवढे वतन दिले त्याच्या या खूणा आहेत.
14 Não removerás os marcos do teu próximo, colocados pelos teus antecessores na tua herança que receberás, na terra que o Senhor teu Deus te dá para a possuíres.
15 एखाद्याने काही गुन्हा किंवा अपराध केला तर, अपराधाचा आरोप कोणावर असेल तर त्यास दोषी ठरवायला एक साक्षीदार पुरेसा नाही. त्याने खरेच गुन्हा केला आहे हे ठरवायला दोन किंवा तीन साक्षीदार तरी हवेतच.
15 uma só testemunha não se levantará contra alguém por qualquer iniqüidade, ou por qualquer pecado, seja qual for o pecado cometido; pela boca de duas ou de três testemunhas se estabelecerá o fato.
16 अमक्याच्या हातून अपराध घडला आहे असे एखादा साक्षीदार द्वेषबुद्धीने, मुद्दाम खोटे सांगू शकतो.
16 Se uma testemunha iníqua se levantar contra alguém, para o acusar de transgressão,
17 अशावेळी त्या दोघांना परमेश्वरासमोर म्हणजे तेथे जे याजक व न्यायाधीश त्यावेळी असतील त्यांच्यापुढे उभे करावे.
17 então aqueles dois homens que tiverem a demanda se apresentarão perante o Senhor, diante dos sacerdotes e dos juízes que houver nesses dias.
18 मग न्यायाधीशांनी त्याबाबत कसून चौकशी केली पाहिजे. त्यातून साक्षीदाराचा आपल्या बंधुविरोधात खोटारडेपणा उघडकीला आला,
18 E os juízes inquirirão cuidadosamente; e eis que, sendo a testemunha falsa, e falso o testemunho que deu contra seu irmão,
19 तर मग तुम्ही त्यास तीच शिक्षा करावी जी त्यास आपल्या बंधूला जे शासन व्हावे असे वाटत होते. अशा रीतीने आपल्यामधून नीच वृत्तीचा नायनाट करा
19 far-lhe-ás como ele cuidava fazer a seu irmão; e assim exterminarás o mal do meio de ti.
20 हे ऐकून इतरांना भीती वाटेल आणि तेथून पुढे तुमच्यामध्ये असे वाईट घडणार नाही.
20 Os restantes, ouvindo isso, temerão e nunca mais cometerão semelhante mal no meio de ti.
21 तू दया दाखवू नये. कोणी कोणाचा जीव घेतल्यास त्यालाही देहान्ताचे शासन द्यावे. डोळ्याबद्दल डोळा, दाताबद्दल दात, हाताच्या बदल्यात हात आणि पायाच्या बदल्यात पाय असा दंड करावा.
21 O teu olho não terá piedade dele; vida por vida, olho por olho, dente por dente, mão por mão, pé por pé.

Ler em outra tradução

Comparar com outra

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Deuteronômio 19, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.