Deuteronômio 15
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (MAR) vs ACF
1 प्रत्येक सात वर्षांच्या शेवटी तुम्ही कर्ज माफ करून टाकावे.
1 Ao fim dos sete anos farás remissão.
2 त्याची पद्धत अशी: प्रत्येकाने आपल्या इस्राएल बांधवाला दिलेले कर्ज रद्द करून टाकावे. त्यास परतफेड करायला सांगू नये. कारण परमेश्वरानेच त्यावर्षी कर्जमुक्ती जाहीर केली आहे.
2 Este, pois, é o modo da remissão: todo o credor remitirá o que emprestou ao seu próximo; não o exigirá do seu próximo ou do seu irmão, pois a remissão do Senhor é apregoada.
3 परक्याकडून हवी तर वसुली करावी, पण तुझ्या बांधवाकडे तुझे काही येणे असेल तर ते तू सोडून दे.
3 Do estrangeiro o exigirás; mas o que tiveres em poder de teu irmão a tua mão o remitirá.
4 तुमच्या देशात कोणी गरीब असता कामा नये. कारण ही भूमी तुम्हास परमेश्वराने दिली आहे आणि तो तुम्हास भरभरुन आशीर्वाद देणार आहे
4 Exceto quando não houver entre ti pobre algum; pois o Senhor abundantemente te abençoará na terra que o Senhor teu Deus te dará por herança, para possuí-la.
5 पण त्यासाठी तुम्ही तुमचा देव परमेश्वर याच्या आज्ञेत राहिले पाहिजे. मी आज सांगितलेल्या सर्व आज्ञा काळजीपूर्वक पाळा.
5 Se somente ouvires diligentemente a voz do Senhor teu Deus para cuidares em cumprir todos estes mandamentos que hoje te ordeno;
6 मग तुमचा देव परमेश्वर आपल्या वचनानुसार तुमचे कल्याण करील. तुम्ही इतर राष्ट्रांना उसने द्याल पण उसने घ्यायची तुमच्यावर वेळ येणार नाही. तुम्ही इतर राष्ट्रावर सत्ता चालवाल पण तुमच्यावर इतरांची सत्ता चालणार नाही.
6 Porque o Senhor teu Deus te abençoará, como te tem falado; assim, emprestarás a muitas nações, mas não tomarás empréstimos; e dominarás sobre muitas nações, mas elas não dominarão sobre ti.
7 तुमचा देव परमेश्वर तुम्हास देणार असलेल्या या देशात एखादा मनुष्य गरीब असेल, त्यास मदत करायला हात आखडता घेऊ नका, स्वार्थीपणाने वागू नका.
7 Quando entre ti houver algum pobre, de teus irmãos, em alguma das tuas portas, na terra que o Senhor teu Deus te dá, não endurecerás o teu coração, nem fecharás a tua mão a teu irmão que for pobre;
8 त्याच्यासाठी हात सैल सोडा आणि त्याच्या गरजेपुरते उसने द्या.
8 Antes lhe abrirás de todo a tua mão, e livremente lhe emprestarás o que lhe falta, quanto baste para a sua necessidade.
9 कर्जमाफीचे वर्ष (सातवे वर्ष) आता जवळच आले आहे अशा दुष्ट विचाराने कुणाला मदत नाकारू नका. गरजूंच्या बाबतीत असे क्षुद्र विचार मनात आणू नका. त्याच्या बाबतीत अनुदार राहू नका. तसे केले तर ते तुमच्याविरुध्द परमेश्वराकडे गाऱ्हाणे गातील. आणि तुम्हास पाप लागेल.
9 Guarda-te, que não haja palavra perversa no teu coração, dizendo: Vai-se aproximando o sétimo ano, o ano da remissão; e que o teu olho seja maligno para com teu irmão pobre, e não lhe dês nada; e que ele clame contra ti ao Senhor, e que haja em ti pecado.
10 तेव्हा तुम्हास शक्य आहे ते त्यांना द्या. उदार अंत:करणाने द्या. या सत्कृत्याबद्दल तुम्हास परमेश्वर देवाचा आशीर्वाद मिळेल. तुम्ही जे काम हाती घ्याल त्यामध्ये तुम्हास यश मिळेल.
10 Livremente lhe darás, e que o teu coração não seja maligno, quando lhe deres; pois por esta causa te abençoará o Senhor teu Deus em toda a tua obra, e em tudo o que puseres a tua mão.
11 गरीब लोक तर देशात नेहमीच असणार म्हणून मी म्हणतो की त्यांना मदत करायला तयार राहा. आपल्या देशातील गरजवंतांना सढळ हाताने मदत करा.
11 Pois nunca deixará de haver pobre na terra; pelo que te ordeno, dizendo: Livremente abrirás a tua mão para o teu irmão, para o teu necessitado, e para o teu pobre na tua terra.
12 एखादी इब्री स्त्री किंवा पुरुष तुम्ही दास म्हणून विकत घेतलेला असेल तर सहा वर्षे चाकरी झाल्यावर, सातव्या वर्षी त्यास मुक्त करा.
12 Quando teu irmão hebreu ou irmã hebréia se vender a ti, seis anos te servirá, mas no sétimo ano o deixarás ir livre.
13 पण त्यास रिक्त हाताने जाऊ देऊ नका.
13 E, quando o deixares ir livre, não o despedirás vazio.
14 तर तुझी गुरे, खळे, द्राक्षकुंड यातून उदार हाताने दे. तुमचा देव परमेश्वर याच्या आशीर्वादाने तुम्हास भरभरुन मिळाले आहे, त्या प्रमाणात त्यास दे.
14 Liberalmente o fornecerás do teu rebanho, e da tua eira, e do teu lagar; daquilo com que o Senhor teu Deus te tiver abençoado lhe darás.
15 आपण मिसरमध्ये दास होतो व तुमचा देव परमेश्वर याने तुम्हास मुक्त केले हे लक्षात ठेवा. त्यासाठीच मी तुम्हास आज ही आज्ञा देत आहे.
15 E lembrar-te-ás de que foste servo na terra do Egito, e de que o Senhor teu Deus te resgatou; portanto hoje te ordeno isso.
16 असे घडेल की, तो तुम्हास म्हणेल, मी तुमच्यापासुन दूर जाणार नाही, कारण तुमच्यावर व कुटुंबावर प्रीती करीत असेल आणि आनंदात असल्यामुळे तो तुम्हास सोडून जायला तयार होणार नाही.
16 Porém se ele te disser: Não sairei de ti; porquanto te amo a ti, e a tua casa, por estar bem contigo;
17 तेव्हा दरवाजाजवळ धरुन अरीने त्याचा कान टोचा. तो तुमचा कायमचा दास आहे हे त्यावरुन कळेल. दासीच्या बाबतीतही असेच करा.
17 Então tomarás uma sovela, e lhe furarás a orelha à porta, e teu servo será para sempre; e também assim farás à tua serva.
18 दासांना मुक्त करून जाऊ देताना तुम्हास जड वाटू नये. पगारी नोकराला तुम्हास द्यावे लागले असते त्याच्या निम्म्या पैशातच याने तुमची सेवा केली आहे हे लक्षात ठेवा. असे केलेत तर तुम्ही जे जे कराल त्यामध्ये तुमचा देव परमेश्वर तुम्हास आशीर्वाद देईल.
18 Não seja duro aos teus olhos, quando despedi-lo liberto de ti; pois seis anos te serviu em equivalência ao dobro do salário do diarista; assim o Senhor teu Deus te abençoará em tudo o que fizeres.
19 तुमच्या कळपातील सर्व जनावरांचा पहिला गोऱ्हा पवित्र मानून तो परमेश्वरास अर्पण करा. पहिला गोऱ्हा कामाला जुंपू नका. पहिल्या मेंढराची लोकर कातरू नका.
19 Todo o primogênito que nascer das tuas vacas e das tuas ovelhas, o macho santificarás ao Senhor teu Deus; com o primogênito do teu boi não trabalharás, nem tosquiarás o primogênito das tuas ovelhas.
20 दरवर्षी या सगळ्या गोऱ्हांना तुमचा देव परमेश्वर याने निवडलेल्या जागी घेऊन जा. तेथे सर्व कुटुंबियांसमवेत परमेश्वरासमोर त्याचे मांस खा.
20 Perante o Senhor teu Deus os comerás de ano em ano, no lugar que o Senhor escolher, tu e a tua casa.
21 पण यापैकी एखाद्या जनावरात लंगडेपणा, आंधळेपणा असे काही व्यंग असेल तर तुमचा देव परमेश्वर ह्याला त्याचा बली देऊ नका.
21 Porém, havendo nele algum defeito, se for coxo, ou cego, ou tiver qualquer defeito, não o sacrificarás ao Senhor teu Deus.
22 वाटल्यास घरीच त्याचे मांस खा. हरणाचे किंवा सांबराचे मांस खातात त्याप्रमाणे अशुद्ध व शुद्ध कोणीही ते खावे.
22 Nas tuas portas o comerás; o imundo e o limpo o comerão também, como da corça ou do veado.
23 फक्त त्याचे रक्तसेवन करु नये. ते तेवढे पाण्याप्रमाणे जमिनीवर ओतून द्यावे.
23 Somente o seu sangue não comerás; sobre a terra o derramarás como água.
Atalhos do teclado
- Capítulo anterior←
- Próximo capítulo→
- Versículo anteriork
- Próximo versículoj
- Limpar seleçãoEsc
- Esta ajuda?
Estude este capítulo no WhatsApp
Peça à IA da Bíblia Fala para explicar Deuteronômio 15, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.