Deuteronômio 11

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (MAR) vs VC

Sair da comparação
VC Versão Católica
1 म्हणून तुमचा देव परमेश्वर ह्यांच्यावर प्रेम करा. त्याच्या आज्ञेप्रमाणे वागा. त्याने घालून दिलेल्या नियमांचे, आज्ञांचे पालन करा.
1 Amarás, pois, o Senhor, teu Deus, e observarás sempre o que ele te ordena, suas leis, seus preceitos e seus mandamentos.
2 परमेश्वराने तुमच्यासाठी केलेले सर्व प्रताप आज आठवा. हे मी तुम्हासच सांगत आहे. तुमच्या मुलाबाळांना नव्हे. कारण त्यांनी या शिस्तींपैकी काहीच पाहिले किंव्हा अनुभवले नाही. तुमचा देव परमेश्वर त्याची थोरवी, त्याचे सामर्थ्य व पराक्रमी हात व ऊगारलेला बाहू ह्याच्याद्ववारे,
2 Quanto a vós pois não se trata de vossos filhos, que não conheceram e não foram testemunhas oculares das lições que o Senhor nos deu , {reconhecei} a grandeza de vosso Deus, o poder de sua mão, e o vigor de seu braço,
3 मिसरचा राजा फारो व त्याचा सर्व देश ह्याला त्याने कोणती चिन्हे व चमत्कार दाखवली हे तुम्ही पाहिलेच आहे.
3 os prodígios e as obras que fez no Egito contra o faraó, rei do Egito, e contra toda a sua terra;
4 मिसरचे सैन्य, त्यांचे घोडे, रथ यांची कशी दैना झाली, तुमचा ते पाठलाग करत असताना त्यांच्यावर तांबड्या समुद्राच्या पाण्याचा लोंढा कसा आणला हेही तुम्ही पाहिले. परमेश्वराने त्यांना पूर्ण नेस्तनाबूत केले.
4 o que fez ao exército egípcio, aos seus cavalos e aos seus carros, como os envolveu nas águas do mar Vermelho, quando vos perseguiam, aniquilando-os para sempre.
5 तुम्ही येथे येईपर्यंत रानावनातून तुम्हास त्याने कसे आणले हे तुम्हास माहीत आहेच.
5 {Lembra-te} do que fez por vós no deserto até a vossa chegada a este lugar;
6 त्याचप्रमाणे रऊबेनाचा मुलगा अलीयाब याच्या दाथान व अबीराम या मुलांचे देवाने काय केले ते तुम्हास माहीत आहे. त्यांना आणि त्यांचे कुटुंबीय, त्यांचे तंबू, नोकरचाकर व गुरेढोरे यांना सर्व इस्राएलादेखत पृथ्वीने आपल्या पोटात घेतले.
6 do castigo que infligiu a Datã e Abiron, filhos de Eliab, filho de Rubem, quando a terra, abrindo sua boca, engoliu-os no meio de todo o Israel, com suas famílias, suas tendas e todos os seres vivos que os seguiam.
7 परमेश्वराची ही महान कृत्ये तुमच्या मुलांनी नाही, तर तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पाहिलीत.
7 Os vossos filhos viram todas as obras que o Senhor fez.
8 तेव्हा आज मी देतो ती प्रत्येक आज्ञा कटाक्षाने पाळा त्यामुळे तुम्ही बलशाली व्हाल, यार्देन ओलांडून जो देश ताब्यात घ्यायला तुम्ही सिद्ध झाला आहात तो हस्तगत कराल.
8 Observareis, pois, as ordens que hoje vos dou, para que sejais fortes e entreis na posse da terra que ides ocupar,
9 त्या देशात तुम्ही चिरकाल रहाल. तुमच्या पूर्वजांना व त्यांच्या वंशजांना दुधामधाचा प्रदेश द्यायचे परमेश्वराने वचन दिले आहे. या प्रदेशात सुबत्ता आहे.
9 e prolongueis os vossos dias na terra que o Senhor jurou dar a vossos pais e à sua posteridade, terra que mana leite e mel.
10 तुम्ही जेथे जाणार आहात तो प्रदेश तुम्ही सोडून आलेल्या मिसरसारखा नाही. तेथे तुम्ही भाजीच्या मळ्याप्रमाणे बी पेरून पायांनी जमीनीला पाणी देत होता.
10 Com efeito, a terra em que vais entrar para possuí-la, não é como o Egito de onde saíste, onde, depois de lançada a semente, devias regar a terra com a força de teus pés, como se rega uma horta.
11 पण आता मिळणारी जमीन तशी नाही. त्या देशामध्ये डोंगर आणि खोरी आहेत. आकाशातून पडणाऱ्या पावसाचे पाणी या भूमीला मिळते.
11 A terra que ides ocupar é uma terra de montes e vales, que bebe as chuvas do céu.
12 तुमचा देव परमेश्वर त्या जमिनीची काळजी घेतो. वर्षांच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्याची या जमिनीवर कृपादृष्टी असते.
12 É uma terra de que o Senhor, teu Deus, toma cuidado, e para a qual os seus olhos estão continuamente voltados do começo ao fim do ano.
13 परमेश्वर म्हणतो, ज्या आज्ञा मी आज तुम्हास देत आहे त्यांचे तुम्ही काटेकोरपणे पालन करा. मन:पूर्वक तुमचा देव परमेश्वर याची सेवा करा. त्याच्यावर प्रेम करा.
13 Se obedecerdes aos mandamentos que hoje vos prescrevo, se amardes o Senhor, servindo-o de todo o vosso coração e de toda a vossa alma,
14 तसे वागलात तर तुमच्या भूमीवर मी योग्यवेळी पाऊस पाडीन. म्हणजे तुम्हास धान्य, नवीन द्राक्षरस, तेल यांचा साठा करता येईल.
14 derramarei sobre a vossa terra a chuva em seu tempo, a chuva do outono e a da primavera, e recolherás o teu trigo, o teu vinho e o teu óleo;
15 माझ्यामुळे तुमच्या गुराढोरांना कुरणात गवत मिळेल. तुम्हास खाण्याकरता पुष्कळ असेल.
15 darei erva aos teus campos para os teus animais, e te alimentarás até ficares saciado.
16 पण सांभाळा, गाफील राहू नका. या देवापासून परावृत होऊन इतर दैवतांचे भजन पूजन करु नका.
16 Tende cuidado para que o vosso coração não seja seduzido e vos desvieis do Senhor para servir deuses estranhos, rendendo-lhes culto e prostrando-vos diante deles.
17 तसे केलेत तर परमेश्वराचा कोप तुमच्यावर होईल. तो आकाश बंद करील आणि मग पाऊस पडणार नाही. जमिनीत पीक येणार नाही. जो चांगला देश परमेश्वर तुम्हास देत आहे त्यामध्ये तुम्हास लवकरच मरण येईल.
17 A cólera do Senhor se inflamaria contra vós e ele fecharia os céus: a chuva cessaria de cair, e não haveria mais colheita, no vosso solo, de modo que não tardaríeis a perecer nesta boa terra que o Senhor vos dá.
18 म्हणून सांगतो या आज्ञा लक्षात ठेवा. त्या हृदयात साठवून ठेवा. त्या लिहून ठेवा. आणि लक्षात राहण्यासाठी हातावर चिन्हादाखल बांधा व कपाळावर लावा.
18 Gravai, pois, profundamente em vosso coração e em vossa alma estas minhas palavras; prenderas às vossas mãos como um sinal, e levaras como uma faixa frontal entre os vossos olhos.
19 आपल्या मुलाबाळांना हे नियम शिकवा. घरीदारी, झोपताना, झोपून उठताना त्याविषयी बोलत राहा.
19 Ensinai-as aos vossos filhos, falando-lhes delas seja em vossa casa, seja em viagem, quando vos deitardes ou levantardes.
20 घराच्या फाटकांवर, आणि दारांच्या खांबांवर ही वचने लिहा.
20 Escreve-as nas ombreiras e nas portas de tua casa,
21 म्हणजे जो देश परमेश्वराने तुमच्या पूर्वजांना शपथपूर्वक देऊ केला त्या देशात तुम्ही आणि तुमची मुलेबाळे पृथ्वीवर आकाशाचे छप्पर असेपर्यंत रहाल.
21 para que se multipliquem os teus dias e os dias de teus filhos na terra que o Senhor jurou dar a teus pais, e sejam tão numerosos como os dias do céu sobre a terra.
22 मी सांगतो त्या सर्व आज्ञा नीट पाळा. परमेश्वर तुमचा देव ह्याजवर प्रेम करा. त्याने सांगितलेल्या मार्गाने जा. त्याच्यावरच निष्ठा ठेवा.
22 Se observardes fielmente todos os mandamentos que vos prescrevo, amando o Senhor, vosso Deus, andando em seus caminhos e apegando-vos a ele,
23 म्हणजे तुम्ही जाल तेव्हा तेथील इतर राष्ट्रांना परमेश्वर तेथून हुसकावून लावेल. तुमच्यापेक्षा मोठ्या आणि सामर्थ्यवान राष्ट्रावर तुम्ही ताबा मिळवाल.
23 então o Senhor expulsará de diante de vós todas essas nações, e despojareis povos mais numerosos e mais fortes do que vós.
24 जेथे जेथे तुम्ही पाय ठेवाल ती जमीन तुमची होईल. दक्षिणेतील वाळवंटापासून उत्तरेला लबानोन पर्यंत आणि पूर्वेला फरात नदीपासून पश्चिमेला समुद्रापर्यंत एवढा प्रदेश तुमचा होईल.
24 Todo lugar em que pisar a planta de vossos pés vos pertencerá. Vossa fronteiras irão desde o deserto até o Líbano e desde o rio Eufrates até o mar do ocidente.
25 कोणीही तुमचा सामना करु शकणार नाही. परमेश्वर देवाने तुम्हास सांगितल्याप्रमाणे, तुम्ही जेथे जेथे जाल तेथे लोकांस तुमची दहशत वाटेल.
25 Ninguém vos poderá resistir: o Senhor, vosso Deus, semeará o pânico e o terror de vós em todas as terras onde pisardes, como vos prometeu.
26 आज मी तुमच्यापुढे आशीर्वाद आणि शाप हे पर्याय ठेवत आहे. त्यातून निवड करा.
26 Vede: proponho-vos hoje bênção ou maldição.
27 आज मी तुमचा देव परमेश्वर ह्याच्या ज्या आज्ञा तुम्हास सांगितल्या त्या नीट लक्षपूर्वक पाळल्यात तर तुम्हास आशीर्वाद मिळेल.
27 Bênção, se obedecerdes aos mandamentos do Senhor, vosso Deus, que hoje vos prescrevo.
28 पण या आज्ञा न ऐकता भलतीकडे वळालात तर शाप मिळेल. तेव्हा आज मी सांगितल्या मार्गानेच जा. इतर दैवतांच्या मागे लागू नका. परमेश्वरास तुम्ही ओळखता पण इतर दैवतांची तुम्हास ओळख नाही.
28 Maldição, se não obedecerdes aos mandamentos do Senhor, vosso Deus, e vos apartardes do caminho que hoje vos mostro, para seguintes deuses estranhos que não conheceis.
29 तुमचा देव परमेश्वर तुम्हास त्या प्रदेशात घेऊन जाईल. तुम्ही लवकरच तो प्रदेश ताब्यात घ्याल. तेथे गेल्याबरोबर तुम्ही गरिज्जीम डोंगरावर जा, व आशीर्वाद उच्चारा. मग तेथून एबाल डोंगरावर जाऊन शापवाणीचा उच्चार करा.
29 Quando o Senhor, vosso Deus, te tiver introduzido na terra que vais possuir, pronunciarás a bênção sobre o monte Garizim, e a maldição sobre o monte Ebal.
30 हे डोंगर यार्देन नदीच्या पलीकडे, सुर्य माळवतो त्या दिशेला अराबात राहणाऱ्या कनानी लोकांच्या प्रदेशात, पश्चिमेकडे गिलगाल शहराजवळच्या मोरे येथील ओक वृक्षांजवळ आहेत.
30 Essas montanhas encontram-se além do Jordão, do outro lado do caminho do ocidente, na terra dos cananeus que habitam nas planícies defronte de Gálgala, perto dos carvalhos de Moré.
31 तुम्ही यार्देन नदी पार करून जाल. तुमचा देव परमेश्वर देत असलेली जमीन तुम्ही ताब्यात घ्याल. ती तुमची असेल. त्यामध्ये वस्ती कराल तेव्हा
31 Com efeito, vós passareis o Jordão e tomareis posse da terra que te dá o Senhor. Quando a possuirdes e nela habitardes,
32 मी आज सांगितलेले नियम व विधी यांचे काळजीपूर्वक पालन करा.
32 cuidareis de praticar todos os preceitos e todas as leis que hoje vos proponho.

Ler em outra tradução

Comparar com outra

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Deuteronômio 11, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.