Atos 9
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (MAR) vs VC
1 शौल यरूशलेम शहरामध्ये प्रभूच्या अनुयायांना अजूनही धमकावण्याचा व जिवे मारण्याचा प्रयत्न करीत होता, म्हणून तो महायाजकाकडे गेला.
1 Enquanto isso, Saulo só respirava ameaças e morte contra os discípulos do Senhor. Apresentou-se ao príncipe dos sacerdotes,
2 शौलाने दिमिष्क येथील सभास्थानातील महायाजकाकडून ख्रिस्ताच्या अनुयायांना पकडण्यासाठी अशी अधिकारपत्रे मागितली की, जर त्यास तेथे कोणी ‘तो मार्ग’ अनुसरणारा, मग तो पुरूष असो अथवा स्त्री, सापडले तर त्याने त्यांना बांधून यरूशलेम शहरास आणावे.
2 e pediu-lhe cartas para as sinagogas de Damasco, com o fim de levar presos a Jerusalém todos os homens e mulheres que achasse seguindo essa doutrina.
3 मग शौल दिमिष्काजवळ आला तेव्हा एकाएकी, आकाशातून फारच प्रखर प्रकाश त्याच्याभोवती चमकला;
3 Durante a viagem, estando já perto de Damasco, subitamente o cercou uma luz resplandecente vinda do céu.
4 शौल जमिनीवर पडला आणि एक वाणी त्याच्याशी बोलताना त्याने ऐकली, “शौला, शौला, तू माझा छळ का करतोस?”
4 Caindo por terra, ouviu uma voz que lhe dizia: Saulo, Saulo, por que me persegues?
5 शौल म्हणाला, “प्रभू तू कोण आहेस?” ती वाणी म्हणाली, “मी येशू आहे, ज्याचा तू छळ करीत आहेस तो मीच आहे;
5 Saulo disse: Quem és, Senhor? Respondeu ele: Eu sou Jesus, a quem tu persegues. {Duro te é recalcitrar contra o aguilhão.
6 आता ऊठ, आणि नगरात जा, तुला काय करायचे आहे, ते तुला तेथे कोणीतरी सांगेल.”
6 Então, trêmulo e atônito, disse ele: Senhor, que queres que eu faça? Respondeu-lhe o Senhor:} Levanta-te, entra na cidade. Aí te será dito o que deves fazer.
7 जी माणसे शौलाबोबर प्रवास करीत होती, ती तेथेच स्तब्ध उभी राहिली त्या लोकांनी आवाज ऐकला, पण त्यांना कोणी दिसले नाही.
7 Os homens que o acompanhavam enchiam-se de espanto, pois ouviam perfeitamente a voz, mas não viam ninguém.
8 शौल जमिनीवरून उठला, त्याने डोळे उघडले, पण त्यास काहीच दिसेना, म्हणून जे लोक त्याच्याबरोबर होते त्यांनी त्याचा हात धरून त्यास दिमिष्क शहरात नेले.
8 Saulo levantou-se do chão. Abrindo, porém, os olhos, não via nada. Tomaram-no pela mão e o introduziram em Damasco,
9 तीन दिवसांपर्यंत शौलाला काहीच दिसत नव्हते, त्याने काही खाल्ले किंवा प्याले नाही.
9 onde esteve três dias sem ver, sem comer nem beber.
10 दिमिष्कांमध्ये येशूचा एक शिष्य होता त्याचे नाव हनन्या होते; प्रभू त्याच्याशी एका दृष्टांतात बोलला तो म्हणाला, “हनन्या.” हनन्याने उत्तर दिले, “मी इथे आहे, प्रभू.”
10 Havia em Damasco um discípulo chamado Ananias. O Senhor, numa visão, lhe disse: Ananias! Eis-me aqui, Senhor, respondeu ele.
11 प्रभू हनन्याला म्हणाला, “ऊठ आणि नीट नावाच्या रस्त्यावर जा, तेथे यहूदाचे घर शोध व तार्सस शहराहून आलेल्या शौल नावाच्या व्यक्तीबद्दल विचार सध्या तो तेथे आहे; व प्रार्थना करीत आहे.
11 O Senhor lhe ordenou: Levanta-te e vai à rua Direita, e pergunta em casa de Judas por um homem de Tarso, chamado Saulo; ele está orando.
12 शौलाने दृष्टांतात पाहिले की त्यामध्ये हनन्या नावाचा मनुष्य आपल्याकडे आला, असून आपल्यावर हात ठेवत आहे व त्यानंतर त्यास पुन्हा दृष्टी प्राप्त झाली, असे त्यास दिसले.”
12 {Este via numa visão um homem, chamado Ananias, entrar e impor-lhe as mãos para recobrar a vista.}
13 परंतु हनन्याने उत्तर दिले, “प्रभू, मी त्या मनुष्याविषयी अनेक लोकांच्या तोंडून ऐकले आहे; यरूशलेम शहरातील तुझ्या संतांशी तो किती वाईट रीतीने वागला हे मी ऐकले आहे.
13 Ananias respondeu: Senhor, muitos já me falaram deste homem, quantos males fez aos teus fiéis em Jerusalém.
14 आणि आता जे तुझ्या नावावर विश्वास ठेवतात अशा लोकांस बांधून नेण्यासाठी मुख्य याजकांकडून अधिकारपत्र घेऊन हा शौल येथे आला आहे.”
14 E aqui ele tem poder dos príncipes dos sacerdotes para prender a todos aqueles que invocam o teu nome.
15 परंतु प्रभू म्हणाला, “जा, राजांना आणि परराष्ट्रांना आणि इस्राएलाचे संतान यांच्यासमोर माझे नाव घेऊन जाण्याकरता तो माझे निवडलेले पात्र आहे.
15 Mas o Senhor lhe disse: Vai, porque este homem é para mim um instrumento escolhido, que levará o meu nome diante das nações, dos reis e dos filhos de Israel.
16 माझ्या नावाकरीता ज्या गोष्टी त्यास सहन कराव्या लागतील त्या मी त्यास दाखवून देईन,”
16 Eu lhe mostrarei tudo o que terá de padecer pelo meu nome.
17 हनन्या निघाला आणि यहूदाच्या घरी गेला, त्याने शौलाच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हटले, “शौल, भाऊ, प्रभू येशूने तुला इकडे येत असता रस्त्यावर दर्शन दिले त्यानेच मला तुझ्याकडे पाठवले, यासाठी की, तुला पुन्हा दृष्टी यावी व तू पवित्र आत्म्याने परिपूर्ण व्हावे.”
17 Ananias foi. Entrou na casa e, impondo-lhe as mãos, disse: Saulo, meu irmão, o Senhor, esse Jesus que te apareceu no caminho, enviou-me para que recobres a vista e fiques cheio do Espírito Santo.
18 लागलीच खपल्यासारखे काहीतरी शौलाच्या डोळ्यावरून खाली पडले, आणि त्यास पुन्हा दृष्टी आली शौल तेथून उठल्यावर त्याचा बाप्तिस्मा करण्यात आला.
18 No mesmo instante caíram dos olhos de Saulo umas como escamas, e recuperou a vista. Levantou-se e foi batizado.
19 नंतर त्याने अन्न सेवन केल्यावर त्याच्या अंगात शक्ती आली, शौल काही दिवस दिमिष्क येथील शिष्यांबरोबर राहिला.
19 Depois tomou alimento e sentiu-se fortalecido. Demorou-se por alguns dias com os discípulos que se achavam em Damasco.
20 यानंतर सरळ सभास्थानात जाऊन शौल येशूच्या नावाची घोषणा करू लागला, येशू हा देवाचा पुत्र आहे.
20 Imediatamente começou a proclamar pelas sinagogas que Jesus é o Filho de Deus.
21 ज्या लोकांनी शौलाचे बोलणे ऐकले त्या सर्वांना मोठे नवल वाटले ते म्हणाले, “यरूशलेम शहरातील ज्या लोकांचा येशूच्या नावावर विश्वास आहे, त्या सर्वाचा नाश करू पाहणारा हाच नाही काय? तो येशूच्या अनुयायांना अटक करण्यासाठी येथे आला आहे व तो त्यांना यरूशलेम शहरातील मुख्य याजकांसमोर उभे करणार आहे.”
21 Todos os seus ouvintes pasmavam e diziam: Este não é aquele que perseguia em Jerusalém os que invocam o nome de Jesus? Não veio cá só para levá-los presos aos sumos sacerdotes?
22 परंतु शौल अधिकाधिक सामर्थ्यशाली होत गेला, त्याने हे सिद्ध केले की, येशू हाच ख्रिस्त आहे आणि त्याचे पुरावे इतके सबळ होते. दिमिष्क येथील यहूदी त्याच्याबरोबर वाद घालू शकले नाहीत.
22 Saulo, porém, sentia crescer o seu poder e confundia os judeus de Damasco, demonstrando que Jesus é o Cristo.
23 काही दिवसानंतर, यहूदी लोकांनी शौलाला जिवे मारण्याचा कट रचला.
23 Decorridos alguns dias, os judeus deliberaram, em conselho, matá-lo.
24 यहूदी रात्रंदिवस शहराच्या वेशीवर पहारा देत होते व शौलाला पकडण्याची वाट पाहत होते. त्यांना शौलाला ठार मारायचे होते, पण त्यांचा हा बेत शौलास समजला.
24 Estas intenções chegaram ao conhecimento de Saulo. Guardavam eles as portas de dia e de noite, para matá-lo.
25 एके रात्री शौलाने ज्यांना शिक्षण दिले होते अशा काही अनुयायांनी शहरातून जाण्यासाठी शौलाला मदत केली, अनुयायांनी शौलाला एका टोपलीत ठेवले, नंतर त्यांनी टोपली गावकुसावरून रात्रीच्या वेळी खाली सोडली.
25 Mas os discípulos, tomando-o de noite, fizeram-no descer pela muralha dentro de um cesto.
26 नंतर शौल यरूशलेमे शहरास गेला तेथील विश्वास ठेवणाऱ्यांच्या परिवारात मिसळण्याचा त्याने प्रयत्न केला, पण ते त्यास घाबरत होते, त्यांचा विश्वासच बसत नव्हता, शौल खरोखर येशूचा शिष्य झाला आहे.
26 Chegando a Jerusalém, tentava ajuntar-se aos discípulos, mas todos o temiam, não querendo crer que se tivesse tornado discípulo.
27 परंतु बर्णबाने शौलाचा स्वीकार केला व त्यास घेऊन प्रेषितांकडे गेला. बर्णबाने सांगितले की, शौलाने येशूला दिमिष्कच्या रस्त्यावर पाहिले आहे, येशू त्याच्याशी कसा बोलला हेही त्याने सविस्तरणे सांगितले, मग त्याने प्रेषितांना सांगितले की, येशूविषयीची सुवार्ता शौलाने मोठ्या धैर्याने दिमिष्क येथील लोकांस सांगितली.
27 Então Barnabé, levando-o consigo, apresentou-o aos apóstolos e contou-lhes como Saulo vira o Senhor no caminho, e que lhe havia falado, e como em Damasco pregara, com desassombro, o nome de Jesus.
28 मग शौल अनुयायांसह तेथे राहिला, तो यरूशलेम शहरामध्ये सगळीकडे गेला. व धैर्याने प्रभूची सुवार्ता सांगू लागला.
28 Daí por diante permaneceu com eles, saindo e entrando em Jerusalém, e pregando, destemidamente, o nome do Senhor.
29 शौल नेहमी ग्रीक भाषा बोलणाऱ्या यहूदी लोकांशी बोलत असे तो त्यांच्याशी वादविवाद करीत असे, पण ते त्यास मारण्याचा प्रयत्न करीत होते.
29 Falava também e discutia com os helenistas. Mas estes procuravam matá-lo.
30 जेव्हा बंधुजनांना हे कळाले तेव्हा त्यांनी त्यास कैसरीया येथे नेले, व नंतर तेथून त्यास तार्सास पाठवले.
30 Os irmãos, informados disso, acompanharam-no até Cesaréia e dali o fizeram partir para Tarso.
31 अशाप्रकारे सर्व यहूदिया, गालील प्रांत, शोमरोन या प्रदेशातील मंडळीस तेथे शांती लाभली; आणि, मंडळी पवित्र आत्म्याच्या सांत्वनेत व परमेश्वराच्या भयात वाढत गेली.
31 A Igreja gozava então de paz por toda a Judéia, Galiléia e Samaria. Estabelecia-se ela caminhando no temor do Senhor, e a assistência do Espírito Santo a fazia crescer em número.
32 मग असे झाले की, पेत्र यरूशलेम शहराच्या सभोवतालच्या गावामध्ये फिरला, लोद या गावामध्ये जे देवाचे पवित्रजन होते त्यांना भेटला.
32 Pedro, que caminhava por toda parte, de cidade em cidade, desceu também aos fiéis que habitavam em Lida.
33 लोद येथे त्यास ऐनेयास नावाचा मनुष्य आढळला, त्याच्या अंगातून वारे गेल्याने तो पंगू झाला होता व आठ वर्षे अंथरुणाला खिळून होता.
33 Ali achou um homem chamado Enéias, que havia oito anos jazia paralítico num leito.
34 पेत्र त्यास म्हणाला, “ऐनेयास, येशू ख्रिस्त तुला बरे करीत आहे; ऊठ, आपले अंथरुण नीट कर.” ऐनेयास ताबडतोब उभा राहिला.
34 Disse-lhe Pedro: Enéias, Jesus Cristo te cura: levanta-te e faze tua cama. E levantou-se imediatamente.
35 लोद येथे राहणाऱ्या सर्व लोकांनी आणि शारोनात राहणाऱ्यांनी त्यास पाहिले, तेव्हा ते सर्व प्रभूकडे वळले.
35 Viram-no todos os que habitavam em Lida e em Sarona, e converteram-se ao Senhor.
36 यापो शहरात येशूची एक शिष्या राहत होती, तिचे नाव तबिथा होते, (ग्रीक भाषेत तिचे नाव “दुर्कस” होते. त्याचा अर्थ हरीण) ती नेहमी लोकांसाठी चांगली कामे करीत असे गरीबांना दानधर्म करीत असे.
36 Em Jope havia uma discípula chamada Tabita - em grego, Dorcas. Esta era rica em boas obras e esmolas que dava.
37 जेव्हा पेत्र लोदमध्ये होता, तेव्हा तबिथा आजारी पडली व मरण पावली; लोकांनी तिला आंघोळ घालून व माडीवरच्या एका खोलीत ठेवले.
37 Aconteceu que adoecera naqueles dias e veio a falecer. Depois de a terem lavado, levaram-na para o quarto de cima.
38 यापो येथील शिष्यांनी ऐकले की, पेत्र लोदमध्ये आहे, लोद हे यापोजवळ आहे, म्हणून त्यांनी दोन माणसे पाठविली, त्यांनी त्यास विनंती केली, ते म्हणाले, “त्वरा करा, आमच्याकडे लवकर या.”
38 Ora, como Lida fica perto de Jope, os discípulos, ouvindo dizer que Pedro aí se encontrava, enviaram-lhe dois homens, rogando-lhe: Não te demores em vir ter conosco.
39 पेत्र तयार झाला व त्यांच्याबरोबर गेला, जेव्हा तो तेथे पोहोचला तेव्हा त्यांनी त्यास माडीवरच्या एका खोलीत नेले, सर्व विधवा स्त्रिया पेत्राभोवती उभ्या राहिल्या, त्या रडत होत्या, दुर्कस जिवंत असताना जे कपडे व झगे तिने तयार केले होते ते त्यांनी पेत्राला दाखवले.
39 Pedro levantou-se imediatamente e foi com eles. Logo que chegou, conduziram-no ao quarto de cima. Cercavam-no todas as viúvas, chorando e mostrando-lhe as túnicas e os vestidos que Dorcas lhes fazia quando viva.
40 पेत्राने खोलीतील सर्वांना बाहेर काढले त्याने गुडघे टेकून प्रार्थना केली आणि दुर्कसच्या शरीराकडे वळून तो म्हणाला, “तबिथा ऊठ” तेव्हा तिने डोळे उघडले, जेव्हा तिने पेत्राला पाहीले तेव्हा ती उठून बसली.
40 Pedro então, tendo feito todos sair, pôs-se de joelhos e orou. Voltando-se para o corpo, disse: Tabita, levanta-te! Ela abriu os olhos e, vendo Pedro, sentou-se.
41 त्याने तिला आपला हात देऊन उभे राहण्यास मदत केली, नंतर त्याने पवित्रजनांना आणि विधवा स्त्रियांना खोलीमध्ये बोलावले, त्याने तबिथाला त्यांना दाखवले, ती जिवंत होती.
41 Ele a fez levantar-se, estendendo-lhe a mão. Chamando os irmãos e as viúvas, entregou-lha viva.
42 यापोमधील सर्व लोकांस हे समजले, यातील पुष्कळ लोकांनी प्रभूवर विश्वास ठेवला.
42 Este fato espalhou-se por toda Jope e muitos creram no Senhor.
43 नंतर असे झाले की, तो यापोत शिमोन नावाच्या कोणाएका कातडे कमावणाऱ्या चांभाराच्या येथे बरेच दिवस राहीला.
43 Pedro permaneceu ainda muitos dias em Jope, em casa dum curtidor, chamado Simão.
Atalhos do teclado
- Capítulo anterior←
- Próximo capítulo→
- Versículo anteriork
- Próximo versículoj
- Limpar seleçãoEsc
- Esta ajuda?
Estude este capítulo no WhatsApp
Peça à IA da Bíblia Fala para explicar Atos 9, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.