Atos 24
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (MAR) vs ACF
1 पाच दिवसानंतर महायाजक हनन्या, काही वडील आणि तिर्तुल्ल नावाचा कोणीएक वकील हे खाली आले; आणि त्यांनी सुभेदारापुढे पौलाविरुद्ध फिर्याद केली.
1 E, cinco dias depois, o sumo sacerdote Ananias desceu com os anciãos, e um certo Tértulo, orador, os quais compareceram perante o presidente contra Paulo.
2 जेव्हा पौल शासकासमोर उभा राहिला तेव्हा तिर्तुल्ल त्याच्यावर दोषारोप ठेवून म्हणाला, “फेलिक्स महाराज, आपल्यामुळे आम्हास फार शांतता मिळाली आहे आणि आपल्या दूरदर्शीपणामुळे या राष्ट्रात सुधारणा होत आहेत.
2 E, sendo chamado, Tértulo começou a acusá-lo, dizendo: Visto como por ti temos tanta paz e por tua prudência se fazem a este povo muitos e louváveis serviços,
3 म्हणून त्यांचे आम्ही पूर्ण कृतज्ञतेने, सर्व प्रकारे व सर्वत्र स्वागत करतो.
3 Sempre e em todo o lugar, ó potentíssimo Félix, com todo o agradecimento o queremos reconhecer.
4 तरी आपला अधिक वेळ न घेता मी विनंती करतो की, मेहरबानी करून आमचे थोडक्यात ऐकावे.
4 Mas, para que não te detenha muito, rogo-te que, conforme a tua eqüidade, nos ouças por pouco tempo.
5 हा मनुष्य म्हणजे एक पिडा आहे असे आम्हास आढळून आले आहे आणि जगातल्या सर्व यहूदी लोकात हा बंड उठवणारा असून नासोरी पंथाचा पुढारी आहे.
5 Temos achado que este homem é uma peste, e promotor de sedições entre todos os judeus, por todo o mundo; e o principal defensor da seita dos nazarenos;
6 ह्याने परमेश्वराचे भवनही विटाळण्याचा प्रयत्न केला; त्यास आम्ही धरले; व आमच्या नियमाशास्त्राप्रमाणे याचा न्याय करण्यास आम्ही पाहत होतो.
6 O qual intentou também profanar o templo; e nós o prendemos, e conforme a nossa lei o quisemos julgar.
7 पण लुसिया सरदाराने येऊन मोठ्या जबरदस्तीने ह्याला आमच्या हातातून काढून नेले.
7 Mas, sobrevindo o tribuno Lísias, no-lo tirou de entre as mãos com grande violência,
8 आणि याची चौकशी आपण कराल तर ज्या गोष्टींचा दोषारोप आम्ही त्याच्यावर करतो त्या सर्वांविषयी त्याच्याकडूनच आपणाला समजेल.”
8 Mandando aos seus acusadores que viessem a ti; e dele tu mesmo, examinando-o, poderás entender tudo o de que o acusamos.
9 तेव्हा या सर्व गोष्टी अशाच आहेत, असे म्हणून दुसऱ्या यहूद्यांनी ही दुजोरा दिला.
9 E também os judeus consentiam, dizendo serem estas coisas assim.
10 मग सुभेदाराने बोलण्यास खुणविल्यावर पौलाने उत्तर दिले, “आपण पुष्कळ वर्षापासून या लोकांचे न्यायाधीश आहात हे मला ठाऊक आहे, म्हणून मी आपल्यासंबंधीच्या गोष्टीचे संतोषाने समर्थन करतो.
10 Paulo, porém, fazendo-lhe o presidente sinal que falasse, respondeu: Porque sei que já vai para muitos anos que desta nação és juiz, com tanto melhor ânimo respondo por mim.
11 आपल्याला पूर्णपणे कळून येईल की, मला यरूशलेम शहरात उपासना करायला जाऊन अजून बारापेक्षा अधिक दिवस झाले नाहीत.
11 Pois bem podes saber que não há mais de doze dias que subi a Jerusalém a adorar;
12 आणि परमेश्वराच्या भवनात, सभास्थानात किंवा नगरात कोणाबरोबर वादविवाद करतांना किंवा बंडाळी माजवतांना मी त्यांना आढळलो नाही.
12 E não me acharam no templo falando com alguém, nem amotinando o povo nas sinagogas, nem na cidade.
13 ज्या गोष्टींचा दोषारोप ते माझ्यावर आता करत आहेत, त्या गोष्टी त्यांना आपणापुढे शाबीत करता येत नाहीत.
13 Nem tampouco podem provar as coisas de que agora me acusam.
14 तरी मी आपणाजवळ इतके कबूल करतो की, ज्या मार्गाला ते पाखंड म्हणतात त्या मार्गाप्रमाणे जे जे नियमशास्त्रानुसार आहे व जे जे संदेष्ट्यांच्या लेखांत आहे त्या सर्वांवर विश्वास ठेवून मी पूर्वजांच्या देवाची सेवा करतो.
14 Mas confesso-te isto que, conforme aquele caminho que chamam seita, assim sirvo ao Deus de nossos pais, crendo tudo quanto está escrito na lei e nos profetas.
15 आणि नीतिमानांचे व अनीतिमानांचे पुनरुत्थान होईल, अशी जी आशा धरतात तीच आशा मी देवाकडे पाहून धरतो.
15 Tendo esperança em Deus, como estes mesmos também esperam, de que há de haver ressurreição de mortos, assim dos justos como dos injustos.
16 ह्यामुळे देवासंबंधाने व मनुष्यांसंबंधाने माझा विवेकभाव सतत शुद्ध राखण्याचा मी यत्न करत असतो.
16 E por isso procuro sempre ter uma consciência sem ofensa, tanto para com Deus como para com os homens.
17 मी पुष्कळ वर्षांनी आपल्या लोकांस दानधर्म करण्यास व यज्ञार्पणे वाहण्यास आलो.
17 Ora, muitos anos depois, vim trazer à minha nação esmolas e ofertas.
18 शुद्धीकरणाच्या विधीत मी व्रतस्थ असा परमेश्वराच्या भवनात आढळलो, माझ्याबरोबर लोकांचा घोळका नव्हता किंवा दंगा होत नव्हता; पण तेथे आशिया प्रांतातले कित्येक यहूदी होते.
18 Nisto me acharam já santificado no templo, não em ajuntamentos, nem com alvoroços, uns certos judeus da Ásia,
19 त्यांचे माझ्याविरूद्ध काही असते तर त्यांनी आपणा पूढे येऊन माझ्यावर दोषारोप करायचा होता.
19 Os quais convinha que estivessem presentes perante ti, e me acusassem, se alguma coisa contra mim tivessem.
20 किंवा मी न्यायसभेपूढे उभा राहीलो असता माझा कोणता अपराध ह्यांना दिसून आला ते ह्यांनी तरी सांगावे;
20 Ou digam estes mesmos, se acharam em mim alguma iniqüidade, quando compareci perante o conselho,
21 ह्यांच्यामध्ये उभे राहून, मरण पावलेल्यांचा पुनरुत्थानाविषयी माझा न्याय आज तुमच्यापुढे होत आहे, हे शब्द मी मोठ्याने बोललो, हा एवढा उद्गार अपराध असला तर असेल.”
21 A não ser estas palavras que, estando entre eles, clamei: Hoje sou julgado por vós acerca da ressurreição dos mortos.
22 फेलिक्सास त्या मार्गाची चांगली माहीती असल्यामुळे त्याने खटला तहकूब करून म्हटले, “लुसीयाचा सरदार येईल तेव्हा तुमच्या प्रकरणाचा निकाल करीन.”
22 Então Félix, havendo ouvido estas coisas, lhes pôs dilação, dizendo: Havendo-me informado melhor deste Caminho, quando o tribuno Lísias tiver descido, então tomarei inteiro conhecimento dos vossos negócios.
23 आणि त्याने शताधिपतीला हुकुम केला की, ह्याला पहाऱ्यात ठेवावे; तरी ह्याला मोकळीक असावी आणि ह्याच्या स्वकीयांना याची सेवा करण्यास मनाई नसावी.
23 E mandou ao centurião que o guardasse em prisão, tratando-o com brandura, e que a ninguém dos seus proibisse servi-lo ou vir ter com ele.
24 मग काही दिवसानंतर फेलिक्स आपली यहूदी पत्नी द्रुसिल्ला हिच्यासह आला व त्याने पौलाला बोलावून ख्रिस्त येशूवरील विश्वासाविषयी त्याच्यापासून ऐकून घेतले.
24 E alguns dias depois, vindo Félix com sua mulher Drusila, que era judia, mandou chamar a Paulo, e ouviu-o acerca da fé em Cristo.
25 तेव्हा नीतिमत्त्व, इंद्रियदमन व पुढे होणारा न्याय ह्यांविषयी तो भाषण करत असता, फेलिक्साने भयभीत होऊन म्हटले, “आता जा, संधी सापडली म्हणजे तुला बोलावीन.”
25 E, tratando ele da justiça, e da temperança, e do juízo vindouro, Félix, espavorido, respondeu: Por agora vai-te, e em tendo oportunidade te chamarei.
26 आणखी आपणास पौलाकडून पैसे मिळतील अशी आशाही त्यास होती, म्हणून तो त्यास पुनःपुन्हा बोलावून घेवून त्याच्याबरोबर संभाषण करत असे.
26 Esperando ao mesmo tempo que Paulo lhe desse dinheiro, para que o soltasse; pelo que também muitas vezes o mandava chamar, e falava com ele.
27 पुढे दोन वर्षांनंतर फेलिक्साच्या जागेवर पुर्क्य फेस्त हा आला; तेव्हा यहूद्यांची मर्जी संपादन करण्याच्या इच्छेने फेलिक्स पौलाला कैदेतच ठेवून गेला.
27 Mas, passados dois anos, Félix teve por sucessor a Pórcio Festo; e, querendo Félix comprazer aos judeus, deixou a Paulo preso.
Atalhos do teclado
- Capítulo anterior←
- Próximo capítulo→
- Versículo anteriork
- Próximo versículoj
- Limpar seleçãoEsc
- Esta ajuda?
Estude este capítulo no WhatsApp
Peça à IA da Bíblia Fala para explicar Atos 24, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.