Atos 19
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (MAR) vs VC
1 तेव्हा असे झाले की, अपुल्लो करिंथ येथे असताना पौल निरनिराळ्या भागातून प्रवास करीत इफिस येथे आला, तेथे त्यास काही शिष्य आढळले.
1 Enquanto Apolo estava em Corinto, Paulo atravessou as províncias superiores e chegou a Éfeso, onde achou alguns discípulos e indagou deles:
2 पौलाने त्यांना विचारले, “जेव्हा तुम्ही विश्वास ठेवला, तेव्हा तुम्हास पवित्र आत्मा मिळाला काय?” ते अनुयायी त्यास म्हणाले, “पवित्र आत्मा आहे हे सुद्धा आम्ही ऐकलेले नाही.”
2 Recebestes o Espírito Santo, quando abraçastes a fé? Responderam-lhe: Não, nem sequer ouvimos dizer que há um Espírito Santo!
3 तो म्हणाला, “मग कसला बाप्तिस्मा तुम्ही घेतला?” ते म्हणाले, “योहानाचा बाप्तिस्मा.”
3 Então em que batismo fostes batizados?, perguntou Paulo. Disseram: No batismo de João.
4 पौल म्हणाला, “योहानाचा बाप्तिस्मा पश्चात्तापाचा होता, त्याने लोकांस सांगितले की, त्यानंतर जो येत आहे, त्याच्यावर लोकांनी विश्वास ठेवावा, तो येणारा म्हणजे येशू होय.”
4 Paulo então replicou: João só dava um batismo de penitência, dizendo ao povo que cresse naquele que havia de vir depois dele, isto é, em Jesus.
5 जेव्हा त्यांनी हे ऐकले, तेव्हा त्यांनी प्रभू येशूच्या नावात बाप्तिस्मा घेतला.
5 Ouvindo isso, foram batizados em nome do Senhor Jesus.
6 आणि जेव्हा पौलाने त्याचे हात त्यांच्यावर ठेवले, तेव्हा पवित्र आत्मा त्यांच्यावर आला आणि ते निरनिराळ्या भाषा बोलू लागले व भविष्य सांगू लागले.
6 E quando Paulo lhes impôs as mãos, o Espírito Santo desceu sobre eles, e falavam em línguas estranhas e profetizavam.
7 या गटात सर्व मिळून बारा पुरूष होते.
7 Eram ao todo uns doze homens.
8 पौल यहूदी सभास्थानात जात असे व तीन महिने धैर्याने बोलत असे, देवाच्या राज्याविषयी चर्चा करीत व यहूदी लोकांचे मन वळवीत असे.
8 Paulo entrou na sinagoga e falou com desassombro por três meses, disputando e persuadindo-os acerca do Reino de Deus.
9 परंतु त्यांच्यातील काही कठीण मनाचे झाले व त्यांनी विश्वास ठेवण्यास नकार दिला आणि ख्रिस्ताच्या मार्गाविषयी वाईट बोलले, मग पौल त्यांच्यातून निघून गेला व शिष्यांनाही त्यांच्यातून वेगळे केले आणि तुरन्नाच्या शाळेत दररोज त्यांच्याशी चर्चा केली.
9 Mas, como alguns se endurecessem e não cressem, desacreditando a sua doutrina diante da multidão, apartou-se deles e reuniu à parte os discípulos, onde os ensinava diariamente na escola de um certo Tirano.
10 हे असे दोन वर्षे चालले, याचा परिणाम असा झाला की, आशियात राहत असलेल्या सर्व यहूदी व ग्रीक लोकांपर्यंत प्रभू येशूचे वचन पोहोचले.
10 Isto durou dois anos, de tal maneira que todos os habitantes da Ásia, judeus e gentios, puderam ouvir a palavra do Senhor.
11 देवाने पौलाच्या हातून असामान्य चमत्कार घडविले.
11 Deus fazia milagres extraordinários por intermédio de Paulo, de modo que lenços e outros panos que tinham tocado o seu corpo eram levados aos enfermos;
12 पौलाच्या शरीरावरून रुमाल आणि कपडेही आणून काही, लोक या गोष्टी आजारी लोकांवर ठेवत असत, जेव्हा ते असे करीत तेव्हा आजारी लोक बरे होत आणि दुष्ट आत्मे त्यांना सोडून जात.
12 e afastavam-se deles as doenças e retiravam-se os espíritos malignos.
13 काही यहूदी सुद्धा सगळीकडे प्रवास करीत असत व लोकांमधून दुष्ट आत्मे घालवीत असत, ते दुष्ट आत्म्याने पछाडलेल्या व्यक्तीमधून प्रभू येशूच्या नावाने ते आत्मे घालवीत असत.
13 Alguns judeus exorcistas que percorriam vários lugares inventaram invocar o nome do Senhor Jesus sobre os que se achavam possessos dos espíritos malignos, com as palavras: Esconjuro-vos por Jesus, a quem Paulo prega.
14 ते म्हणत, “पौल ज्या येशूच्या नावाने घोषणा करतो त्या नावाने मी तुला आज्ञा करतो,” स्किवा नावाच्या यहूदी मुख्य याजकाचे सात पुत्र असे करीत होते.
14 Assim procediam os sete filhos de um judeu chamado Cevas, sumo sacerdote.
15 परंतु एकदा एक दुष्ट आत्मा त्यांना म्हणाला, “मी येशूला ओळखतो, पौल मला माहीत आहे, पण तुम्ही कोण आहात?”
15 Mas o espírito maligno replicou-lhes: Conheço Jesus e sei quem é Paulo. Mas vós, quem sois?
16 मग ज्याला दुष्ट आत्मा लागला होता त्या मनुष्याने त्यांच्यावर उडी मारली, त्याने त्यांच्यावर सरशी केली व त्यांना पराभूत केले, तेव्हा ते दोघे उघडे व जखमी होऊन घरातून पळाले.
16 Nisto o homem possuído do espírito maligno, saltando sobre eles, apoderou-se de dois deles e subjugou-os de tal maneira, que tiveram que fugir daquela casa feridos e com as roupas estraçalhadas.
17 इफिस येथे राहणाऱ्या सर्व यहूदी व ग्रीक लोकांस हे समजले, तेव्हा सर्वांना भीती वाटली आणि लोक प्रभू येशूच्या नावाचा अधिकच आदर करू लागले.
17 Este caso tornou-se {em breve} conhecido de todos os judeus e gregos de Éfeso, e encheu-os de temor e engrandeceram o nome do Senhor Jesus.
18 पुष्कळसे विश्वास ठेवणारे पापकबुली देऊ लागले व ज्या वाईट गोष्टी त्यांनी केल्या होत्या, त्या सांगू लागले.
18 Muitos dos que haviam acreditado vinham confessar e declarar as suas obras.
19 काही विश्वास ठेवणाऱ्यांनी जादूची कामे केली होती, या विश्वास ठेवणाऱ्यांनी आपली सर्व जादूची पुस्तके लोकांसमोर आणली आणि जाळली, त्या पुस्तकांची किंमत पन्नास हजार चांदीच्या नाण्यांइतकी भरली.
19 Muitos também, que tinham exercido artes mágicas, ajuntaram os seus livros e queimaram-nos diante de todos. Calculou-se o seu valor, e achou-se que montava a cinqüenta mil moedas de prata.
20 अशा रीतीने प्रभूच्या वचनाचा दूरवर प्रसार झाला व ते फार परिणामकारक ठरले.
20 Foi assim que o poder do Senhor fez crescer a palavra e a tornou sempre mais eficaz.
21 या गोष्टी घडल्यानंतर पौलाला पवित्र आत्म्याने सुचवले की, मासेदोनिया व अखया या प्रांतांतून प्रवास करीत पुढे यरूशलेम शहरास जायचे आहे, तो म्हणाला, “मी तेथे गेल्यांनतर मला रोम शहरही पाहिलेच पाहिजे.”
21 Concluídas essas coisas, Paulo resolveu ir a Jerusalém, depois de atravessar a Macedônia e a Acaia. Depois de eu ter estado lá, disse ele, é necessário que veja também Roma.
22 म्हणून त्याचे दोन मदतनीस तीमथ्य व एरास्त यांना त्याने मासेदोनियाला पाठवून दिले आणि त्याने आणखी काही काळ आशियात घालविला.
22 Enviou à Macedônia dois dos seus auxiliares, Timóteo e Erasto, mas ele mesmo se demorou ainda por algum tempo na Ásia.
23 याकाळामध्ये ‘त्या मार्गाविषयी’ मोठा गोंधळ उडाला.
23 Por esse tempo, ocorreu um grande alvoroço a respeito do Evangelho.
24 देमेत्रिय नावाचा एक मनुष्य होता, तो सोनार होता, तो अर्तमी देवीचे देव्हारे बनवीत असे, जे कारागीर होते त्यांना यामुळे खूप पैसे मिळत.
24 Um ourives, chamado Demétrio, que fazia de prata templozinhos de Ártemis, dava muito a ganhar aos artífices.
25 त्या सर्वांना व या धंद्याशी संबंध असलेल्या सर्वांना त्याने एकत्र केले आणि तो म्हणाला, लोकहो, तुम्हास माहीत आहे की, या धंद्यापासून आपल्याला चांगला पैसा मिळतो.
25 Convocou-os, juntamente com os demais operários do mesmo ramo, e disse: Conheceis o lucro que nos resulta desta indústria.
26 पण पाहा तो पौल नावाचा मनुष्य काय करीत आहे तो काय म्हणत आहे ते ऐका! पौलाने पुष्कळ लोकांस प्रभावित केले आहे व बदलले आहे, त्याने हे इफिसमध्ये व सगळ्या आशियामध्ये केले आहे, तो म्हणतो, मनुष्यांच्या हातून बनवलेले देव खरे देव नाहीत.
26 Ora, estais vendo e ouvindo que não só em Éfeso, mas quase em toda a Ásia, esse Paulo tem persuadido e desencaminhado muita gente, dizendo que não são deuses os ídolos que são feitos por mãos de homens.
27 ह्यामुळे या आपल्या धंद्याची बदनामी होण्याचा धोका आहे; इतकेच नव्हे तर ज्या महादेवी अर्तमीची पूजा सर्व आशिया प्रांत किंबहूना जगसुद्धा करते तिचे देऊळ निरुपयोगी ठरण्याचा व तिचे स्वतःचे महत्त्व नष्ट होण्याचा धोका आहे.
27 Daí não somente há perigo de que essa nossa corporação caia em descrédito, como também que o templo da grande Ártemis seja desconsiderado, e até mesmo seja despojada de sua majestade aquela que toda a Ásia e o mundo inteiro adoram.
28 जेव्हा त्यांनी हे ऐकले तेव्हा ते फार रागावले आणि मोठ्याने ओरडून म्हणू लागले, “इफिसकरांची अर्तमी थोर आहे.”
28 Estas palavras encheram-nos de ira e puseram-se a gritar: Viva a Ártemis dos efésios!
29 शहरातील लोकांमध्ये गोंधळ उडाला आणि लोकांनी गायस व अरीस्तार्ख या पौलाबरोबर सोबती म्हणून प्रवास करणाऱ्या मासेदोनियाच्या रहिवाश्यांना पकडून नाट्यगृहात नेले.
29 A cidade alvoroçou-se e todos correram ao teatro levando consigo Caio e Aristarco, macedônios e companheiros de Paulo.
30 पौल लोकांच्या पुढे जाऊ इच्छीत होता पण येशूचे अनुयायी त्यास असे करू देईनात.
30 Paulo queria apresentar-se ao povo, mas os discípulos não o deixaram.
31 पौलाचे काही मित्र जे प्रांताधिकारी होते, त्यांनी निरोप पाठवून त्याने नाट्यगृहात जाऊ नये अशी कळकळीची विनंती केली.
31 Até alguns dos asiarcas, que eram seus amigos, enviaram-lhe recado, pedindo que não se aventurasse a ir ao teatro.
32 एकत्र जमलेल्या जमावातून काही लोक एक घोषणा करू लागले तर दुसरे लोक इतर घोषणा करू लागले, त्यामुळे सगळा जमाव अगदी गोंधळून गेला आणि त्यातील पुष्कळ जणांना माहीत नव्हते की, आपण या न्याय भवनात एकत्र का आलोत.
32 Todos gritavam ao mesmo tempo. A assembléia era uma grande confusão e a maioria nem sabia por que se achavam ali reunidos.
33 यहूदी लोकांनी आलेक्सांद्र नावाच्या एका मनुष्यास ढकलीत नेऊन सर्वांच्या समोर उभे केले, तो आपल्या हातांनी खुणावून त्यांना समजावण्याचा प्रयत्न करू लागला.
33 Então fizeram sair do meio da turba Alexandre, que os judeus empurravam para a frente. Alexandre, fazendo sinal com a mão, queria dar satisfação ao povo.
34 पण जेव्हा लोकांस समजले की, तो एक यहूदी आहे, तेव्हा जवळ जवळ दोन तास सातत्याने ते एका आवाजात ओरडत राहिले, “इफिसकरांची अर्तमी देवी थोर आहे.”
34 Mas quando perceberam que ele era judeu, todos a uma voz gritaram pelo espaço de quase duas horas: Viva a Ártemis dos efésios!
35 शहराचा लेखनिक लोकांस शांत करीत म्हणाला, “इफिसच्या लोकांनो, थोर अर्तमी देवीचे व स्वर्गातून पडलेल्या पवित्र दगडाचे इफिस हे रक्षणकर्ते आहे, हे ज्याला माहीत नाही असा एकतरी मनुष्य जगात आहे काय?
35 Então o escrivão da cidade {veio} para apaziguar a multidão e disse: Efésios, que homem há que não saiba que a cidade de Éfeso cultua a grande Ártemis, e que a sua estátua caiu dos céus?
36 ज्याअर्थी या गोष्टी नाकारता येत नाहीत त्याअर्थी तुम्ही शांत राहिलेच पाहिजे, उतावळेपणा करू नये.
36 Se isso é incontestável, convém que vos sossegueis e nada façais inconsideradamente.
37 तुम्ही या दोघांना येथे घेऊन आलात, वस्तुतः त्यांनी मंदिरातील कशाचीही चोरी केली नाही किंवा आपल्या देवीची निंदा केलेली नाही.
37 Estes homens, que aqui trouxestes, não são sacrílegos nem blasfemadores da vossa deusa.
38 जर देमेत्रिय व त्याच्याबरोबर असलेल्या कारागिरांच्या काही तक्रारी असतील, तर त्यासाठी न्यायालये उघडी आहेत, तेथे ते एकमेकांवर आरोप करू शकतात.
38 Mas, se Demétrio e os outros artífices têm alguma queixa contra alguém, os tribunais estão abertos e aí estão os magistrados: institua-se um processo contra eles.
39 परंतु जर तुम्हास एखाद्या गोष्टीची चौकशी करायची असेल तर नियमित सभेत त्यासंबंधी विचार केला जाईल.
39 Se tendes reclamação a fazer, a assembléia legal decidirá.
40 आज येथे जे काही घडलेले आहे, त्याबद्दल योग्य ते कारण आपणांस सांगता येणार नाही, त्यामुळे आपणच ही दंगल सुरू केली असा आरोप आपल्यावर केला जाण्याची भीती आहे.”
40 Do que se deu hoje, até corremos risco de sermos acusados de rebelião, porque não há motivo algum que nos permita justificar este concurso.
41 असे सांगून झाल्यानंतर त्याने जमावाला जाण्यास सांगितले.
41 A estas palavras, dissolveu-se a aglomeração.
Atalhos do teclado
- Capítulo anterior←
- Próximo capítulo→
- Versículo anteriork
- Próximo versículoj
- Limpar seleçãoEsc
- Esta ajuda?
Estude este capítulo no WhatsApp
Peça à IA da Bíblia Fala para explicar Atos 19, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.