2 Samuel 12

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (MAR) vs NVI

Sair da comparação
NVI Nova Versão Internacional
1 परमेश्वराने नाथानाला दावीदाकडे पाठवले. तेव्हा नाथान दावीदाकडे आला. नाथान म्हणाला, एका नगरात दोन माणसे होती एक श्रीमंत होता आणि एक गरीब.
1 E o Senhor enviou a Davi o profeta Natã. Ao chegar, ele disse a Davi: "Dois homens viviam numa cidade, um era rico e o outro, pobre.
2 श्रीमंत मनुष्याकडे मेंढरे आणि गुरे भरपूर होती.
2 O rico possuía muitas ovelhas e bois,
3 पण गरीबाकडे त्याने विकत घेतलेल्या एका लहान मेंढी खेरीज काही नव्हते. त्याने मेंढीला खाऊपिऊ घातले. या गरीब मनुष्याच्या मुलाबाळांबरोबर ती वाढली त्याच्याच अन्नातला घास ती खाई त्याच्याच कपातले पाणी ती पिई त्याच्याच छातीवर डोके ठेवून झोपे त्या गरीबाला ती मेंढी मुलीसारखीच होती.
3 mas o pobre nada tinha, senão uma cordeirinha que havia comprado. Ele a criou, e ela cresceu com ele e com seus filhos. Ela comia junto dele, bebia do seu copo e até dormia em seus braços. Era como uma filha para ele.
4 एकदा एक पाहुणा त्या श्रीमंत मनुष्याकडे आला. त्या पाहुण्याला खाऊपिऊ घालायची श्रीमंत मनुष्याची इच्छा होती. पण आपल्या गुरामेंढरांमधून त्यास काही काढून घ्यायचे नव्हते, म्हणून त्याने त्या गरीब मनुष्याची मेंढी घेतली. तिला मारले आणि त्या पाहुण्यासाठी अन्न शिजवले.
4 "Certo dia, um viajante chegou à casa do rico, e este não quis pegar uma de suas próprias ovelhas ou do seus bois para preparar-lhe uma refeição. Em vez disso, preparou para o visitante a cordeira que pertencia ao pobre".
5 दावीदाला त्या श्रीमंत मनुष्याचा फारच राग आला. तो नाथानला म्हणाला, परमेश्वराची शपथ या मनुष्यास प्राणदंड मिळाला पाहिजे
5 Então, Davi encheu-se de ira contra o homem e disse a Natã: "Juro pelo nome do Senhor que o homem que fez isso merece a morte!
6 त्या मेंढीच्या चौपट पैसे त्याने भरले पाहिजेत, कारण त्याचे हे भयंकर कृत्य करताना त्यास दया आली नाही.
6 Deverá pagar quatro vezes o preço da cordeira, porquanto agiu sem misericórdia".
7 तेव्हा नाथान दावीदाला म्हणाला, तूच तो मनुष्य आहेस. इस्राएलचा देव परमेश्वर म्हणतो, इस्राएलचा राजा म्हणून मी तुला अभिषेक केला, तुला शौलापासून वाचवले.
7 Então Natã disse a Davi: "Você é esse homem! Assim diz o Senhor, o Deus de Israel: ‘Eu o ungi rei de Israel, e livrei-o das mãos de Saul.
8 त्याचे घरदार आणि स्त्रिया तुझ्या स्वाधीन केल्या. इस्राएल आणि यहूदाचा तुला राजा केले. एवढे पुरेसे नव्हते म्हणून तुला आणखीही देत राहिलो.
8 Dei-lhe a casa e as mulheres do seu senhor. Dei-lhe a nação de Israel e Judá. E, se tudo isso não fosse suficiente, eu lhe teria dado mais ainda.
9 असे असताना तू परमेश्वराची आज्ञा का मोडलीस? त्याच्या दृष्टीने वाईट असे कृत्य का केलेस? उरीया हित्तीला तू तलवारीने मारलेस, आणि त्याच्या पत्नीचा स्वतःची पत्नी म्हणून स्विकार केलास. होय, अम्मोन्यांच्या तलवारीने तू त्याचा वध करवलास.
9 Por que você desprezou a palavra do Senhor, fazendo o que ele reprova? Você matou Urias, o hitita, com a espada dos amonitas e ficou com a mulher dele.
10 तेव्हा आता ही तलवार तुझ्या कुटुंबाचा पिच्छा सोडणार नाही. तू उरीया हित्तीच्या पत्नीचे हरण केलेस. तुला माझी पर्वा नाही हेच यातून दिसते.
10 Por isso, a espada nunca se afastará de sua família, pois você me desprezou e tomou a mulher de Urias, o hitita, para ser sua mulher’.
11 परमेश्वर म्हणतो, आता तुझ्यावर संकटे कोसळतील. अडचणींना सुरुवात तुझ्या घरातूनच होईल. तुझ्या स्त्रिया तुझ्यापासून मी हिरावून घेऊन. त्या तुझ्या एका आप्ताच्याच हवाली करीन. तो तुझ्या बायकां बरोबर झोपेल आणि ही गोष्ट सर्वांसमक्ष घडेल.
11 "Assim diz o Senhor: ‘De sua própria família trarei desgraça sobre você. Tomarei as suas mulheres diante dos seus próprios olhos e as darei a outro; e ele se deitará com elas em plena luz do dia.
12 बथशेबाचा उपभोग तू गुपचूप घेतलास, पण हे मात्र सूर्याच्या साक्षीने, सर्व इस्राएलादेखत होईल.
12 Você fez isso às escondidas, mas eu o farei diante de todo o Israel, em plena luz do dia’ ".
13 मग दावीद नाथानला म्हणाला, माझ्याहातून परमेश्वराचा मोठा अपराध घडला आहे. नाथान तेव्हा दावीदाला म्हणाला, परमेश्वराने हा तुझा अपराध दूर केला आहे. तू मरणार नाहीस.
13 Então Davi disse a Natã: "Pequei contra o Senhor! " E Natã respondeu: "O Senhor perdoou o seu pecado. Você não morrerá.
14 पण परमेश्वराच्या शत्रूंना तू त्याचा उपहास करायला मोठे कारण दिलेस, म्हणून हा तुझा पुत्र मरेल.
14 Entretanto, uma vez que você insultou o Senhor, o menino morrerá".
15 यानंतर नाथान घरी परतला. उरीयाची पत्नी बथशेबा आणि दावीद यांना झालेला मुलगा परमेश्वराच्या कोपामुळे खूप आजारी पडला.
15 Depois que Natã foi para casa, o Senhor fez adoecer o filho que a mulher de Urias dera a Davi.
16 दावीदाने बाळासाठी देवाची प्रार्थना केली. दावीदाने अन्नपाण्याचा त्याग केला. घरात जाऊन रात्रभर जमिनीवर पडून राहिला.
16 E Davi implorou a Deus em favor da criança. Ele jejuou e, entrando em casa, passou a noite deitado no chão.
17 घरातील वडीलधाऱ्या मनुष्यांनी येऊन दावीदाला जमिनीवरून उठवायचा खूप प्रयत्न केला. पण काही केल्या दावीद तेथून हलेना. त्यांच्याबरोबर खायला प्यायलाही त्याने नकार दिला.
17 Os oficiais do palácio tentaram fazê-lo levantar-se do chão, mas ele não quis, e recusou comer.
18 सातव्या दिवशी ते मूल मरण पावले. मुलाच्या मृत्यूची बातमी दावीदाला द्यायला त्याचे नोकर कचरु लागले. ते म्हणाले, मुलगा जिवंत असतानाही आम्ही दावीदाशी बोलायला गेलो तरी तो ऐकत नसे, मग आता तर मूल मरण पावले असे आम्ही सांगितले तर तो आपल्या जिवाचे काही बरेवाईट करून घेईल.
18 Sete dias depois a criança morreu. Os conselheiros de Davi estavam com medo de dizer-lhe que a criança estava morta, e comentavam: "Enquanto a criança ainda estava viva, falamos com ele, e ele não quis escutar-nos. Como vamos dizer-lhe que a criança morreu? Ele poderá cometer alguma loucura! "
19 पण आपल्या नोकरांची कुजबूज दावीदाने ऐकली त्यावरून मूल गेल्याचे तो मनोमन उमजला. त्याने नोकरांना विचारले, मूल गेले का? नोकरांनी होय म्हणून उत्तर दिले.
19 Davi, percebendo que seus conselheiros cochichavam entre si, compreendeu que a criança estava morta e perguntou: "A criança morreu? " "Sim, morreu", responderam eles.
20 तेव्हा दावीद जमिनीवरून उठला त्यांने आंघोळ केली, कपडे बदलून तयार झाला. मग आराधना करण्यासाठी परमेश्वराच्या मंदिरात गेला. त्यानंतर घरी जाऊन त्याने खायला मागितले. सेवकांनी त्यास वाढले आणि तो जेवला.
20 Então Davi levantou-se do chão, lavou-se, perfumou-se e trocou de roupa. Depois entrou no santuário do Senhor e adorou. E voltando ao palácio, pediu que lhe preparassem uma refeição e comeu.
21 दावीदाचे सेवक त्यास म्हणाले, तुम्ही असे का वागलात? मूल जिवंत असताना तुम्ही अन्नत्याग केलात, शोक केलात. पण मुलगा वारल्यावर मात्र तुम्ही उठलात आणि खाल्लेत.
21 Seus conselheiros lhe perguntaram: "Por que ages assim? Enquanto a criança estava viva, jejuaste e choraste; mas, agora que a criança está morta, te levantas e comes! "
22 दावीदाने सांगितले, मूल जिवंत होते तेव्हा मी अन्न वर्ज्य केले आणि शोक केला, कारण मला वाटले न जाणो परमेश्वरास माझी दया येईल आणि बाळ जगेल.
22 Ele respondeu: "Enquanto a criança ainda estava viva, jejuei e chorei. Eu pensava: ‘Quem sabe? Talvez o Senhor tenha misericórdia de mim e deixe a criança viver’.
23 पण आता ते गेलेच. तेव्हा आता मी कशासाठी उपास करू? मुलाचे तर प्राण मी परत आणू शकत नाही. ते गेलेच. एक दिवस मीच त्याच्या भेटीला जाईन पण तो आता परत येणे नाही.
23 Mas agora que ela morreu, por que deveria jejuar? Poderia eu trazê-la de volta à vida? Eu irei até ela, mas ela não voltará para mim".
24 दावीदाने मग आपली पत्नी बथशेबा हिचे सांत्वन केले. तिच्याशी त्याने शरीरसंबंध केला. बथशेबा पुन्हा गरोदर राहिली. तिला दुसरा मुलगा झाला. दावीदाने त्याचे नाव शलमोन ठेवले. शलमोनावर परमेश्वराची प्रीती होती.
24 Depois Davi consolou sua mulher Bate-Seba e deitou-se com ela, e ela teve um menino, a quem Davi deu o nome de Salomão. E o Senhor o amou
25 त्याने नाथान या संदेष्ट्यामार्फत दावीदाला निरोप पाठविला. नाथानने त्याचे नाव यदीद्या, म्हणजेच देवाला प्रिय असे ठेवले. परमेश्वराच्या वतीने नाथानने हे केले.
25 e, por isso, enviou o profeta Natã para dizer a Davi que, o menino deveria chamar-se Jedidias.
26 अम्मोन्यांच्या राब्बावर हल्ला करून यवाबाने हे राजधानीचे नगर काबीज केले.
26 Enquanto isso, Joabe atacou Rabá dos amonitas e conquistou a fortaleza real.
27 यवाबाने निरोप्यामार्फत दावीदाला निरोप पाठवला राब्बाशी लढाई देऊन मी हे जलनगर हस्तगत केले आहे.
27 Então mandou mensageiros a Davi, dizendo: "Lutei contra Rabá e apoderei-me dos seus reservatórios de água.
28 आता इतर लोकांस एकत्र आणून या शहराचा ताबा घ्या मी घेण्यापूर्वी हे करा. मी जर आधी ताबा घेतला तर ते नगर माझ्या नावाने ओळखले जाईल.
28 Agora, convoca o restante do exército, cerca a cidade e conquista-a. Se não, eu terei a fama de havê-la conquistado".
29 मग दावीद सर्व लोकांस घेऊन राब्बाकडे गेला. राब्बा येथे लढाई करून त्याने त्याचा ताबा घेतला.
29 Então, Davi convocou todo o exército, foi a Rabá, atacou a cidade e a conquistou.
30 त्यांच्या राजाच्या मस्तकावरचा मुकुट दावीदाने काढला. हा मुकुट सोन्याचा असून त्याचे वजन सुमारे एक किक्कार होते. त्यामध्ये मौल्यवान रत्ने जडवलेली होती, तो मुकुट लोकांनी दावीदाच्या मस्तकावर ठेवला. दावीदाने बऱ्याच किंमती वस्तू आपल्याबरोबर आणल्या.
30 A seguir tirou a coroa da cabeça de Milcom, uma coroa de ouro de trinta e cinco quilos; ornamentada com pedras preciosas. E ela foi colocada na cabeça de Davi. Ele levou uma grande quantidade de bens da cidade
31 राब्बा नगरातील लोकांसही त्याने बाहेर नेले त्यांना कुऱ्हाडी, करवती, लोखंडी दाताळी यांनी काम करायला ठेवले. त्यांच्याकडून जबरदस्तीने वीट कामही करून घेतले. सर्व अम्मोनी नगरांमध्ये दावीदाने असेच केले. नंतर दावीद आपल्या सैन्यासह यरूशलेमेला परतला.
31 e levou também os seus habitantes, designando-lhes trabalhos com serras, picaretas e machados, além da fabricação de tijolos. Davi fez assim com todas as cidades amonitas. Depois voltou com todo o seu exército para Jerusalém.

Ler em outra tradução

Comparar com outra

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar 2 Samuel 12, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.