2 Reis 9

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (MAR) vs NAA

Sair da comparação
NAA Nova Almeida Atualizada 2017
1 अलीशाने, एका तरुण संदेष्ट्याला बोलावले. अलीशा त्यास म्हणाला, “तयार हो आणि ही तेलाची कुपी बरोबर घे. रामोथ-गिलाद येथे जा.
1 Então o profeta Eliseu chamou um dos discípulos dos profetas e lhe disse: — Prepare-se, leve com você este vaso de azeite e vá até Ramote-Gileade.
2 येथे पोचल्यावर निमशीचा मुलगा यहोशाफाट याचा मुलगा येहू याला शोधून काढ. मग आत जाऊन त्यास त्याच्या भावांमधून उठवून आतल्या खोलीत ने.
2 Quando chegar lá, procure Jeú, filho de Josafá, filho de Ninsi. Entre no lugar onde ele estiver, peça que ele se levante do meio de seus companheiros e leve-o para uma câmara interior.
3 त्यानंतर ही तेलाची कुपी घेऊन त्याच्या मस्तकावर तेल ओत. तेव्हा ‘परमेश्वर म्हणतो की इस्राएलचा राजा म्हणून मी तुला अभिषेक केला आहे,’ असे म्हण. एवढे झाले की धावत परत ये. तेथे थांबू नकोस!”
3 Pegue o vaso de azeite, derrame o azeite sobre a cabeça dele e diga: Assim diz o Senhor : “Eu o ungi para ser rei sobre Israel.” Depois, abra a porta e fuja depressa.
4 तेव्हा तो तरुण संदेष्टा रामोथ-गिलाद येथे आला
4 O rapaz, o jovem profeta, foi até Ramote-Gileade.
5 येथे पोचल्यावर त्यास सैन्यातील सरदार बसलेले आढळले. त्यांना तो म्हणाला, “तुमच्यासाठी एक निरोप आहे.” येहू म्हणाला, “आम्ही सर्वच इथे आहोत. निरोप नक्की कोणासाठी आहे?” तेव्हा तो तरुण म्हणाला, “हे सरदारा, तुझ्याशीच; माझे काम आहे.”
5 Quando chegou lá, eis que os capitães do exército estavam reunidos. Ele disse: — Capitão, tenho uma mensagem para o senhor. Ao que Jeú perguntou: — Para qual de nós? O rapaz respondeu: — Para o senhor, capitão!
6 यावर येहू उठून घरात आला. त्या तरुण संदेष्ट्याने त्याच्या मस्तकावर तेलाचा अभिषेक केला. येहूला तो म्हणाला, इस्राएलचा परमेश्वर देव म्हणतो, “इस्राएलचा पुढचा राजा म्हणून मी तुला अभिषेक करत आहे.”
6 Então Jeú se levantou e entrou na casa. O jovem derramou o azeite sobre a cabeça de Jeú e lhe disse: — Assim diz o
7 तुमचा राजा अहाब याच्या घराण्याचा तू संहार करावास. अशा तऱ्हेने मी माझे सेवक, संदेष्टे, परमेश्वराचे सर्व सेवक यांच्या वधाचा सूड घेऊन ईजबेलला शासन करणार आहे.
7 Você porá fim à casa de Acabe, seu senhor, para que eu vingue da mão de Jezabel o sangue de meus servos, os profetas, e o sangue de todos os servos do Senhor .
8 म्हणजे अहाबचे संपूर्ण घराणे नष्ट होईल. अहाबाच्या घराण्यात एकही मुलगा जिवंत राहणार नाही. मग ती इस्राएलमधील मुक्त व्यक्ती असो की गुलाम.
8 Toda a casa de Acabe perecerá. Eliminarei de Acabe todos do sexo masculino, quer escravo, quer livre, em Israel.
9 नबाटचा मुलगा यराबाम तसेच अहीयाचा मुलगा बाशा यांच्या घराण्यासारखी अहाबाच्या घराण्याची मी गत करून टाकीन.
9 Porque farei com a casa de Acabe o mesmo que fiz com a casa de Jeroboão, filho de Nebate, e com a casa de Baasa, filho de Aías.
10 “ईजबेलला इज्रेल भागात कुत्री खातील. तिचे दफन होणार नाही. एवढे बोलून हा तरुण संदेष्टा दार उघडून पळून गेला.”
10 Os cães devorarão Jezabel no campo de Jezreel; não haverá quem a sepulte.” Dito isto, abriu a porta e fugiu.
11 येहू पुन्हा राजाच्या सरदारांमध्ये आला. तेव्हा त्यांच्यातला एकजण म्हणाला, “येहू, सर्व कुशल आहे ना? तो वेडा तुझ्याकडे कशाला आला होता?” येहू त्यांना म्हणाला, “तो मनुष्य कोण आणि त्याचा संदेश तुम्हास माहित आहेच.”
11 Jeú saiu e voltou para junto dos outros servos de seu senhor, que lhe perguntaram: — Está tudo bem? Por que esse louco veio falar com você? Ele respondeu: — Vocês conhecem esse homem e sabem as coisas que ele anda dizendo.
12 तेव्हा ते सर्व म्हणाले, “नाही, नाही खर काय झाले ते सांग. काय म्हणाला तो?” तेव्हा तो तरुण संदेष्टा काय म्हणाला ते येहूने सरदारांना सांगितले. येहू म्हणाला, “तो मला म्हणाला, ‘इस्राएलाचा राजा म्हणून परमेश्वराच्या सांगण्यावरुन मी तुला अभिषेक करत आहे.”
12 Mas eles disseram: — É mentira! Por favor, conte-nos o que ele disse. Então Jeú disse: — Assim e assim me falou, a saber: Assim diz o
13 हे ऐकून मात्र त्यांनी ताबडतोब आपले अंगरखे उतरवले, येहूच्या समोरच्या पायऱ्यांवर ते ठेवले आणि शिंग फुंकून येहू राजा झाला असल्याची घोषणा केली.
13 Então eles se apressaram e, tomando cada um o seu manto, os puseram debaixo dele, sobre os degraus, e tocaram a trombeta, e disseram: — Jeú é rei!
14 निमशीचा मुलगा यहोशाफाट याचा मुलगा येहू याने योरामाविरुध्द कट रचला. यावेळी, अरामाचा राजा हजाएल याच्यापासून रामोथ-गिलादाचे संरक्षण करण्यासाठी योराम सर्व इस्राएलांसह झटत होता. येहू इज्रेल येथे जातो
14 Assim, Jeú, filho de Josafá, filho de Ninsi, conspirou contra Jorão. Ora, Jorão tinha estado em Ramote-Gileade, ele e todo o Israel, para defendê-la de Hazael, rei da Síria.
15 राजा योथामाने हजाएलशी झुंज घेतली होती. पण अरामी लोकांनी योरामाला जायबंदी केले होते तेव्हा जखमा भरुन येण्यासाठी तो इज्रेलला गेला होता. तेव्हा येहू त्या सगळ्या सरदारांना म्हणाला, “नवीन राजा म्हणून मला तुमची मान्यता असेल तर ही बातमी नगरातून इज्रेलमध्ये जाऊ देऊ नका.”
15 Porém o rei Jorão voltou a Jezreel para se curar dos ferimentos que os sírios lhe haviam causado, quando lutou contra Hazael, rei da Síria. Jeú disse aos demais capitães do exército: — Se é da vontade de vocês, que ninguém saia escondido da cidade, para ir anunciar isto em Jezreel.
16 योराम इज्रेलमध्ये आराम करत होता. येहू रथात बसून इज्रेलला गेला. यहूदाचा राजा अहज्या देखील तेव्हा योथामाला भेटावयाला इज्रेलला आला होता.
16 Então Jeú subiu num carro de guerra e foi para Jezreel, porque Jorão estava de cama ali. Também Acazias, rei de Judá, tinha ido visitar Jorão.
17 इज्रेलमध्ये बुरूजावर एक पहारोकरी होता. त्याने येहूला मोठ्या जमावनिशी येताना पाहिले. तो म्हणाला, “मोठाच जमाव दिसतोय” योरामाने त्यास सांगितले, “कोणाला तरी घोड्यावरुन त्यांच्याकडे पाठव. ते शांतीने येत आहेत का ते त्या स्वाराला विचारायला सांग.”
17 A sentinela que estava na torre de Jezreel viu a tropa de Jeú, que se aproximava, e disse: — Vejo uma tropa. Jorão disse: — Chame um cavaleiro e diga que vá ao encontro deles, para perguntar: “Vocês vêm em paz?”
18 तेव्हा एक सेवक घोड्यावरुन येहूला सामोरा गेला. राजा योरामाच्या वतीने त्याने येहूला विचारले, “तुमचे येणे शांततेचे आहे ना?” येहू त्यास म्हणाला, “शांतीशी तुला कर्तव्य नाही. असा माझ्या मागेमाग ये.” पहारेकऱ्याने योथामाला सांगितले, “आपला तिकडे पाठवलेला मनुष्य अजून परत आलेला नाही.”
18 O cavaleiro foi ao encontro de Jeú e disse: — Assim diz o rei: “Vocês vêm em paz?” Jeú respondeu: — O que você tem a ver com a paz? Passe para trás de mim. A sentinela deu aviso, dizendo: — O mensageiro chegou até eles, mas não está voltando.
19 तेव्हा योथामाने दुसऱ्या घोडेस्वाराला पाठवले, तो येहूकडे आला आणि राजा योरामाच्या वतीने सलोख्याचे अभिवादन केले. येहू म्हणाला, “तुला सलोख्याशी काय करायचे आहे? असा माझ्या मागोमाग ये?”
19 Então o rei Jorão mandou outro cavaleiro. Quando ele chegou até eles, disse: — Assim diz o rei: “Vocês vêm em paz?” Jeú respondeu: — O que você tem a ver com a paz? Passe para trás de mim.
20 पहारेकऱ्याने योथामाला सांगितले, “संदेश घेऊन गेलेला दुसरा मनुष्यही परत आलेला नाही. रथ चालवणारा तर वेड्यासारखा भरधाव रथ हाकतो आहे. निमशीचा मुलगा येहू याच्यासारखीच ती पध्दत आहे.
20 A sentinela deu aviso, dizendo: — Também este chegou até eles, mas não está voltando. E o guiar do carro parece como o de Jeú, filho de Ninsi, porque ele está guiando como um louco.
21 योथामाने मग स्वत:चा रथ तयार ठेवण्यास सांगितले.” तेव्हा सेवकाने योरामाचा रथ आणला. इस्राएलचा राजा योराम आणि यहूदाचा राजा अहज्या या दोघांनी आपापले रथ येहूच्या दिशेने पळवले. इज्रेलचा नाबोथ याच्या शेतात त्यांची यहूशी गाठ पडली.
21 Jorão disse: — Preparem o meu carro de guerra! E eles o prepararam. Jorão, rei de Israel, saiu, e Acazias, rei de Judá, foi com ele, cada um em seu carro de guerra. Foram ao encontro de Jeú, e o acharam no campo de Nabote, o jezreelita.
22 येहूला पाहून योरामाने त्यास विचारले, “येहू तू शांततेसाठीच आला आहेस ना?” येहू म्हणाला, “तुझी आई ईजबेल हिचे व्यभिचार आणि चेटके चालू असेपर्यंत कसली आली आहे शांतता?”
22 Ao ver Jeú, o rei Jorão perguntou: — Jeú, você vem em paz? Ele respondeu: — Que paz, se ainda continuam as prostituições de sua mãe Jezabel e as suas muitas feitiçarias?
23 योरामाने ताबडतोब आपले घोडे वळवले आणि पळ काढण्याच्या तयारीत तो अहज्याला म्हणाला, “अहज्या, दगा आहे.”
23 Então Jorão deu meia-volta e fugiu, gritando para Acazias: — É uma traição, Acazias!
24 पण येहूने सर्व शक्तीनिशी धनुष्य ओढून योरामाचा बरोबर दोन बाहूंच्यामध्ये वेध घेतला. बाण योरामाच्या हृदयातून आरपार गेला. योराम रथात मरुन पडला.
24 Mas Jeú entesou o seu arco com toda a força e atingiu Jorão entre os ombros; a flecha atravessou o coração, e ele caiu morto no seu carro de guerra.
25 येहूने आपल्या रथाचा सारथी बिदकर याला सांगितले, “योरामाचा मृतदेह उचल आणि तो इज्रेलचा नाबोथ ह्याच्या शेतात फेकून दे आपण दोघे, योरामाचा बाप अहाब याच्याबरोबर बसून चाललो होतो तेव्हा हे असे घडणार असे परमेश्वराने सांगितले होते, ते आठवते ना?
25 Então Jeú disse a Bidcar, seu capitão: — Levante-o e jogue-o no campo que era de Nabote, o jezreelita. Lembre-se de que, quando eu e você, juntos, vínhamos andando a cavalo atrás de Acabe, o pai de Jorão, o
26 परमेश्वर म्हणाला होता, ‘नाबोथ आणि त्याची मुले यांचे रक्त काल मला दिसले तेव्हा त्या शेतात मी अहाबाला शिक्षा करीन.’ प्रत्यक्ष परमेश्वरच असे म्हणाला. तेव्हा उचल तो मृतदेह आणि परमेश्वराच्या म्हणण्याप्रमाणे दे टाकून त्या शेतात!”
26 “Tão certo como vi ontem à tarde o sangue de Nabote e o sangue de seus filhos, diz o Senhor , assim neste campo eu darei a retribuição que você merece”, diz o Senhor . Agora, pois, pegue-o e jogue-o neste campo, segundo a palavra do Senhor .
27 यहूदाचा राजा अहज्या याने ते पाहिले आणि तेथून पळ काढला. मळ्यातल्या एका घराच्या बाजूने तो गेला. येहूने त्याचा पाठलाग केला. येहू म्हणाला, “अहज्याचाही वध करा.” तेव्हा येहूच्या मनुष्यांनी अहज्याला इब्लाम जवळच्या गूरच्या रस्त्यावर जखमी केले. तेव्हा अहज्या मगिद्दोकडे पळाला पण तिथेच मरण पावला.
27 À vista disto, Acazias, rei de Judá, fugiu pelo caminho de Bete-Hagã. Mas Jeú o perseguiu e disse: — Matem também a este! E eles o atingiram dentro do carro de guerra, na subida de Gur, perto de Ibleão. Acazias fugiu para Megido, onde morreu.
28 अहज्याच्या चाकरांनी त्याचा मृतदेह रथातून यरूशलेम येथे आणला. त्याचे त्यांनी दावीद नगरात त्याच्या पूर्वजांशेजारी दफन केले.
28 Os servos dele o levaram, num carro, para Jerusalém e o sepultaram no seu túmulo junto a seus pais, na Cidade de Davi.
29 अहाबाचा पुत्र योरामाचे इस्राएलचा राजा म्हणून अकरावे वर्षे चालू असताना अहज्या यहूदाचा राजा झाला होता.
29 Acazias havia começado a reinar sobre Judá no décimo primeiro ano do reinado de Jorão, filho de Acabe.
30 येहू इज्रेलला आला ते ईजबेलने ऐकले. तिने चांगले प्रसाधन केले, केशभूषा केली आणि खिडकीत बसून बाहेर बघू लागली.
30 Jeú chegou a Jezreel, e Jezabel ficou sabendo disso. Então ela se pintou em volta dos olhos, enfeitou a cabeça e olhou pela janela.
31 येहूने नगरात प्रवेश केला. ईजबेल म्हणाली, ते शांतीने येत आहेत काय? “काय रे जिम्री? त्याच्या सारखेच तू ही आपल्या स्वामीला मारलेस?”
31 Quando Jeú entrou pelo portão do palácio, ela gritou: — Correu tudo bem com Zinri, o assassino do seu senhor?
32 येहूने वर खिडकीकडे पाहत म्हटले, “माझ्या बाजूने कोण आहे? बोला!” तेव्हा खिडकीतून दोन तीन खोजांनी त्याच्याकडे पाहिले.
32 Jeú ergueu o rosto, olhou para a janela e perguntou: — Quem está do meu lado? Quem? E dois ou três oficiais olharam para ele.
33 येहू त्यांना म्हणाला, “त्या ईजबेलला खाली फेका.” तेव्हा त्या खोजांनी ईजबेलला खाली फेकून दिले. भिंतीवर आणि घोड्यांवर तिचे रक्त उडाले. घोडे तिच्यावरून चालून गेले.
33 Então ele disse: — Joguem-na pela janela! E eles a jogaram. O sangue dela salpicou a parede e os cavalos, e Jeú a atropelou.
34 येहू घरात शिरला आणि त्याने फराळाच्या पदार्थांचा समाचार घेतला. मग तो म्हणाला, “आता त्या शापित स्त्रीला घ्या व तिचे दफन करा कारण ती राजकन्या होती.”
34 Jeú entrou no palácio, comeu e bebeu. Depois disse: — Tomem conta daquela maldita e sepultem o corpo, porque ela é filha de rei.
35 लोक तिला पुरायला पुढे झाले पण त्यांना तिच्या देहाचा पत्ता लागला नाही. फक्त तिचे शिर, पाय आणि हाताचे तळवे सापडले.
35 Mas os que foram sepultá-la não acharam dela nada mais do que a caveira, os pés e as palmas das mãos.
36 तेव्हा त्या लोकांनी येऊन येहूला हे सांगितले. येहू त्यांना म्हणाला, “आपला सेवक एलीया तिश्बी याच्या मार्फत परमेश्वराने हेच सांगितले होते. एलीया म्हणाला होता, ‘इज्रेलच्या परिसरात ईजबेलचा देह कुत्री खातील.’
36 Então voltaram e contaram isso a Jeú. Ele disse: — Esta é a palavra do
37 शेणखतासारखा ईजबेलचा देह इज्रेलच्या भूमीवर पडेल. लोकांस तिचे प्रेत ओळखू येणार नाही.”
37 O cadáver de Jezabel será como esterco sobre a terra no campo de Jezreel, de maneira que ninguém poderá dizer: ‘Esta é Jezabel.’”

Ler em outra tradução

Comparar com outra

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar 2 Reis 9, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.