2 Reis 2

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (MAR) vs NVT

Sair da comparação
NVT Nova Versão Transformadora
1 आणि असे झाले की, एका वावटळीद्वारे परमेश्वर एलीयाला वर स्वर्गास घेणार होता, तेव्हा एलीया अलीशाबरोबर गिलगालहून निघाला.
1 Quando o S enhor estava para levar Elias ao céu num redemoinho, Elias e Eliseu partiram de Gilgal.
2 एलीया अलीशाला म्हणाला, “कृपाकरून तू येथेच थांब, कारण परमेश्वराने मला बेथेल येथे पाठवले आहे.” अलीशा म्हणाला, “परमेश्वर जिवंत आहे, व तू जिवंत आहे, मी तुला सोडणार नाही.” मग ते खाली बेथेलास गेले.
2 No caminho, Elias disse a Eliseu: “Fique aqui, pois o S enhor me mandou ir a Betel”. Eliseu, porém, respondeu: “Tão certo como vive o S
3 तेव्हा बेथेल येथील संदेष्ट्यांचे पुत्र अलीशाकडे येऊन त्यास म्हणाले, “आज तुझ्या स्वामीला परमेश्वर तुझ्यापासून घेऊन जाणार आहे, हे तुला माहित आहे काय?” अलीशा म्हणाला, “होय, मला माहित आहे, पण या विषयी बोलू नका”
3 O grupo de profetas de Betel foi ao encontro de Eliseu e lhe perguntou: “Você sabe que o S enhor levará seu mestre hoje?”. “Sim, eu sei”, respondeu Eliseu. “Mas não falem sobre isso.”
4 एलीया अलीशाला म्हणाला, “कृपाकरून तू येथेच थांब, कारण परमेश्वराने मला यरीहो येथे पाठवले आहे.” पण अलीशा म्हणाला, “परमेश्वर जिवंत आहे व तू जिवंत आहे, मी तुला सोडणार नाही.” मग ते यरीहोस आले.
4 Então Elias disse a Eliseu: “Fique aqui, pois o S enhor me mandou ir a Jericó”. Mas Eliseu respondeu novamente: “Tão certo como vive o S
5 तेव्हा यरीहो मधील संदेष्ट्यांचा समूह अलीशाकडे येऊन म्हणाली, “परमेश्वर तुझ्या स्वामीला आज तुझ्यापासून घेऊन जाणार आहे हे तुला माहित आहे काय?” अलीशा म्हणाला, “होय मला माहित आहे, पण या विषयी बोलू नका.”
5 O grupo de profetas de Jericó foi ao encontro de Eliseu e lhe perguntou: “Você sabe que o S enhor levará seu mestre hoje?”. “Sim, eu sei”, respondeu Eliseu. “Mas não falem sobre isso.”
6 नंतर एलीया अलीशाला म्हणाला, “तू कृपाकरून येथेच थांब, कारण परमेश्वराने मला यार्देनेस पाठवले आहे.” अलीशा म्हणाला, “परमेश्वर जिवंत आहे व तू जिवंत आहे; मी तुला सोडणार नाही.” तेव्हा ते दोघे पुढे निघाले.
6 Então Elias disse a Eliseu: “Fique aqui, pois o S enhor me mandou ir ao rio Jordão”. Mais uma vez, porém, Eliseu respondeu: “Tão certo como vive o S
7 नंतर संदेष्ट्याच्या मुलांतले पन्नास त्यांच्या विरूद्ध दिशेने लांब उभे राहिले व ते दोघे यार्देन जवळ उभे राहिले.
7 Cinquenta homens do grupo de profetas também foram e observaram de longe quando Elias e Eliseu pararam junto ao rio Jordão.
8 तेव्हा एलीयाने आपला झगा काढला व त्याची घडी केली, आणि तो पाण्यावर आपटला. तेव्हा पाणी दोन्ही दिशेने दुभागले व ते दोघे कोरडया भूमीवरुन चालत नदी पार करून गेले.
8 Elias dobrou seu manto e bateu com ele nas águas. O rio se abriu, e os dois atravessaram em terra seca.
9 आणि असे झाले की, नदी ओलांडल्यावर एलीया अलीशाला म्हणाला, “परमेश्वराने मला येथून घेऊन जायच्या अगोदर मी तुझ्यासाठी काय करावे ते माग.” अलीशा म्हणाला, “कृपाकरून तुमच्या ठायी असलेल्या आत्म्याचा दुप्पट वाटा मला मिळावा.”
9 Quando chegaram à outra margem, Elias disse a Eliseu: “Diga-me, o que posso fazer por você antes de ser levado embora?”. Eliseu respondeu: “Peço-lhe que eu receba uma porção dobrada do seu espírito e me torne seu sucessor”.
10 एलीयाने उत्तर दिले, “ही तर फारच कठिण गोष्ट तू मागितलीस. तरीसुद्धा, तुझ्या जवळून मी घेतला जात असता, जर तुला मी दिसलो तर हे शक्य आहे. पण जर नाही, तर असे होणार नाही.”
10 Elias respondeu: “O que você pediu é uma tarefa difícil, mas, se me vir quando eu for separado de você, receberá o que pediu; caso contrário, não será atendido”.
11 एलीया आणि अलीशा बोलत पुढे चालले होते, तेवढयात अग्नीचा रथ व अग्नीचे घोडे तेथे अवतीर्ण झाले आणि त्यांनी त्या दोघांना एकमेकांपासून दूर केले, आणि एका वावटळीमधून एलीया वर स्वर्गात गेला.
11 De repente, enquanto caminhavam e conversavam, surgiu uma carruagem de fogo, puxada por cavalos de fogo. Passou entre os dois e os separou, e Elias foi levado para o céu num redemoinho.
12 अलीशा हे पाहून मोठ्याने ओरडला, “माझ्या बापा! माझ्या बापा! इस्राएलचा रथ आणि त्याचे घोडेस्वार!” त्याने एलीयाला पुन्हा पाहिले नाही. त्याने आपली वस्रे धरुन फाडली व त्याचे दोन तुकडे केले.
12 Eliseu viu isso e gritou: “Meu pai, meu pai! Você era como os carros de guerra de Israel e seus cavaleiros!”. E, quando ele sumiu de vista, Eliseu rasgou as roupas ao meio.
13 त्याने एलीयाचा अंगरखा जो जमिनीवर पडला होता, उचलला, आणि परत यार्देनकाठी जाऊन उभा राहिला.
13 Em seguida, pegou o manto de Elias, que tinha caído, e voltou à margem do Jordão.
14 त्याने एलीयाचा झगा जो खाली पडला होता, तो घेऊन पाण्यावर मारला आणि म्हटले, “परमेश्वर, एलीयाचा देव कोठे आहे?” त्याने जेव्हा पाण्यावर मारले, तेव्हा पाणी दोन्ही बाजूस दुभंगले आणि अलीशा पार गेला.
14 Bateu nas águas com o manto e gritou: “Onde está o S enhor , o Deus de Elias?”. Então o rio se dividiu, e Eliseu o atravessou.
15 तेव्हा यरीहो येथील संदेष्ट्यांचे पुत्र जे समोर होते ते त्यास पाहून म्हणाले, “एलीयाचा आत्मा अलीशावर आला आहे.” आणि ते त्यास भेटायला आले. त्यांनी त्यास जमिनीपर्यंत लवून नमन केले.
15 Quando os membros do grupo de profetas de Jericó viram o que havia acontecido, exclamaram: “O espírito de Elias repousa sobre Eliseu!”. Então foram encontrar-se com Eliseu e se curvaram com o rosto no chão diante dele.
16 ते त्यास म्हणाले, “आता पाहा, तुझ्या दासाकडे कडे पन्नास धष्टपुष्ट माणसे आहेत. त्यांना जाऊन तुझ्या स्वामीचा शोध घेऊ दे. कदाचित् परमेश्वराच्या आत्म्याने एलीयाला वर नेऊन कोठेतरी डोंगर किंवा दरीमध्ये टाकले असेल.” अलीशा म्हणाला, “नाही, त्यांना पाठवू नका.”
16 Disseram: “Nós, seus servos, temos cinquenta homens corajosos que podem procurar seu mestre no deserto. Talvez o Espírito do S enhor o tenha deixado em algum monte ou em algum vale”. “Não enviem ninguém”, disse Eliseu.
17 पण अलीशाला लाज वाटेपर्यंत संदेष्ट्यांनी आग्रह धरला, तो म्हणाला, “त्यांना पाठवा.” मग त्यांनी पन्नास जणांना पाठवले, आणि त्यांनी एलीयाचा तीन दिवस शोध घेतला, पण ते त्यास शोधू शकले नाही.
17 Mas insistiram tanto que, por fim, constrangido, ele consentiu: “Está bem, enviem os homens”. Os cinquenta homens procuraram por três dias, mas não encontraram Elias.
18 आणि अलीशा यरीहोत राहत असता, ते त्याच्याकडे परत आले, तेव्हा तो त्यांना म्हणाला, “जाऊ नका, असे मी तुम्हास सांगितले नव्हते काय?”
18 Eliseu ainda estava em Jericó quando eles voltaram, e disse: “Não lhes falei que não fossem?”.
19 त्या नगरातील माणसे अलीशाला म्हणाली, “पाहा, आम्ही तुला विनंती करतो, या नगराची परिस्थिती आनंददायी आहे, माझ्या स्वामी हे तुम्ही पाहताच आहात, पण इथले पाणी खराब व जमीन नापीक आहे.”
19 Certo dia, alguns moradores de Jericó disseram a Eliseu: “Temos um problema, meu senhor. A cidade está situada numa boa região, como o senhor pode ver. Contudo, a água não é boa, e a terra é improdutiva”.
20 अलीशा त्यांना म्हणाला, “एक नवीन पात्र घेऊन या आणि त्यामध्ये मीठ घाला.” तेव्हा त्यांनी ते त्याच्याकडे आणले.
20 Eliseu disse: “Tragam-me uma tigela nova cheia de sal”, e fizeram o que ele pediu.
21 अलीशा ते घेऊन त्या झऱ्याच्या उगमापाशी गेला आणि त्यामध्ये ते मीठ टाकून म्हणाला, “परमेश्वर असे म्हणतो, ‘आता हे पाणी मी बरे केले आहे. आता यापुढे आणखी मृत्यू किंवा नापिकी आणखी होणार नाही.”
21 Eliseu foi à nascente que abastecia a cidade com água e jogou ali o sal. Disse ele: “Assim diz o S enhor : ‘Purifiquei esta água. Ela não causará mais morte nem tornará a terra improdutiva’”.
22 अलीशा बोललेल्या वचनाप्रमाणे ते पाणी चांगले झाले व आजपर्यंत ते चांगले आहे.
22 E, desde então, a água permanece pura, conforme a palavra de Eliseu.
23 नंतर अलीशा तेथून वर बेथेलास गेला. तो वाटेने वर चालत असता, लहान मुलांनी गावातून निघून त्याची टिंगल करायला सुरुवात केली. ती म्हणाली, “अरे टकल्या वर जा, ए टकल्या, वर जा.”
23 Eliseu saiu dali e foi a Betel. Enquanto subia pelo caminho, um grupo de adolescentes da cidade começou a zombar dele. “Vá embora, careca! Vá embora, careca!”, gritavam.
24 अलीशाने मागे वळून त्यांच्याकडे पाहिले आणि परमेश्वराच्या नावाने त्यांना शाप दिला. त्यानंतर दोन अस्वलींनी वनातून बाहेर येऊन त्यांच्यातली बेचाळीस मुले फाडून टाकली.
24 Eliseu se voltou para trás, olhou para eles e os amaldiçoou em nome do S enhor . Então duas ursas saíram do bosque e despedaçaram 42 adolescentes.
25 नंतर अलीशा तेथून कर्मेल डोंगराकडे गेला, आणि तिथून तो परत शोमरोनास आला.
25 Dali Eliseu foi para o monte Carmelo e, por fim, voltou a Samaria.

Ler em outra tradução

Comparar com outra

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar 2 Reis 2, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.