2 Reis 20

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (MAR) vs NAA

Sair da comparação
NAA Nova Almeida Atualizada 2017
1 याच सुमारास हिज्कीया आजारी पडून मरणास टेकला. तेव्हा आमोजचा मुलगा यशया हा संदेष्टा त्याच्याकडे येऊन म्हणाला, “परमेश्वराचे म्हणणे आहे, ‘तुझ्या घराची तू व्यवस्था कर, कारण तू मरणार, वाचणार नाहीस.”
1 Por esse tempo, Ezequias adoeceu de uma enfermidade mortal. O profeta Isaías, filho de Amoz, foi visitá-lo e lhe disse: — Assim diz o
2 तेव्हा हिज्कीयाने आपले तोंड भिंतीकडे वळवले आणि परमेश्वराची प्रार्थना करून तो म्हणाला.
2 Então Ezequias virou o rosto para a parede e orou ao Senhor , dizendo:
3 “परमेश्वरा, मी तुझी मन:पूर्वक सेवा केली आहे हे लक्षात असू दे. तुझ्या दृष्टीने जे उचित तेच मी केले.” तेव्हा हिज्कीया फार रडला.
3 — Ó Senhor , lembra-te de que andei diante de ti com fidelidade, com coração íntegro, e fiz o que era reto aos teus olhos. E Ezequias chorou amargamente.
4 यशया मधला चौक ओलांडून शहराच्या बाहेर जाण्यापूर्वी पुन्हा त्यास परमेश्वराचे शब्द ऐकू आले. परमेश्वर म्हणाला,
4 Antes que Isaías tivesse saído do pátio central, a palavra do Senhor veio a ele, dizendo:
5 “पुन्हा मागे फिर आणि माझ्या प्रजेचा नेता हिज्कीया याच्याशी बोल.” त्यास म्हणावे, “तुझा पूर्वज दावीद याचा परमेश्वर देव म्हणतो: तुझी प्रार्थना मी ऐकली आहे आणि तुझे अश्रू पाहिले आहेत. तेव्हा मी तुला बरे करतो, तिसऱ्या दिवशी तू परमेश्वराचे मंदिर चढून जाशील.
5 — Volte e diga a Ezequias, príncipe do meu povo: Assim diz o Senhor , o Deus de Davi, seu pai: “Ouvi a sua oração e vi as suas lágrimas. Eis que eu vou curá-lo e, ao terceiro dia, você subirá à Casa do Senhor .
6 तुला मी आणखी पंधरा वर्ष आयुष्य दिले आहे. अश्शूरच्या राजाच्या हातून तुझी आणि या नगराची मी सोडवणूक करीन. या नगराचे मी रक्षण करीन स्वत:साठी तसेच माझा सेवक दावीद याला मी दिलेल्या वचनासाठी मी हे करीन.”
6 Acrescentarei quinze anos à sua vida e livrarei das mãos do rei da Assíria tanto você quanto esta cidade. Defenderei esta cidade por amor de mim e por amor a Davi, meu servo.”
7 मग यशया म्हणाला, “अंजीराचे मिश्रण करुन ते याच्या दुखऱ्या भागावर लावा.” तेव्हा त्यांनी अंजीरांचे मिश्रण करून हिज्कीयाच्या दुखऱ्या भागावर त्याचा लेप दिला. तेव्हा हिज्कीया बरा झाला.
7 Isaías disse mais: — Peguem uma pasta de figos. Eles a pegaram e a puseram sobre a úlcera. E Ezequias recuperou a saúde.
8 हिज्कीया यशयाला म्हणाला, “परमेश्वराच्या कृपेने माझ्या प्रकृतीला उतार पडेल आणि तिसऱ्या दिवशी मी परमेश्वराचे मंदिर चढू शकेन याबद्दल काही खूण देता येईल का?”
8 Ezequias perguntou a Isaías: — Qual será o sinal de que o
9 यशया म्हणाला, “तुला काय हवे बोल. सावली दहा पावले पुढे जाऊ किंवा मागे येऊ दे? परमेश्वराने तुझ्या बाबतीत जे घडेल असे कबूल केले आहे त्याची ही खूण आहे.”
9 Isaías respondeu: — Este é o sinal que você receberá do
10 हिज्कीया म्हणाला, “सावली दहा पावले पुढे जाणे स्वाभाविक आहे. तेव्हा तसे नको, ती दहा पावले मागे यावी.”
10 Ezequias respondeu: — É fácil a sombra adiantar dez graus. Mas que não seja assim; pelo contrário, que ela retroceda dez graus.
11 मग यशया संदेष्ट्याने परमेश्वराची प्रार्थना केली याप्रकारे परमेश्वराने आहाजाची सावली दहा पावले मागे घेतली. जिथून ती पुढे गेली होती तिथेच ती पूर्ववत आली.
11 Então o profeta Isaías clamou ao Senhor e ele fez retroceder dez graus a sombra lançada pelo sol declinante no relógio de Acaz.
12 यावेळी बलदानचा मुलगा बरोदख-बलदान हा बाबेलचा राजा होता. त्याने हिज्कीयाकडे पत्रे आणि भेटवस्तू पाठवल्या. हिज्कीया आजारी असल्याचे त्याने ऐकले होते.
12 Nesse tempo, Merodaque-Baladã, filho de Baladã, rei da Babilônia, enviou cartas e um presente a Ezequias, porque soube que ele havia estado doente.
13 हिज्कीयाने त्याच्याकडून आलेल्या मनुष्यांचे आगतस्वागत केले. त्यांना आपल्या घरातील सर्व मौल्यवान वस्तू दाखवल्या. सोने, चांदी, मसाल्याचे पदार्थ, किंमती अत्तरे, शस्त्रास्त्रे असा आपला सर्व खजिना त्यांना दाखवला. आपल्या घरातील आणि राज्यातील कोणतीही गोष्ट त्याने त्यांना दाखवायची शिल्लक ठेवली नाही.
13 Ezequias recebeu bem os mensageiros e lhes mostrou toda a casa do seu tesouro, a prata, o ouro, as especiarias, os óleos finos, o seu arsenal e tudo o que havia nos seus tesouros. Não houve nada em seu palácio nem em todo o seu domínio que Ezequias não lhes mostrasse.
14 तेव्हा यशया संदेष्टा राजाकडे येऊन म्हणाला, “हे लोक कोण? त्यांचे काय म्हणणे आहे?” हिज्कीया म्हणाला, “हे फार लांबच्या प्रांतातून बाबेलमधून आले आहेत.”
14 Então o profeta Isaías foi falar com o rei Ezequias e lhe disse: — Que foi que aqueles homens disseram e de onde vieram? Ezequias respondeu: — Vieram de uma terra distante, da Babilônia.
15 यशयाने विचारले, “त्यांनी या घरातले काय काय पाहिले?” हिज्कीयाने सांगितले, “त्यांनी सगळेच पाहिले. माझे सगळे भांडार मी त्यांच्यापुढे उघडे केले.”
15 Isaías perguntou: — O que eles viram no seu palácio? Ezequias respondeu: — Viram tudo o que há em meu palácio. Não houve nada nos meus tesouros que eu não lhes mostrasse.
16 तेव्हा यशया हिज्कीयाला म्हणाला, “आता परमेश्वराचा हा निरोप ऐक.
16 Então Isaías disse a Ezequias: — Ouça a palavra do
17 तुझ्या घरातील सर्व चीजवस्तू आणि तुझ्या पूर्वजांनी जमवलेले सर्व धन आत्ता बाबेलला नेण्यात येईल. ती वेळ आता येऊन ठेपली आहे. काही म्हणता काही मागे उरणार नाही. ही परमेश्वराची वाणी आहे.
17 “Eis que virão dias em que tudo o que houver no seu palácio, isto é, tudo o que os seus pais ajuntaram até o dia de hoje, será levado para a Babilônia; não ficará coisa alguma, diz o Senhor .
18 बाबेलचे लोक तुझ्या मुलांना घेऊन जातील. ती मुले बाबेलच्या राजवाड्यात खोजे बनून राहतील.”
18 Alguns dos seus próprios filhos, gerados por você, serão levados, para que sejam eunucos no palácio do rei da Babilônia.”
19 तेव्हा हिज्कीया यशयाला म्हणाला, “परमेश्वराचे म्हणणे योग्यच आहे.” तो पुढे म्हणाला, “निदान माझ्या कारकिर्दीत तरी शांतता लाभेल ना?”
19 Então Ezequias disse a Isaías: — Boa é a palavra do Pois ele pensava assim: “Enquanto eu viver haverá paz e segurança.”
20 शहराला पाणीपुरवठा करणारी तळी आणि कालवे यांच्यासकट हिज्कीयाने जी कामगिरी बजावली तिची नोंद यहूदाच्या राजांचा इतिहास या पुस्तकात आहे.
20 Quanto aos demais atos de Ezequias, a todo o seu poder, como fez o tanque e o aqueduto e trouxe água para dentro da cidade, não está tudo escrito no Livro da História dos Reis de Judá?
21 हिज्कीया निधन पावला आणि त्याचा पूर्वजांशेजारी त्याचे दफन झाले. त्याचा मुलगा मनश्शे गादीवर आला.
21 Ezequias morreu, e Manassés, seu filho, reinou em seu lugar.

Ler em outra tradução

Comparar com outra

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar 2 Reis 20, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.