2 Reis 18
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (MAR) vs ARIB
1 आणि एलाचा मुलगा होशे, जो इस्राएलाचा राजा, याच्या तिसऱ्या वर्षी यहूदाचा राजा आहाज याचा मुलगा हिज्कीया राज्य करू लागला.
1 Ora, sucedeu que, no terceiro ano de Oséias, filho de Elá, rei de Israel, começou a reinar Ezequias, filho de Acaz, rei de Judá.
2 हिज्कीया पंचवीस वर्षाचा होता जेव्हा तो राज्य करू लागला. आणि त्याने यरूशलेमामध्ये एकोणतीस वर्षे राज्य केले. याच्या आईचे नाव अबी. ही जखऱ्याची मुलगी होती.
2 Tinha vinte e cinco anos quando começou a reinar, e reinou vinte e nove anos em Jerusalém. O nome de sua mãe era Abi, filha de Zacarias.
3 परमेश्वराच्या दृष्टीने जे चांगले ते तो करीत असे, आपला पूर्वज दावीद करीत असे त्याप्रमाणे हिज्कीयाही सर्वकाही करत असे.
3 Ele fez o que era reto aos olhos do Senhor, conforme tudo o que fizera Davi, seu pai.
4 त्याने उंचस्थानावरील पूजास्थळे नष्ट करून टाकली. तसेच स्मृतीस्तंभ, आणि अशेराचे खांबही तोडून टाकले. त्याने मोशेने केलेल्या पितळी सापाचे तुकडे केले कारण त्या दिवसांमध्ये इस्राएलाचे लोक त्यास धूप जाळत असत. ते त्यास “नहुश्तान” असे म्हणत.
4 Tirou os altos, quebrou as colunas, e deitou abaixo a Asera; e despedaçou a serpente de bronze que Moisés fizera {porquanto até aquele dia os filhos de Israel lhe queimavam incenso}, e chamou-lhe Neüstã.
5 इस्राएलचा देव परमेश्वर ह्यांच्यावर हिज्कीयाने भरवसा ठेवला होता, म्हणून त्याच्यासारखा राजा यहूदाच्या राजांमध्ये त्याच्याआधी किंवा त्याच्यानंतरही झाला नाही.
5 Confiou no Senhor Deus de Israel, de modo que depois dele não houve seu semelhante entre todos os reis de Judá, nem entre os que foram antes dele.
6 तो परमेश्वरास धरून राहिला. त्यास अनुसरण्याचे त्याने सोडले नाही परमेश्वराने मोशेला दिलेल्या आज्ञांचे त्याने पालन केले.
6 Porque se apegou ao Senhor; não se apartou de o seguir, e guardou os mandamentos que o Senhor ordenara a Moisés.
7 म्हणून परमेश्वर त्याच्यासोबत होता, आणि जिकडे तो जाई तिथे त्याची उन्नती होई. त्याने अश्शूरच्या राजाविरुध्द बंड केले व त्यांची सेवा केली नाही.
7 Assim o Senhor era com ele; para onde quer que saísse prosperava. Rebelou-se contra o rei da Assíria, e recusou servi-lo.
8 त्याने गज्जा आणि त्याच्या सीमेपर्यंत पलिष्ट्यांचा पराभव केला. त्याने पहारेकऱ्यांच्या बुरूजा पासून तटबंदीच्या नगरापर्यंत त्यांना मारले.
8 Feriu os filisteus até Gaza e os seus termos, desde a torre dos atalaias até a cidade fortificada.
9 आणि हिज्कीया राजाच्या चौथ्या वर्षी, म्हणजे इस्राएलाचा राजा, एलाचा मुलगा होशे ह्याच्या सातव्या वर्षी, असे झाले की अश्शूराचा राजा शल्मनेसर हा शोमरोनावर चढून आला व त्यास वेढा घातला.
9 No quarto ano do rei Ezequias que era o sétimo ano de Oséias, filho de Elá, rei de Israel, Salmanasar, rei da Assíria, subiu contra Samária, e a cercou
10 तीन वर्षांच्या अखेरीस त्याने ते घेतले. यहूदाचा राजा हिज्कीया याच्या सहाव्या वर्षी हे झाले. अर्थातच इस्राएलचा राजा एलाचा मुलगा होशे याच्या नवव्या वर्षी त्यांनी शोमरोन घेतले.
10 e, ao fim de três anos, tomou-a. No ano sexto de Ezequias, que era o ano nono de Oséias, rei de Israel, Samária foi tomada.
11 मग अश्शूरच्या राजाने इस्राएल लोकांस कैद करून अश्शूरला नेले. त्यांना त्याने हलहा येथे, गोजानमधील हाबोर नदीजवळ आणि माद्य नगरांमध्ये ठेवले.
11 Depois o rei da Assíria levou Israel cativo para a Assíria, e os colocou em Hala, e junto ao Habor, rio de Gozã, e nas cidades dos medos;
12 त्यांनी असे केले कारण इस्राएल लोकांनी परमेश्वर त्यांचा देव, ह्याचा शब्द पाळला नाही. तर त्याच्या कराराचा भंग केला, म्हणजे परमेश्वराचा सेवक मोशे याने जे आज्ञापिलेले होते ते त्यांनी जुमानले नाही व त्याची शिकवण ऐकली नाही.
12 porquanto não obedeceram à voz do senhor seu Deus, mas violaram o seu pacto, nada ouvindo nem fazendo de tudo quanto Moisés, servo do Senhor, tinha ordenado.
13 हिज्कीया राजा ह्याच्या चौदाव्या वर्षी, अश्शूरचा राजा सन्हेरीब याने यहूदातील सर्व तटबंदी नगरांवर हल्ला चढवून त्यांचा ताबा घेतला.
13 No ano décimo quarto do rei Ezequias, subiu Senaqueribe, rei da Assíria, contra todas as cidades fortificadas de Judá, e as tomou.
14 तेव्हा यहूदाचा राजा हिज्कीया याने अश्शूराच्या राजाला लाखीश येथे निरोप पाठवला की, “माझ्याकडून अपराध झाला आहे, तर आता माझ्या पासून निघून जा. तू जे माझ्यावर लादशील ते मी सहन करीन.” यावर अश्शूराच्या राजाने यहूदाचा राजा हिज्कीया याला तिनशे किक्कार चांदी व तीस किक्कार सोने अशी खंडणी मागितली.
14 Pelo que Ezequias, rei de Judá, enviou ao rei da Assíria, a Laquis, dizendo: Pequei; retira-te de mim; tudo o que me impuseres suportarei. Então o rei da Assíria impôs a Ezequias, rei de Judá, trezentos talentos de prata e trinta talentos de ouro.
15 तेव्हा हिज्कीयाने परमेश्वराच्या घरात व राजाच्या राजवाड्यातील भांडारात असणारी सर्व चांदी त्यास दिली.
15 Assim deu Ezequias toda a prata que se achou na casa do Senhor e nos tesouros da casa do rei.
16 मग हिज्कीयाने परमेश्वराच्या मंदिराचे दरवाजे आणि सोन्याच्या पल्याने मढवलेले खांब काढून घेतले आणि अश्शूरच्या राजाला हे सोने दिले.
16 Foi nesse tempo que Ezequias, rei de Judá, cortou das portas do templo do Senhor, e dos umbrais, o ouro de que ele mesmo os cobrira, e o deu ao rei da Assíria.
17 पण अश्शूरच्या राजाने तर्तान व रब-सारीस व रब-शाके यांना मोठ्या सैन्यासोबत लाखीशाहून यरूशलेमामध्ये हिज्कीया राजा कडे पाठवले. तेव्हा ते यरूशलेमेस चढून आले, आणि वरच्या तलावाच्या पाटाजवळ परिटाच्या शेताच्या रस्त्यावर उभे राहिले.
17 Contudo este enviou de Laquis Tartã, Rabe-Sáris e Rabsaqué, com um grande exército, ao rei Ezequias, a Jerusalém; e subiram, e vieram a Jerusalém. E, tendo chegado, pararam ao pé do aqueduto da piscina superior, que está junto ao caminho do campo do lavandeiro.
18 त्यांनी राजाला निरोप पाठवला तेव्हा, हिल्कीयाचा मुलगा एल्याकीम जो घरावरचा कारभारी, व शेबना चिटणीस आणि नोंदणी लेखक व आसाफचा मुलगा यवाह हे त्यांना भेटावयास पुढे आले.
18 Havendo eles chamado o rei, saíram-lhes ao encontro Eliaquim, filho de Hilquias, o mordomo, e Sebna, o escrivão, e Joá, filho de Asafe, o cronista.
19 तेव्हा रबशाके त्यांना म्हणाला, “अश्शूराचा महान राजा हिज्कीयास काय म्हणतो हे सांगा; तुझ्या आत्मविश्वासाविषयी कसली शिष्टता बाळगतोस?
19 E Rabsaqué lhes disse: Dizei a Ezequias: Assim diz o grande rei, o rei da Assíria: Que confiança é essa em que te estribas?
20 तू म्हणतोस, लढाईसाठी पुरेशी मसलत आणि सामर्थ्य तुझ्याजवळ आहेत, परंतू ते केवळ पोकळ व अर्थहीन शब्द आहेत. आता तू कोणावर भरवसा ठेवतोस. माझ्याविरूद्ध बंड करण्यासाठी तुला कोणी धैर्य दिले आहे?
20 Dizes {são, porém, palavras vãs}: Há conselho e poder para a guerra. Em quem, pois, agora confias, que contra mim te revoltas?
21 पाहा, तू ठेचलेल्या बोरूच्या काठीवर म्हणजे मिसर देशावर भरवसा ठेवतोस, अशा काठीवर कोणी मनुष्य विसंबून राहिला तर ती मोडून पडेल व हातात रुतेल. जे कोणी मिसराचा राजा फारो ह्यावर विश्वास ठेवतात त्या सर्वांना तो तसाच आहे.
21 Estás confiando nesse bordão de cana quebrada, que é o Egito; o qual, se alguém nele se apoiar, entrar-lhe-á pela mão e a traspassará; assim é Faraó, rei do Egito para com todos os que nele confiam.
22 तू कदाचित् असे म्हणशील, आम्ही परमेश्वर देवावर भरवसा ठेवतो. पण हिज्कीयाने परमेश्वराची उंचस्थाने आणि वेद्या काढून टाकल्या आणि यहूदा व यरूशलेमेला म्हटले की, फक्त यरूशलेममधील याच वेदीपुढे आराधना करावी तोच तो आहे की नाही?
22 Se, porém, me disserdes: No Senhor nosso Deus confiamos; porventura não é esse aquele cujos altos e altares Ezequias tirou dizendo a Judá e a Jerusalém: Perante, este altar adorareis em Jerusalém?
23 तर आता अश्शूराचा राजा माझा धनी याच्यावतीने, तुझ्याकडे घोड्यांवर स्वार व्हायला माणसे असतील तर तुला दोन हजार घोडे देण्याचा चांगला प्रस्ताव मांडतो.
23 Ora pois faze uma aposta com o meu senhor, o rei da Assíria: dar-te-ei dois mil cavalos, se tu puderes dar cavaleiros para eles.
24 माझ्या स्वामीच्या सर्वात कनिष्ठ सेवकाचा देखील तू पराभव करु शकणार का? रथ आणि घोडेस्वार यांच्यासाठी तू मिसरवर अवलंबून आहेस.
24 Como, então, poderias repelir um só príncipe dos menores servos de meu senhor, quando estás confiando no Egito para obteres carros e cavaleiros?
25 मी यरूशलेमचा संहार करायला चाल करून आलोय, तो काही परमेश्वराचा पाठिंबा असल्याशिवाय आलो काय? परमेश्वर मला म्हणाला, या देशावर स्वारी करून त्याचा पूर्ण पाडाव कर.”
25 Porventura teria eu subido sem o Senhor contra este lugar para o destruir? Foi o Senhor que me disse: sobe contra esta terra e a destrói.
26 तेव्हा हिल्कीयाचा मुलगा एल्याकीम, शेबना आणि यवाह हे सेनापतीला म्हणाले, “तू आपल्या सेवकाशी अरामी भाषेत बोल. आम्हास ती भाषा कळते. आमच्याशी यहूदी भाषेत बोलू नको. कारण तटबंदीवरील लोक आपले बोलणे ऐकतील.”
26 Então disseram Eliaquim, filho de Hilquias, e Sebna, e Joá, a Rabsaqué: Rogamos-te que fales aos teus servos em aramaico, porque bem o entendemos; e não nos fales na língua judaica, aos ouvidos do povo que está em cima do muro.
27 पण रब-शाके त्यांना म्हणाला, “प्रभूने काही मला फक्त तुझ्याशी आणि तुझ्या राजाशी बोलायला पाठवलेले नाही, तटबंदीवरील लोकांशीही मी बोलतो आहे. तुमच्याबरोबरच त्यांनाही स्वत:चे मलमूत्र चाटायची वेळ येणार आहे.”
27 Rabsaqué, porém, lhes disse: Porventura mandou-me meu senhor para falar estas palavras a teu senhor e a ti, e não aos homens que estão sentados em cima do muro que juntamente convosco hão de comer o seu excremento e beber a sua urina ?
28 मग रब-शाके यहूदी भाषेत मोठ्याने ओरडून म्हणाला, “अश्शूराचा थोर राजा काय म्हणतो ते ऐका”
28 Então pondo-se em pé, Rabsaqué clamou em alta voz, na língua judaica, dizendo: Ouvi a palavra do grande rei, do rei da Assíria.
29 राजा असे म्हणतो, हिज्कीयाच्या भूलथापांना बळी पडू नका. माझ्यापासून तो तुम्हास वाचवू शकणार नाही.
29 Assim diz o rei: Não vos engane Ezequias; porque não vos poderá livrar da minha mão;
30 तो म्हणतो परमेश्वरावर विसंबून राहू नका. हिज्कीया तुम्हास सांगतो, परमेश्वर आपल्याला वाचवील. अश्शूराचा राजा आपल्या शहराचा पराभव करु शकणार नाही.
30 nem tampouco vos faça Ezequias confiar no Senhor, dizendo: Certamente nos livrará o Senhor, e esta cidade não será entregue na mão do rei da Assíria.
31 पण हिज्कीयाचे ऐकू नका. “कारण अश्शूराचा राजा म्हणतो माझ्याशी तह करा आणि माझ्याकडे या. तसे केलेत तर आपापल्या द्राक्षवेलीवरची, अंजिराच्या झाडावरची फळे तुम्हास खायला मिळतील. स्वत:च्या विहिरीचे पाणी प्यायला मिळेल.
31 Não deis ouvidos a Ezequias; pois assim diz o rei da Assíria: Fazei paz comigo, e saí a mim; e coma cada um da sua vide e da sua figueira, e beba cada um a água da sua cisterna;
32 पुढे मी तुमच्या देशासारख्याच दुसऱ्या देशात, धान्याचा व द्राक्षरसाचा देश, अन्नाचा व द्राक्षीच्या मळ्याचा देश, जैतून तेलाचा व मधाचा देश यामध्ये मी तुम्हास घेऊन जाईपर्यंत तुम्ही असे वागा. तरच तुम्ही जगाल; मरणार नाही. आणि हिज्कीयाचे ऐकू नका. तो तुमचे हृदयपरिवर्तन करु पाहत आहे, ‘परमेश्वर आपल्याला वाचवेल’ असे तो म्हणतो.
32 até que eu venha, e vos leve para uma terra semelhante à vossa, terra de trigo e de mosto, terra de pão e de vinhas, terra de azeite de oliveiras e de mel; para que vivais e não morrais. Não deis ouvidos a Ezequias, quando vos envenena, dizendo: O Senhor nos livrará.
33 इतर दैवतांनी आपले देश अश्शूराच्या राजाच्या तावडीतून सोडवले आहेत असे अजून झाले आहे काय? कधीच नाही.
33 Porventura os deuses das nações puderam livrar, cada um a sua terra, das mãos do rei da Assíria?
34 कुठे आहेत हमाथ आणि अर्पद यांची दैवतं? सफरवाईम, हेना, इव्वा यांची दैवते कुठे गेले? त्यांनी शोमरोनचे माझ्यापासून रक्षण केले का?
34 Que é feito dos deuses de Hamate e de Arpade? Que é feito dos deuses de Sefarvaim, de Hena e de Iva? porventura livraram Samária da minha mão?
35 इतर राष्ट्राच्या दैवतांनी आपापली भूमी माझ्यापासून सुरक्षित ठेवली का? नाही माझ्याकडून परमेश्वर यरूशलेम वाचवणार का?”
35 Dentre todos os deuses das terras, quais são os que livraram a sua terra da minha mão, para que o Senhor livre Jerusalém da minha mão?
36 पण लोक गप्पच होते. ते सेनापतीला काहीही बोलले नाहीत. कारण “त्यांनी काहीही उत्तर द्याचये नाही” अशी राजा हिज्कीयाची त्यांना आज्ञा होती.
36 O povo, porém, ficou calado, e não lhe respondeu uma só palavra, porque o rei ordenara, dizendo: Não lhe respondais.
37 हिल्कीयाचा मुलगा एल्याकीम, जो राजवाड्याचा कारभारी, व चिटणीस शेबना आणि आसाफचा मुलगा यवाह हा नोंदी करणारा होता हे शोकाकुल होऊन आपली वस्त्रे फाडून हिज्कीयाकडे आले. अश्शूराचा सेनापती रब-शाके काय म्हणाला ते त्यांनी हिज्कीयाला सांगितले.
37 Então Eliaquim, filho de Hilquias, o mordomo, e Sebna, o escrivão, e Joá, filho de Asafe, o cronista, vieram a Ezequias com as vestes rasgadas, e lhe fizeram saber as palavras de Rabsaqué.
Atalhos do teclado
- Capítulo anterior←
- Próximo capítulo→
- Versículo anteriork
- Próximo versículoj
- Limpar seleçãoEsc
- Esta ajuda?
Estude este capítulo no WhatsApp
Peça à IA da Bíblia Fala para explicar 2 Reis 18, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.