2 Reis 13

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (MAR) vs ARC

Sair da comparação
ARC Almeida Revista e Corrigida 2009
1 अहज्याचा मुलगा योवाश यहूदाचा राजा, याच्या तेविसाव्या वर्षापासून येहूचा मुलगा यहोआहाज शोमरोनांत इस्राएलवर राज्य करु लागला. त्याने सतरा वर्षे राज्य केले.
1 No ano vinte e três de Joás, filho de Acazias, rei de Judá, começou a reinar Jeoacaz, filho de Jeú, sobre Israel, em Samaria, e reinou dezessete anos.
2 परमेश्वराच्या दृष्टीने वाईट अशा गोष्टी यहोआहाजाने केल्या. नबाटचा मुलगा यराबाम याने इस्राएलाला जी पापे करायला लावली तीच यहोआहाजाने केली, त्याने ती सोडली नाही.
2 E fez o que era mal aos olhos do Senhor ; porque seguiu os pecados de Jeroboão, filho de Nebate, que fez pecar a Israel; não se apartou deles.
3 तेव्हा परमेश्वराचा इस्राएलवर कोप झाला. अरामाचा राजा हजाएल आणि हजाएलचा मुलगा बेन-हदाद यांच्या हाती परमेश्वराने इस्राएलची सत्ता सोपवली.
3 Pelo que a ira do Senhor se acendeu contra Israel, o qual deu-os na mão de Hazael, rei da Síria, e na mão de Ben-Hadade, filho de Hazael, todos aqueles dias.
4 तेव्हा यहोआहाजाने मदतीसाठी परमेश्वराची याचना केली, तेव्हा परमेश्वराने त्याची विनंती ऐकली. अरामाच्या राजाने इस्राएली लोकांचा केलेला छळ आणि इस्राएलांच्या हाल अपेष्टा परमेश्वराने पाहिल्या होत्या.
4 Porém Jeoacaz suplicou diante da face do Senhor , e o Senhor o ouviu; pois viu a opressão de Israel, porque os oprimia o rei da Síria.
5 मग परमेश्वराने इस्राएलाला तारणारा दिला. तेव्हा अराम्यांच्या हातून इस्राएलींची मुक्तता झाली आणि इस्राएली लोक पूर्वीप्रमाणेच आपापल्या मुक्कामी परतले.
5 E o Senhor deu um salvador a Israel, e os filhos de Israel saíram de debaixo das mãos dos siros e habitaram nas suas tendas, como dantes.
6 तरीही यराबामाच्या घराण्याने जी पापे इस्राएल लोकांस करायला लावली ती करायचे काही त्यांनी सोडले नाही. यराबामाची सर्व पापाचरणे त्यांनी चालूच ठेवली शोमरोनात अशेरा देवतेचे स्तंभ त्यांनी ठेवलेच.
6 (Contudo, não se apartaram dos pecados da casa de Jeroboão, que fez pecar a Israel; porém andaram neles; e também o bosque ficou em pé em Samaria.)
7 अरामाच्या राजाने यहोआहाजाच्या सैन्याचा पराभव केला. सैन्यातील बहुतेक लोकांस त्याने ठार केले. फक्त पन्नास घोडेस्वार, दहा रथ आणि दहा हजारांचे पायदळ एवढेच शिल्लक ठेवले. खळ्यातील धान्याच्या मळणीच्या वेळी उडून जाणाऱ्या फोलफटाप्रमाणे यहोआहाजाच्या सैनिकांची अवस्था होती.
7 Não deixou a Jeoacaz mais povo, senão só cinquenta cavaleiros, e dez carros, e dez mil homens de pé; porquanto o rei da Síria os tinha destruído e os tinha feito como o pó, trilhando- os.
8 “इस्राएलच्या राजांचा इतिहास” या पुस्तकात यहोआहाजाने केलेली थोर कृत्ये लिहून ठेवली आहेत.
8 Ora, o mais dos atos de Jeoacaz, e tudo quanto fez mais, e o seu poder, porventura, não estão escritos no livro das Crônicas dos Reis de Israel?
9 पुढे यहोआहाज मरण पावला आणि पूर्वजांसमवेत त्याचे दफन झाले. शोमरोनात लोकांनी त्यास पुरले. त्याचा मुलगा योवाश (किंवा यहोआश) त्याच्या जागी राज्य करु लागला.
9 E Jeoacaz dormiu com seus pais, e o sepultaram em Samaria; e Jeoás, seu filho, reinou em seu lugar.
10 यहोआहाजाला मुलगा योवाश शोमरोनात इस्राएलच्या राजा झाला. यहूदाचा राजा योवाश याचे ते सदतिसावे वर्ष होते. योवाशाने इस्राएलवर सोळा वर्षे राज्य केले.
10 No ano trinta e sete de Joás, rei de Judá, começou a reinar Jeoás, filho de Jeoacaz, sobre Israel, em Samaria, e reinou dezesseis anos.
11 परमेश्वराने जे जे करु नका म्हणून सांगितले ते सर्व त्याने केले. नबाटचा मुलगा यराबाम याने इस्राएलाला जी पापे करायला लावली ती करण्याचे योवाशाने सोडले तर नाहीच, उलट तोसुध्दा त्याच मार्गाने गेला.
11 E fez o que era mal aos olhos do Senhor ; não se apartou de nenhum dos pecados de Jeroboão, filho de Nebate, que fez pecar a Israel, porém andou neles.
12 इस्राएलच्या राजांचा इतिहास या पुस्तकात, योवाशाने केलेले पराक्रम आणि यहूदाचा राजा अमस्या याच्याशी झालेल्या लढाया यांची हकिकत आलेली आहे.
12 Ora, o mais dos atos de Jeoás, e tudo quanto fez mais, e o seu poder, com que pelejou contra Amazias, rei de Judá, porventura, não estão escritos no livro das Crônicas dos Reis de Israel?
13 योवाशाच्या निधनानंतर त्याचे आपल्या पूर्वजांशेजारी दफन झाले. यराबाम सिंहासनावर आला आणि योवाशाचे शोमरोनात इस्राएलच्या राजांबरोबर दफन झाले.
13 E Jeoás dormiu com seus pais, e Jeroboão se assentou no seu trono; e Jeoás foi sepultado em Samaria, junto aos reis de Israel.
14 आता अलीशा तर आजारी पडला व त्या आजारातच पुढे तो मरण पावला. तेव्हा इस्राएलाचा राजा योवाश त्यास भेटायला गेला आणि अलीशाबद्दल दु:खातिशयाने त्यास रडू आले. योवाश म्हणाला, “माझ्या बापा, माझ्या बापा, इस्राएलचा रथ व त्याचे स्वार तुला घेण्यासाठी आले.”
14 E Eliseu estava doente da sua doença de que morreu; e Jeoás, rei de Israel, desceu a ele, e chorou sobre o seu rosto, e disse: Meu pai, meu pai, carros de Israel e seus cavaleiros!
15 तेव्हा अलीशा योवाशाला म्हणाला, “धनुष्य आणि काही बाण घे.” तेव्हा योवाशाने धनुष्य व काही बाण घेतले
15 E Eliseu lhe disse: Toma um arco e flechas. E tomou um arco e flechas.
16 मग अलीशा इस्राएलाच्या राजाला म्हणाला, “धनुष्यावर हात ठेव.” योवाशाने त्याप्रमाणे केले. अलीशाने मग आपले हात राजाच्या हातांवर ठेवले.
16 Então, disse ao rei de Israel: Põe a tua mão sobre o arco. E pôs sobre ele a sua mão; e Eliseu pôs as suas mãos sobre as mãos do rei.
17 अलीशा त्यास म्हणाला, “पूर्वेकडची खिडकी उघड.” योवाशाने खिडकी उघडली. तेव्हा अलीशाने त्यास बाण मारायला सांगितले. योवाशाने बाण सोडला. अलीशा त्यास म्हणाला, “परमेश्वराचा हा विजयाचा तीर होय. अरामावरील विजयाचा बाण. अफेक येथे तू अराम्यांचा पाडाव करशील, त्यांना नेस्तनाबूत करशील.”
17 E disse: Abre a janela para o oriente. E abriu-a. Então, disse Eliseu: Atira. E atirou; e disse: A flecha do livramento do Senhor é a flecha do livramento contra os siros; porque ferirás os siros em Afeca, até os consumir.
18 अलीशा पुढे म्हणाला, “बाण घे.” योवाशाने ते घेतले. अलीशाने मग इस्राएलच्या राजाला भूमीवर बाण मारायला सांगितले. योवाशाने जमिनीवर तीन बाण मारले. मग तो थांबला.
18 E disse mais: Toma as flechas. E tomou- as. Então, disse ao rei de Israel: Fere a terra. E feriu-a três vezes e cessou.
19 देवाचा मनुष्य योवाशावर रागावला. तो त्यास म्हणाला, “तू पाच सहावेळा तरी मारायला हवे होतेस. तरच तू अराम्यांना पुरते नेस्तनाबूत करु शकला असतास. आता तू फक्त तीनदाच त्यांचा पराभव करशील.”
19 Então, o homem de Deus se indignou muito contra ele e disse: Cinco ou seis vezes a deverias ter ferido; então, feririas os siros até os consumir; porém agora só três vezes ferirás os siros.
20 अलीशाने देह ठेवला आणि लोकांनी त्यास पुरले. पुढे वसंतात मवाबी सैन्यातील काहीजण इस्राएलाला आले. लढाईनंतर लूट करायला ते आले होते.
20 Depois, morreu Eliseu, e o sepultaram. Ora, as tropas dos moabitas invadiam a terra, à entrada do ano.
21 काही इस्राएली लोक एका मृताला पुरत असताना त्यांनी या सैनिकांना पाहिले. तेव्हा त्या लोकांनी अलीशाच्या कबरेतच तो मृतदेह टाकला आणि पळ काढला. अलीशाच्या अस्थींना त्या देहाचा स्पर्श होताच तो मृत पुन्हा जिवंत झाला आणि आपल्या पायावर उभा राहिला.
21 E sucedeu que, enterrando eles um homem, eis que viram um bando e lançaram o homem na sepultura de Eliseu; e, caindo nela o homem e tocando os ossos de Eliseu, reviveu e se levantou sobre os seus pés.
22 यहोआहाजाच्या कारकिर्दीमध्ये अरामाचा राजा हजाएल याने इस्राएलचा छळ केला होता.
22 E Hazael, rei da Síria, oprimiu a Israel todos os dias de Jeoacaz.
23 पण परमेश्वरासच इस्राएलची दया आली. इस्राएलवर त्याने आपली कृपादृष्टी वळवली. अब्राहाम, इसहाक आणि याकोब यांच्याशी त्याने केलेल्या करारामुळे त्याने हे केले. परमेश्वरास इस्राएल लोकांचा समूळ नाश करायचा नव्हता. त्यास त्यांना अद्याप टाकून द्यायचे नव्हते.
23 Porém o Senhor teve misericórdia deles, e se compadeceu deles, e tornou para eles, por amor do seu concerto com Abraão, Isaque e Jacó; e não os quis destruir e não os lançou ainda da sua presença.
24 अरामाचा राजा हजाएल मरण पावला. त्यानंतर बेन-हदाद राज्य करु लागला.
24 E morreu Hazael, rei da Síria; e Ben-Hadade, seu filho, reinou em seu lugar.
25 मृत्यूपूर्वी हजाएलने योवाशाचे वडिल यहोआहाज ह्यांच्या कडून युध्दात काही नगरे हस्तगत केली होती. पण योवाशाने ती आता हजाएलचा मुलगा बेन-हदाद याच्याकडून परत मिळवली. योवाशाने बेनहदादचा तीनदा पराभव केला आणि इस्राएलची नगरे जिंकून घेतली.
25 E Jeoás, filho de Jeoacaz, tornou a tomar as cidades das mãos de Ben-Hadade, que este tinha tomado das mãos de Jeoacaz, seu pai, na guerra; três vezes Jeoás o feriu e recuperou as cidades de Israel.

Ler em outra tradução

Comparar com outra

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar 2 Reis 13, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.