2 Crônicas 9
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (MAR) vs NAA
1 शलमोनाची कीर्ती शबाच्या राणीच्या कानावर गेली तेव्हा त्याची कठीण परीक्षा घेण्यासाठी ती यरूशलेमास आली. तिच्याबरोबर मोठा लवाजमा होता. मसाल्याचे पदार्थ, सोनेनाणे, मौल्यवान रत्ने या गोष्टी उंटांवर लादून तिने सोबत आणल्या होत्या शलमोनाची भेट घेऊन ती त्याच्याशी मनातल्या गोष्टी बोलली. तिला शलमोनाला बरेच प्रश्न विचारायचे होते.
1 Quando a rainha de Sabá ouviu falar da fama de Salomão, veio a Jerusalém prová-lo com perguntas difíceis. Chegou com uma enorme comitiva, com camelos carregados de especiarias, de ouro em abundância e pedras preciosas. Ela se apresentou diante de Salomão e lhe expôs tudo o que trazia em sua mente.
2 शलमोनाने तिच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. त्यास त्यातले काहीच अवघड वाटले नाही. त्याने उत्तर दिले नाही असा कोणताच प्रश्न उरला नाही.
2 Salomão respondeu todas as perguntas que ela fez, e não houve nada profundo demais que Salomão não pudesse explicar.
3 शबाच्या राणीने त्याच्या सूज्ञपणाचा प्रत्यय घेतला, त्याचा महाल पाहिला.
3 Quando a rainha de Sabá viu a sabedoria de Salomão, o palácio que ele havia construído,
4 त्याच्या मेजावरील अन्नपदार्थ तिने पाहिले, त्याच्या प्रमुख कारभाऱ्याची बैठक पाहिली. त्यांची कार्यपध्दती आणि त्यांचे पोशाख पाहिले. शलमोनाचे प्यालेबरदार आणि त्यांचे पोशाख, परमेश्वराच्या मंदिरातील शलमोनाने केलेली होमार्पणे हे सर्व तिने पाहिली आणि या दर्शनाने ती थक्क झाली.
4 a comida que era servida na mesa dele, o lugar dos seus oficiais, o serviço dos seus criados e os trajes deles, seus copeiros e os trajes deles, e o holocausto que oferecia na Casa do Senhor , ficou como fora de si
5 मग ती राजा शलमोनाला म्हणाली, “तुझ्या कामगिरीची आणि शहाणपणाची जी वर्णने मी माझ्या देशात ऐकली ती खरीच आहेत.
5 e disse ao rei: — É verdade o que ouvi na minha terra a respeito de você e a respeito da sua sabedoria.
6 इथे येऊन स्वतः अनुभव घेईपर्यंत मला या गोष्टींवर विश्वास बसत नव्हता. आता मी प्रत्यक्ष माझ्या डोळ्यांनी पाहीले आहे. खरे तर तुझ्या सूज्ञपणाची थोरवी निम्म्यानेही माझ्यापर्यंत पोचली नव्हती. तुझ्याबद्दल जे ऐकले त्यापेक्षाही तू महान आहेस.
6 Eu, porém, não acreditava no que se falava, até que vim e vi com os meus próprios olhos. Eis que não me contaram nem a metade da grandeza da sua sabedoria; você supera a fama que ouvi.
7 तुझे लोक व तुझ्या सेवेत सदैव तत्पर असलेले तुझे सेवक, तुझी माणसे आणि अधिकारी फार धन्य आहेत. तुझ्या सेवेत असतानाच त्यांना तुझ्या शहाणपणाचा लाभ होतो.
7 Felizes os homens à sua volta e felizes estes seus servos que estão sempre diante de você e que ouvem a sua sabedoria!
8 तुझा देव परमेश्वर ह्याची स्तुती असो. तो तुझ्यावर प्रसन्न आहे आणि आपल्या वतीने त्याने तुला राजा म्हणून सिंहासनावर बसवले आहे. परमेश्वराचे इस्राएलावर प्रेम आहे आणि इस्राएलावर त्याचा कायमचा वरदहस्त आहे जे उचित आणि न्याय्य ते करण्यासाठी त्याने तुला राजा केले आहे.”
8 Bendito seja o Senhor , seu Deus, que se agradou de você e o colocou no seu trono como rei para o Senhor , seu Deus. É porque o seu Deus ama Israel e quer estabelecê-lo para sempre que ele o constituiu rei sobre este povo, para que você execute o juízo e a justiça.
9 शबाच्या राणीने मग राजा शलमोन याला एकशेवीस किक्कार सोने, अनेक मसाल्यांचे पदार्थ आणि मौल्यवान रत्ने यांचा नजराणा दिला. तिने दिले तसे मसाल्यांचे पदार्थ व वस्तू शलमोनाला कधीच कोणाकडून मिळाले नव्हते.
9 Ela entregou ao rei quatro toneladas de ouro, grande abundância de especiarias e pedras preciosas. Nunca mais houve especiarias como as que a rainha de Sabá ofereceu ao rei Salomão.
10 हिराम आणि शलमोन यांच्या सेवकांनी ओफिर येथून सोने आणले. रक्तचंदनाचे लाकूड आणि मौल्यवान रत्नेही त्यांनी आणली.
10 Também os servos de Hirão e os servos de Salomão, que tinham trazido ouro de Ofir, trouxeram madeira de sândalo e pedras preciosas.
11 परमेश्वराच्या मंदिराच्या आणि राजमहालाच्या पायऱ्या तसेच गायकांच्या वीणा व सतारी यासाठी शलमोनाने हे रक्तचंदन वापरले. रक्तचंदनाचा वापर करून बनवलेल्या इतक्या सुंदर वस्तू यापूर्वी यहूदात कधी कोणी पाहिल्या नव्हत्या.
11 Desta madeira de sândalo o rei mandou fazer corrimões para a Casa do Senhor e para o palácio real, bem como harpas e liras para os cantores. Nunca antes se tinha visto madeira como esta na terra de Judá.
12 शबाच्या राणीला जे हवे ते राजा शलमोनाने देऊ केले. त्याने जे देऊ केले ते तिने आणलेल्या नजराण्यापेक्षा जास्तच होते मग शबाची राणी आपल्या लव्याजम्यासाहित आपल्या देशात परतली.
12 O rei Salomão deu à rainha de Sabá tudo o que ela quis e pediu, além do equivalente ao que ela lhe havia trazido. Então ela voltou e foi para a sua terra, ela e os seus servos.
13 शलमोनाला वर्षभरात जेवढे सोने मिळे त्याचे वजन सहाशे सहासष्ट किक्कार एवढे असे.
13 O peso do ouro que se trazia a Salomão a cada ano era de cerca de vinte e três toneladas,
14 याखेरीज, फिरस्ते व्यापारी आणि विक्रेते खूप सोने आणत. अरबस्तानचे राजे आणि वेगवेगळ्या प्रदेशांचे सुभेदार सोने चांदी आणत, ते वेगळेच
14 além do que entrava dos vendedores e dos negociantes. Também todos os reis da Arábia e os governadores dessa mesma terra traziam a Salomão ouro e prata.
15 सोन्याचे पत्रे ठोकून दोनशे मोठ्या ढाली राजा शलमोनाने केल्या. अशा प्रत्येक ढालीला सहाशे शेकेल वजनाचा सोन्याचा पत्रा लागला.
15 O rei Salomão fez duzentos grandes escudos de ouro batido, empregando sete quilos e duzentos gramas de ouro batido em cada escudo.
16 याखेरीज अशा घडीव सोन्याच्या तीनशे ढाली त्याने केल्या. त्यांना प्रत्येकी तिनशे शेकले सोने लागले. या सोन्याच्या ढाली त्याने लबानोनाच्या अरण्यमहालात ठेवल्या.
16 Fez também trezentos escudos menores de ouro batido, empregando três quilos e seiscentos gramas de ouro em cada escudo. E o rei os pôs na Casa do Bosque do Líbano.
17 राजा शलमोनाने हस्तिदंताचे मोठे सिंहासन बनवले व सिंहासनाच्या वरचा भाग मागे गोलाकार होता. ते शुद्ध सोन्याने मढवले.
17 O rei fez também um grande trono de marfim e o cobriu de ouro puro.
18 या सिंहासनाला सहा पायऱ्या होत्या. बैठकीच्या दोन्ही बाजूला हात टेकवता येतील अशी सिंहासनाला सोय होती. आणि त्यास लागून प्रत्येकी एक सिंहाचा पुतळा होता.
18 O trono tinha seis degraus e um estrado de ouro ligado a ele. De ambos os lados do assento havia um braço, e a figura de um leão junto a cada um dos braços.
19 सहा पायऱ्यांपैकी प्रत्येक पायरीच्या दोन्ही बाजूला एकेक असे एकंदर बारा सिंह होते. दुसऱ्या कोणत्याही राज्यात असे सिंहासन नव्हते.
19 Doze leões estavam ali sobre os seis degraus, um em cada extremo destes. Nunca se havia feito obra semelhante em nenhum outro reino.
20 राजाची सर्व पेयपात्रे सोन्याची होती लबानोनाच्या अरण्यमहालातील सर्व घरगुती वापरायच्या वस्तू शुद्ध सोन्याने घडवलेल्या होत्या. शलमोनाच्या काळात चांदी फारशी मौल्यवान मानली जात नसे.
20 Todas as taças que o rei Salomão usava para beber eram de ouro, e também de ouro puro eram todos os objetos da Casa do Bosque do Líbano. Nos dias de Salomão não se dava nenhum valor à prata.
21 राजाकडे समुद्रांवर गलबतांचा ताफा हिरामाच्या ताफ्यासोबत होता. तीन वर्षातून एकदा हा ताफा सोने, चांदी व हस्तीदंत ह्याप्रमाणे मोर व वानरे आणत.
21 Porque o rei tinha navios que iam a Társis, com os servos de Hirão. De três em três anos, os navios voltavam de Társis, trazendo ouro, prata, marfim, bugios e pavões.
22 वैभव आणि ज्ञान याबाबतीत पृथ्वीच्या पाठीवरील कोणत्याही राजापेक्षा शलमोन महान झाला.
22 Assim, o rei Salomão excedeu a todos os reis do mundo, tanto em riqueza como em sabedoria.
23 त्याच्या सल्लामसलतीचा लाभ घ्यायला सर्व ठिकाणचे राजे शलमोनाकडे येऊ लागले. परमेश्वरानेच शलमोनाला जो सूज्ञपणा दिला होता तो पहावयास ते येत असत.
23 Todos os reis do mundo queriam ver Salomão para ouvir a sabedoria que Deus tinha posto no coração dele.
24 हे राजे दरवर्षी येताना शलमोनासाठी नजराणे घेऊन येत. त्यामध्ये सोन्यारुप्याच्या वस्तू, कपडे, चिलखते, मसाले, घोडे आणि खेचरे ह्यांचा समावेश असे.
24 Cada um trazia o seu presente: objetos de prata e de ouro, roupas, armaduras, especiarias, cavalos e mulas. E foi assim ano após ano.
25 घोडे आणि रथ यांच्यासाठी शलमोनाकडे चार हजार बस्थाने होती. त्याच्यापदरी बारा हजार स्वार होते. त्यांची सोय त्याने मुद्दाम वसवलेल्या नगरात आणि स्वत:ला लागतील तेवढ्याची यरूशलेमामध्ये केली होती.
25 Salomão tinha quatro mil cavalos em estrebarias, para os seus carros de guerra, e doze mil cavaleiros, que colocou nas cidades onde mantinha os carros, deixando uma parte junto ao rei, em Jerusalém.
26 फरात नदीपासून पलिष्ट्यांच्या देशापर्यंत आणि मिसरची सीमा येथपर्यंतच्या सर्व राजावर शलमोनाचा अधिकार होता.
26 Salomão dominava sobre todos os reis desde o Eufrates até a terra dos filisteus e até a fronteira do Egito.
27 यरूशलेमचा राजा शलमोनाकडे चांदी ही दगडधोंडे असावे इतकी आणि गंधसरूची झाडे, खोऱ्यातल्या उंबराच्या झाडांइतकी विपुल होती.
27 O rei fez com que, em Jerusalém, a prata fosse tão comum como as pedras e os cedros fossem tão numerosos como os sicômoros que estão na Sefelá.
28 मिसर आणि इतर देशामधून लोक शलमोनासाठी घोडे आणत.
28 Importavam-se cavalos para Salomão, do Egito e de todas as terras.
29 शलमोनाने सुरुवातीपासून शेवटपर्यंत ज्या सर्व गोष्टी केल्या त्या नाथान या संदेष्ट्याच्या इतिहासात तसेच, अहीया शिलोनी याच्या संदेशलेखात आणि इद्दो या भविष्यावादयाच्या इद्दोची दर्शने यामध्ये नोंदवलेल्या आहेत. नबाटाचा पुत्र यराबाम याविषयीही इद्दोने लिहिलेले आहे.
29 Quanto aos demais atos de Salomão, tanto os primeiros como os últimos, não está tudo escrito no Livro da História de Natã, o profeta, e na Profecia de Aías, o silonita, e nas Visões de Ido, o vidente, a respeito de Jeroboão, filho de Nebate?
30 शलमोनाने यरूशलेमेत इस्राएलवर चाळीस वर्षे राज्य केले.
30 Salomão reinou sobre todo o Israel, em Jerusalém, durante quarenta anos.
31 मग तो आपल्या पूर्वजांना मिळाला. लोकांनी त्याचे दावीद नगरात दफन केले. शलमोनाचा पुत्र रहबाम हा पुढे शलमोनाच्या जागी राज्य करु लागला.
31 Salomão morreu e foi sepultado na Cidade de Davi, seu pai, e Roboão, seu filho, reinou em seu lugar.
Atalhos do teclado
- Capítulo anterior←
- Próximo capítulo→
- Versículo anteriork
- Próximo versículoj
- Limpar seleçãoEsc
- Esta ajuda?
Estude este capítulo no WhatsApp
Peça à IA da Bíblia Fala para explicar 2 Crônicas 9, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.