2 Crônicas 34

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (MAR) vs ARA

Sair da comparação
ARA Almeida Revista e Atualizada 1993
1 योशीया, राजा झाला तेव्हा आठ वर्षांचा होता. त्याने यरूशलेमेमध्ये एकतीस वर्षे राज्य केले.
1 Tinha Josias oito anos de idade quando começou a reinar e reinou trinta e um anos em Jerusalém.
2 त्याने वर्तन योग्य प्रकारचे होते परमेश्वराची त्याच्याकडून जशी अपेक्षा होती तसेच तो वागला आपला पूर्वज दावीद याच्याप्रमाणे त्याने सत्कृत्ये केली. सन्मार्गावरुन तो ढळला नाही.
2 Fez o que era reto perante o Senhor , andou em todo o caminho de Davi, seu pai, e não se desviou nem para a direita nem para a esquerda.
3 आपल्या कारकिर्दीच्या आठव्या वर्षीच तो आपला पूर्वज दावीद याच्या परमेश्वराच्या भजनी लागला. योशीयाने लहान वयातच हा मार्ग पत्करला आणि कारकिर्दीच्या बाराव्या वर्षी यहूदा आणि यरूशलेमेला शुद्ध केले, उंचस्थाने, अशेरा देवीचे खांब, कोरीव आणि ओतीव मूर्ती यांची मोडतोड केली.
3 Porque, no oitavo ano de seu reinado, sendo ainda moço, começou a buscar o Deus de Davi, seu pai; e, no duodécimo ano, começou a purificar a Judá e a Jerusalém dos altos, dos postes-ídolos e das imagens de escultura e de fundição.
4 लोकांनी त्याच्या समोरच बआलदेवतांच्या मूर्ती फोडून टाकल्या. वरच्या भागात असलेल्या धूप जाळण्याच्या वेद्या योशीयाने उद्ध्वस्त केल्या. अशेराच्या मूर्ती ओतीव आणि कोरीव मूर्तीचाही त्याने पार चुराडा करून टाकला आणि हे चूर्ण, ज्या लोकांनी बआल देवतांसाठी यज्ञ केले त्यांच्या कबरीवर पसरले.
4 Na presença dele, derribaram os altares dos baalins; ele despedaçou os altares do incenso que estavam acima deles; os postes-ídolos e as imagens de escultura e de fundição, quebrou-os, reduziu-os a pó e o aspergiu sobre as sepulturas dos que lhes tinham sacrificado.
5 बआल देवतांची पूजा करणाऱ्या याजकांच्या अस्थी देखील त्याने त्यांच्याच वेद्यांवर जाळून टाकल्या. अशाप्रकारे त्याने यहूदा आणि यरूशलेमला शुद्ध केले.
5 Os ossos dos sacerdotes queimou sobre os seus altares e purificou a Judá e a Jerusalém.
6 मनश्शे, एफ्राइम, शिमोन, नफताली येथपर्यंतच्या शहरांतून आणि त्यांच्या आसपासच्या पडीक जागेत त्याने हेच केले.
6 O mesmo fez nas cidades de Manassés, de Efraim e de Simeão, até Naftali, por todos os lados no meio das suas ruínas.
7 त्याने वेद्या मोडून टाकल्या, अशेरा खांबांची मोडतोड करून चूर्ण केले धूपाच्या वेद्या उखडणे ही इस्राएलभरची मोहीम उरकल्यावर योशीया यरूशलेमेला परतला.
7 Tendo derribado os altares, os postes-ídolos e as imagens de escultura, até reduzi-los a pó, e tendo despedaçado todos os altares do incenso em toda a terra de Israel, então, voltou para Jerusalém.
8 योशीयाने राज्याची सूत्रे हाती घेतल्याच्या अठराव्या वर्षी शाफान, मासेया, आणि योवाह यांना परमेश्वर देवाचे मंदिर दुरुस्तीसाठी पाठवले. शाफानच्या पित्याचे नाव असल्या, मासेया हा नगराचा कारभारी होता आणि योवाहाचे पिता योवाहाज. योवाह हा बखरकार होता. यहूदा आणि मंदिर यांच्या शुद्धीकरणासाठी मंदिराच्या डागडुजीचे हे काम योशीयाने अंगावर घेतले.
8 No décimo oitavo ano do seu reinado, havendo já purificado a terra e a casa, enviou a Safã, filho de Azalias, a Maaseias, governador da cidade, e a Joá, filho de Joacaz, cronista, para repararem a Casa do Senhor , seu Deus.
9 ही माणसे हिल्कीया या मुख्य याजकाकडे गेली. मनश्शे, एफ्राइम आणि उर्वरित सर्व इस्राएलातून लोकांनी देवाच्या मंदिरासाठी दिलेला पैसा लेवी द्वारपालांनी जमा केला होता. सर्व यहूदा प्रांत, बन्यामिनचा प्रदेश आणि यरूशलेमेतून देखील त्यांनी पैसे जमा केले होते. ही रक्कम हिल्कीयाकडे त्यांनी सुपूर्त केली.
9 Foram a Hilquias, sumo sacerdote, e entregaram o dinheiro que se tinha trazido à Casa de Deus e que os levitas, guardas da porta, tinham ajuntado, dinheiro provindo das mãos de Manassés, de Efraim e de todo o resto de Israel, como também de todo o Judá e Benjamim e dos habitantes de Jerusalém.
10 मग, परमेश्वराच्या मंदिराच्या बांधकामावर देखरेख करणाऱ्यांना लेवींनी हे पैसे दिले आणि परमेश्वराच्या मंदिराची दुरुस्ती करण्यासाठी कामगारांना दिले.
10 Eles o entregaram aos que dirigiam a obra e tinham a seu cargo a Casa do Senhor , para que pagassem àqueles que faziam a obra, trabalhadores na Casa do Senhor , para repararem e restaurarem a casa.
11 तासलेले चिरे, लाकूड यांच्या खरेदीसाठी गवंडी, सुतार या लोकांस पैसे देण्यात आले. मंदिराच्या दुरुस्तीसाठी आणि कडीपाटासाठी लाकूड लागले. यहूदाचा राजांनी यापूर्वी मंदिराची योग्य देखभाल न केल्यामुळे मंदिराच्या इमारती जीर्ण झाल्या होत्या.
11 Deram-no aos carpinteiros e aos edificadores, para comprarem pedras lavradas e madeiras para as junturas e para servirem de vigas para as casas que os reis de Judá deixaram cair em ruína.
12 कामगारांनी मन लावून काम केले. यहथ व ओबद्या हे मरारी कुळातील लेवी देखरेख करत होते. कहाथी वंशातील जखऱ्या आणि मशुल्लाम हे ही देखरेखीच्या कामावर होते. वाद्ये वाजवण्यात निपुण असलेले लेवीसुध्दा होते.
12 Os homens procederam fielmente na obra; e os superintendentes deles eram Jaate e Obadias, levitas, dos filhos de Merari, como também Zacarias e Mesulão, dos filhos dos coatitas, para superintenderem a obra.
13 ते कारागिरांवर आणि मजुरांवर देखरेख करत होते. चिटणीस, कारभारी आणि द्वारपाल म्हणून काही लेवी काम करत होते.
13 Todos os levitas peritos em instrumentos músicos eram superintendentes dos carregadores e dirigiam a todos os que faziam a obra, em qualquer sorte de trabalho. Outros levitas eram escrivães, oficiais e porteiros.
14 परमेश्वराच्या मंदिरातील पैसा लेवी बाहेर आणत असताना हिल्कीया या याजकाला मोशेद्वारे आलेला नियमशास्त्राचा ग्रंथ सापडला.
14 Quando se tirava o dinheiro que se havia trazido à Casa do Senhor , Hilquias, o sacerdote, achou o Livro da Lei do Senhor , dada por intermédio de Moisés.
15 हिल्कीयाने शाफान चिटणीसास असे सांगितले कि, “परमेश्वराच्या मंदिरात मला नियमशास्त्राचा ग्रंथ सापडला आहे.” मग हिल्कीयाने शाफानाला तो ग्रंथ दिला.
15 Então, disse Hilquias ao escrivão Safã: Achei o Livro da Lei na Casa do Senhor .
16 शाफानने तो योशीयाकडे आणला. राजाला तो म्हणाला, “तुझे सेवक तुझ्या आज्ञेप्रमाणे वागत आहेत.
16 Hilquias entregou o livro a Safã. Então, Safã levou o livro ao rei e lhe deu relatório, dizendo: Tudo quanto se encomendou a teus servos, eles o fazem.
17 परमेश्वराच्या मंदिरातील पैसा घेऊन त्यातून ते देखरेख करणाऱ्यांना आणि मजुरांना वेतन देत आहेत”
17 Contaram o dinheiro que se achou na Casa do Senhor e o entregaram nas mãos dos que dirigem a obra e dos que a executam.
18 शाफान पुढे राजाला म्हणाला, “याजक हिल्कीयाने मला हे पुस्तक दिले आहे.” शाफानने मग राजाला पुस्तकातील मजकूर वाचून दाखवला.
18 Relatou mais o escrivão ao rei, dizendo: O sacerdote Hilquias me entregou um livro. Safã leu nele diante do rei.
19 तो नियमशास्त्रग्रंथ ऐकत असता राजा योशीयाने आपले कपडे फाडले.
19 Tendo o rei ouvido as palavras da lei, rasgou as suas vestes.
20 आणि हिल्कीया, शाफानचा पुत्र अहीकाम, मीखाचा पुत्र अब्दोन, चिटणीस शाफान आणि आपला सेवक असाया यांना योशीयाने आज्ञा केली की.
20 Ordenou o rei a Hilquias, a Aicão, filho de Safã, a Abdom, filho de Mica, a Safã, o escrivão, e a Asaías, servo do rei, dizendo:
21 “माझ्या आणि इस्राएल व यहूदा येथे आता शिल्लक असलेल्या लोकांच्या वतीने परमेश्वरास जाऊन विचारा. या पुस्तकातील वचनांविषयी त्यास विचारा. आपल्या पूर्वजांनी परमेश्वराचे म्हणणे न जुमानल्यामुळे परमेश्वराचा आपल्यावर कोप झाला आहे. आपल्या पूर्वजांचे वर्तन या पुस्तकातील वचनांना अनुसरुन नव्हते.”
21 Ide e consultai o Senhor por mim e pelos restantes em Israel e Judá, acerca das palavras deste livro que se achou; porque grande é o furor do Senhor , que se derramou sobre nós, porquanto nossos pais não guardaram as palavras do Senhor , para fazerem tudo quanto está escrito neste livro.
22 हिल्कीया आणि राजाचे सेवक हुल्दा नावाच्या संदेष्टीकडे गेले. हुल्दा ही शल्लूमची पत्नीशल्लूम ताकहतचा आणि ताकहत इस्त्राचा पुत्र. इस्त्रा राजाच्या वस्त्रागाराचा प्रमुख होता. हुल्दा यरूशलेमेच्या नवीन भागात राहत होती. हिल्कीया आणि राजाचे सेवकांनी तिला सर्व जे घडले ते सांगितले.
22 Então, Hilquias e os enviados pelo rei foram ter com a profetisa Hulda, mulher de Salum, o guarda-roupa, filho de Tocate, filho de Harás, e lhe falaram a esse respeito. Ela habitava na Cidade Baixa, em Jerusalém.
23 हुल्दा त्यांना म्हणाली, “इस्राएलाचा परमेश्वर देव याचे म्हणणे असे आहे.” राजा योशीयाला म्हणावे:
23 Ela lhes disse: Assim diz o Senhor , o Deus de Israel: Dizei ao homem que vos enviou a mim:
24 परमेश्वर म्हणतो, “या प्रदेशावर आणि इथे राहणाऱ्या लोकांवर मी कोप आणणार आहे.” यहूदाच्या राजाला जे पुस्तक वाचून दाखवण्यात आले. त्यातील मजकुरात आहेत ती सर्व संकटे त्यांच्यावर ओढवतील.
24 Assim diz o Senhor : Eis que trarei males sobre este lugar e sobre os seus moradores, a saber, todas as maldições escritas no livro que leram diante do rei de Judá.
25 माझ्याकडे पाठ फिरवून इतर देवतांपुढे त्यांनी धूप जाळला म्हणून मी असे करणार आहे. आपल्या दुष्कृत्यांमुळे लोकांनी मला सतंप्त केले आहे. या क्रोधाचा अंगार त्यांच्यावर बरसेल आणि तो शांत होणार नाही.
25 Visto que me deixaram e queimaram incenso a outros deuses, para me provocarem à ira com todas as obras das suas mãos, o meu furor está derramado sobre este lugar e não se apagará.
26 पण यहूदाचा राजा योशीया याला सांग, त्यानेच तुला माझ्याकडे पाठवले आहे की तू नुकतेच जे ऐकलेस त्याविषयी इस्राएलाचा परमेश्वर देव म्हणतो:
26 Porém ao rei de Judá, que vos enviou a consultar o Senhor , assim lhe direis: Assim diz o Senhor , o Deus de Israel, acerca das palavras que ouviste:
27 योशीयाने, पश्चातापाने देवासमोर विनम्र झाला. खेदाने आपले कपडे फाडलेस. तू रडलास. तू मृदू अंत:करणाचा असल्यामुळे
27 Porquanto o teu coração se enterneceu, e te humilhaste perante Deus, quando ouviste as suas ameaças contra este lugar e contra os seus moradores, e te humilhaste perante mim, e rasgaste as tuas vestes, e choraste perante mim, também eu te ouvi, diz o Senhor .
28 तुझ्या पूर्वजांकडे मी तुला नेईन. तुला शांत मरण येईल. या प्रदेशावर आणि लोकांवर जी संकटे कोसळतील ती तुला पाहायला लागणार नाहीत. हिल्कीया आणि राजाचे सेवक यासर्वांनी हा निरोप राजाला येऊन सांगितला.
28 Pelo que eu te reunirei a teus pais, e tu serás recolhido em paz à tua sepultura, e os teus olhos não verão todo o mal que hei de trazer sobre este lugar e sobre os seus moradores. Então, levaram eles ao rei esta resposta.
29 तेव्हा राजा योशीयाने यहूदा आणि यरूशलेममधील सर्व वयोवृद्धांना भेटीसाठी एकत्र बोलावले.
29 Então, deu ordem o rei, e todos os anciãos de Judá e de Jerusalém se ajuntaram.
30 राजा परमेश्वराच्या मंदिरात गेला. यहूदातील सर्व प्रजा, यरूशलेममधील सर्व थोर तसेच सामान्य माणसे, याजक आणि लेवी हे सर्व राजासोबत होते. परमेश्वराच्या मंदिरात सापडलेल्या कराराच्या ग्रंथातील सर्व वचने तेथे राजाने त्यांना वाचून दाखवली.
30 O rei subiu à Casa do Senhor , e todos os homens de Judá, todos os moradores de Jerusalém, os sacerdotes, os levitas e todo o povo, desde o menor até ao maior; e leu diante deles todas as palavras do Livro da Aliança que fora encontrado na Casa do Senhor .
31 मग राजा उभा राहिला. त्याने परमेश्वराशी करार केला. परमेश्वरास अनुसरायचे, त्याचे आज्ञा, नियम आणि विधी पाळायचे त्याने कबूल केले. हे सर्व त्याने मन:पूर्वक करायचे मान्य केले. नियमशास्त्रातील वचनांप्रमाणे वागायचे कबूल केले.
31 O rei se pôs no seu lugar e fez aliança ante o Senhor , para o seguirem, guardarem os seus mandamentos, os seus testemunhos e os seus estatutos, de todo o coração e de toda a alma, cumprindo as palavras desta aliança, que estavam escritas naquele livro.
32 मग त्याने यरूशलेम आणि बन्यामीन मधील लोकांसही या करारपालनात सामील करून घेतले. यरूशलेमचे लोक आपल्या पूर्वजांच्या देवाचा करार पाळू लागले.
32 Todos os que se acharam em Jerusalém e em Benjamim anuíram a esta aliança; e os habitantes de Jerusalém fizeram segundo a aliança de Deus, o Deus de seus pais.
33 इस्राएलमध्ये वेगवेगळ्या देशांमधील विविध मूर्ती होत्या. पण त्या सर्व अनिष्ट मूर्ती योशीयाने फोडून तोडून टाकल्या. इस्राएल लोकांस त्याने परमेश्वर देवाची सेवा करायला लावले. आणि योशीया जिवंत असेपर्यंत लोक आपल्या पूर्वजांचा देव परमेश्वर याचीच उपासना करत होते.
33 Josias tirou todas as abominações de todas as terras que eram dos filhos de Israel; e a todos quantos se acharam em Israel os obrigou a que servissem ao Senhor , seu Deus. Enquanto ele viveu, não se desviaram de seguir o Senhor , Deus de seus pais.

Ler em outra tradução

Comparar com outra

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar 2 Crônicas 34, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.