2 Crônicas 2
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (MAR) vs NVI
1 परमेश्वराच्या नावासाठी एक मंदिर तसेच स्वत:साठी एक राजमहालही बांधायची शलमोनाने आज्ञा केली.
1 Salomão deu ordens para a construção de um templo em honra do nome do Senhor e de um palácio para si mesmo.
2 डोंगरातून दगडांचे चिरे काढायला ऐंशी हजार लोक आणि ते वाहून नेण्यासाठी त्याने सत्तर हजार मजूर नेमले. मजुरांच्या कामावर देखरेख करण्यासाठी शलमोनाने तीन हजार सहाशे मुकादम नेमले.
2 Ele designou setenta mil homens como carregadores, oitenta mil como cortadores de pedras nas colinas e três mil e seiscentos como capatazes.
3 सोराचा राजा हिराम याला शलमोनाने निरोप पाठवला, “माझे पिता दावीद यांना जशी त्यांचे निवासस्थान बांधायला उपयोगी पडावे म्हणून तुम्ही गंधसरूचे लाकूड पाठवले होते. तशीच मदत मला करा.
3 Depois Salomão enviou esta mensagem a Hirão, rei de Tiro: "Envia-me cedros como fizeste para meu pai Davi, quando da construção do palácio dele.
4 मी माझ्या परमेश्वर देवाच्या नावाच्या सन्मानार्थ एक मंदिर बांधणार आहे. तेथे आम्ही रोज परमेश्वरासमोर सुगंधी धूप जाळू तसेच एका खास मेजावर पवित्र भाकर ठेवू. शिवाय, रोज सकाळ संध्याकाळ शब्बाथाच्या दिवशी प्रत्येक नव चंद्रदर्शनी आणि आमचा देव परमेश्वराने नेमून दिलेल्या सहभोजनाच्या दिवशी आम्ही होमार्पणे करु इस्राएल लोकांनी सर्वकाळ पाळायचा हा नियमच आहे.
4 Agora estou para construir um templo em honra do nome do Senhor, o meu Deus, e dedicá-lo a ele, para queimar incenso aromático diante dele, apresentar regularmente o pão consagrado e fazer holocaustos todas as manhãs e todas as tardes, nos sábados, nas luas novas e nas festas fixas do Senhor, o nosso Deus. Esse é um decreto perpétuo para Israel.
5 आमचा परमेश्वर हा सर्व इतर देवतांपेक्षा श्रेष्ठ आहे म्हणून मी त्याच्यासाठी भव्य मंदिर उभारणार आहे.
5 "O templo que vou construir será grande, pois o nosso Deus é maior do que todos os outros deuses.
6 परमेश्वरासाठी निवासस्थान बांधणे कोणाला कसे शक्य आहे? जेव्हा स्वर्ग किंवा संपूर्ण विश्वही त्यास सामावून घ्यायला अपुरे आहे. तेव्हा त्याच्यासाठी म्हणून मंदिर बांधणारा मी कोण? मी आपला त्याच्याप्रीत्यर्थ धूप जाळण्यासाठी फक्त एक ठिकाण बांधू शकतो एवढेच.
6 Mas quem é capaz de construir um templo para ele, visto que os céus não podem contê-lo, nem mesmo os mais altos céus? Quem sou eu, então, para lhe construir um templo, a não ser como um lugar para queimar sacrifícios perante ele?
7 तर, सोने, चांदी, पितळ आणि लोखंड या धातुकामात प्रवीण असा कारागिर तुम्ही माझ्याकडे पाठवून दिलात तर बरे. त्यास जांभळे, किरमिजी आणि निळे वस्त्र तयार करता यावे. कोरीव कामाचेही त्यास ज्ञान असावे. माझ्या पित्याने, दावीदाने निवडलेल्या इतर कारागिरांबरोबर तो इथे यहूदा आणि यरूशलेमेत काम करील.
7 "Por isso, manda-me um homem competente no trabalho com ouro, com prata, com bronze, com ferro e com tecido roxo, vermelho e azul, e experiente em esculturas, para trabalhar em Judá e em Jerusalém com os meus hábeis artesãos, preparados por meu pai Davi.
8 लबानोनातून माझ्यासाठी गंधसरू, देवदार आणि रक्तचंदन यांचे लाकूड इत्यादी पाठवावे. लबानोनातील तुझे लाकूडतोडे चांगले अनुभवी आहेत हे मला माहीत आहे तुमच्या सेवकांसमवेत माझे सेवक राहतील.
8 "Também envia-me do Líbano madeira de cedro, de pinho e de junípero, pois eu sei que os teus servos são hábeis em cortar a madeira de lá. Os meus servos trabalharão com os teus
9 मी बांधायला घेतलेले मंदिर चांगले विशाल आणि सुंदर होणार असल्यामुळे मला मोठ्या प्रमाणावर लाकूड लागणार आहे.
9 para me fornecerem madeira em grande quantidade, pois é preciso que o templo que vou edificar seja grande e imponente.
10 लाकडांसाठी वृक्षतोड करणाऱ्या तुमच्या सेवकांना मी पुढीलप्रमाणे मोबदला देईन: वीस हजार कोर गहू, वीस हजार कोर जव, वीस हजार बुधले द्राक्षरस आणि वीस हजार बुधले तेल.”
10 E eu darei como sustento a teus servos, os lenhadores, vinte mil tonéis de trigo, vinte mil tonéis de cevada, dois mil barris de vinho e dois mil barris de azeite".
11 मग सोराचा राजा हिरामाने शलमोनाला लिखीत उत्तर पाठवले. त्यामध्ये त्याने असा निरोप पाठवला की, शलमोना, परमेश्वराचे आपल्या प्रजेवर प्रेम आहे. म्हणून तर त्याने तुला त्यांचा राजा म्हणून नेमले.
11 Hirão, rei de Tiro, respondeu por carta a Salomão: "O Senhor ama o seu povo, e por isso te fez rei sobre ele".
12 हिराम पुढे म्हणाला, “इस्राएलाचा परमेश्वर देव धन्य असो. स्वर्ग आणि पृथ्वीची निर्मिती त्यानेच केली. दावीद राजाला त्याने सूज्ञ पुत्र दिला आहे. शलमोना, तू सूज्ञ आणि समजदार आहेस. तू परमेश्वरासाठी मंदिर तसेच स्वतःसाठी राजवाडा बांधण्याची तयारी करीत आहेस.
12 E acrescentou: "Bendito seja o Senhor, o Deus de Israel, que fez os céus e a terra, pois deu ao rei Davi um filho sábio, que tem inteligência e discernimento, e que vai construir um templo para o Senhor e um palácio para si.
13 हूरामबी नावाचा एक कुशल व विवेकी कारागीर मी तुझ्याकडे पाठवतो.
13 "Estou te enviando Hirão-Abi, homem de grande habilidade.
14 त्याची आई दान वंशातील असून त्याचे पिता सोर नगरातले होते. हा कारागीर सोने, चांदी, पितळ, लोखंड, दगड आणि लाकूड यांच्या कामात तरबेज आहे. जांभळे, निळे आणि अत्यंत तलम असे उंची किरमिजी वस्त्र करण्यातही तो निपुण आहे. त्यास सांगितलेल्या कोणत्याही गोष्टीची योग्य नक्षी, कोरून काढू शकतो. तो तुझ्या आणि तुझ्या पित्याच्या, माझा स्वामी दावीद याच्या कसबी कारागिरांबरोबर काम करील.
14 Sua mãe era de Dã e seu pai, de Tiro. Ele foi treinado para trabalhar com ouro e prata, bronze e ferro, pedra e madeira, e em tecido roxo, azul e vermelho, e em linho fino e em todo tipo de entalhe. Ele pode executar qualquer projeto que lhe for dado. Trabalhará com os teus artesãos e com os de meu senhor Davi, teu pai.
15 माझ्या स्वामींनी गहू, जव, तेल आणि द्राक्षरस देण्याचे कबूल केले आहे ते सर्व आमच्या नोकरांना द्यावे.
15 "Agora, envie meu senhor a seus servos o trigo, a cevada, o azeite e o vinho que prometeste,
16 लबानोनातून तुम्हास हवे तितके लाकूड झाडे तोडून पाठवू. ओंडक्यांचे तराफे करून आम्ही ते इथून समुद्रमार्गे यापो येथे पोहोचते करु. तेथून ते तुम्ही यरूशलेमेला न्यावे.”
16 e cortaremos toda a madeira do Líbano necessária, e a faremos flutuar em jangadas pelo mar, descendo até Jope. De lá poderás levá-la a Jerusalém".
17 शलमोनाचा पिता दावीद याने जशी इस्राएलातील सर्व उपऱ्या लोकांची गणना केली होती, त्याप्रमाणे शलमोनाने गणती केली. या गणनेत त्यांना एक लाख त्रेपन्न हजार सहाशे उपरे लोक मिळाले.
17 Salomão fez um recenseamento de todos os estrangeiros que viviam em Israel, como o que fizera seu pai Davi; e descobriu-se que eram cento e cinqüenta e três mil e seiscentos.
18 शलमोनाने त्यापैकी सत्तर हजार जणांना ओझी वाहायला निवडले आणि ऐंशी हजार लोकांस डोंगरातून दगड काढायच्या कामासाठी निवडले. उरलेल्या तीन हजार सहाशे उपऱ्यांना या काम करणाऱ्यांवर देखरेख करणारे मुकादम म्हणून नेमले.
18 Ele designou setenta mil deles para serem carregadores e oitenta mil para serem cortadores de pedras nas colinas, com três mil e seiscentos capatazes para manter o povo trabalhando.
Atalhos do teclado
- Capítulo anterior←
- Próximo capítulo→
- Versículo anteriork
- Próximo versículoj
- Limpar seleçãoEsc
- Esta ajuda?
Estude este capítulo no WhatsApp
Peça à IA da Bíblia Fala para explicar 2 Crônicas 2, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.