2 Crônicas 16

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (MAR) vs BKJ

Sair da comparação
1 आसाच्या राज्याच्या छत्तिसाव्या वर्षी इस्राएलाचा राजा बाशाने यहूदावर स्वारी केली. बाशा हा इस्राएलचा राजा रामा हे नगर निवडून त्याने त्याची मजबुती केली. यहूदाचा राजा आसा याच्याकडे कोणालाही येण्याजाण्याला प्रतिबंध व्हावा हा त्याचा त्यामागचा हेतू होता.
1 No trigésimo sexto ano do reinado de Asa, Baasa, rei de Israel, subiu contra Judá, e edificou Ramá, para não deixar ninguém sair ou entrar até Asa, o rei de Judá.
2 तेव्हा आसाने परमेश्वराच्या मंदिराच्या भांडारातून व राजमहालातून सोने आणि चांदी काढून घेतली. अरामाचा राजा बेन-हदाद दिमिष्काला राहत होता. आसाने त्याच्याकडे सोने, आणि चांदी पाठवून त्यास निरोप पाठवला,
2 Então, Asa retirou prata e ouro dos tesouros da casa do SENHOR e da casa do rei, e enviou para Ben-Hadade, rei da Síria, que habitava em Damasco, dizendo:
3 “आपण आपसात एक करार करू आपल्या दोघांच्या पित्यामध्येही तसा करार केलेला होता मी माझ्याकडचे सोने व रुपे तुझ्याकडे पाठवत आहे. इस्राएलचा राजा बाशा याच्याबरोबरचा तुझा करार मोड म्हणजे तो माझ्याकडे पाठ फिरवेल आणि मला त्रस्त करणार नाही.”
3 Há um pacto entre mim e ti, como tinha entre o meu pai e o teu pai; eis que tenho enviado a ti prata e ouro; vai e quebra o teu pacto com Baasa, rei de Israel, para que ele se retire de mim.
4 बेन-हदाद आसाच्या गोष्टीशी सहमत झाला. त्याने इस्राएली नगरांवर आपले सैन्याचे सरदार पाठवले. त्या सरदारांनी ईयोन, दान आबेल-मईम या नगरांवर हल्ला केला कोठारे असलेल्या नफतालीच्या नगरांवरही त्यांनी चढाई केली.
4 E Ben-Hadade atentou ao rei Asa, e enviou os capitães dos seus exércitos contra as cidades de Israel, e eles feriram Ijom, e Dã, e Abel-Maim, e todas as cidades-armazéns de Naftali.
5 या चढायांचे वृत्त बाशाच्या कानावर गेले. तेव्हा त्याने रामा शहराच्या मजबुतीचे काम अर्धवट सोडून दिले.
5 E sucedeu, quando Baasa ouviu isto, que ele abandonou a construção de Ramá, e deixou a sua obra cessar.
6 राजा आसाने मग सर्व यहूदी लोकांना बोलावले. बाशा ने रामा नगर बांधण्यासाठी वापरलेले दगड, लाकूड ही सामग्री हस्तगत केली. त्यांनी ती गिबा आणि मिस्पा या नगरांच्या बांधकामासाठी वापरली.
6 Então, o rei Asa, tomou todo o Judá; e levaram consigo as pedras de Ramá, e a sua madeira com a qual Baasa estava edificando; e edificou com ela Geba e Mispá.
7 यावेळी हनानी नावाचा द्रष्टा यहूदाचा राजा आसा याच्याकडे आला व त्यास म्हणाला, “आसा तू मदतीसाठी तुझ्या परमेश्वर देवावर भरवंसा न ठेवता अरामाच्या राजावर अवलंबून राहिलास. तू परमेश्वराचे साहाय्य घ्यायला हवे होतेस. पण तू परमेश्वराचा धावा केला नाहीस म्हणून अरामाचे सैन्य तुझ्या हातातून सुटून गेले आहे.
7 E naquele tempo, Hanani, o vidente, veio até Asa, rei de Judá, e disse-lhe: Porque tens confiado no rei da Síria, e não confiastes no SENHOR teu Deus, por isso o exército do rei da Síria escapou da tua mão.
8 कूशी आणि लुबी यांचे सैन्य तर केवढे बलाढ्य होते! त्यांच्याकडे कितीतरी रथ आणि स्वार होते पण तेव्हा तू परमेश्वरावर भरवंसा ठेवलास आणि परमेश्वराने तुला विजय मिळवून दिला.
8 Não eram os etíopes e os líbios um exército mui grande, com muitíssimas carruagens e cavaleiros? Todavia, porque confiastes no SENHOR, ele os entregou na tua mão.
9 अखिल पृथ्वीवर परमेश्वराचे नेत्र निरीक्षण करीत असतात जे कोणी सरळ मनाने त्याच्याशी वर्ततात अशांना तो आपले पाठबळ देतो. पण तू मात्र मूर्खपणा केला आहेस. तेव्हा यापुढे तुला लढायांना तोंड द्यावे लागेल.”
9 Porque os olhos do SENHOR correm de um lado para o outro por toda a terra, para mostrar-se forte em lugar daqueles cujos corações são perfeitos diante dele. Nisto agiste loucamente; portanto desde agora terás guerras.
10 द्रष्ट्याच्या या बोलण्याचा आसास राग आला व क्रोधाच्या भरात त्याने त्यास तुरुंगात डांबले. याच काळात आसा काही लोकांशी फार निर्दयतेने वागला.
10 Então, Asa ficou irado com o vidente, e o pôs em uma casa prisional; porque ficou furioso com ele por causa desta coisa. E Asa, no mesmo tempo, oprimiu alguns do povo.
11 आसाची सर्व कृत्ये इस्राएल व यहूदी राजांचा इतिहास या पुस्तकात लिहिलेले आहेत.
11 E, eis que, os atos de Asa, os primeiros e os últimos, estão escritos no livro dos reis de Judá e Israel.
12 आपल्या राज्याच्या एकोणचाळीसाव्या वर्षी आसा पायाच्या दुखण्याने बेजार झाला. त्याचा आजार खूप बळावला तरी त्याने दुखण्यात परमेश्वराचा धावा केला नाही. त्याने वैद्यांकरवी इलाज करून घेतला.
12 E Asa, no trigésimo nono ano do seu reinado ficou enfermo dos seus pés, até que a sua enfermidade ficou mui grande; contudo na sua enfermidade ele não buscou ao SENHOR, mas aos médicos.
13 आपल्या कारकिर्दीच्या एक्केचाळीसाव्या वर्षी आसा मरण पावला व आपल्या पूर्वजांबरोबर त्याने चिरविश्रांती घेतली.
13 E Asa dormiu com os seus pais, e morreu no quadragésimo primeiro ano do seu reinado.
14 दावीद नगरात त्याने आधीच स्वत:साठी करून घेतलेल्या कबरीत लोकांनी त्याचे दफन केले. विविध सुवासिक द्रव्ये आणि मसाले घातलेल्या बिछान्यावर लोकांनी त्यास ठेवले. त्याच्या सन्मानाप्रीत्यर्थ त्यांनी मोठा जाळ केला.
14 E eles o sepultaram em seu próprio sepulcro, que ele havia feito para si, na cidade de Davi, e o deitaram no leito que estava cheio de perfumes e diversos tipos de especiarias preparadas pela arte dos boticários; e fizeram uma queima mui grande para ele.

Ler em outra tradução

Comparar com outra

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar 2 Crônicas 16, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.